पापलेट फ्राय रेसिपी Paplet Fry Recipe in Marathi आपण बऱ्याच रेसिपी पाहिल्या परंतु पापलेट फ्राय ही रेसिपी बऱ्याच लोकांची खूपच आवडती रेसिपी असून पापलेट फ्राय कशी तयार करायची ही बऱ्याच लोकांना माहीत नाही. पापलेट फ्राय करण्याआधी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी लागते. तसेच त्यावर आडवे काप देऊन त्याला लिंबू रस चोळून लावावा लागतो. त्यानंतर हळद व आलं लसूण पेस्ट लावावी लागते. नंतर ते झाकून ठेवावे लागते. झाकून ठेवल्यानंतर ती फ्राय करावी लागते. तर चला मग आज आपण पापलेट फ्राय रेसिपी विषयी माहिती जाणून घेऊया.
पापलेट फ्राय रेसिपी Paplet Fry Recipe in Marathi
रेसिपी प्रकार :
अनेक जणांना आपल्या आहारामध्ये मासे खाणे आवडते. मासेप्रेमी म्हणजेच कोकण किनार पट्ट्याकडे राहणारे लोक तर मासे आणि भात असा त्यांचा आहार असतो. जसे कोळंबी रेसिपी फ्राय पापलेट माशांचे कालवण इ. मासे खाणे आपल्या शरीरासाठी तसेच आरोग्यासाठी हिताचे असते. पापलेट फ्राय ही रेसिपी फिश फ्रायमध्येच येते. पापलेट फ्राय या रेसिपी विषयी बोलायचे झाले तर आपण फिश फ्राय रेसिपी विषयी सविस्तर माहिती पाहिली आहे. परंतु पापलेट फ्राय करत असताना त्यामध्ये थोडा बदल करावा लागतो. पापलेट फ्राय ही रेसिपी वेगवेगळ्या पद्धतीने तयार केली जाते. रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये पापलेट फ्राय बऱ्याचदा आपण मागवतो परंतु तेथील महागडे रेट आपल्याला न परवडणारे सारखे असतात. म्हणून आपण आपल्या घरीच पापलेट फिश आणून पापलेट फ्राय रेसिपी तयार करू शकता. तेही अगदी झटपट चविष्ट व कमी वेळामध्ये तर चला मग जाणून घेऊया या रेसिपी साठी लागणारे साहित्य व पाककृती.
ही रेसिपी किती व्यक्तींकरता तयार होणार आहे ?
ही रेसिपी आपण दोन व्यक्तींकरता तयार करणार आहोत.
पूर्वतयारी करता लागणारा वेळ :
पापलेट फ्राय ही रेसिपी च्या पूर्वतयारी करता आपल्याला किमान 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
पापलेट फ्राय ही रेसिपी कुकिंग करण्याकरता 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.
टोटल टाईम :
पापलेट फ्राय रेसिपी पूर्ण करण्याकरता आपल्याला एकूण वेळ 20 मिनिटे एवढा लागतो.
पापलेट फ्रायसाठी लागणारे साहित्य :
1) मध्यम आकाराचा 2 पापलेट
2) 4 चमचे बेसन
3) एक चमचा आलं-लसूण पेस्ट
4) 2 चमचे लिंबू रस
5) अर्धा चमचा हळद
6) 2 चमचे फिश मसाला
7) एक चमचा लाल तिखट
8) गरजेनुसार रवा
9) एक चमचा धनेपूड
10) मीठ आणि तेल.
पापलेट रेसिपी तयार करण्याची पाककृती :
- वडा सांबर मराठी
- सर्वप्रथम आपल्याला पापलेट स्वच्छ धुऊन घ्यावी लागते, त्यानंतर त्यावर आडवे काप करून घ्यावेत.
- नंतर दोन्ही पापलेटला लिंबाचा रस चोळून लावावा.
- लिंबाचा रस लावल्यानंतर त्या पापलेटला हळद व आले लसूण पेस्ट लावून घ्यावी.
- ही पेस्ट छान काप केलेल्या भागांमध्ये व्यवस्थित लावून घ्यावी व छान अशी मॅरीनेट होण्यासाठी ते एक ते दीड तास बाजूला ठेवून द्यावी.
- त्यानंतर एका बाऊलमध्ये बेसन, लाल तिखट, फिश मसाला, धने पूड व मीठ एकत्र करून मिक्स करून घ्या.
- पापलेट मॅरीनेट झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या.
त्याला बेसन मिसळून केलेला मसाला छान लावून घ्या. - नंतर मसाला लावल्यावर पापलेट रव्यामध्ये टाकून दोन्ही बाजूला छान रवा चिटकला पाहिजे. व एका नॉनस्टिक पॅनमध्ये थोडं तेल टाकून छान परतून घ्या.
- त्यांवर पापलेट ठेवताना अलगद ठेवा, म्हणजे त्यातील मसाला बाहेर पडणार नाही. तसेच पापलेट चमच्याच्या सहाय्याने दाबून शेकून घ्यावे. असे केल्यामुळे पापलेट दोन्ही बाजूंनी खरपूस शेकला जातो.
- साधारण पाच मिनिटापर्यंत एक बाजू शिकली जाते. नंतर दुसरी बाजू ही तशीच शिकून घ्यावी.
- अशाप्रकारे दोन्ही बाजूंनी शिकून झाल्यानंतर पापलेट एका प्लेटमध्ये काढून त्यावर थोडा कोथिंबीर टाकून सर्व्ह करा. तुम्ही ही रेसिपी टोमॅटो सॉस किंवा सलाद सोबत खाऊ शकता.
पापलेट फ्रायमध्ये असणारे घटक :
पापलेट फ्राय हे एक लोकप्रिय रेसिपी आहे. यातील फिशमध्ये विविध घटक आहेत, जसे चरबी, कोलेस्टॉल, पोटॅशियम, कॅल्शियम, कार्बोहाइड्रेट, प्रथिने, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, लोह हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत.
फायदे :
पापलेट फ्राय खाल्ल्याने आपण निरोगी राहतो. यामध्ये असणारे घटक कॅल्शियम व प्रथिने आपल्या हाडे मजबूत ठेवतात.
पापलेट फ्राय खाल्ल्याने आपले डोळे व गुडघे चांगले राहतात, यातून आपल्याला फिश ऑईल मिळते.
चरबी, लोह, व्हिटॅमिन, हे सर्व घटक शारीरिक थकवा दूर करतात आणि शरीराची वाढ करतात.
तोटे :
पापलेट फ्राय जास्त प्रमाणात खाल्ल्याने आपल्याला पोटदुखी व मळ मळ होऊ शकते.
यामध्ये जास्त प्रमाणत तेल असते, तसेच यातील पौष्टिक घटक आपल्या शरीरात जास्त झाले तर आपण आजारी पडू शकतो.
म्हणून आपण पापलेट फ्राय योग्य प्रमाणात सेवन केली पाहिजे.
तर मित्रांनो, तुम्हाला पापलेट फ्राय रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा