मशरूम रेसिपी मराठी Mushroom Recipe In Marathi

मशरूम रेसिपी मराठी Mushroom Recipe In Marathi मशरूम मसाला हे मशरूम पासून बनवले जाते. हा एक स्वादिष्ट आणि पौष्टिक आहार आहे. भारतात विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे मशरूम रेसिपी बनवली जाते. हा शुध्द शाकाहारी पदार्थ आहे, जे लोक नॉनव्हेज खात नाही, त्याचासाठी मशरूम हा एक पर्यायी आहार आहे. मशरूममध्ये अनेक पौष्टिक घटक आहेत, जे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत. मशरूम हे लोकप्रिय आणि मसालेदार पदार्थ आहे. आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये पाहिले असेल किती स्वादिष्ट आणि मसालेदार मशरूम मसाला खायाला मिळते.

परंतु काही ग्रामीण तसेच शहरी भागात मशरूम मसाला मिळत नाही. काही लोकांना मशरूम रेसिपी खूप आवडते. पण त्यांचा परिसरात स्वादिष्ट मशरूम मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे. एकदम सोप्या पद्धतीने स्वादिष्ट मशरूम कशे बनवतात यांची रेसिपी, आता आपण मशरूम रेसिपी पाहणार आहोत.

 Mushroom

मशरूम रेसिपी मराठी Mushroom Recipe In Marathi

मशरूमचे प्रकार :

मशरूम हा एक स्वादिष्ट आणि मसालेदार पदार्थ आहे. मशरूम वेग-वेगळ्या प्रकारे बनवले जाते. यामध्ये मशरूम मसाला, मशरूम मटर मसाला, मशरूम पास्ता, मशरूम करी, मशरूम भाजी, बटर मशरूम, मलाई मशरूम मसाला हे सर्व प्रकार खायाला एकदम स्वादिष्ट आहेत.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
मशरूम ही रेसिपी आपण 5 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

मशरूमच्या पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ :

मशरूम तयार करण्यासाठी आपल्याला पहिले पूर्वतयारी करावी लागते, नंतर आपण लवकर मशरूम रेसिपी बनवू शकतो. यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

मशरूम कुकिंग करण्यासाठी आपल्याला 25 मिनिट वेळ लागतो.

टोटल टाईम :

मशरूम तयार करण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते. नंतर कुकिंग करावी लागते, यासाठी आपल्याला टोटल टाईम 45 मिनिट वेळ लागतो.

मशरूमसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) 200 ग्रॅम मशरूमचे तुकडे.
2) 2 टोमॅटो.
3) 2 कांदे.
4) 1 शिमला मिरची.
5) 3 ते 4 चमचे लसन-अद्रक पेस्ट.
6) 1 चमच हळद.
7) 2 चमचे मिरची पावडर.
8) 2 चमचे धनीया पावडर.
9) मीठ.
10) 1 चमच गरम मसाला.
11) 8 ते 10 काजू.
12) 1 चिमूट कस्तुरी मेथी.
13) कोथींबीर.
14) तेल.

पाककृती :

 • सर्वात प्रथम कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, शिमला मिरची स्वच्छ धुऊन घ्या, आणि नंतर बारीक चिरून घ्या.
 • नंतर कांदा पेस्ट, आणि लसन- अद्रक पेस्ट, काजू पेस्ट तयार करून नंतरच्या कामासाठी बाजूला ठेवा.
 • नंतर गॅस चालू करून गॅसवरती एक खोल तळाचा पॅन ठेवा, आणि आवश्यक तेवढे तेल टाकून गरम करा.
 • तेल गरम झाले की त्यामध्ये प्रथम लसन- अद्रक पेस्ट टाका, आणि परतवत रहा.
 • पेस्ट थोडा लालसर झाला की, त्यामध्ये कांदा पेस्ट टाका, आणि कच्चा वास आणि कांचा चांगला होये पर्यत परतवत रहा.
 • कांदा पेस्ट झाला की यामध्ये, बारीक चिरूलेले टोमॅटो टाका, आणि व्यवस्थित मिक्स करून मऊ होये पर्यत शिजवा.
 • नंतर यांमध्ये चिरलेली ढोबळी मिरची टाकून, 2 ते 3 मिनिट शिजवा, आणि परतवत रहा.
 • नंतर यामध्ये मिरची पावडर, धनिया पावडर, गरम मसाला, काजू पेस्ट आणि हळद टाकून, व्यवस्थित मिक्स करा.
 • नंतर यामध्ये थोडी कस्तुरी मेथी टाका, आणि आवश्यक तेवढे मीठ टाकून पूर्ण मसाला एकजीव करा.
 • मसाला पूर्ण झाला की, यामध्ये मशरूम स्वच्छ धुऊन मसाल्यात टाका. याबरोबर यामध्ये एक ग्लास पाणी टाकून चांगले मिक्स करा.
 • मसाला चांगला झाला की, मसाल्याचा सुगंध येणार आणि पूर्ण तेल बाहेर येणार आणि थोडे बुळ-बुळे येणार.
 • मशरूमला चांगली उकडी आली की, यामध्ये थोडी बारीक कोथिंबीर टाका, आणि 2 मिनिट चांगले शिजवू द्या.
 • नंतर गॅस बंद करा, आता आपले स्वादिष्ट आणि मसालेदार मशरूम मसाला खाण्यासाठी तयार आहेत.
 • मशरूम मसाला आपण भात, पोळी आणि भाकरी सोबत थोडा कांदा आणि लिंबू घेऊन खाण्याचा आनंद घेऊ शकतो.

मशरूममध्ये असणारे घटक :

मशरूम हा एक पौष्टिक आणि मसालेदार पदार्थ आहे. यामध्ये विविध घटक आहेत, जसे कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, चरबी, प्रथिने, प्रोटीन, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए, मॅग्निशियॅम हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत.

फायदे :

मशरूम सेवन केल्याने आपल्याला अनेक पौष्टिक घटक मिळतात, यामुळे आपले शरीर निरोगी राहते.

यामध्ये असणारे व्हिटॅमिन, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आपले हाड मजबूत ठेवतात.

यातील चरबी, आणि प्रोटीन आपल्या शरीरावर मासपेशी आणि चरबी वाढवतात, हे आपल्यासाठी खूप फायद्याचे आहेत.

तोटे :

मशरूम मसाला आपण जास्त प्रमाणात सेवन केला तर आपल्याला पोटदुखी होऊ शकते.

यामध्ये अनेक पौष्टिक घटक आहेत, तसेच अनेक गरम मसाले आहेत. यामुळे आपल्याला मळ-मळ होऊ शकते.

म्हणून मशरूम आपण योग्य प्रमाणात सेवन केले पाहिजे, ज्यामुळे आपण निरोगी राहू.

तर मित्रांनो, तुम्हाला मशरूम रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment