Saint Gora Kumbar Information In Marathi संत गोरा कुंभार हे विठ्ठलाचे परम भक्त होते. ते महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक थोर असे संत होते. त्यांचा सहवास संत नामदेव महाराज संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या काळातील होतात. त्यांना सर्वजण गोरोबा काका असे म्हणतात. संत गोरा कुंभार यांचे जीवन मात्र एक सर्वसाधारण कुटुंबामध्ये व्यतीत झाले होते. जरी ते सर्वसाधारण कुटुंबांमध्ये आपले जीवन व्यतीत करीत असले तरीसुद्धा त्यांनी विठ्ठलाच्या भक्तीमध्ये स्वतःला अर्पण करून दिले होते तसेच त्यांनी स्वतः विठ्ठलाचे नामस्मरण करत परमार्थ जपला. विठ्ठलाचे नामस्मरण करत असताना त्यांना कोणत्याही गोष्टीचे भान राहत नव्हते. अतिशय त्या नामस्मरणामध्ये लीन होत होते.

संत गोरा कुंभार यांची संपूर्ण माहिती Saint Gora Kumbar Information In Marathi
नाव | संत गोरा कुंभार |
जन्म | इ.स. 1267 |
गाव | तेरढोकी पंढरपूर जवळील |
वडील | माधव बुवा |
आई | रखुमाई |
पत्नी | संती आणि रामी |
व्यवसाय | कुंभार |
समाधी | 1317 तेरढोकी, जिल्हा उस्मानाबाद |
संत गोरा कुंभार यांचा जन्म:
संत गोरा कुंभार यांचा जन्म इसवी सन 1267 झाला. त्यांच्या जन्माविषयी दस्ताऐवज उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांची जन्माविषयीची माहिती आपल्याला पुरेपूर माहित नाही.
महाराष्ट्रात वसलेल्या तेर नावाच्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला असे म्हटले जाते. त्यांचा जन्म हा तेराव्या शतकात झाला. गोरा कुंभार हे कुंभार असल्यामुळे त्यांचा व्यवसाय मातीचे मडके घडवण्याचा होता.
जीवन:
तेर या गावांमध्ये गोरोबाकाका यांच्या घराण्याची परंपरा आपल्याला दिसून येते. त्यांची घराण्याची परंपरा ही धार्मिक वृत्तीची व सदाचारी वृत्तीची होती. ती येथील काळेश्वर या ग्रामदैवतांचे त्यांचे घराणे उपासक होते. दोघेही नवरा बायको कुंभार काम व कबाळ कष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.
सदाचारी अशा वृत्तीमुळे तेर गावातील माधव बुवांना संत म्हणून गावकरी ओळखत होते. माधव बुवांना आठ मुले झाली होती. त्यांना झालेली मुले जगत नव्हती त्यांनी आपली आठ मुले ही काळेश्वर जवळील स्मशानात गोरीत पुरवली होती.
माधव बुवा हे धार्मिक आणि सहिष्णुवृत्तीचे होते. काळेश्वरावर त्यांची भक्ती होती, सात मुले एका मागोमाग एक गेली परंतु आठवा मुलगा गोरोबा हा जिवंत राहिला. संत गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक असे थोर संत होऊन गेले आहेत. त्यांचा विवाह हा संतीशी झाला होता.
यांना एक गोंडस बाळ झाले. त्यांचा व्यवसाय कुंभार व्यवसाय असल्यामुळे त्यांना चिखलात मातीत, पाणी मिसळून मडके घडवणे व ती विकणे हे काम होते. हे काम करत असताना ते अतिशय मग्न होऊन श्री विठ्ठलाचे नामस्मरण करत असत.
संत गोरा कुंभार यांचे कार्य :
संत गोरोबाकाकांनी भागवत धर्माची प्रतिज्ञा भक्तीचा प्रचार केला तसेच भक्तीचा प्रसार सुद्धा त्यांनी केला. त्यांनी भक्ती आणि नामस्मरण या साधनांद्वारे करणे करे तो नरका नारायण होई…. म्हणजेच विठ्ठल भक्तच विठ्ठल होऊन गेले अशी त्यांची दृढ श्रद्धा होती. पंढरीच्या पांडुरंगाची त्यांनी किमया सर्वांना पटवून दिले आहे.
पंढरीच्या पांडुरंगाचे महात्म्य त्यांनी इतर सामान्य जणांना सांगितले आहे. त्यांच्या मते
तुझे रुप चित्ती राहो, मुखी तुझे नाम |
देह प्रपंचाचा दास, सुखे करी काम ||
त्यांनी या अभंगांमध्ये आपल्याला सांगितले आहे. नेहमीच आपले कोणतेही काम करीत असताना आपण वारकरी पंथामध्ये यावे तसेच बुक्का अबीर लावावा. गळ्यामध्ये माळ घालावी. पांडुरंगाचे नामस्मरण करत आपला जीवनक्रम नित्य नियमाने सुरू ठेवावा. शुद्ध अंतकरणाने आपण भक्ती भावाने देवावर श्रद्धा ठेवून पवित्र मनाने आपले काम सुरू ठेवावे. त्यामध्येच परमार्थ आहे संसारामध्ये राहून सुद्धा आपण देवाची भक्ती करू शकतो असे त्यांनी सांगितले आहे.
संत गोरा कुंभार यांच्या विषयी आख्यायिका :
संत गोरा कुंभार हे नियमित आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कामांमध्ये व्यस्त असतात परंतु काम करत असताना ते नेहमीच विठ्ठल नामामध्ये मग्न होऊन जात असल्यास त्यांना कोणत्याही कामाचे भान राहत नव्हते. कुंभार काम करत असताना पांडुरंगाचे गुणगान नेहमी त्यांच्या मुखातून यायचे.
एकदा त्यांची पत्नी पाणी भरायला गेली असताना मुलाला आपल्या अंगणामध्ये ठेवून गेली. त्यावेळी अंगणात गोराबा कुंभार माती तुडवीत होते. नामसकीर्तनामध्ये ते एवढे तरलिन झाले होते की, अंगणात रांगणारे बाळ त्यांच्याकडे येत असल्याने त्यांना भान सुद्धा राहिले नाही.
बाळ जवळ येऊन मातीच्या आळ्यात पडले आणि गोरा कुंभार त्यांच्या पायाखाली त्या बाळाला तुडवले गेले. विठ्ठलाच्या भजनामध्ये नामामध्ये गोरा कुंभार एवढे मग्न झाले होते की, त्यांच्या हे लक्षात सुद्धा आले नाही की मुल रडत आहे. पाणी घेऊन आलेल्या त्यांच्या पत्नीने अंगणात आपल्या चिमुकल्याला शोधले परंतु तिला दिसले नाही.
तिचे लक्ष गोरा कुंभार तुडवीत असलेल्या मातीकडे गेले तेव्हा माती रक्ताने लाल झालेली तिला दिसली आणि तिने हंबरडा फोडला कांत केला. तेव्हा तिच्यावर आणि गोरा कुंभारावर आभाळ कोसळले परंतु पांडुरंगाची भक्ती मुळे आणि त्यांच्या श्रद्धेमुळे त्यांची मूल हे जिवंत झाले. हे आख्यायिका खूप प्रसिद्ध आहे.
संत गोरा कुंभार यांचे अभंग :
संत गोरा कुंभार यांची काही अभंग आजही गायले जातात. संत गोरा कुंभार हे वारकरी संप्रदायातील असल्यामुळे विठ्ठलाचे खूप मोठे भक्त होते. त्यांनी अनेक अभंग लिहिलेले आहेत. त्यांचे अभंग हे रसाळ वाणीचे समजेल अशा भाषेमध्ये आहेत.
निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे |
तव झालो प्रसंगी गुणातीत ||
माझं रुप नाही नाव सांगू काही |
झाला बाई काही बोलू नये ||
बोलता आपली जीव्हा पैं खादली |
खेचरे लागली पाहता पाहता ||
म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी |
सुखा सुखी मिठी पडली कैसी ||
मुकिया साखर चाखाया दिधली |
बोलतं हे बोली बोलवेना ||
तो काय शब्द खुंटला अनुवाद |
आपला आनंद आधाराया ||
आनंदी आनंद गिळूनि राहणें |
अखंडित होणे न होतिया ||
म्हणे गोरा कुंभार जीवन मुक्त होणें |
जग हे करणे शहाणे बापा ||
संत गोरा कुंभार यांची समाधी :
संत गोरा कुंभार यांनी समाधी शके 1239 चैत्र कृष्ण त्रयोदशीला घेतली. त्यांचे समाधी मंदिर हे उस्मानाबाद जिल्ह्यामधील तेरढोके या गावांमध्ये आहे. त्या ठिकाणी असलेले त्यांचे घर आणि मुलं तुडवलेली जागा आजही आपण पाहू शकतो.
FAQ
संत गोरा कुंभार हे कोणत्या देवाचे नामस्मरण करत असत?
पंढरीचे पांडुरंग या देवतेचे नामस्मरण करत असत.
संत गोरा कुंभार यांचा जन्म कोठे झाला?
महाराष्ट्रातील तेर या गावांमध्ये संत गोरा कुंभार यांचा जन्म झाला.
संत गोरोबा कुंभार यांच्या पत्नीचे नाव काय होते?
संत गोरोबा कुंभार यांच्या पहिल्या पत्नीचे नाव संती असे होते.
संत गोरोबा कुंभार यांची समाधी कोठे आहे?
उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरढोके या गावांमध्ये संत गोरोबा कुंभार यांची समाधी आहे.
संत गोरा कुंभार यांनी समाधी कधी घेतली?
संत गोरा कुंभार यांनी समाधी शके 1239 चैत्र कृष्ण त्रयोदशीला घेतली.