Pratibhatai Patil Information In Marathi प्रतिभाताई पाटील ह्या भारताच्या बाराव्या राष्ट्रपती होत्या तसेच त्यांनी 2007 ते 2012 पर्यंत राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली. भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमलेल्या ह्या सर्वप्रथम महिला होत्या. प्रतिभाताई पाटील यांनी आपल्या जीवनाची सुरुवात एका सामाजिक कार्याने केली व नंतर गांधीवादी विचारामुळे सक्रिय राजकारणात त्या सहभागी झाल्या. राष्ट्रपती होण्यापूर्वी त्या राजस्थानच्या सोळाव्या राज्यपाल व प्रथम महिला राजस्थान राज्यपाल सुद्धा होत्या. त्यापूर्वी त्या राज्यसभेच्या उपसभापती व 1962 ते 1985 दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार तसेच विविध खात्याच्या मंत्री सुद्धा होत्या.
प्रतिभाताई पाटील यांची संपूर्ण माहिती Pratibhatai Patil Information In Marathi
नाव | श्रीमती प्रतिभाताई पाटील |
जन्म | 19 डिसेंबर 1934 |
जन्म ठिकाण | जळगाव खान्देश जिल्हा |
वडील | नारायणराव पाटील |
पती | डॉ. देवसिंह रणसिंह शेखावत |
मुले | राजेंद्र सिंह आणि ज्योती |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
जन्म व बालपण :
प्रतिभाताई यांचा जन्म एका राजकीय घराण्यामध्ये झाला होता. त्यांचा जन्म हा 19 डिसेंबर 1934 रोजी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नारायणराव पाटील होते तसेच त्यांचे वडील स्वतः एक राजकारणी होते. त्यांच्या वडिलांच्या कार्यामुळेच प्रतिभाताई ह्या प्रभावित झाल्या आणि त्या सुद्धा राजकारणाकडे वळल्या.
प्रतिभाताई पाटील यांची बालपण खूप सुखात केले. त्यांची आई त्या लहान असताना वारली. त्यानंतर प्रतिभाताई आणि त्यांच्या भावंडांची संपूर्ण देखरेख ही त्यांच्या वडिलांनी आणि इतर नातेवाईकांनी केली. त्यांच्या वडिलांनी त्यांच्या भावंडावर चांगले संस्कार केले.
त्यांना हे संस्कार पुढे कामे आले. त्यांच्या वडिलांनी दिलेले संस्कार, काम करण्याची जिद्द आणि हुशार व्यक्तिमत्व तसेच व्यवहारातील ज्ञान या सर्वांचीच ओळख त्यांना झाली तसेच प्रतिभाताई पाटील या सर्वच गुणांमुळे भारताच्या राष्ट्रीय पदावर सुद्धा विराजमान झाल्या होत्या.
प्रतिभाताई यांचे शिक्षण :
प्रतिभाताई पाटील ह्या खूप हुशार होत्या त्यांना वडिलांकडून चांगले संस्कार मिळणे आणि त्यांचे भविष्य सुद्धा उज्वल झाले. शिक्षणामध्ये प्रतिभाताई यांचे भविष्य चांगले व्हावे या उद्देशाने त्यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी प्रेरित केले. प्रतिभाताई यांचे प्राथमिक शिक्षण हे जळगावमध्ये झाले.
त्यानंतर त्यांनी जळगावमधील आर. आर. या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केले व पुढची पदवी घेण्यासाठी त्यांनी पुणे विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला. तेथे त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे वडील वकील होते, त्यामुळे प्रतिभाताईंना वकिलीचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा प्रेरणा मिळाली आणि त्याचा उपयोग प्रतिभाताई यांना त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये झाला.
त्यांनी मुंबईच्या शासकीय महाविद्यालयातून वकिलीचा अभ्यास पूर्ण केला तसेच अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यामध्ये प्रतिभाताई यांनी एम.ए. ही पदवी सुद्धा मिळवली. शिक्षण पूर्ण करता करता त्यांना खेळामध्ये रुची निर्माण झाली आणि मैदानी खेळ खेळणे त्यांच्या आवडीचे होते. त्या एक उत्तम टेबल टेनिस खेळाडू सुद्धा आहेत. त्यांनी आपल्या महाविद्यालयात आणि विद्यार्थ्यांमध्ये बऱ्याचदा प्रतिनिधित्व केले आहे. प्रतिभाताई या ब्युटी विथ ब्रेन असून त्यांनी कॉलेजमध्ये असताना त्यांची ब्युटी क्वीन म्हणून सुद्धा ओळख होती.
प्रतिभाताई यांचे वैयक्तिक जीवन :
प्रतिभाताई यांच्या आईचे निधन त्या लहान असताना झाले. त्यामुळे त्यांचे संगोपन त्यांच्या वडिलांनी व त्यांच्या नातेवाईकांनी केले. त्यामुळे त्यांना शिस्त तसेच इतर संस्कार त्यांच्या वडिलांकडून मिळाले. त्यांचे बालपण सुद्धा वडिलांच्या हाताखाली गेले. त्यामुळे प्रतिभाताईंना प्रत्येक कार्यामध्ये विशिष्ट शिस्त दिसून येते. त्यांनी शिक्षण पूर्ण केले त्यानंतर त्यांनी डॉक्टर देवसिंह रणसिंह शेखावत यांच्याशी विवाह केला.
देवसिंह यांनी सुद्धा सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये आवड असल्यामुळे नेहमीच प्रतिभाताई पाटील यांची साथ दिली व त्यांना पाठिंबा दिला. प्रतिभाताई यांचे पती देवसिंह हे प्रोफेसर होते. त्यामुळे शैक्षणिक विभागांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. प्रतिभाताई यांना दोन मुलं आहेत त्यामध्ये एक मुलगा राजेंद्र सिंह आणि दुसरी मुलगी म्हणजेच युती तिचे नाव आहे. प्रतिभाताई यांना टेबल टेनिस खेळाची खूप आवड होती.
राजकीय आयुष्य :
प्रतिभाताई राजकारणामध्ये येण्याआधी उत्तम समाजसेविका होत्या. त्यांना मनापासून समाजाची सेवा करणे खूप आवडायचे. त्यांच्या मते, समाजामध्ये बदल घडवून आणणे खूप गरजेचे होते तसेच त्यांनी सामाजिक कार्य करायला सुरुवात सुद्धा केली. स्त्रियांसाठी महिला होमगार्ड जी त्यांनी स्थापना केली. महिलांनी सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी व्हावे व पुढाकार घ्यावा, यासाठी त्यांनी गरीब होतकरू स्त्रियांसाठी संगणक, शिवणकाम इत्यादींचे प्रशिक्षण देणारे केंद्र सुद्धा सुरू केले.
कामामुळे आपल्या घरापासून दूर राहणाऱ्या स्त्रियांसाठी त्यांनी मुंबई, दिल्ली येथे वस्तीगृह स्थापन केले आणि महिलांनी सुद्धा तेथे शिक्षण घेणे गरजेचे आहे. परंतु गरीब आणि घरातल्या मुली किंवा मागासलेल्या मुली शिक्षणासाठी पैसे कुठून आणणार अशा विचाराने प्रतिभाताई यांनी अशा मुलींसाठी नर्सरी स्कूल सुद्धा सुरू केली. अमरावती येथे दृष्टीहींनासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापन केले. अनुसूचित जनजाती जमाती युवांसाठी जळगावमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज सुद्धा सुरू केले.
त्यानंतर समाजसेवा करत करत त्या राजकारणाकडे वळल्या. 1962 मध्ये त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. जळगाव मधून विभाग विधानसभा सदस्य म्हणून त्यांची निवड झाली होती. काँग्रेसकडून निवडणूक लढत होत्या. त्या सलग चार वर्ष मुक्ताईनगर विधानसभा सीट निवडून आल्या आणि एमएलए पदावर सुद्धा नियुक्त झाल्या.
1967 ते 1972 या काळामध्ये महाराष्ट्राची राज्यमंत्री म्हणून जन आरोग्य संसदीय कार्य आवास पर्यटन अशी मुख्य विभाग त्यांच्या हाताखाली होती. सगळी कामे विभाग आणि पद प्रतिभाताई पाटील यांनी अगदी मनापासून सांभाळले. 1972 मध्ये त्यांच्या कष्टाच्या बडावर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक सुद्धा त्यांनी जिंकली.
त्यानंतर महाराष्ट्र शासनात कॅबिनेट मंत्री म्हणून महत्त्वाचं पद त्यांच्या हाती आले आणि त्यांनी समाज कल्याण पर्यटन अशी महत्त्वाची विभाग सांभाळताना पुढचे काही वर्ष कॅबिनेट मंत्री म्हणून सुद्धा महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली. सांस्कृतिक व पुनर्वसन ही सर्वच विभाग त्यांनी सांभाळली. त्यानंतर 1979 ते 1980 हे दोन वर्ष त्या महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षप्रमुख बनल्या.
1980 मध्ये सलग पाच वर्ष निवडून येऊन विजय प्राप्त झाला आणि 1985 पर्यंत प्रतिभाताई पाटील महाराष्ट्र सरकार मध्ये कॅबिनेट मंत्री होऊन बाकीची सर्व खाती सांभाळत होत्या. त्यानंतर त्यांनी 1986 मध्ये राज्यसभेत उपसभापती पद सुद्धा मिळवले.
1991 पर्यंत राज्यसभेत कार्य करत असताना पहिल्यांदा त्यांनी अमरावतीमध्ये निर्वाचन क्षेत्रात संसदीय सदस्य हे पद मिळवले. प्रतिभाताई यांची राजकीय कारकीर्द पाहून त्यांना दिलेले सर्व विभाग व्यवस्थित सांभाळत होते.
त्यामुळे त्यांना राजस्थानचा 24 वा राज्यपाल होण्याची संधी सुद्धा मिळाली. त्यानंतर 2007 ते 2012 हा काळ प्रतिभाताई पाटील यांच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा ठरला. त्यांना या काळामध्ये भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून मान मिळाला. त्यांनी या काळामध्ये सुद्धा कौतुकास्पद कार्य केले आहे. राजकारणात असून सुद्धा त्यांची सामाजिक कार्य थांबली नाही तर त्यांनी गरिबांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुद्धा राबवल्या.
FAQ
भारताच्या पहिली राष्ट्रपती महिलेचे नाव काय आहे
श्रीमती प्रतिभाताई पाटील.
प्रतिभाताई पाटील यांच्या वडिलांचे नाव काय होते?
नारायणराव पाटील.
प्रतिभाताई पाटील यांचा जन्म कधी झाला?
19 डिसेंबर 1934.
प्रतिभाताई पाटील या कोणत्या पक्षाच्या नेत्या होत्या?
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.
प्रतिभाताई पाटील यांचा विवाह कोणाशी झाला?
देवीसिंग रणसिंग शेखावत.