पोपट पक्षाची संपूर्ण माहिती Parrot Bird Information In Marathi

Parrot Bird Information In Marathi पोपट हा पक्षी आपल्या सर्वांचा ओळखीचा आहे.तसेच पोपट हा जगातील विविध सुंदर पक्षांमधील एक आहे. या पक्षाला हिंदीमध्ये तोता असे म्हणतात तर इंग्लिश मध्ये पॅरोट म्हणतात. पोपट ज्याला आपण प्रेमाने मिठू सुद्धा म्हणतो. पोपट हा वेगवेगळ्या प्रकारे तसेच रंगीबिरंगी पक्षी आहे. त्याचे वेगवेगळ्या देशांमध्ये अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. हाच पक्षी दक्षिण अमेरिका, अमेरिका आणि मेक्सिको मध्ये तर खूपच आश्चर्यकारक रंगांनी आकर्षक दिसतात. तर आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा पोपटाचे अनेक प्रकार आहेत.

Parrot Bird Information In Marathi

पोपट पक्षाची संपूर्ण माहिती Parrot Bird Information In Marathi

त्यांच्या रंग रूपांमध्ये विविधता आपल्याला दिसून येते. पोपटाच्या जगभर 300 पेक्षा जास्त प्रजाती आढळून येतात. पोपट हा एक हुशार पक्षी आहे तसेच तो खूप लोकांना पाडणे पसंत करतात. पोपट हा छोटा पक्षी आहे तर या पोपटाच्या काही प्रजाती थोड्या मोठ्या सुद्धा आहेत. पोपटाचे वैज्ञानिक नाव आपण पाहिले तर सीटकुला कॅमरी आहे. हा असा एक पक्षी आहे, जो आपण बोललेलं शिकू शकतो. पोपट रंग आणि आकार ओळखतो तसेच त्याला भाषा शिकवल्यानंतर सहज कळते व तो सुद्धा शिकू शकतो.

पोपट या पक्षाचे वर्णन :

पोपट हा पक्षी विविध रंगांमध्ये आपल्याला आढळतो पोपटाचा रंग पिवळा, लाल, पांढरा, निळा किंवा विविध रंगी असतो. पोपटाची सुरुवात ही एका अंड्यापासून होते तसेच त्याची उंची दहा ते बारा इंच एवढी असते. त्याच्या गळ्यामध्ये एकठी जितीचा रंग असते. पोपट हा जगातील सुंदर पक्षांपैकी एक पक्षी आहे. त्याचा रंग हिरवा, लाल चोच असते. त्यामुळे लोकांना त्याच्याकडे खूप आकर्षित करतो या रंगाच्या एकत्रितरणामुळे पोपट हा पक्षी आपल्याला अतिशय आकर्षक व सुंदर दिसतो.

पोपटाच्या वेगवेगळ्या प्रजाती आपण पाहिल्या आहेत पोपट हा पक्षी असा आहे. ज्याला माणसांमध्ये राहणे आवडते तसेच हा पक्षी माणसाची नक्कल सुद्धा करतो. हे पक्षी दरवाज्याची बेल, फोन रिंग, व्हॅक्युम क्लिनरचा आवाज असे वेगवेगळे आवाज सुद्धा काढू शकतात.

या पक्षाला जसे शिकवले जाईल तसे गाणे सुद्धा तो गातो. पिंजरामध्ये बंद करून ठेवले तर त्याला पिंजराची सवय सुद्धा लागते आणि पिंजरा सोडून तो कुठेही जात नाही, गेला तरी सुद्धा तो त्या पिंजऱ्यात परत येतो. या पक्षांची स्मरणशक्ती सुद्धा खूप जास्त असते.

पोपट या पक्षाचा आहार :

पोपट या पक्षाचे आवडते फळ पेरू आणि मिरची आहे. त्याचबरोबर हे पक्षी धान्य बियाणे, कीटक व कठीण फळं सुद्धा खातात. तसेच अन्नामध्ये शिजवलेला भात सुद्धा हा पक्षी खातो. जे पक्षी पिंजऱ्यामध्ये असतात, त्यांना विविध पदार्थ किंवा सफरचंद सुद्धा खायला घालतात.

पोपट या पक्षाचे प्रकार :

पोपट हा पक्षी दिसायला सुंदर व रंगी बेरंगीअसला तरी हे पक्षी उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये राहणे खूप पसंत करतात. या पक्षांच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत तसेच त्यांचे रंग व आकार सुद्धा आपल्याला भिन्नता दिसून येते. या पक्षामध्ये जाती सुद्धा अवलंबून आहेत. या पक्षांच्या 350 किंवा त्यापेक्षा जास्त जाती आढळून येतात. काही जातीमध्ये नर पोपट आणि मादी पोपट एकसारखेच आपल्याला दिसून येतात. तर पोपटांचे प्रकार आपण पाहूया. पोपटाच्या काही प्रसिद्ध जाती भारतात व जगभरामध्ये खूप प्रसिद्ध आहेत.

रेनबोव पोपट : हा पोपट विविध रंगाचा असतो आणि या इतर पक्षांपेक्षा दिसायला खूप सुंदर व आकर्षक असतो या पोपट जंगलामध्ये आढळून येतो व या पक्षाला काही लोक सुद्धा पाकडतात हे पक्षी मध्यम आकाराचे असून या पक्षाची लांबी ही 27 ते 30 सेंटिमीटर लांब असते आणि या पक्षाचे शेपूट हे दहा इंच एवढे लांब असते. हा पोपट कोठे आढळतो तर या प्रजातीचे पोपट हे ऑस्ट्रेलियाचे मूळ असून हे पक्षी घनदाट जंगले किंवा पाण्याच्या किनाऱ्यावर असणाऱ्या झाडांचे झुडपांवर आपले घरटे बनवतात व हे पक्षी अमृत, फळे इतर फळे बिया सुद्धा खातात. या पक्षाचे आयुष्य हे 16 ते 20 वर्ष असते.

कैक पोपट : या पोपटाची प्रजाती ही वेगवेगळ्या रंगांमध्ये आपल्याला दिसून येते. तसेच हा पोपट सुद्धा दिसायला खूप छान व आकर्षक असतो. या जातीच्या पक्षांमध्ये वेगवेगळे शेड आपल्याला दिसून येतात. जसे की, त्यामध्ये पिवळा, काळा, हिरवा, नारंगी व पांढरा या जातीच्या पोपटाला आपण जर पाहिले तर भारताच्या तिरंग्याची आपल्याला नक्कीच आठवण होईल कारण हा जास्त हिरवा, पांढरा आणि नारंगी रंगाचा असतो. या पोपटावर हे सर्वच रंग अतिशय आकर्षक दिसतात. या पोपटाला ब्लॅकहेडेड पोपट सुद्धा म्हटले जाते कारण या पोपटाच्या डोक्यावर काळा रंग असतो.

काळ्या रंगाचा एक ठिपका असतो. हा पोपट ब्राझील या देशांमध्ये आढळून येतो आणि हे पक्षी काही प्रमाणात भारतात सुद्धा आढळून येतात. या प्रकारचे पक्षी हे सर्वांना किंवा उष्णकटिबंधीय प्रदेशात राहणे पसंत करतात. या पोपटाचा आहार वनस्पतीची पाने, फुले आणि बिया आहे तसेच या पोपटाचे आयुष्य हे 40 वर्षापर्यंत असते.

आफ्रिकन ग्रे पोपट : आफ्रिकन ग्रे पोपटाला काँगो आफ्रिकन ग्रे पोपट या नावाने सुद्धा ओळखले जाते. हा पोपटाचा प्रकार अतिशय आकर्षक असून हे पक्षी मुख्यतः आफ्रिकेमध्ये आढळून येतात तसेच भारतामध्ये सुद्धा काही प्रमाणात या प्रजाती आढळून येतात. या पक्षाचा रंग राखाडी रंग असून त्याच्या डोळ्याच्या भोवती पांढरा गोल असतो आणि या पक्षाची चोच ही काळ्या रंगाची असते तसेच या पोपटाची लांबी 33 सेंटीमीटर असते व त्याचे वजन 400 ग्रॅम पर्यंत असते.

हे पोपट आफ्रिकेमधील काँगो, गाभण, घाणा, उलगंडा व अंगुला या प्रदेशात आढळून येतात. या जातीचे पोपट हे रेन फॉरेस्ट मध्ये राहणे खूप पसंत करतात तसेच या पोपटाचा आहार हा बेरी, धान्य, बिया आणि फळे आहे. या जातीच्या पोपटाचे आयुष्य साधारणपणे आपण जंगलांमध्ये पाहिलं तर 21 ते 23 वर्ष हे जगतात आणि जर या पोपटांना पिंजऱ्यामध्ये ठेवले तर त्यांचे आयुष्य 45 ते 50 वर्षापर्यंत वाढते.

ॲमेझॉन पोपट : ॲमेझॉन पोपट हे आकाराने खूप छोटे असतात तसेच त्यांचे शेपूट सुद्धा लहान असते हे पोपट पूर्णतः हिरव्या रंगाचे असतात व त्यांच्या डोक्यावर थोडासा ओवाल सारंग असतो. हे पक्षी कळपांमध्ये राहने पसंत करतात. या जातीचे पोपट खूपच कार्यक्षम असं आणि दिसायला सुद्धा ते सुंदर व आकर्षक असतात. त्यांची लांबी दहा ते बारा सेंटीमीटर असते. हे पक्षी दक्षिण अमेरिका, मेक्सिको, कॅरिबियन या देशांमध्ये आढळून येतात. हे पोपट फळे, बिया आणि वनस्पतीची कोवडी पाने खातात. या पोपटाचे आयुष्य 40 ते 50 वर्षे असते.

गलाह पोपट : या प्रजातीचा पोपट अतिशय दिसायला वेगळे व डोळ्याचे पारणे फेडण्यासारखा आहे. या पोपटांना कडपात राहायला खूप आवडते. या पोपटाचा रंग पांढरा, गुलाबी आणि राखाडी असतो. या पक्षाची लांबी 35 सेंटिमीटर असते व या पक्षाला रोज ब्रिसटेड पोपट नावाने सुद्धा ओळखले जाते. हे पक्षी आपले घरटे घनदाट जंगलामध्ये बनवतात तसेच हे पोपट बेर व इतर फळे सुद्धा खातात. त्यांचे आयुष्य 35 ते 40 वर्ष असते.

पोपट्या पक्षाचे उपयोग :

पोपट हा पक्षी बुद्धिमान आहे तसेच तो संवेदनशील सुद्धा आहे. त्याचा चांगला पाळीव पक्षी म्हणून उपयोग होतो. हे पक्षी आपल्या घरांमध्ये आवाज करतात. त्यामुळे घराची राखण सुद्धा होते. घरामध्ये कोणी आले गेले तर हे नजर ठेवतात. काही पोपटांच्या जातीचा उपयोग गणित क्षेत्रांमध्ये सुद्धा केला जातो. कोणत्याही गणिताचे उत्तर काही पोपटांच्या प्रजाती सहज सांगू शकतात. पोपटाचा उपयोग बऱ्याचदा आपण सर्कस मध्ये होताना सुद्धा पाहिलेला आहे.

FAQ

पोपट हे पक्षी काय खातात?

हे पक्षी फळे, धान्य, झाडाची कोवडी पाने, बिया खातात.

पोपट हे पक्षी किती वर्ष जगू शकतात?

पोपट या पक्षाच्या प्रजाती 20 पासून ते 70 वर्षापर्यंत सुद्धा जगू शकतात.

पोपट केव्हा बोलू शकतात?

जेव्हा ते बारा महिन्याचे होतात तेव्हा बोलणाऱ्याचे अनुकरण करतात व पोपट बोलू लागतात.

पोपट हा पक्षी कोणत्या वयात उडतो?

तीन ते चार महिन्या दरम्यान पोपट उडतात.

कोणत्या पोपटाचे आयुष्य सर्वात जास्त असते?

मोठे पोपट जास्त काळ जगतात. त्यामध्ये सर्वात जास्त जगणारी प्रजाती हायसिंथ मॅकाकही आहे.

Leave a Comment