पावभाजी रेसिपी मराठी Pav Bhaji recipe in Marathi

पावभाजी रेसिपी मराठी Pav Bhaji recipe in Marathi  पावभाजी हा शब्द कानावर ऐकू येतात चटकन तोंडाला पाणी सुटतं. आणि ती खावीशी वाटली तर आपल्याला बाहेर स्टॉलवर किंवा रेस्टॉरंट वर जावे लागते. परंतु तुम्ही स्वतः तुमच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातून अगदी साध्या सोप्या पद्धतीने रेस्टॉरंट सारखी पावभाजी घरीच बनवू शकता. कारण आज-काल लोकांची मनोवृत्ती ही खूपच आळशी प्रकारची झाली आहे सर्वांनाच रेडीमेड पदार्थ खायची सवय लागली आहे. कोणालाही कष्ट करावेसे वाटत नाही. परंतु आपण बाहेरची पावभाजी आणली असता आपल्या मनात अनेक प्रश्न पडतात. भाजी बनवण्यासाठी वापरलेली भाजी किंवा फळ धुतलेली असतील की नाही. त्यातच कोरोना सारख्या महामारी ची आधीच भीती वाटते. तर चला मग जाणून घेऊया पावभाजी कशी करायची. त्यासाठी लागणारे साहित्य. व किती लोकांकरिता बनवणार आहोत.

 Pav Bhaji

पावभाजी रेसिपी मराठी Pav Bhaji recipe in Marathi

वाढीव :

ही पावभाजी आपण 8 लोकांकरिता बनवणार आहोत.

पावभाजी तयार करण्यासाठी लागणारा वेळ :

पावभाजी म्हटलं की, त्यामध्ये वेगवेगळ्या पालेभाज्यांचे मिश्रण असते. ही पावभाजीची तयारी करण्याकरता किमान अर्धा तास वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

पावभाजी कुकिंग करण्याकरिता देखील अर्धा तास लागतो.

टोटल टाईम :

पावभाजी साहित्य तयार करण्यासाठी अर्धा तास तसेच पावभाजी कुकिंग करण्याकरता अर्धा तास एकूण एक तास पावभाजी तयार होण्याकरिता लागतो.

रेसिपीचे प्रकार

पावभाजी हा एक महाराष्ट्रीयन मराठी खाद्य प्रकार आहे तसेच तो महाराष्ट्रातील खूपच लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. पावभाजी हा खाद्यपदार्थ विशेषतः पुणे मुंबई या मोठ्या शहरांमध्येच प्रसिद्ध झाला आणि आता तो महाराष्ट्र राज्याच्या विविध खेड्यापर्यंत पोहोचला आहे.

पावभाजीसाठी लागणारे साहित्य :

पावभाजी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे.

1) पाच मध्यम आकाराचे कांदे.
2) दोन चम्मच आलं लसूण पेस्ट.
3) एक पाव फुल कोबी.
4) दीड ते दोन कप मटार.
5) चार ते पाच मध्यम आकाराचे बटाटे.
6) तीन हिरव्या शिमला मिरच्या.
7) चार ते पाच टोमॅटो किंवा टोमॅटो प्युरी.
8) चवीनुसार तिखट, मीठ.
9) पावभाजी मसाला. तो नसल्यास एवरेस्ट मसाला ही चालेल.
10) बटर, जितकं जास्त घ्याल तितकी पावभाजीला चव येईल.

पाककृती :

  • बाकरवडी मराठी
  • पावभाजी तयार करण्याकरिता सर्वप्रथम गोबी, मटार,सिमला मिरची स्वच्छ धुवून घ्याव्यात. नंतर त्या भाज्या चिरून घ्याव्यात. जास्त बारीक नाही चिरला तरी चालतील. चिरलेल्या भाज्या आपल्याला कुकरमध्ये टाकून वाफवून घ्यायचे आहेत. या भाषा अगदी मॅश होतील एवढ्या शिजवून घ्यायचे आहेत.
  • भाज्या शिजल्यानंतर त्यातील पाणी काढून घ्यावे व एका पसरट भांड्यात त्या मॅश करून घ्याव्या.
  • तसेच बटाटे उकडून घेणे ते उकडून झाल्यावर भाज्यांमध्ये एकत्र मॅश करून घालणे. त्यानंतर आता बटाटे व ह्या भाज्या मिश्रणात जेवढे अख्खा भाजीसाठी घालणार त्याच्या निम्मा पावभाजी मसाला घालून झाकून ठेवा. मसाला एकजीव झाला पाहिजे.
  • आपल्याला टोमॅटो उकडून घ्यायचे व त्याची प्युरी करून घेऊन गाळून घेणे आवश्यक असते.
  • आता आपल्याला ज्या भांड्यात भाजी करायची असेल त्यामध्ये बटर घाला. व बटर वितळू द्या.
    बटर तुम्हाला जेवढे घालायचे असेल तेवढे तुम्ही त्यामध्ये घालू शकता.
  • आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा परतून घ्या. कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत आणि त्याचा कच्चा वास जाईपर्यंत तो परतून घेणे गरजेचे असते.
  • आता त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून पुन्हा ते चांगलं परतून घ्या.
  • नंतर त्यामध्ये टोमॅटो प्युरी घाला.
  • आता त्यामध्ये तिखट मीठ व पावभाजी मसाला चवीनुसार घाला.
  • त्यानंतर बटाटे व भाजी मिश्रण यात घालून चांगलं एकत्रित करून झाकण ठेवा.
  • पावभाजी तुम्हाला जशी पाहिजे तशी पातळ किंवा घट्ट त्यानुसार त्यामध्ये पाणी घालणे.
  • भाजी शिजवून घ्या तशा भाज्या शिजलेल्या असतात पण सगळे फ्लेवर एकत्र व्हावे यासाठी दहा ते पंधरा मिनिट झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यावे.
  • आता त्यामध्ये थोडे बटर घालून पाच मिनिटे झाकण ठेवून घ्यावे.
  • आता गॅस बंद करून भाजी बाजूला काढून ठेवावी व पाव भाजून घ्यायचे आहे.

पाव भाजून घ्यायची कृती :

पावती सोबत पाव भाजून खाण्याची मजा वेगळीच आहे पाव भाजण्यासाठी आधी पावलास मधातून सुरीने कट करून घ्या. नंतर तव्यावर बटर घालून त्यावर पाव शेकून घ्या. नंतर ते पावभाजी सोबत खायला द्या.

पावभाजी सजावट :

पावभाजी सोबत बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा व लिंबाच्या फोडी देऊन पावभाजी सजावट करून घ्यावी.

रेसिपी पासून मिळणारे पोषक घटक :

पावभाजी मध्ये विविध फळभाज्याचा समावेश असल्यामुळे पावभाजीमध्ये शरीराला आवश्यक असणारे सर्वच घटक पौष्टिक असतात. पावभाजी मध्ये फॅट, कोलेस्ट्रॉल, सोडियम, कार्बोहायड्रेट पोटॅशियम आणि फायबर हे घटक असून प्रोटीन, व्हिटॅमिन ए, विटामिन सी, आयर्न इत्यादी पौष्टिक घटक असतात. त्यामुळे शरीराची रोग प्रतिकार क्षमता वाढते.

पावभाजी खाण्याचे फायदे :

पावभाजी खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात, कारण पावभाजी मध्ये मिक्स असलेले फळभाज्यांमधील सर्वच पौष्टिक घटक आपल्या शरीराला आवश्यक असतात.
त्यामुळे आपली रोगप्रतिकार क्षमता देखील वाढते.

पावभाजी खाण्याचे तोटे :

पावभाजी खाणे तसे आरोग्यासाठी हिताचेच आहे; परंतु वापरण्यात येणाऱ्या फळभाज्या ह्या स्वच्छ धुतलेल्या असाव्यात.

जर त्या फळभाज्या स्वच्छ धुतलेल्या नसतील तर त्यापासून आपल्या शरीराला हानी होईल व आपल्याला पोट दुखीचा त्रास होऊ शकतो.

तर मित्रांनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

Leave a Comment