पालक पनीर रेसिपी मराठी Spanish paneer recipe in Marathi

पालक पनीर रेसिपी मराठी Spanish paneer recipe in Marathi  आजकाल आपण पाहतो आहे की, मुलांना जेवणामध्ये पालेभाज्या नकोच असतात; परंतु पालेभाज्यांमध्येच एवढे विटामिन असते. त्याची लहान मुलांना कल्पनाही नसते. परंतु आता त्याची काळजी तुम्हाला करण्याची गरज नाही कारण आम्ही तुमच्या करिता घेऊन आलो आहोत, पालक पनीर रेसिपी. ज्यामध्ये पालक आणि पनीर यांच्यापासून हा पदार्थ तयार केला जातो. पालक पनीर हा भारतातील एक लोकप्रिय पदार्थ असून तो पूर्णतः शाकाहारी आहे. पालक पनीर या रेसिपी मध्ये फ्रेश व मलाईदार अशा पालक ग्रेव्हीमध्ये पनीर असते. यामध्ये भरपूर मसाल्यांनी युक्त अशी तुमची डिश ओवर डीप न करता. घरच्या घरीच सोप्या पद्धतीने पालक पनीर रेसिपी कशी बनवायची हे शिकून घ्या. तसेच पालक पनीर ही रेसिपी आपण जीरा राईस, पराठे, पोळी, साधा राईस यांच्या सोबतही खाऊ शकतो. उत्कृष्ट असं अप्रतिम असं जेवण तुम्ही घरच्या घरीच बनवू शकता.
तर चला मग जाणून घेऊया पालक पनीर रेसिपी कशी बनवायची तसेच त्याचे उपयोग.

Spanish paneer

पालक पनीर रेसिपी मराठी Spanish paneer recipe in Marathi

जाणून घेऊया पालक पनीर बनवण्यासाठी लागणारी सामग्री :

1) पालक पनीर बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पालकच्या चार जुळ्या स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या.

2) दोन चमचे अद्रक लसूणची पेस्ट.

3) बारीक केलेल्या चार ते पाच हिरव्या मिरच्या.

4) दोन कप दूध.

5) तीन चमचे फेटलेली क्रीम.

6) एक चमचा गरम मसाला पावडर.

7) एक चमचा कस्तुरी मेथी.

8) कापलेले पनीर फ्राय करून घ्या.

9) तीन मोठे टोमॅटो मिक्सर मधून काढून घ्या.

पालक पनीर बनवण्याची कृती :

पालक पनीर बनवण्यासाठी सर्वप्रथम पालक भाजी स्वच्छ धुऊन घेणे गरजेचे असते. ती भाजी धुवून घेतल्यानंतर उकळुन घ्या. नंतर त्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या बारीक करून टाका. पालकाला कमीत कमी दहा मिनिटे उकळून घ्या. त्याला थंड होऊ द्या व अर्धा मिनिट मेथीच्या कोरड्या पानांना तव्यावर मंद आचेवर परतून घ्या. पानं जळायला नकोत. कढईत तेल गरम होऊ द्या त्यामध्ये आल्याची पेस्ट परतून घ्या. पेस्ट परतून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाका आणि तेल सुटेपर्यंत ही टोमॅटोची प्युरी परतवा. त्यानंतर त्यात पालकाची पेस्ट आणि कोरडी मेथीची पानं मिसळा. हे एकत्र केल्यानंतर त्यामध्ये दूध टाका नंतर चवीनुसार गरम मसाला पावडर आणि तीन चमचे क्रीम आणि कापलेले पनीरचे तुकडे टाका. नंतर चवीनुसार मीठ टाका आणि दहा मिनिटे शिजवून घ्या. पालक पनीर टेस्ट करण्याआधी त्यामध्ये एक चमचा बटर तुम्हाला आवडल्यास टाका. अशाप्रकारे गरमागरम पालक पनीर रेसिपी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही पराठ्यासोबत किंवा जीरा राईस सोबत टेस्ट करू शकता. तुम्ही सुद्धा आपल्या घरी ही रेसिपी तयार करून बघा व रेस्टॉरंट पेक्षाही उत्तम अशी पालक पनीर रेसिपी घरच्या घरी बनवायला शिका.

आपण थोडक्यात पालक पनीरचे फायदे जाणून घेऊया :

पालक पनीरपासून तयार झालेली रेसिपी हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी आहे. पालक पनीर च्या या साध्या सरळ रेसिपीमध्ये समावेश केलेल्या घटकांमध्ये देखील पनीर, कांदे आणि टोमॅटो यांचा समावेश होतो. हे पदार्थ आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात.

पालक पनीर हा प्रथिनांचा स्त्रोत आहे आणि यामुळे वजन देखील वाढण्यास मदत होते. हे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीराची झालेली झीज देखील भरून निघते व आपले शरीर स्वस्थ राहते. पालक पनीर रेसिपी आठवड्यातून दोनदा तरी खाल्ली पाहिजे. यामुळे आपली रोगप्रतिकार क्षमता देखील वाढते.

या रेसिपीमध्ये आपण टोमॅटोचा समावेश केलेला आहे, त्यामुळे टोमॅटोमध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असते आणि हे शरीरातील रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यास उत्तम कार्य करते.

पालक ही भाजी अत्यंत आरोग्यदायी असून यामध्ये विटामिन ए सी कॅल्शियम लोह लुटिन मॅग्नेशियम पोटॅशियम आणि शरीराला फायदेशीर असणारे सर्वच घटक यामध्ये असल्यामुळे आपले डोळे, हृदय आणि शरीराच्या आरोग्याला देखील प्रोत्साहन देते.

तर मित्रांनो, तुम्हाला आजची ‘पालक पनीर’ ही रेसिपी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment