शिमला मिरची रेसिपी मराठी Shimla Mirchi Recipe in Marathi

शिमला मिरची रेसिपी मराठी Shimla Mirchi Recipe in Marathi  सिमला मिरची ही दिसायला ओबडधोबड असते परंतु ती खाण्यासाठी अत्यंत चविष्ट व तोंडाला पाणी सोडवणारी असते. शिमला मिरची मसालेदार बनवून खाण्याची मजाच वेगळी आहे शिमला मिरची बनवण्याची वेगवेगळ्या पद्धती आहेत. शिमला मिरची रेसिपी तुम्ही एकदा जर बनवली तर नेहमीच बनवत राहाल. शिमला मिरची सुकी आणि ग्रेव्हीची देखील बनवली जाते. शिमला मिरची व्हेज आणि नॉनव्हेज या दोन्ही प्रकारांमध्ये वापरली जाते. आजकाल चायनीज डिश यांना खूप प्राधान्य आहे त्यामध्ये तर शिमला मिरची आवर्जून वापरली जाते त्याशिवाय त्या रेसिपींना चवच येत नाही. तर चला मग आज आपण शिमला मिरचीच्या दोन रेसिपी पाहणार आहोत. जाणून घेऊया त्याविषयी सविस्तर माहिती.

Shimla Mirchi Recipe in Marathi

शिमला मिरची रेसिपी मराठी Shimla Mirchi Recipe in Marathi

रेसिपी प्रकार :

शिमला मिरची बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. सुकी शिमला मिरची ही शेंगदाणा पावडर टाकून किंवा बेसन टाकून देखील तयार केली जाते. तसेच शिमला मिरचीचा वेगवेगळ्या भाज्यांमध्ये देखील आपण वापर करू शकतो. जसे वेज मंचुरियन, नूडल्स, बेसन, अंडा भुर्जी, ग्रेव्ही सिमला मिरची इत्यादी प्रकारात मिरची रेसिपी तयार केली जाते तसेच शिमला मिरचीची भजी देखील चविष्ट लागतात. तर चला मग जाणून घेऊया या रेसिपी साठी लागणारे साहित्य व पाककृती.

ही रेसिपी किती व्यक्तींकरता तयार होणार आहे?
ही रेसिपी आपण पाच व्यक्तींकरता तयार करणार आहोत.

पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

शिमला मिरची रेसिपी च्या पूर्वतयारी करतात त्याला 5 मिनिटे एवढाच वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

शिमला मिरची कुकिंग करण्याकरिता आपल्याला 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम :

शिमला मिरची रेसिपी पूर्ण तयार करण्याकरता आपल्याला एकूण वेळ हा 15 मिनिटे एवढा लागतो.

1) सुकी शिमला मिरची रेसिपी :

सुकी शिमला मिरची रेसिपी तयार करण्यासाठी आपल्याला शिमला मिरची बेसन यांची आवश्यकता असते. तर चला मग बघूया अगदी सोप्या पद्धतीने सुकी शिमला मिरची रेसिपी कशी तयार करायची व त्यासाठी लागणारे साहित्य.

1) सहा शिमला मिरच्या
2) अर्धी वाटी हरभरा डाळीचे बेसन
3) दीड चमचा तेल
4) एक चमचा जिरे व धने पावडर
5) एक चमचा गरम मसाला
6) पाव चमचा हळद
7) अर्धा चमचा लाल तिखट
8) एक लिंबाचा रस
9) पाव चमचा हिंग
10) चवीनुसार मीठ

पाककृती :

 • एका नॉनस्टिक पॅनमध्ये तेल टाकून गरम करण्यासाठी ठेवा.
 • तेल गरम झाले की, त्यामध्ये जिरे हळद तिखट हिंग गरम मसाला जिरेपूड व धने पावडर तसेच चवीनुसार मीठ बेसन घालून छान परतून घ्या.
 • मसाले टाकत असताना गॅसचा फ्लेम मंद करून घ्या.
 • मसाले छान परतून झाले की, गॅस बंद करा व त्यामध्ये लिंबाचा रस घाला.
 • आता हे मिश्रण खूपच कोरडे झाले असेल तर काही थेंब पाणी घाला किंवा थोडेसे तेल टाका.
 • नंतर शिमला मिरच्या मध्यभागी कापून घ्या आणि त्यांची बिया काढून घ्या.
 • जास्त प्रमाणात घेऊ नका अन्यथा ते देखील जळेल.- आता गॅस बंद करा आणि त्यामध्ये आता आपण तयार केलेला गरम मसाला बेसन सारण भरून घ्या.
 • नंतर नॉनस्टिक पॅनमध्ये एक चमचा तेल घालून सर्व बाजूने मिरच्या शेकून घ्या.

अशाप्रकारे शिमला मिरची रेसिपी तयार आहे आता ही रेसिपी तुम्ही पोळी सोबत सर्व्ह करू शकता.

2) शिमला मिरचीचा सालन रेसिपी :

शिमला मिर्चीचा सालन ही रेसिपी अत्यंत चविष्ट व अप्रतिम लागते तर चला मग या रेसिपी विषयी सविस्तर माहिती बघूया.

साहित्य :

1) 5 शिमला मिरच्या
2) 4 चमचे तेल
3) 1 चमचा जिरे
4) 1 चमचा मोहरी
5) अर्धा चमचा मेथी दाणे
6) 2 चमचे भाजलेले आणि शेंगदाणे
7) 1 चमचा भाजलेले तीळ
8) 1 चमचा लाल तिखट
9) अर्धा चमचा हळद
10) आले लसूण पेस्ट एक चमचा
11) एक चमचा चिचेचा लगदा
12)अर्धा कप किसलेला नारळ
13) 7-8 कढीपत्त्याची पाने
14) एक छोटा कांदा बारीक चिरलेला
15) एक कप पाणी
16) चवीनुसार मीठ
17) अर्धा चमचा साखर

पाककृती :

 • सर्वप्रथम दोन चमचे तेल एका कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवा.
 • आता तेल गरम झाले की, सिमला मिरचीच्या बिया काढून घ्या व पाच मिनिटे मिरच्या तेलामध्ये तळून घ्या.
 • मिरच्या तळून झाल्या की, एका प्लेटमध्ये काढून घ्या. नंतर त्याच कढईमध्ये थोडेसे तेल घालून जिरे, मेथी, मोहरी, शेंगदाणे, तीळ, तिखट, आले लसूण पेस्ट, चिंच, नारळ घालून घ्या. नंतर कढीपत्ता व कांदा घालून सर्व मिश्रण भाजून घ्या.
 • नंतर त्यामध्ये थोडेसे मीठ घाला व सर्व मिश्रण कढाईमध्ये घाला. पाच ते सहा मिनिटे शिजवून घ्या व त्यामध्ये थोडे पाणी व साखर घाला.
 • नंतर हे मिश्रण छान उकळी येईपर्यंत शिजवून घ्या. गरमागरम रेसिपी तयार आहे. आता तुम्ही ही सर्व्ह करू शकता.

शिमला मिरचीतील पोषक घटक :

शिमला मिरची आपल्या आरोग्यासाठी अत्यंत पोषक आहे. त्यामध्ये विटामिन ए, व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन सारखे पोषक घटक असतात. तसेच महत्त्वाचे जीवनसत्वे असतात. जी आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात.

फायदे :

शिमला मिरची खाणे आपल्या आरोग्यासाठी हिताची आहे. सिमला मिरचीच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत होते. तसेच शिमला मिरचीतील गुणकारी तत्त्वामुळे हृदयाच्या शिरा देखील बंद होत नाही.

मिरचीमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे आहारामध्ये शिमला मिरचीचा समावेश केल्यामुळे आपले हृदय निरोगी राहते.

सिमला मिरचीतील पोषक तत्व कॅन्सर सारख्या रोगापासून शरीराचा बचाव करण्याचे काम करूया यामधील गुणधर्म शरीरातून कॅन्सरच्या पेशी नष्ट करतात.

शिमला मिरची खाल्ल्यामुळे पोटाचे विकार अपचन, ऍसिडिटी किंवा गॅसेसच्या समस्या कमी होतात.

तोटे :

शिमला मिरची खाणे आरोग्यदायी असली तरी तिचा अतिरिक्त वापर करणे,आपल्याला हानिकारक ठरू शकतो किंवा शिमला मिरचीचा अतिरिक्त वापर केल्यामुळे रक्तदाब वाढू शकते.

तसेच हाय ब्लड प्रेशर असलेल्या व्यक्तींची तब्येत देखील बिघडू शकते. अशा व्यक्तीने शिमला मिरची खाणे टाळावे.

शिमला मिरचीमुळे शस्त्रक्रिया दरम्यान आणि शस्त्रक्रिया नंतर अधिक रक्तस्त्राव होऊ शकतो.

शिमला मिरचीचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे पोटदुखीचा त्रास किंवा ऍसिडिटीचा त्रास आपल्याला जाणवू शकतो.

तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट पण नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment