पिझ्झा रेसिपी मराठी Pizza recipe in Marathi

पिझ्झा रेसिपी मराठी Pizza recipe in Marathi पिझ्झा म्हटलं की, आपल्यासमोर पिझ्झाचे चित्र उभे राहते, विविध फळभाज्यांनी नटलेला पिझ्झा तसेच वरून चीज त्यामध्ये आणखीनच भर पाडते. पिझ्झा बेस जरी वेगवेगळ्या पिठापासून तयार असला तरी त्याचे टॉपिंग आपले मन वेधून घेते. तसे पाहिले तर पिझ्झा हा इटालियन पदार्थ आहे, परंतु तो आता सर्व जगभर पसरलेला असून अमेरिकेत तर खूपच प्रसिद्ध आहे. परंतु पिझ्झा बनवण्याची प्रत्येकाची पद्धत ही मात्र वेगळी असते.

पिझ्झा खायचा असेल तर आपल्याला ऑनलाइन बोलावे लागते किंवा मग बाजारात जावे लागेल. परंतु आता आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही. आम्ही तुमच्याकरिता खास पिझ्झा रेसिपीची माहिती घेऊन आलो आहोत. स्वतःच्या हाताने पिझ्झा कसा तयार करू शकता, त्याची स्टफिंग कशी करायची या सर्वांची माहिती या लेखामध्ये आहे तर तुम्ही नक्की हा लेख पूर्ण वाचा व घरच्या घरी यम्मी व टेस्टी असा पिझ्झा तयार करा.

Pizza recipe in Marathi

पिझ्झा रेसिपी मराठी Pizza recipe in Marathi

पिझ्झा प्रकार :

स्वतः पिझ्झा बनवून खाण्याची मजाच वेगळी असते. पिझ्झा वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आपल्याला बनवता येतो. पिझ्झामध्ये वापरण्यात येणारे स्टफिंग वरच पिझ्झाची कॉलिटी अवलंबून असते. पिझ्झा हा दोन प्रकारचा असतो. एक तर शाकाहारी किंवा मग मांसाहारी. पिझ्झावर घातल्या जाणाऱ्या शाकाहारी स्टफिंग मध्ये प्रामुख्याने टोमॅटो, कांदा, शिमला मिरची, मक्का, बेबी कॉर्न, मशरूम, अननस, पालक,
इत्यादी पदार्थांचा समावेश होतो तर मांसाहारी पिझ्झा मध्ये कोंबडी, डुक्कर, बकरा यांच्या मासाचा देखील वापर केला जातो. पिझ्झा रेसिपीच्या प्रकारांमध्ये पनीर पिझ्झा, अंडा पिझ्झा, नॉनव्हेज पिझ्झा, व्हेजिटेबल पिझ्झा इत्यादी असे अनेक प्रकार आहेत.
तर चला मग जाणून घेऊया पिझ्झा बेस तयार कसा करायचा व त्याची स्टफिंग कशी करायची.

पूर्वतयारीकरिता लागणारा वेळ :

पिझ्झा बेस तयार करण्याकरिता आपल्याला पूर्व तयारी करावी लागते पूर्व तयारी करता आपल्याला किमान 15 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

पिझ्झा कुकिंग करण्याकरता आपल्याला 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम :

पिझ्झा पूर्णपणे तयार होण्याकरता आपल्याला ऐकून 25 मिनिटे एवढा वेळ लागतो.

ही रेसिपी किती लोकांसाठी आहे ?
ही रेसिपी 2 जणांंकरता आहे.

पिझ्झा बनवण्यासाठी वापरण्यात येणारी सामग्री :

1) गव्हाचे आणि मैद्याचे पीठ प्रत्येकी दोन कप.
2) दोन चमचे तेल
3) ईस्ट
4) चीज
5) चिरलेला कांदा
6) चिरलेले टोमॅटो
7) चिरलेली शिमला मिरची
8) चवीपुरते मीठ
9) कोमट पाणी
10) इटालियन मसाला
11) अर्धा चमचा साखर

पाककृती :

 • सर्वप्रथम आपल्याला मैदा आणि पीठ चाळणीने गाळून घ्यायचे आहे.
 • नंतर त्यामध्ये तूप किंवा तेल मीठ आणि इटालियन मसाला टाकून हे पीठ चांगले मिक्स करून घ्या.
 • कणकेच्या मध्यभागी खड्डा करून त्यात साखर आणि कोमट पाण्यात इस्ट ऍक्टिव्हेट करा.
 • ईस्ट ऍक्टिव्हेट झाल्यानंतर आपले पीठ मळून घ्या. पिठाला लवचिकता येईल इथपर्यंत ते पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे.
 • नंतर पिठाच्या गोळ्याला तेल लावून ते एका भांड्यात वरून ओला फडका लावून पाच ते सहा मिनिटे ठेवा.
  उबदार ठिकाणी ठेवल्यास हे पीठ लवकर फुगते.
 • ओव्हन प्रीहीट करून घ्या आणि त्यामध्ये पिझ्झा बेक करण्यासाठी एक ट्रे तयार करा. त्या ट्रेला तेल आयलिंक आणि डस्टिंग करून घ्या.
 • मळलेल्या पिठाला 20 प्रमाणे आकार द्या आणि तो ट्रेमध्ये वरून काटेरी चमच्याने चोचे मारून घ्या.
 • साधारणपणे 250cc वर सहा ते सात मिनिटे पिझ्झा बेस बेक करून घ्यायचा आहे.
 • पिझ्झा बेक केलेल्या बेसवर बटर, सॉस, टोमॅटो कांदा, मीठ, चिली फ्लेक्स टाका आणि पिझ्झा आणखीन पाच मिनिटे बेक करा.
 • पाच मिनिटानंतर आपला गरमागरम पिझ्झा तयार आहे. पिझ्झाचे हवे त्या आकारात आपण भाग करून घ्या व सर्व्ह करा.

Homemade Bread Pizza:

ब्रेड पिझ्झा :

आपण पिझ्झा बेस बनवण्याची झंझट न ठेवता घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने झटपट ब्रेड पिझ्झा तयार करू शकतो. कारण प्रत्येकाच्या घरी ब्रेड तर असतातच. त्यामुळे ब्रेड पिझ्झा हा प्रकार बनवण्याकरता अतिशय सोपा आहे कधीही करण्यासारखा आहे आणि अगदी कमी वेळात तयार होणारा आहे. तर चला मग जाणून घेऊया झटपट तयार होणारा ब्रेड पिझ्झा.

लेट पिझ्झासाठी लागणारे साहित्य :

1) ब्रेडचे तीन ते चार स्लाईज
2) एक चमचा बटर
3) चिरलेला कांदा
4) चिरलेला टोमॅटो
5) चिरलेली शिमला मिरची
6) बेबी कॉर्न
7) चिरलेले मशरूम
8) पिझ्झा सॉस
9) टोमॅटो सॉस
10) एक चमचा ॲरेगॅनो
11) एक चमचा चिली फ्लेक्स
12) किसलेले चीझ
13) चवीपुरतं मीठ

पिझ्झा बनवण्याची पाककृती :

 • एका पॅनमध्ये एक चमचा बटर टाकून त्यामध्ये कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची थोडी परतून घ्या.
 • त्यामध्ये आवडत असलेले पिझ्झा सॉस, ऑरगॅनो, चिली फ्लेक्स मिक्स करा आणि गॅस बंद करा.
 • त्या मिश्रणामध्ये वरून थोडे मीठ मिक्स करा व तव्यावर ब्रेडचे स्लाईस बटर लावून एका बाजूने शेका.
 • दुसऱ्या बाजूने शेकत ठेवा आणि वरच्या बाजूकडून पिझ्झाचे मिश्रण त्या ब्रेडला लावा.
 • आणि वरून हवा तेवढा चीज घाला. चीज मेल्ट झालं की वरून ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स आणि सॉस टाकून सर्व्ह करा.
 • अशाप्रकारे गरमागरम ब्रेड पिझ्झा तयार आहे.

पिझ्झा मधील पोषक तत्व :

पिझ्झामधील पोषक तत्वांचा विचार केला असता, त्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या स्टफिंगवर पोषकत्व आधारित असतात. जसे आपण पनीर, चीज, टोमॅटो, टोमॅटो सॉस, ऑरेगॅनो, मशरूम यांचा उपयोग केला असता, त्यामधील सर्वच पोषक तत्व शरीरासाठी आवश्यक असतात. जसे की पनीर, चीज हे दुधापासून बनलेले असतात. त्यामुळे त्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, एनर्जी, विटामिन सी, कोलेस्ट्रॉल, प्रथिने, फॉलिक ऍसिड यांसारखे पोषक तत्व असतात.

फायदे :

आपण ज्या प्रकारचा पिझ्झा बनवला आहे, त्यामध्ये पोषक घटक असतील तर ते शरीरासाठी नक्कीच आवश्यक आहेत. जसे ऑरिगॅनोमध्ये असणारे पदार्थ रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यामध्ये मदत करतात. तसेच त्यामध्ये असणारा carvacrol घटक लिव्हरचं कार्य उत्तम ठेवण्यास मदत करते.

तोटे :

पिझ्झा मैद्यापासून तयार झालेला असतो. त्यामुळे त्याचा सर्वात मोठा परिणाम आपल्या हृदयावर किंवा पचनावर होतो. मैद्याचा पिझ्झा हा शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे पिझ्झा बनवताना नेहमीच गव्हाच्या पिठाचा उपयोग करा.

तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

Leave a Comment