Prafullachandra Roy Information In Marathi अनेक लोकांकडून दुर्लक्षित केले जाणारे आणि अनेकांना आवडणारे विज्ञान विषयातील क्षेत्र म्हणजे रसायन शास्त्राचे क्षेत्र होय. अनेक लोक या रसायनशास्त्रापासून दूर पळताना आढळून येत असतात, मात्र अनेकांनी यामध्ये कार्य करून देखील मोठी मजल मारलेली आहे. यामध्ये प्रफुल्लचंद्र रॉय यांची देखील वर्णी लागते. त्यांना रसायनशास्त्राचे संस्थापक जनक या नावाने देखील ओळखले जात असते. त्यांनी कलकत्ता विद्यापीठांमध्ये आपले डिप्लोमाचे शिक्षण घेतलेले असून, पुढील शिक्षणाकरिता त्यांनी परदेशी जाण्याचे ठरविले होते. तसेच त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेज या ठिकाणी रसायन शास्त्र शिकवत प्राध्यापक म्हणून देखील कार्य केलेले आहे.
प्रफुल्लचंद्र रॉय यांची संपूर्ण माहिती Prafullachandra Roy Information In Marathi
बंगाल केमिकल अँड फार्मासिटिकल लिमिटेड या कंपनीच्या स्थापनेमध्ये देखील त्यांचा मोठा वाटा असून, त्यांच्या पुढाकारानेच या कंपनीची स्थापना झाली होती. त्यांनी पाऱ्याचे नायट्रेट या संयोगाची रासायनिक सूत्र सापडले होते. त्याचबरोबर त्यांनी अनेक शोध प्रकाशित केलेले असून, त्यांची संख्या १०० पेक्षा ही अधिक आहे.
त्यांना रसायन क्षेत्रातील अतिशय उत्कृष्ट व्यक्ती म्हणून देखील ओळखले जात असते. भारताची मान उंचवणारे हे प्रफुल्लचंद्र रॉय यांच्या बद्दल आजच्या भागामध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत…
नाव | प्रफुल्लचंद्र रॉय |
जन्म दिनांक | २ ऑगस्ट १८६१ |
जन्मस्थळ | ररौली, जेसोर |
पदवी | आचार्य |
आईचे नाव | भुवन मोहिनी देवी |
वडिलांचे नाव | हरिश्चंद्र रॉय |
वडिलांचा व्यवसाय | जमिनीदार |
कार्य | रसायन शास्त्रामध्ये योगदान |
प्रफुल्लचंद्र रॉय यांचा जन्म आणि प्रारंभिक आयुष्य:
प्रफुल्लचंद्र रॉय हे अतिशय उत्कृष्ट रसायन शास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म २ ऑगस्ट १८६१ या दिवशी झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव हरिश्चंद्र रॉय, तर आईचे नाव भुवन मोहिनी देवी असे होते. त्यांचे वडील प्रसिद्ध जमीनदार होते, तर त्यांची आई गृहिणी असून त्यांना त्यांच्या कामामध्ये मदत करत असे.
प्रफुल्ल चंद्र रॉय यांचे शैक्षणिक आयुष्य:
प्रफुल्ल चंद्र रॉय हे लहानपणापासूनच अतिशय हुशार होते. त्यांनी १९७९ यावर्षी आपली नववीची परीक्षा उत्तीर्ण करून, मेट्रोपॉलिटिअन कॉलेज मध्ये पुढील अभ्यासाकरिता प्रवेश मिळवला होता. त्यानंतर अकरावी इयत्तेमध्ये त्यांना रसायनशास्त्र हा विषय वेगळा शिकायला मिळाला, आणि याच ठिकाणी त्यांना या विषयांमध्ये प्रचंड आवड निर्माण झाली.
त्यावेळी मिस्टर पॅटर्न नावाचे एक अतिशय उत्कृष्ट रसायन शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांच्या विविध शोधांमुळे प्रफुल चंद्र रॉय यांना चांगलीच प्रेरणा मिळाली होती. त्यांनी या मुळेच रसायनशास्त्राकडे संपूर्ण लक्ष देण्याचा निर्णय घेतला, आणि त्यामुळेच त्यांनी बाह्य विद्यार्थी म्हणून प्रसिडेन्सी कॉलेज येथे प्रवेश मिळवला.
येथे त्यांना अतिशय उत्तम प्रकारे विज्ञान शिकणे शक्य झाले. या विज्ञानाच्या अंतर्गत त्यांनी रसायनशास्त्र हा विषय खूपच चांगला अभ्यासला होता. पुढे भारतीय राज्य क्षेत्रातला अभ्यास पूर्ण करून त्यांनी पुढील अभ्यासाकरिता परदेशी जाण्याचे ठरविले, आणि त्यांनी एडीनबर्ग विद्यापीठांतर्गत प्रवेश मिळवला.
पुढे त्यांनी १८८५ या वर्षी पीएचडी हे शिक्षण देखील पूर्ण केले होते, आणि याच विद्यापीठांमध्ये त्यांनी १८७८ मध्ये डी एस सी ही पदवी प्राप्त केली होती. त्यांनी तांबे आणि मॅग्नेशियम या दोन धातूंवर अतिशय सखोल संश्लेषण केलेले असून, त्या कार्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक देखील करण्यात आले होते.
प्रफुल्लचंद्र रॉय यांचे करिअर:
आपले शिक्षण पूर्ण करून पुन्हा प्रफुल्लचंद्र रॉय हे भारतामध्ये आले होते. त्यांनी जुलै १८८९ पासून प्रेसिडेन्सी कॉलेज या ठिकाणी रसायनशास्त्र शिकवायला सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांना प्रतिमहा अडीचशे रुपये मिळत असत. या नोकरीनंतर त्यांच्या जीवनामध्ये अनेक आमूलाग्र बदल घडून आले.
त्यांना १९११ या वर्षी नाईट हूड या पदवीने सन्मानित करत प्राध्यापक या पदावर देखील नियुक्त करण्यात आले होते. मात्र त्यांनी हे कार्य १९१६ या वर्षी सोडले, आणि पुढील तब्बल वीस वर्षे अर्थात १९३६ पर्यंत त्यांनी एमेरिट्स प्राध्यापक या पदावर कार्य केले होते.
अमोनियम नायट्रेट या पदार्थाचे संश्लेषण:
प्रफुल्लचंद्र रॉय नेहमीच नवनवीन प्रयोग करत असत. असेच एकदा प्रयोगशाळेत कार्य करत असताना त्यांनी आम्ल आणि पारा या दोन घटकांना एकत्र केले, आणि त्याच दरम्यान मर्क्युरस नायट्रेट नावाचा एक उत्तम पदार्थ तयार झाला. या पदार्थांमध्ये त्यांनी पिवळ्या स्पटिकाची निरीक्षण करत, काही निरीक्षणे देखील नोंदवली होती.
त्यांनी हा लावलेला शोध अतिशय आश्चर्यकारक असण्याबरोबरच रसायनशास्त्राच्या क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण देखील होता, कारण तोपर्यंत हा पदार्थ कोणत्याही शास्त्रज्ञाला शोधता आला नव्हता. त्यांनी आपला शोध सार्वजनिक करत, जगभर प्रसिद्धी मिळवली होती.
पुढे त्यांनी शुद्ध अमोनियमचे नायट्रेट तयार करण्याची प्रक्रिया शोधून, त्या अंतर्गत नायट्रेटचे संश्लेषण केले होते. त्यांच्या या संशोधनाला केमिकल सोसायटी ऑफ लंडन येथे झालेल्या बैठकीमध्ये प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती.
स्वदेशी चळवळीत प्रफुल्लचंद्र रॉय यांचा वाटा:
प्रफुल्लचंद्र रॉय हे इंग्रज काळामध्ये होऊन गेलेले शास्त्रज्ञ होते. त्यांनी इंग्लंडला कच्चामाल निर्यात होताना बघितले, मात्र आपण कच्चामाल निर्यात करण्याऐवजी त्यापासून वस्तू तयार केल्या तर आपण जास्तीत जास्त नफ्याला या वस्तू निर्यात करू शकतो. या अंतर्गतच त्यांनी स्वदेशीचा पाया रोवला, आणि आपल्याच घरामध्ये १८९२ या वर्षी एक कारखाना देखील उभा केला होता. त्यामुळे भारतीय तरुणांना नोकरी मिळण्याबरोबरच येथे अनेक आर्थिक फायदा देखील होऊ लागला.
निष्कर्ष:
रसायनिक शास्त्र म्हटलं की अनेक जण तोंड वेडावताना दिसत असतात. कारण या रासायनिक शास्त्रामध्ये अनेक अवघड संज्ञा असून, त्याचा अभ्यास करणे अनेकांना अतिशय कंटाळवाणे वाटत असते. हा अतिशय गमतीचा विषय असून, त्यामध्ये योग्य रस घेऊन अभ्यास केला तर चांगल्या पद्धतीने आपण उत्तीर्ण होऊ शकतो.
लहानपणापासून प्रत्येक जण रासायनिक शास्त्र हा विषय शिकत असतो. मात्र अकरावी मध्ये गेल्यानंतर हा विषय सेपरेट शिकावं लागल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या मार्कवर परिणाम जाणवत असतो. विविध आम्ल, आम्लारी यांसह ऑरगॅनिक केमिस्ट्री हा विषय देखील अतिशय अवघड असतो.
आजच्या भागामध्ये आपण या रासायनिक शास्त्र विषयात प्रचंड मोठे योगदान दिलेले प्रफुल्लचंद्र रॉय यांच्या विषयी संपूर्ण माहिती बघितलेली असून, त्यांचे जीवन चरित्र जाणून घेतलेले आहे.
त्यामध्ये प्रफुल्लचंद्र यांचे जन्म व प्रारंभिक आयुष्य, त्याचबरोबर शैक्षणिक आयुष्य, त्याच जोडीने त्यांचे करिअरमधील प्रवास याबद्दल देखील जाणून घेतलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी अमोनियम नायट्रेट या पदार्थाचे केलेले संश्लेषण, स्वदेशी उद्योगांमध्ये त्यांनी दिलेले योगदान, त्याचबरोबर विविध चळवळीमध्ये त्यांचे असलेले कार्य, याबद्दल माहिती घेतलेली आहे. व त्यांच्या मृत्यूबद्दल देखील जाणून घेतलेले आहे.
FAQ
प्रफुल्लचंद्र रॉय यांचा जन्म कोणत्या दिवशी व कोणत्या ठिकाणी झाला होता?
प्रफुल्लचंद्र रॉय यांचा जन्म दिनांक २ ऑगस्ट १८६१ या दिवशी ररौली या जेसोर जिल्ह्यातील एका गावी झाला होता.
प्रफुल्लचंद्र रॉय यांच्या आईचे वडिलांचे नाव काय होते?
प्रफुल्लचंद्र रॉय यांच्या आईचे नाव भुवन मोहिनी देवी असे होते, तर वडिलांचे नाव हरिश्चंद्र रॉय असे होते.
प्रफुल्लचंद्र रॉय यांचे वडील आणि आई कोणकोणते व्यवसाय करत असतात?
प्रफुल्लचंद्र रॉय यांचे वडील त्यांच्या गावातील एक प्रसिद्ध जमीनदार व्यक्ती होते, त्याचबरोबर त्यांच्या आई या गृहिणी होत्या.
प्रफुल्लचंद्र रॉय यांनी कोणत्या क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे?
प्रफुल्लचंद्र रॉय यांनी रसायनशास्त्र या विषयांमध्ये आपले मोलाचे योगदान दिलेले आहे.
प्रफुल्लचंद्र रॉय यांनी कोणकोणत्या ठिकाणी शिक्षण घेतलेले आहे?
प्रफुल्लचंद्र रॉय यांनी अनेक नामांकित ठिकाणी शिक्षण घेतलेले असून, त्यामध्ये प्रेसिडेन्सी कॉलेज एडीनबर्ग विद्यापीठ इत्यादी ठिकाणांचा समावेश होतो.