Maharashtra Fort Information In Marathi महाराष्ट्राचा इतिहास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर गड किल्ले उभे राहतात. महाराष्ट्राला गडकिल्ल्यांचा मोठा वारसा लाभलेला असून, अगदी मोगल काळापासूनच भारतातील इतर राज्यांमध्ये देखील किल्ल्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राची संस्कृती ही किल्ल्यांशीच निगडित असून, छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास लाभणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये किल्ल्यांची संख्या खूप आहे.

महाराष्ट्रातील किल्ल्यांची संपूर्ण माहिती Maharashtra Fort Information In Marathi
या प्रत्येकाला एक इतिहास लाभलेला असून, छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा रीतीने परकीय मुघलांच्या आक्रमणाला परतवून लावले, आणि महाराष्ट्रात स्वतःचे स्वराज्य स्थापन केले, या घटनेची साक्ष देणारे हे किल्ले महाराष्ट्राचे खरे वैभव समजले जातात. महाराष्ट्रामध्ये जलदुर्ग, गिरीदुर्ग, यासोबतच भुईकोट या प्रकारातील वेगवेगळे किल्ले आढळून येतात.
आजच्या भागांमध्ये आपण या महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांबद्दल माहिती बघणार आहोत. त्याचबरोबर त्यांच्या ऐतिहासिक महत्त्व व या ठिकाणी घडलेल्या काही किस्याबद्दल देखील जाणून घेणार आहोत. या माहितीच्या आधारे तुम्हाला गडावरच भटकंती करत असल्याचा अनुभव येईल, त्यामुळे हा लेख नक्कीच शेवटपर्यंत वाचा…
१. जंजिरा किल्ला:
महाराष्ट्रातील जोड किल्ल्यांच्या स्वरूपात असणारा जंजिरा किल्ला मुरुड जंजिरा या नावाने देखील ओळखला जातो. पाण्यात असलेला हा किल्ला जलदुर्ग प्रकारातील असून, त्याची निर्मिती १७ व्या शतकात मलिक अंबर नावाच्या राजाने केली होती. हा किल्ला अतिशय अद्वितीय व अजिंक्य स्वरूपाचा होता. या किल्ल्याच्या संरक्षणाकरिता तत्कालीन काळामध्ये सुमारे ५०० तोफा तैनात केलेल्या होत्या असे सांगितले जाते.
२. दौलताबादचा किल्ला:
दौलताबाद या किल्ल्याला देवगिरी या नावाने देखील ओळखले जाते. औरंगाबाद जवळ वसलेला हा किल्ला १४ व्या शतकात बांधण्यात आला होता, असे सांगितले जाते. महाराष्ट्रातील महत्त्वाचे किल्ल्यांमधील एक असणारा हा किल्ला अतिशय विलक्षण स्वरूपात होता. यावर मुघल, मराठा, पेशवे, यांसारख्या अनेक राजवटीने राज्य केलेले आहे.
३. शिवनेरी किल्ला:
महाराष्ट्रातील आराध्य दैवत व सर्वात प्रिय राजे म्हणून ओळखले जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म या शिवनेरी किल्ल्यावरच झालेला होता. समुद्रसपाटीपासून सुमारे साडेतीन हजार फूट उंचीवर असणारा हा किल्ला चढण्यासाठी फारसा अवघड नाही. या गडावर सर्वात प्रसिद्ध असणारे शिवाई मंदिर असून, येथे अनेक प्रकारच्या गुहा, विविध दरवाजे, शिवजन्म स्थळ इत्यादी महत्त्वाची प्रेक्षणीय स्थळे आहेत.
४. तोरणा किल्ला:
कुठल्याही कार्याची सुरुवात ही घराला तोरण बांधून केली जाते असे आपल्याकडे म्हटले जाते. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य सुरू करताना स्वराज्याचे तोरण बांधण्याकरिता तोरणा हा किल्ला जिंकला होता. या किल्ल्याला प्रपंचगड असे देखील नाव असून, पुण्यामध्ये असलेला हा किल्ला अतिशय दुर्गम भागामध्ये आहे.
पुण्यापासून अवघ्या ६० किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला पावसाळ्यामध्ये अतिशय उत्कृष्ट दृश्य व अनुभव यांसाठी ओळखला जातो. या ठिकाणी अनेक लोक दरवर्षी कॅम्पिंग आणि गिर्यारोहण देखील करत असतात. पायथ्यापासून सुमारे दोन ते तीन तास चढल्यानंतर आपण या किल्ल्याच्या वर पोहोचू शकतो.
५. प्रतापगड किल्ला:
छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या प्रराक्रमाचे आणि औरंगजेबाच्या वधाचे प्रतीक म्हणून या प्रतापगड किल्ल्याला ओळखले जाते. अतिशय दुर्गम डोंगरांमध्ये आणि झाडीमध्ये वसलेला हा किल्ला आज रस्त्यांच्या सोयीमुळे पोहोचण्यास सोपा वाटत असला, तरी तत्कालीन काळामध्ये हा किल्ला एक अवघड किल्ल्यांमध्ये ओळखला जात असे.
समुद्रसपाटीपासून १२०० मीटर उंच असणारा हा किल्ला महाबळेश्वर या हिल स्टेशन पासून अगदी जवळच आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडीचा किल्ल्यामधील एक किल्ला होता.
६. पुरंदर किल्ला:
स्वराज्याचे वारसदार म्हणून ओळखले जाणारे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म ज्या किल्ल्यावर झाला, तो किल्ला म्हणजे पुरंदर होय. पुरंदर हा किल्ला आज थोडासा मोडकळीच आला असला, तरी देखील त्याकाळी अतिशय भक्कम किल्ला म्हणून या किल्ल्याला ओळखले जात असे.
समुद्रसपाटीपासून पंधराशे मीटर उंच असला तरी देखील चढाई करण्यासाठी अतिशय सोपा किल्ला आहे. पायथ्यापासून वरपर्यंत अगदी एक तासांमध्ये आपण हा किल्ला चढू शकतो. पुरंदर हा किल्ला सासवड जवळ वसलेला असून, या ठिकाणी भारतीय सेनेने आपला तळ निर्माण केलेला आहे.
त्यामुळे येथे भेट देण्यासाठी काही मर्यादा पाळाव्या लागतात. या ठिकाणावर शेंदऱ्या बुरुज, खंडकडा, रामेश्वर मंदिर, पद्मावती तळे, बिनी दरवाजा, पुरंदरेश्वराचे मंदिर, यासारख्या उत्कृष्ट वास्तू बघण्यासाठी उत्तम आहेत.
७. सिंहगड किल्ला:
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा हा किल्ला पुण्याच्या नैऋत्य दिशेला वसलेला असून, अतिशय कठीण स्वरूपाचा किल्ला म्हणून याला ओळखले जाते. हा किल्ला तानाजी मालुसरे यांच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे झालेल्या युद्धाच्या नंतर गड आला पण सिंह गेला असे वाक्य उच्चारले होते. यावरून या किल्ल्याला सिंहगड असे नाव पडलेले आहे.
हा किल्ला पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचा असून, येथे अनेक लोक कॅम्पिंग व ट्रेकिंग करण्यासाठी येत असतात. या किल्ल्यावर भेट देण्यासाठी गडापर्यंत रस्ता बनवलेला असल्यामुळे, तुम्हाला फारसा त्रास घ्यावा लागत नाही. मात्र तुम्ही या किल्ल्याला भेट देण्याचा विचार करत असाल, तर शनिवार अथवा रविवार निवडू नये. कारण या ठिकाणी या दोन दिवसांसाठी खूप गर्दी अनुभवायला मिळते.
गड किल्ले हे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाचे वैभव आहेत. त्यामुळे या गडकिल्ल्यांच्या संवर्धन करणे गरजेचे आहे. आपण या किल्ल्यांच्या स्वच्छतेसाठी हातभार लावायला हवा. ते जमले नाही तर निदान आपल्यामुळे काही त्रास होईल असे वर्तन तरी करू नये.
निष्कर्ष:
महाराष्ट्र हा अतिशय वैभवशाली व दैदिप्यमान इतिहास लाभलेला असल्यामुळे प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीला आपल्या राज्याबद्दल नक्कीच अभिमान वाटत असतो. थोडेसे इतिहासात डोकावून बघितले, तर पूर्वीच्या काळी राजेशाही पद्धत अंमलात होती. आणि ज्या राजाकडे सर्वात जास्त गड किल्ले असतील तो राजा सर्वात बलाढ्य समजला जाई.
गडाच्या आसपास असणारा प्रदेश देखील त्या राज्याच्या अखत्यारीत येत असे, त्यामुळे जास्तीत जास्त किल्ले मिळवण्याकडे पूर्वीच्या राजवाड्यांचा कल असे. आजच्या भागामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये आढळणारा विविध किल्ल्यांची माहिती बघितली आहे.
त्यामध्ये जंजिरा, रायगड, दौलताबाद, प्रतापगड, राजमाची, सिंहगड, यासह महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या किल्यांचा समावेश आहे. या किल्ल्यांच्या माहितीच्या अंतर्गत तुम्हाला त्यांचे भौगोलिक स्थान, त्यांचा इतिहास, या ठिकाणी घडणाऱ्या काही महत्त्वाच्या गोष्टी, आणि या ठिकाणी बघितले जाणारे प्रेक्षणीय स्थळ इत्यादी माहिती वाचायला मिळाली असेल.
FAQ
महाराष्ट्र मध्ये असणाऱ्या बऱ्याचशा किल्ल्यांवर कोणाची सत्ता होती?
महाराष्ट्र मध्ये असणाऱ्या बऱ्याच किल्ल्यांवर स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची सत्ता होती.
महाराष्ट्र मध्ये कोणकोणत्या स्वरूपाचे गड किल्ले आढळून येतात?
महाराष्ट्र मध्ये साधारणपणे भुईकोट किल्ला, गिरीदुर्ग स्वरूपातील किल्ला, आणि जलदुर्ग प्रकारातील किल्ला इत्यादी प्रकारचे किल्ले आढळून येतात.
महाराष्ट्र मधील काही महत्त्वाच्या किल्ल्यांची नावे काय आहेत?
महाराष्ट्र मधील प्रत्येक किल्ला महत्त्वाचा आहे, मात्र त्यातील काही निवडक नावे घ्यायची ठरल्यास शिवनेरी, रायगड, तोरणा, पुरंदर, प्रतापगड, सिंहगड, सिंधुदुर्ग यांसारख्या किल्ल्यांचा समावेश होतो.
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला, व मृत्यू कोणत्या किल्ल्यावर झाला होता?
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. तर मृत्यू हा रायगड किल्ल्यावर झाला होता.
महाराष्ट्र मधील सर्वात जास्त किल्ले कोणत्या प्रकारचे आहेत व ते कुठे वसलेले आहेत?
महाराष्ट्र मध्ये असणारे किल्ले सर्वात जास्त प्रमाणामध्ये गिरीदुर्ग प्रकारातील असून, ते सह्याद्रीच्या उपरांगांमध्ये वसलेले आहेत.