रगडा पॅटीस रेसिपी मराठी Ragada Patis Recipe in Marathi

रगडा पॅटीस रेसिपी मराठी Ragada Patis Recipe in Marathi  रगडा पॅटीस, पाणीपुरी, शेवपुरी, भेळपुरी, रगडा चाट इत्यादी पदार्थांच्या आजकाल बरेच स्टॉल आपल्याला गल्लीत पाहायला मिळतात. तसेच यांची नावे ऐकताच आपल्या तोंडाला पाणी देखील सुटते. परंतु आपण जर हे सर्व पदार्थ किंवा यातील जे आवडतात. ते पदार्थ आपल्या घरी स्वतःच्या हाताने तयार केले तर किती मजा येईल आणि खाण्याचा आनंद देखील द्विगुणित होईल. रगडा पॅटीस ही एक प्रकारची चाट आहे. जी बनवायला अतिशय सोपी व चमचमीत अशी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. आणि ही रेसिपी बनवायला देखील कमी वेळ लागतो. अतिशय कमी वेळामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते. तर चला मग जाणून घेऊया या रेसिपी विषयी माहिती.

Ragada Patis

रगडा पॅटीस रेसिपी मराठी Ragada Patis Recipe in Marathi

रेसिपी प्रकार :

रगडा पॅटीस हे मुंबई व भारतातील इतर राज्यात देखील मिळते. ही एक प्रसिद्ध चाट असून ती खूप लोकप्रिय आहे. बरेच लोक सकाळी नाश्त्यामध्ये रगडा पॅटीस ही चाट खातात. रगडा आणि पॅटीस हे दोन्हीही वेगवेगळ्या रेसिपीज आहेत. रगडा हा चणाडाळ किंवा वटाण्यापासून बनवल्या जातो आणि पॅटीस हे बटाट्यापासून बनवले जाते. यामध्ये विविध मसाले मिक्स करून रगडा पॅटीस आणखीन चविष्ट बनवला जातो. ही अतिशय सोपी व चटकदार अशी रेसिपी आहे. तर चला मग जाणून घेऊया या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व पाककृती.

ही रेसिपी किती व्यक्तींकरता आहे ?
ही रेसिपी आपण 8 व्यक्तींकरता बनवणार आहोत.

पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

रगडा पॅटीस ही रेसिपी बनवण्याकरता आपल्याला काही पूर्वतयारी करावी लागते. त्या पूर्वतयारी करता आपल्याला 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

रगडा पॅटीस कुकिंग करण्याकरता आपल्याला 20 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाइम :

रगडा पॅटीस रेसिपी पूर्ण करण्याकरता आपल्याला 30 मिनिटे एवढा वेळ लागतो.

रगडासाठी लागणारे साहित्य :

1) 2 वाटी वाटाणे
2) 1 चमचा लाल मिरची पूड
3) 1 चमचा तेल
4) पाव चमचा मोहरी
5) पाव चमचा जिरे
6) एक चमचा आलं लसूण पेस्ट
7) एक चमचा गरम मसाला
8) एक चमचा कोथिंबीर
9) एक चमचा टोमॅटो बारीक चिरलेला
10) एक मोठा कांदा बारीक चिरलेला
11) एक चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची
12) अर्धा चमचा हळद
13) मीठ चवीनुसार

पॅटीस बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

1) अर्धा किलो उकडलेले बटाटे
2) एक चमचा आलं लसूण पेस्ट
3) पाव चमचा जिरेपूड
4) अर्धा चमचा धने पूड
5) पाव चमचा हळद
6) पावसाचा चाट मसाला
7) चवीनुसार मीठ
8) अर्धा चमचा लाल तिखट
9) अर्धा चमचा गरम मसाला
10) तीन चमचे कोथिंबीर
11) अर्धी वाटी ब्रेड क्रम्ब्स
12) आवश्यकतेनुसार तेल

रगडा पॅटीस बनवण्याची पाककृती :

  • वाटाणे रात्री भिजू घाला. सकाळी त्यातील पाणी झाडून स्वच्छ धुऊन घ्या व नंतर कुकरमध्ये तीन शिट्ट्या लावून शिजवून घ्यायचे आहे.
  • त्याआधी त्यामध्ये हळद, मीठ, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि चार कप पाणी घालून कुकर बंद करून गॅसवर ठेवा. तीन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर गॅसवरच राहू द्या.
  • तोपर्यंत रगडा तयार करून घेऊया. रगडा तयार करण्यासाठी आपल्याला गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल घाला व तेल छान गरम होऊ द्या.
  • तेल चांगले गरम झाले की, त्यामध्ये मोहरी, जिरे आणि लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो, लाल तिखट, हळद, गरम मसाला घालून परतून घ्या.
  • त्यामध्ये वाफलेले वाटाणे घालून आवश्यकतेनुसार पाणी घाला व ते शिजवून घ्या.
  • पॅटीस बनवण्यासाठी बटाटे उकडण्यासाठी ठेवा नंतर उकडलेले बटाटे थंड झाले की, स्मॅश करून घ्या.
  • त्यामध्ये हळद, मीठ, धने पूड, जिरे, लसूण पेस्ट, चाट मसाला आणि गरम मसाला, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि ब्रेड क्रम्ब्स घालून घ्या.
  • नंतर हे सर्व मिश्रण हाताच्या साह्याने एकत्र करून घ्या नंतर हातावर बटाट्याच्या मिश्रणाचा छोटा गोळा घेऊन त्याची पारी तयार करून पॅटीस बनवून घ्या.
  • हे पॅटीस तेलात तांबूस रंगाचे होईपर्यंत तळून घ्या.
  • आता पॅटीस गरम करून त्यावर रगडा घाला आणि वरून चिंचेचे आंबट गोड चटणी तसेच हिरवी चटणी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर आणि बारीक शेव घालून सर्व्ह करा.

पौष्टिक घटक :

रगडा पॅटीस चाट बनवण्यासाठी वाटाणे, आलू, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर व शेव इत्यादी घटकांचा वापर करतो. जे आपल्या शरीरासाठी पोषक असतात. तसेच त्यामध्ये असणारे पोषक आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढतात. रगडा पॅटीस चाटमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, विटामिन सी, विटामिन बी, कार्बोहायड्रेट, खनीज, क्षार, प्रोटीन इत्यादी घटक आढळतात.

फायदे :

रगडा पॅटीस चाट खाणे आपल्या शरीरासाठी हेल्दी आहे. सकाळी नाश्त्यामध्ये खाल्ल्यास पोट भरल्यासारखे वाटते व आपण उत्सुकतेने काम करतो.

शरीराला आवश्यक असणारे विटामिन देखील त्यामध्ये असतात. त्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

टोमॅटो आलू सारखे घटक आपल्या शरीरासाठी खूपच आवश्यक असतात. त्यामुळे विटामिन बी आणि विटामिन सी तसेच विटामिन डी आपल्या शरीराला मिळतात.

चाट खाल्ल्यामुळे आपले मूड फ्रेश होते, व कामातही मन लागते.

तोटे :

रगडा पॅटीस चाट खाल्ल्यामुळे ती खाण्याची सवय लागू शकते त्यामध्ये असलेले आलू किंवा चणाडाळ ही वातड असते.

त्यामुळे हाडे किंवा सांधेदुखीचा त्रास आपल्याला होऊ शकतो.

तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा तसेच ही रेसिपी घरी नक्की करून बघा व आम्हाला कळवा.

Leave a Comment