रवा जिलेबी रेसिपी मराठी Rava jalebi in Marathi

रवा जिलेबी रेसिपी मराठी Rava jalebi in Marathi  कधी कधी धार्मिक सण असो किंवा नसो आपल्याला गोडधोड खावेसे वाटते, त्यामध्ये खास करून जिलेबी सर्वांच्याच आवडीची आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत जिलेबी सर्वच खाऊ शकतात. बाहेरून विकत आणून जिलेबी तर सर्वच खातात; परंतु घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार करून बघा. स्वच्छ व चांगल्या तेलात किंवा तुपात आपण घरी तळू शकतो. आपल्याकडे वाढदिवस किंवा कोणताही कार्यक्रम असो त्यामध्ये गोड पदार्थ ठेवतात. तुम्हालाही जर जिलेबी रेसिपी विषयी जाणून घ्यायचे असेल तर ही माहिती खास तुमच्याकरिता आहे. चला तर मग जाणून घेऊया जिलेबी या रेसिपी विषयी माहिती.

Rava jalebi

रवा जिलेबी रेसिपी मराठी Rava jalebi in Marathi

रेसिपी प्रकार :

जिलेबी ही रेसिपी भारतातच नाही तर पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश इत्यादी देशांमध्ये देखील प्रसिद्ध आहे. जिलेबी ही मिठाई खाद्यपदार्थ असून रवा मैदा बेसन गव्हाचे पीठ आंबवून केले जाते. तसेच सर्वप्रथम तेलामध्ये तळले जाते व नंतर पाकामध्ये भिजवून बाहेर काढून ठेवले जातात. जिलेबी ही भारतीय उपखंड आणि इराणमध्ये खूपच लोकप्रिय आहे. जिलेबी बनविण्याच्या विविध पद्धती आहेत. तसेच आकारही वेगवेगळे आढळून येतात. रवा जिलेबी, खवा जिलेबी, मैदा जिलेबी, बेसन जलेबी व गुळाच्या पाकातील जिलेबी. तर चला मग जाणून घेऊया जिलेबी बनविण्याकरता लागणारे साहित्य व पाककृती.

ही रेसिपी किती जणांकरिता आहे?
ही रेसिपी आठ व्यक्तींकरता आहे.

पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

जिलेबीच्या पूर्वतयारी करता किमान 40 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

जिलेबी कुकिंग करण्याकरता आपल्याला 20 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम :

जिलेबी रेसिपी पूर्ण करण्याकरता आपल्याला एकूण 60 मिनिटे म्हणजेच एक तास एवढा वेळ लागतो.

साहित्य :

1) एक वाटी रवा
2) पाव वाटी मैदा
3) अर्धी वाटी फेटलेली दही
4) अर्धा चमचा बेकिंग सोडा
5) अर्धा चमचा ऑरेंज फूड कलर
6) अर्धी वाटी साखर
7) अर्धी वाटी पाणी
8) अर्धे लिंबू
9) अर्धा चमचा विलायची पावडर
10) तळण्याकरता तेल किंवा तूप

पाककृती :

  • सर्वप्रथम आपल्याला रवा, मैदा व खाण्याचा ऑरेंज रंग व दही टाकून एकसारखे मिश्रण करून घ्यायचे आहे. त्यामध्ये हळूहळू पाणी घालून मिश्रण घट्ट भिजवून घ्यायचे आहे.
  • हे मिश्रण अगदी घट्ट किंवा अगदी पातळही नको म्हणून व्यवस्थित मिश्रणात पाणी घालूनच मिश्रण तयार करावे.
  • जिलेबीचा आकार नीट पडेल पिठाचे असे मिश्रण करावे.
  • आता हे मिश्रण अर्धा ते पाऊण तास झाकण ठेवून भिजवायला ठेवून द्यावे. कारण त्यातील रवा छान मुरेल.
  • तोपर्यंत साखरेचा पाक बनवून घ्या.
  • एका पातेल्यामध्ये दोन वाटी साखर घालून त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घाला. त्याचा एक तारी पाक करून घ्यायचा आहे. त्या पाकामध्ये अर्धे लिंबू पिळून घ्या. आणि गॅस बंद करून वेलची पावडर टाका.
  • एका सपाट कढाईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा.
    तेल चांगले तापले की, जिलेबी पिठामध्ये सोडा घालून सगळं मिश्रण एकत्र मिक्स करून घ्या.
  • नंतर सॉसच्या बाटलीमध्ये किंवा एका कापडाला छिद्र पाडून त्यामध्ये जिलेबी पीठ घालून गोल – गोल आकारात जिलेब्या तेलामध्ये तळून घ्या.
  • जिलेब्या छान तळून झाल्या की, गरम गरम पाकामध्ये टाकावी. हे जिलेबी पाच ते दहा मिनिटे पाकामध्ये ठेवा. कारण पाक जिलेबीमध्ये छान मुरेल व जिलेबी खाण्यासाठी गोड लागेल.
  • अशाप्रकारे सर्व जिलेब्या थंड झाल्यानंतर एका डब्यामध्ये भरून ठेवा.
  • आपण नेहमीच खातो परंतु दिवाळीमध्ये किंवा सणासुदीला आपल्या घरी गरमागरम जिलेबीची चव चाखून बघा वेगळीच मजा येईल. तसेच गरम गरम जिलेबी आपण पाहुणे मंडळींना देखील सर्व्ह करू शकतो.

पोषक घटक :

रवा जिलेबी आरोग्यासाठी हेल्दी आहे. त्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, ऊर्जा थायमिन, फॉलिक ऍसिड, झिंक, कॉपर, शुगर, सोडियम आणि फॉस्फरस असतो. त्यामुळे जिलेबी खाल्ल्याचे आपल्याला अनेक फायदे देखील आहेत.

फायदे :

जिलेबी खाण्याचे फायदे पुढील प्रमाणे.

बऱ्याचदा आपला मूड फ्रेश करण्यासाठी किंवा तणाव मुक्त होण्यासाठी जिलेबी खाणे आवश्यक आहे. जिलेबी खाल्ल्याने आपण तणामुक्त किंवा फ्रेश होतो. तसेच मुले अभ्यास करताना मेंदूचा अधिक वापर करतात, त्यांना जिलेबी जरूर खायला द्यावी. त्यामुळे त्यांचा मूड प्रसन्न होतो.

जिलेबी खाल्ल्यामुळे श्वसनासंबंधी आजार देखील कमी होतात. दमा, सर्दी, खोकला यांसारख्या आजारावर दूध आणि जिलेबी खाल्ल्याने आराम मिळतो.

जर एखाद्या व्यक्तीला काविळची समस्या असेल तर जिलेबीचे सेवन करणे त्यांच्यासाठी खूप फायद्याचे आहे. कावीळच्या रुग्णांनी सकाळी रिकाम्या पोटी दोन जिलेब्या खाव्यात. काही दिवस असे केल्यास कावीळची समस्या दूर होते.

जिलेबी खाल्ल्यामुळे अशक्तपणा दूर होतो व रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते. ज्यांचे शरीर पातळ आहे अशांनी जिलेबीचे सेवन केल्यास त्यांना लवकर फायदा होतो.

तोटे :

जिलेबी खाणे जेवढे फायद्याचे आहे, तेवढेच मधुमेह किंवा रक्तदाब असणाऱ्या रुग्णांकरिता हानिकारक देखील आहे.

तुम्ही मधुमेहाचे पेशंट असाल, तर रोज जिलेबी खाणे तुमच्याकरिता हानिकारक ठरू शकते. जर तुम्हाला जिलेबी खायची असेल तर तुम्ही त्याचे प्रमाण ठरवू शकता.

जिलेबीच्या अति सेवनामुळे पोटदुखी व दातदुखी होऊ शकते, त्यामुळे जिलेबिचे सेवन प्रमाणातच करावे.

तर मित्रांनो, तुम्हाला जिलेबी रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा. व ही रेसिपी घरी करून बघायला विसरू नका.

No schema found.

Leave a Comment