गोडा रेसिपी मराठी Goda Masala Recipe in Marathi कोणतीही भाजी आपण बनवली तर त्याला मसाल्याशिवाय चवच नाही. मसाल्यांच्या विविध रेसिपीज आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने मसाला बनवला जातो. गोडा मसाला वापरून भाजीची चव वाढवली जाते. त्या भाज्यांमध्ये आमटी, मटकीची उसळ, भेंडीची भाजी, फोडणीचा भात, मसाले भात, शिमला मिरची इत्यादी रेसिपी बनवू शकतो. गोडा मसाला ही रेसिपी अगदी सोपी व झटपट तयार होणारी आहे. बऱ्याच लोकांना मसाल्याची रेसिपी माहीत नसते. त्यामुळे आपल्या भाज्यांची चव देखील व्यवस्थित होत नाही, म्हणून तुमच्याकरिता खास गोडा मसाला व कांदा लसूण मसाला ही रेसिपी आम्ही घेऊन आलो आहोत.
गोडा रेसिपी मराठी Goda Masala Recipe in Marathi
रेसिपी प्रकार :
आपण मसाल्यांची विविध प्रकार पाहिले आहेत. जसे काळा मसाला, गोडा मसाला, एव्हरेस्ट मसाला, कांदा मसाला, पंजाबी मसाला, स्पेशल गरम मसाला, मालवणी मसाला इत्यादी बनवण्याच्या पद्धती देखील वेगवेगळ्या आहेत. तर गोडा मसाला बनवण्यासाठी आपल्याला धने, जिरे, सुखे खोबरे, मीठ, तीळ, लवंग, दालचिनी, हिंग, हळद, लाल मिरची पावडर व तेल एवढे साहित्य लागते. तर चला मग पाहूया गोडा मसाला रेसिपी विषयी माहिती.
खालील साहित्यामध्ये 850 gm मसाला तयार होईल.
पूर्वतयारी करताना वेळ :
गोडा मसाल्याच्या पूर्वतयारी करता आपल्याला सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत. त्याकरिता आपल्याला पूर्व तयारी करायची आहे. पूर्वतयारी करता आपल्याला किमान 10 मिनिटे वेळ लागेल.
कुकिंग टाईम :
गोडा मसाला कुकिंग करण्याकरता आपल्याला 20 मिनिटे एवढा वेळ लागतो.
टोटल टाईम :
तयार करण्यासाठी आपल्याला अर्धा तास एवढा वेळ लागतो.
गोडा मसाला तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :
1) 500 ग्रॅम धने
2) 100 ग्रॅम जिरे
3) 150 ग्रॅम सुके खोबरे
4) 100 ग्रॅम तीळ
5) 5 ग्रॅम काळीमिरी
6) 5 ग्रॅम लवंगा
7) पाच ग्रॅम दालचिनी
8) 5 ग्रॅम तमालपत्र
9) 10 ग्रॅम खडा हिंग
10) दोन चमचे मीठ
11) पाव कप तेल
पाककृती :
- शेजवान चटणी मराठी
- सर्वप्रथम आपल्याला खोबरं किसून घ्यावे लागेल तसेच कोरडेच खोबरे भाजून घ्यावे. भाजलेले खोबरे बाजूला एका ताटात काढून ठेवावे.
- नंतर तीळ आणि जिरे वेगवेगळे खमंग भाजून घ्यावे. दोन्ही भाजताना मध्यम आच ठेवावी. तीळ व जिरे जळणार नाही याची दक्षता घ्यावी.
- नंतर कढईमध्ये तेल गरम करून 10 ग्रॅम खडा हिंग तळून घ्यावा. नंतर एका वाटीत बाजूला काढून ठेवावे.
- नंतर त्याच तेलामध्ये तमालपत्र, लवंग, दालचिनी आणि काळी मिरी घालून वेगवेगळे तळून घ्यावे. हे मसाले सर्व व्यवस्थित तळून झाले की, बाजूला काढून घ्यावे.
- नंतर उरलेल्या तेलामध्ये धने खमंग भाजून घ्यावे. थंड होण्यासाठी ठेवावे. भाजलेले व तळलेले सर्व मसाल्याचे पदार्थ आता एका खलबत्त्यामध्ये आबडधोबड कुठून घ्यावेत.
- नंतर ते मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची बारीक पूड तयार करून घ्यावी. नंतर धने बारीक करून घ्यावे. हिंगाची देखील बारीक पूड तयार करून घ्यावी.
- नंतर बारीक केलेले सर्व पदार्थ चाळणीतून चाळून घ्यावे.
- नंतर चाळणीत उरलेला जाडसर भाग पुन्हा मिक्सरमधून बारीक करून घ्यावा.
- आता सर्वात शेवटी भाजलेले खोबरे आणि तीळ वेगळे कुटून मिक्सरमधून बारीक करून घ्यावेत.
- चाळलेल्या मिश्रणामध्ये उठलेले खोबरे व तीळ मिक्स करून घ्यावे तसेच त्यामध्ये मीठ मिक्स करून घ्या. नंतर सर्व मसाला हवाबंद डब्यात भरून ठेवा.
- अशाप्रकारे चटपटीत तुम्ही खडा मसाला वापरून गोडा मसाला तयार करू शकता.
कांदा लसूण मसाला :
कांदा लसूण मसाला देखील सर्वच भाज्यांमध्ये वापरण्यात येतो. त्यामुळे तुमच्याकरता खास कांदा लसूण मसाला रेसिपी घेऊन आलो आहोत.
आता आपण कांदा लसूण मसाला रेसिपी पाहूया.
कांदा लसूण मसाला साठी लागणारे साहित्य :
1) तीन मोठे कांदे
2) पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या
3) 150 gm धने
4) 150 gm सुक्या मिरच्या
5) दोन ते तीन दालचिनी
6) दोन चमचे हळद
7) एक चमचा लवंग
8) दहा ते बारा तमालपत्रे
9) दहा मसाला वेलचदोडे
10) एक चमचा काळी मिरी
10) पाच चमचे जिरे
11) एक चमचा शहाजिरे
12) पाच ग्रॅम नागकेशर
13) पाच चमचे खसखस
14) 100 ग्रॅम तीळ
मसाला बनवण्याची कृती :
वरील दिलेली सामग्रीतील सर्वच पदार्थ थोड्या तेलावर वेगवेगळे भाजून घ्यायचे आहेत.
थंड झाल्यानंतर एकत्रितपणे मिक्सर मधून बारीक करून घ्या
अशाप्रकारे कांदा लसूण मसाला तयार होतो. आता हा मसाला तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये वापरू शकता.
मसाल्यातील पोषक घटक :
या पदार्थांमध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असून चरबी, प्रथिने कर्बोदके याचे प्रमाण जास्त असते. तसेच मसाले आहारात लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि इतर बऱ्याच खनिजांचे व इतर सूक्ष्म पोषक घटकांचे मोठ्या प्रमाणात स्त्रोत असतात. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात.
फायदे :
मसाला या पदार्थांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात तसेच सर्वोच्च वापरात गरम मसाल्यांचा आवर्जून वापर करावा. ते आरोग्यासाठी चांगलेच आहे.
मसाल्यांमध्ये मधुमेह कमी करण्याची शक्ती असते. जिरे हे देखील मसाल्यांमध्येच वापरले जाते. ते मधुमेह विरोधी एक सक्रिय अँटीडायबेटिक घटक आहे.
तोटे :
खडा मसाल्यांच्या अतिसेवनाने देखील आपल्या शरीराला हानी पोहोचू शकते. कारण गरम मसाल्यांची चव ही खूपच गरम असते.
भाज्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या मसाले आपण कमी प्रमाणातच वापरले पाहिजे, नाहीतर आपल्याला मुळव्याध, छातीत जळजळ, पोटात जळजळ आंबटपणा अशा प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.
तर मित्रांनो, गोडा मसाला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.