साखर भात मराठी Sakhar Bhat Recipe In Marathi

साखर भात मराठी Sakhar Bhat Recipe In Marathi साखर भात पदार्थ काजू, बदाम, तांदूळ आणि साखर पासून बनवला जातो. हा चवीला एकदम स्वादिष्ट आणि गोड पदार्थ आहे. भारतात विविध ठिकाणी साखर भात वेग-वेगळ्या प्रकारे बनवला जातो. लहान मुलांसाठी साखर भात हा एक पौष्टिक आहार आहे, यामध्ये विविध प्रकारे घटक असतात. जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत, हा एक शुध्द शाकाहारी पदार्थ आहे. साखर भात अंगणवाडी आणि बाल शालेयमध्ये मोठ्या प्रमाणात बनवला जातो, हा एक लोकप्रिय पदार्थ आहे.

आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये पाहिले असेल किती स्वादिष्ट आणि चवदार साखर भात खायाला मिळतो. काही लोकांना साखर भात खूप आवडतो, पण त्याचा परिसरात स्वादिष्ट आणि गोड साखर भात मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे. एकदम सोप्या आणि सहज पद्धतीने चवदार आणि गोड साखर भात कसा बनवतात यांची रेसिपी. आता आपण साखर भात रेसिपी पाहणार आहोत.

Sakhar Bhat

साखर भात मराठी Sakhar Bhat Recipe In Marathi

साखर भातचे प्रकार :

साखर भात हा पदार्थ एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे, जो विविध ठिकाणी वेग-वेगळ्या प्रकारे बनवला जातो. जसे साखर भात, मसाला भात, तिखट भात हे सर्व प्रकार एकदम स्वादिष्ट आहेत.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
साखर भात रेसिपी ही आपण 6 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

साखर भातच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ :

साखर भात तयार करण्यासाठी पहिले सर्व साहित्य एकत्र करावे लागते. नंतर आपण लवकर भात बनवू शकतो, यासाठी आपल्याला 15 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

साखर भात कुकिंग करण्यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.

टोटल टाईम :

साखर भात बनवण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते, नंतर कुकिंग करावा लागतो, यासाठी आपल्याला टोटल टाईम 35 मिनिट वेळ लागतो.

साखर भातसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) 1 पाव साधे तांदूळ.
2) 200 ग्रॅम साखर.
3) 5 ते 6 लवंग.
4) 1 चमच वेलची पावडर.
5) थोडा मनुका.
6) अर्धी वाटी काजू, बदाम.
7) 100 ग्रॅम तूप.
8) 1 ग्लास दूध.
9) 1 चिमूट केसर.

पाककृती :

  • पोहा पापड रेसिपी मराठी
  • सर्वात प्रथम 2 ते 3 वेळा तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घ्या, आणि थोडा वेळ बाजूला ठेवा.
  • नंतर एक पॅन घ्या, त्याला गॅसवर ठेवून त्यामध्ये 2 चमचे तूप टाकून गरम करा.
  • नंतर काजू, बदाम टाकून चांगले भाजून घ्या, नंतर थोडा मनुका तळून घ्या, आणि एका प्लेटमध्ये काढून ठेवा.
  • नंतर थोडे आणखी तूप गरम करून, लवंग आणि वेलची थोडे भाजून घ्या, आणि नंतरच्या कामासाठी बाजूला ठेवा.
  • आता गॅसवर कुकरमध्ये 2 ग्लास पाणी टाकून चांगली उकडी येऊ द्या, नंतर यामध्ये भात टाका.
  • आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या, नंतर यामध्ये भाजलेले काजू बदामचे तुकडे, वेलची पावडर, मनुका, टाकून चांगले मिसळा.
  • नंतर यामध्ये लवंग आणि वेलची टाका, याबरोबर थोडे दूध आणि केसर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • नंतर यामध्ये चवीनुसार साखर आणि थोडे तूप टाका, आणि व्यवस्थित झाकण लाऊन भात कुकरवरती 10 मिनिट चांगला शिजवू द्या.
  • 2 शिट्या झाल्या की, आपला भात झाला का तपासून घ्या, नंतर खाली काढून थोडा वेळ थंड होऊ द्या.
  • आता आपला स्वादिष्ट आणि चवदार साखर भात खाण्यासाठी तयार आहे, आपण एका प्लेटमध्ये घेऊन साखर भात खाण्याचा आनंद घेऊ शकतो.

साखर भातमध्ये असणारे घटक :

साखर भात हा एक पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ आहे, यामध्ये विविध प्रकारचे पौष्टिक साहित्य वापरले जाते. यामुळे यामध्ये विविध प्रकारचे घटक असतात. जसे कॅल्शियम, फॉस्फरस, प्रोटीन, कर्बोदके, फायबर, लोह, चरबी, शुगर, व्हिटॅमिन, पोटॅशियम, कॅलरी हे सर्व घटक आपल्यासाठी खूप फायद्याचे आहेत.

फायदे :

साखर भात सेवन केल्याने आपल्याला अनेक पौष्टिक घटक मिळतात, यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम सारखे घटक आहेत.

यामुळे आपल्या शरीरातील हाडे आणि शरीर मजबूत राहते, आणि आपले शरीर निरोगी राहते.

यामध्ये असणारे फॅट, कॅलरी, व्हिटॅमिन, चरबी हे घटक आपल्या शरीराची आणि शरीरातील अवयवांची वाढ करतात.

साखर भात हे एक हलके अन्न आहे, यामुळे आपल्याला लवकर पचन होण्यास मदत होते.

साखर भातमध्ये असणारे सर्व घटक आपल्यासाठी खूप फायद्याचे आहेत.

तोटे :

साखर भात हे एक पौष्टिक आहार आहे, आपण जास्त प्रमाणात सेवन केला तर, आपल्याला पोटदुखी होऊ शकते.

यामध्ये अनेक प्रकारे घटक आहेत, हे घटक आपल्या शरीरात जास्त झाले तर, आपण आजारी पडू शकतो.

म्हणून साखर भात आपण योग्य प्रमाणात सेवन केला पाहिजे, ज्यामुळे आपण निरोगी राहू.

तर मित्रांनो, तुम्हाला साखर भात रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment