सोयाबीन चिल्ली रेसिपी मराठी Soyabean Chilli Recipe in Marathi सोयाबीन आहारामध्ये समाविष्ट करणे खूपच गरजेचे आहे. कारण त्यामध्ये महत्त्वपूर्ण घटक आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. त्याचे शरीराला होणारे फायदेही अनेक आहेत. आहारामध्ये सोयाबीनचा नियमित वापर केल्याने हाडांच्या कमजोरीपासून आराम मिळतो. सोयाबीन केवळ तुमचे आरोग्य चांगले राखणार नाही, तर त्वचेचीही काळजी घेईल. चला मग आज पाहूया सोयाबीन चिली रेसिपी विषयी सविस्तर माहिती.
सोयाबीन चिल्ली रेसिपी मराठी Soyabean Chilli Recipe in Marathi
रेसिपी प्रकार :
सोयाबीन चिली हा एक महाराष्ट्रातील रेसिपी आहे. आपण सोयाबीनच्या वेगवेगळ्या प्रकारे तयार केलेल्या रेसिपीज बघितले असेलच त्यामध्ये सोयाबीन चिल्ली, मसाला सोयाबीन, सोयाबीन पुलाव
सोया कबाब, सोयाबीन मंचुरियन, सोयाबीन कटलेट इत्यादी रेसिपी आहे. जे लोक मास खात नाहीत त्यांच्याकरिता सोयाबीन एक प्रोटीनयुक्त व पौष्टिक आहार मानला जातो. ही रेसिपी अतिशय स्वादिष्ट चटकदार लागते आजकाल बाहेर स्टॉल वरती आपल्याला सोयाबीन चिल्ली मिळतात. परंतु बाहेरून विकत घेतल्याशिवाय स्वतः आपण ती घरी करून बघितली तर ती पौष्टिक राहते. तर आजच ही रेसिपी करून बघा व आम्हालाही कमेंट करून नक्की सांगा. जाणून घेऊया या रेसिपी साठी लागणारे साहित्य व पाककृती.
ही रेसिपी किती व्यक्तींकरिता आहे?
ही रेसिपी आपण तीन व्यक्तींकरता बनवणार आहोत.
पूर्वतयारी करता लागणारा वेळ :
सोयाबीन चिल्ली रेसिपीच्या पूर्वतयारी करता आपल्याला 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
सोयाबीन चिल्ली कुकिंग करण्याकरता आपल्याला 15 मिनिटे एवढा वेळ लागतो.
टोटल टाईम :
सोयाबीन चिल्ली रेसिपी पूर्ण करण्याकरता आपल्याला एकूण 25 मिनिट एवढा वेळ लागतो.
साहित्य :
1) दोन वाटी सोया चंक्स
2) एक कांदा
3) एक सिमला मिरची
4) एक चमचा लसूण पेस्ट
5) अर्धा चमचा काळीमिरी पावडर
6) दोन चमचे कॉर्न फ्लोअर
7) सोया सॉस
8) टोमॅटो सॉस
9) दोन चमचे दही
10) चवीपुरतं मीठ
11) कांद्याची पात
सोयाबीन चिल्ली पाककृती :
- मसाला भेंडी रेसिपी मराठी
- सर्वप्रथम आपल्याला सोयाबीन चंक्स उकडून उकळून घ्यायचे आहे नंतर त्यातील पाणी जाणून घ्यायचे आहे.
- नंतर एका भांड्यामध्ये मीठ, दही, काळी मिरी पावडर व सोया सॉस मिक्स करून घ्या. त्यामध्ये सोया चंक्स आणि कॉर्नफ्लॉवर मिसळून घ्या.
- नंतर एका पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा तेल गरम झाले की, त्यामध्ये सोया चंक्स तळून घ्या.
- नंतर एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण परतून घ्या.
- नंतर कांदा आणि शिमला मिरचीचे मोठे चौकोनी तुकडे देखील कापून परतून घ्या.
- नंतर कांद्यावर सोया सॉस, टोमॅटो सॉस, काळीमिरी पावडर आणि मीठ टाका.
- आपल्या आवडीनुसार यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे देखील परतून घालू शकता. नंतर या मिश्रणामध्ये तळलेले सोयाबीन टाका आणि छान परतून घ्या.
- नंतर कांद्याची पात टाकून छान सजवा. अशाप्रकारे गरमागरम सोयाबीन चिल्ली रेसिपी तयार आहे.
- ही रेसिपी तुम्ही भाजी, पोळी किंवा भाकरी सोबत ही खाऊ शकता.
पौष्टिक घटक :
सोयाबीन चिल्लीमध्ये अनेक पोषक तत्वे असतात. जी आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. सोयाबीनमध्ये मॅग्नीज, लोह, फॉस्फरस, तांबे, पोटॅशियम, जस्त आणि सेलेनियम इत्यादी घटक असतात.
फायदे :
सोयाबीनचा नियमित आहार केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाही किंवा असल्या तर त्या कमी होण्यास मदत होतात.
सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते, त्यामुळे केस काळेभोर आणि घनदाट होतात.
सोयाबीन चिल्ली खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.
मधुमेह देखील नियंत्रणात राहतो, मेंदूचे कार्य देखील सुरळीत राहते. तसेच हाडे व स्नायू बळकट होतात शिवाय आपल्या पोटातील अनेक समस्या दूर होतात.
तोटे :
अतिप्रमाणामध्ये सोयाबीन चिल्ली खाल्ल्यामुळे देखील आपल्याला हानी होऊ शकते. त्यामुळे सोयाबीन चिल्ली खात असताना आपण प्रमाणातच खायला पाहिजे.
तर मित्रांनो, तुम्हाला सोयाबीन चिल्ली ही रेसिपी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनाही शेअर करा.