आंबोली रेसिपी मराठी Amboli Recipe in Marathi

आंबोली रेसिपी मराठी Amboli Recipe in Marathi आंबोली ही रेसिपी मालवणी पद्धतीची रेसिपी असून ती तांदळाच्या पिठापासून केली जाते तांदुळ भिजवले जाते नंतर मिक्सरमधून बारीक करून ते रात्रभर थांबायला ठेवले जाते व नंतर केले जाते. आंबोली जरी दिसायला डोशासारखे असली तरी देखील आंबोली आणि डोसा यामध्ये बरेच साम्य आहे. तर चला मग आज आपण आंबोली या रेसिपी विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

 Amboli Recipe

आंबोली रेसिपी मराठी Amboli Recipe in Marathi

रेसिपी प्रकार :

आंबोली ही रेसिपी मालवणी स्वरूपाची असून
दक्षिणेकडील भागात खूप लोकप्रिय आहे डोसा आणि इडल्यांसाठी देखील लक्ष्मीकडील भाग खूप लोकप्रिय आहे परंतु आंबोली ही डोस्यासारखीच परंतु जाड असते. हीदेखील आंबवलेल्या तांदळाच्या पिठापासूनच बनवली जाते. आंबोली ही उडदाची डाळ चणाडाळ पोहे किंवा तांदूळ तसेच मेथीचे दाणे भिजवून बारीक करून रात्रभर आंबवले जाते. व नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जाड आंबोली रेसिपी तयार केली जाते. ही रेसिपी पारंपारिक पणे केली जाते. आंबोली ही रेसिपी खाण्यासाठी चविष्ट व चटपटीत असते. तुम्ही देखील ही रेसिपी अगदी कमी वेळामध्ये करून पाहू शकता. तर चला मग जाणून घेऊया या रेसिपी साठी लागणारे सामग्री व पाककृती.

ही रेसिपी किती व्यक्तींकरता तयार होईल ?
ही रेसिपी आपण 4 व्यक्तींकरता तयार करणार आहोत.

पूर्वतयारी करिता लागणारा वेळ :

पूर्वतयारी करता आपल्याला किमान 12 तास लागतात.

कुकिंग टाईम :

आंबोली तयार करण्याकरता आपल्याला 15 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम :

आंबोली ही रेसिपी तयार करण्यासाठी आपल्याला एकूण 12 तास 15 मिनिटे एवढा वेळ लागतो.

साहित्य :

1) दोन वाटी तांदूळ
2) एक वाटी उडीद डाळ
3) दोन चमचे चणा डाळ
4) पाव वाटी पोहे
5) एक चमचा मीठ
6) पाव चमचा मेथी दाणे
7) तेल आवश्यकतेनुसार
8) पाणी आवश्यकतेनुसार

पाककृती :

  • सर्वप्रथम आपल्याला आंबोली पीठ तयार करण्याकरता डाळी व तांदूळ रात्रभर भिजवत घालून ठेवायचे आहे त्या आधी ते स्वच्छ धुऊन घ्या.
  • त्या तांदळामध्ये मेथी दाणे टाका आणि पाण्यामध्ये भिजवत घाला. त्याचप्रमाणे उडदाची डाळ चणाडाळ पोहे देखील भिजत घाला.
  • कमीत कमी सहा तास आपल्याला हे घटक भिजले पाहिजे.
  • रात्रभर भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यातील पाणी काढून टाका. भिजलेल्या डाळ व पोहे एकत्रित करून त्याची बारीक पेस्ट बनवून घ्या.
  • पेस्ट बनवत असताना आवश्यक तेवढेच पाणी घाला.
    नंतर एका मोठ्या खोल वाडग्यात पीठ काढून घ्या.
    हे पीठ आपल्याला ठेवून द्यायचे आहेत. त्यामुळे ते काही वेळाने फुलते म्हणून आधीच मोठे भांडे घ्यावे.
  • नंतर हे आंबवण सहा तास आपल्याला असेच सोडून द्यायचे आहे. त्यानंतर आंबोली तयार करण्याआधी हे पीठ चांगले फेटून घ्यायचे आहे.
  • नंतर आंबवलेल्या पिठाचे छान कापसासारखे मऊ पोत असणारे आंबोली रेसिपी तयार होईल त्याआधी त्या पिठामध्ये मीठ घालून हलक्या हाताने ढवळून घ्या. आवश्यकता असल्यास त्यामध्ये पाणी घाला..
  • आता गॅसवर एक नॉनस्टिक तवा गरम होण्यासाठी ठेवा त्यामध्ये तेल लावून आंबोली बनवायला सुरुवात करा.
  • गॅसवर आंबोली बनायला टाकल्यानंतर गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे. त्यामुळे ती जळणार नाही व छान चव येईल.
  • एका बाजूकडून शिजवल्यानंतर दुसऱ्या बाजूंकडून पलटून आंबोली छान परतून घ्या.
  • अशाप्रकारे सर्व आंबोली तयार करून घ्या व तुम्ही हे शेंगदाण्याची चटणी किंवा टोमॅटो सॉस, आलू चटणी सोबत सर्व्ह करू शकता.

पोषक घटक :

आंबोली मध्ये आरोग्यासाठी आवश्यक असलेले अनेक पोषक घटक असतात. जसे की, प्रोटीन, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, आयर्न, विटामिन बी 6, मॅग्नेशियम, सोडियम आणि पोटॅशियम असतात.

फायदे :

आंबोलीमध्ये सर्वात जास्त प्रोटीन असते. जे लोक शाकाहारी आहे, त्यांच्याकरिता डोसा हा अतिशय फायदेशीर आहे. दुसऱ्या मुळे आपल्या शरीराला प्रोटीन मिळतं. त्यामुळे आपल्या शरीराची ऊर्जा दिवसभर कायम राहते.

आंबोली ही डाळ आणि तांदूळ यांच्या मिश्रणापासून तयार होतो त्यामुळे त्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. आणि जे लोक डायटिंग करतात त्यांच्यासाठी हे अतिशय लाभदायक असते.

तोटे :

आंबोली तयार करण्याकरता आपल्याला तांदूळ आणि डाळ यांचे मिश्रण आंबवावे लागते, मात्र हे आंबवलेले मिश्रण बऱ्याच जणांना सहन होत नाही.

पोटात आम्लाचे प्रमाण देखील वाढू शकते. शक्यतो पोटाचा त्रास असणाऱ्या लोकांनी आंबोली खाणे टाळावे किंवा सकाळी खावे.

आंबोली जरी आरोग्यासाठी पोषक असला तरी त्याच्यामुळे ऍसिडिटी वाढू शकते. त्यामुळे आपल्या शरीर समस्या देखील वाढू शकतात.

तर मित्रांनो, आंबोली रिसिपी विषयी माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

Leave a Comment