चिमणी पक्ष्याची संपूर्ण माहिती Sparrow Bird Information In Marathi

Sparrow Bird Information In Marathi भारतामधील खेड्यापाड्यात तसे शहरी भागामध्ये चिमणी हा पक्षी सर्वात जास्त आढळून येतो. चिमणी हा पक्षी सर्वांच्या परिचयाचा आहे तसेच याला इंग्लिशमध्ये स्पॅरो असे म्हणतात. चिमणी या पक्षाच्या वेगवेगळ्या काही प्रजाती आढळून येतात. 20 मार्च हा जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो. यामुळे चिमण्यांची घटती संख्या विषयी जागृती व्हावी हा उद्देश आहे. चिमणी एका वेळेला चार ते पाच अंडी देतात. चिमणीचे वजन 30 ते 35 ग्रॅम असते, त्यांच्याकडे 38.5 किलोमीटर वेगाने उडण्याची क्षमता असते.

Sparrow Bird Information In Marathi चिमणी पक्ष्याची संपूर्ण माहिती Sparrow Bird Information In Marathi

चिमणी पक्ष्याची संपूर्ण माहिती Sparrow Bird Information In Marathi

चिमणी बिहारचा आणि दिल्लीचा राष्ट्रीय पक्षी आहे. चिमण्या पक्षांमध्ये घरट बनवण्याची जबाबदारी दोघांची असते. नर आणि मादी दोघे मिळून घरटे बनवतात आणि अंड्यांना उबवतात तसेच पिल्लांची संरक्षण सुद्धा दोघे मिळून करतात. चिमण्या मांसाहारी आणि शाकाहारी आहेत दोन्ही प्रकारचे भोजन ते खातात. 2020 पासून जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो. सर्वात जास्त चिमण्यांच्या संख्या ही आशिया खंडामध्ये आहे. चिमण्यांच्या भारतात 43 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात.

चिमणी पक्षाचे वर्णन :

चिमणी हा पक्षी माणसाच्या सानिध्यात राहणारा पक्षी आहे, त्यामुळे आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. चिमणी या पक्षाच्या कपाळाचा रंग शेपटीवरचा आणि पार्श्वभाग राखाडी असतो तर कानाजवळ पांढरा असतो आणि चोच काळी कंठ ते छातीच्या भागावर मोठा काळा भाग असतो.

डोक्यापासून खाली पोटापर्यंत चिमण्याचा पांढरा रंग असून पाठीवर तपकिरी रंगाच्या काड्या तुटक रेषा असतात मादी मातकट तपकिरी रंगाची असते. तिच्या अंगावर काड्या तपकिरी रंगाच्या तुटक रेषा असतात. तिची चोच फिकट तपकिरी रंगाची असते तसेच तिला भारतात तपकीर या नावाने सुद्धा ओळखले जाते.

चिमणी हा पक्षी कोठे आढळतो?

चिमणी हा पक्षी हिमालयाच्या 2000 मीटर उंचीपर्यंत पासून ते भारतात सर्वत्र आढळून येतो. त्याव्यतिरिक्त हा पक्षी बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, म्यानमार इत्यादी देशांमध्ये सुद्धा आढळतो. भारतात कश्मीरी आणि वायव्य येथे त्यांच्या दोन उपप्रजाती सुद्धा आढळून येतात.

चिमणी हा पक्षी काय खातो?

चिमणी हा पक्षी माणसाच्या अगदी जवळ राहणारा पक्षी असून त्याच्या आहारामध्ये कीटक, धान्य, शिजवलेले अन्न, सूर्यफुलांच्या बिया इत्यादी खातो तसेच हंगामानुसार त्याच्या खाण्यामध्ये फरक पडतो. चिमणी हा पक्षी कीटक सोबत सुद्धा खातात.

आपण बऱ्याचदा चिमणीला तांदूळ किंवा इतर धान्य टाकतो चिमण्यांचा थवा येतो आणि पटपट दाणे टिकतात आणि उडून जातात. आपल्याला हे दृश्य पाहण्यासाठी खूपच आकर्षक वाटेल. पक्षी प्रेमींसाठी तर हे दृश्य अतिशय मोहक आहे. चिमण्यांना पिण्यासाठी पाणी आणि धान्य सुद्धा बरेच लोक ठेवतात.

चिमणी या पक्षाचे जीवन :

चिमण्यांचा विनीचा हंगाम हा वर्षभर असतो, त्यामुळे या पक्षांचा नेमका कोणता काळ विनिचा असतो हे सांगता येत नाही. चिमणी आणि चिमणा दोघे मिळून घरटे तयार करतात. घरटे गवत, कापूस, पिसे आणि मिळतील त्या वस्तू वापरून घराच्या शेतामध्ये किंवा भिंतीच्या छिद्रामध्ये झाडांवर कुठेही चिमणी घरटे बांधतात.

मादी फिकट हिरव्या रंगाच्या त्यावर तपकिरी ठिपके असलेली चार ते पाच अंडी देते. अंड्याच्या रंगात स्थानिक बदल सुद्धा जाणवतात नर आणि मादी दोघे मिळून अंडी उबवण्याचे काम करतात तसे दोघे मिळून पिल्लांना खाऊ सुद्धा घालतात. सर्व कामे दोघे मिळून करतात.

चिमण्याचे आयुष्य सहा महिने ते तीन वर्षापर्यंत असते. चिमण्यांच्या विषयी अशी एक प्रचलित गोष्ट आहे. हे चिमणीला जर मानवाने स्पर्श केला तर इतर चिमण्या तिला त्यांच्या कडपामध्ये सामील करून घेत नाही किंवा तिला चोचीने मरेपर्यंत मारतात किंवा तिला कळपा बाहेर टाकून देतात.

चिमण्यांची संख्या कमी होण्याचे कारण :

दिवसेंदिवस चिमणी या पक्षाचे प्रमाण घटत चालल्याचे आपल्याला दिसते. त्याचे कारण म्हणजे मुख्य शहरीकरण आणि वृक्षतोड हे खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे तसेच शहरातील मोबाईल टॉवर्समधून होणारे विद्युत चुंबकीय उत्सर्जन यामुळे अनेक चिमण्यांना आपला जीव गमावा लागतो.

आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धतीमुळे सुद्धा चिमण्यांना घरटे बांधण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही आणि त्यांना अन्नाची सुद्धा गरज असते; परंतु बऱ्याच ठिकाणी चिमण्यांना अन्न पाणी मिळत नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो तसे शहरांमध्ये वाढते.

प्रदूषण आणि शेतामध्ये रासायनिक खते व कीटकनाशकांचा होणारा वापर यामुळे अनेक चिमण्या झपाट्याने कमी होत आहेत. 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून सुद्धा पाडला जातो. त्यांच्या संख्येत वाढ व्हावी याकरिता जनजागृती घडवून आणण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

चिमणी या पक्षाचे प्रकार :

या पक्षाच्या 40 पेक्षा जास्त प्रजाती आढळून येतात. काही चिमण्यांच्या प्रजाती खालील प्रमाणे पाहूया.

हाऊस स्पॅरो : या चिमण्यांच्या प्रजाती ग्रामीण तसेच शहरी भागात सुद्धा आढळून येतात. त्यांचे घरटे घराजवळ राहतात म्हणजेच या चिमण्या माणसांच्या सानिध्यात राहतात. या चिमण्यांचा आकार लहान असून त्यांचा रंग तपकिरी असतो. या चिमण्यांमध्ये नर आणि मादी आपण सहजपणे ओळखू शकतो. नर तपकिरी रंगाचा असून त्यावर काडीपट्टी असते. तर राखाडी रंगाची छाती आणि पांढरे गळा असतो मादी फिकटपटी रंगाची असून पांढरे गळ असतात आणि मुकुट असतो. या चिमण्याचा आठ ते दहा जणांचा गट असतो. या चिमणीची लांबी 16 सेंटीमीटर आणि त्यांचे वजन 25 ते 38 ग्रॅम एवढे असते.

रूसेट चिमणी : हे पूर्वत तर हिमालय परसराम मध्ये आढळून येतो. ही चिमणी दुसऱ्या चिमण्यांसारख्या तांबूस रंगाच्या असतात. या चिमण्यांची लांबी 14 सेंटीमीटर एवढी लांब असते.

स्पॅनिश चिमणी : स्पॅनिश चिमणी हे एक स्थलांतरित चिमण्यांची प्रजाती असून देशाच्या उत्तरेकडील भागामध्ये ही मोठ्या प्रमाणात आढळून येते. या चिमण्या हाऊस स्पॅरो सारख्या दिसतात काही प्रदेशांमध्ये या चिमण्या आणि इटालियन चिमण्यांचे संकरित जाती सुद्धा आहेत.

सिंध चिमणी : ही दक्षिण आशियातील इंडस दरीमध्ये आढळून येते आणि या चिमण्या दिसायला हाऊस स्पॅरो सारख्या दिसतात. या चिमण्यांना जंगल सिंध चिमणी असे सुद्धा म्हटले जाते.

सोनाली चिमणी : सोनाली चिमणी इतर प्रजातीपैकी एक आहे. या चिमण्यांचा सोमाली लँड आणि केनिया मध्ये सुद्धा प्रसार असल्याचा आपल्याला दिसून येतो.

युरेशियन ट्री चिमणी : ही चिमण्यांची प्रजाती पूर्व भारतात आढळून येते. या चिमण्यांची लांबी 14 सेंटीमीटर असून त्या तीन वर्ष जगतात. या चिमण्यांच्या कानाजवळ काळे डाग असतात. नर आणि मादी दोघेही दिसायला एक समान असतात.

FAQ

जागतिक चिमणी दिवस कधी साजरा केला जातो?

20 मार्च हा जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो.

चिमण्यांची सर्वात जास्त संख्या कोठे आढळून येते?

आशिया खंडात.

जागतिक चिमणी दिवस कधीपासून साजरा केला जात आहे?

2020 पासून.

चिमणी कोठे राहते?

चिमणी मानवी वस्त्यांमध्ये, घरात, झाडावर घरटे करून त्यामध्ये राहते.

चिमणी ला इंग्लिश मध्ये काय म्हणतात?

हाऊस स्पॅरो.

Leave a Comment