संत मीराबाई यांची संपूर्ण माहिती Sant Mirabai Information In Marathi

By Wiki Mitra

Updated On:

Follow Us
Sant Mirabai Information In Marathi

Sant Mirabai Information In Marathi संत मीराबाई ह्या राजस्थानमधील उच्च कुळात जन्मलेल्या एक हिंदू कृष्ण भक्त होत्या. त्या वैष्णव भक्ती परंपरेतील संतांपैकी एक मानल्या जातात. मीराबाईंची बाराशे ते तेराशे भजने आजही उपस्थित आहे तसेच त्यांनी भारतभर प्रसिद्धी मिळवली आहे. मीराबाईंनी आपल्या अभंगांमध्ये ईश्वराच्या प्रति असलेले तिचे प्रेम व्यक्त केलेले आहे. संत मीराबाई यांनी आपले संपूर्ण जीवन श्रीकृष्णाच्या स्वाधीन केले होते.

Sant Mirabai Information In Marathi

संत मीराबाई यांची संपूर्ण माहिती Sant Mirabai Information In Marathi

मिराबाई ह्या एक श्रीकृष्णाची एकमेव मैत्रिणी होती. मीराबाईंनी आपले संपूर्ण जीवन श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये व्यतित केले आहे. मिराबाई श्रीकृष्णाच्या महान भक्त होत्या. मीराबाई ह्या एक कवयित्री सुद्धा होत्या. मीराबाईंचा जन्म कधी झाला याविषयी ठोस पुरावा उपलब्ध नाही. मात्र मीराबाईंच्या आजही अनेक गाणी, कविता आणि त्यांच्या प्रेमाची कथा आपण ऐकत आलेलो आहोत.

मिराबईचा यांचा जन्म व बालपण :

मीराबाई चा जन्म हा 1498 मध्ये राजस्थान मधील नागोर जिल्ह्यातील कुडकी या गावात झाला. लहान वयातच तिची आई वारल्यामुळे तिला तिच्या आजोबांकडे राहावे लागले आणि तिथेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या वडिलांचे नाव रतन सिंह हे होते. त्यांचा जन्म राजपूत घराण्यात झाला होता.

मिराबाई लहान असताना जेव्हा लग्नाची वरात तिच्या दारासमोरून जात होती तेव्हा मीराबाई त्याच्याकडे कुतूहलतेने पाहत होती. तेव्हा मीराबाईने तिच्या आईला विचारले माझा वर कोण? त्यावर तिच्या आईने तिला देवघरात घेऊन गेली आणि तिला भगवान श्रीकृष्णाच्या मूर्ती कडे बोट दाखवत हा तुझा वर आहे असे सांगितले.

छोट्याशा मीरावर या गोष्टीचा खूपच प्रभाव झाला आणि तिचे जीवन कृष्णमय झाले. अजान त्या वयापासूनच ती कृष्ण प्रेमात बुडाली. जडीस थडी काष्टी पाशाने तिला गोवर्धन गिरधारी दिसू लागला. एका साधू कडून मिळालेली कृष्णमूर्ती मीरा सतत तिच्याजवळ ठेवत असे. तिने त्या मूर्ती सोबत स्वतःचे लग्न सुद्धा लावले. कृष्ण प्रेमात ती इतकी बुडाली होती की, जीवनातील तिला सर्वच गोष्टी कृष्णापुढे नश्वर वाटत होत्या.

मीराबाईंचे वैयक्तिक जीवन :

मिराबाई यांच्या जीवनाविषयी विश्वासनीय असे ऐतिहासिक पुरावे किंवा दस्तऐवज उपलब्ध नाहीत; परंतु विद्वानांनी मीराबाईच्या जीवनावर साहित्य व इतर स्त्रोतांमधून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. मीराबाईचा जन्म कागदपत्रानुसार राजस्थानमधील मेहता येथे 1498 मधील राजघराण्यातच झाला होता. मिराबाई त्यांच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती आणि लहान असताना तिच्या आईची निधन झाले होते.

मीराबाई यांना संगीत, धर्मप्रशासन, राजकारण अशी विषयी शिकवले जात होते. मीराबाईचे पालन पोषण त्यांच्या आजोबांच्या हस्ते झाले. त्यांचे आजोबा सुद्धा भगवान विष्णूचे मोठे उपासक होते. ते एक योद्धा आणि भक्त हृदय होते. साधुसंतांच्या भेटी त्यांच्या नेहमी होत असत. अशा प्रकारे मीराबाईला सुद्धा लहानपणापासून धार्मिक आणि ऋषीमुनी लोकांच्या संपर्कामध्ये येण्याचा सहवास लाभला.

चित्तोड येथील राणा सांगा यांचे चिरंजीव भोजराज यांच्याशी मीराबाईचा विवाह लहान वयात करून देण्यात आला. स्वतःचा विवाह कृष्णाशी झाला असेल तिला राजभोशी झालेला विवाह मान्य नव्हता. तरीसुद्धा तिच्या कुटुंबीयांच्या मान मर्यादे करता तिने तो स्वीकारला होता. घरामध्ये मीरा कृष्ण भक्ती शिवाय इतर कोणत्याही देवाची पूजा करीत नसे.

1527 मध्ये झालेल्या लढाईत भोजराज मारला गेला होता व आजोबा वडील आणि सासरे यांच्या एकामागे एक झालेल्या मृत्युने मीराबाईने नश्वर जीवनाकडे पाठ फिरवली आणि कृष्ण भक्तीमध्ये स्वतःला वाहून घेतले. यादरम्यानच तिने अनेक भजन आणि रचनांची निर्मिती सुद्धा केली विरह आणि विरक्तीने भरलेल्या त्यांच्या अनेक रचना आजही आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळतात. सुरुवातीला मीराबाईची कृष्ण भक्ती ही त्यांच्या वैयक्तिक मर्यादित होती.

मीराबाईची कृष्ण भक्ती :

मिराबाई या मध्ययुगीन हिंदू आध्यात्मिक कवयित्री होऊन गेल्या आहेत. त्या कृष्णभक्त होत्या, त्यांची भक्ती चळवळीतील सर्वात लोकप्रिय भक्ती ही संतांपैकी एक होती. भगवान श्रीकृष्णाला त्यांची भक्ती समर्पित होती. भगवान श्रीकृष्ण व्यतिरिक्त मीराबाई कोणत्याही देवाला पुजत नव्हत्या. आजही उत्तर भारतामध्ये मीराबाई खूप लोकप्रिय आहेत तसेच त्यांची मंदिरे आहेत आणि मीराबाईंची रचना आजही मोठ्या श्रद्धेने गायली जातात. मीराबाई या भारतीय परंपरेत भगवान श्रीकृष्णाच्या स्तुतीसाठी लिहिलेला हजारो भक्ती कविता यांच्याशी जोडतात.

परंतु पुढे त्या कृष्णभक्ती तल्लीन होत रस्त्यावर मिराबाई नाचू लागल्या आणि ही मीराबाईचा सावत्र देर विक्रमादित्य याला मुळीच आवडत नसे. तो चित्तोडचा त्यावेळी नव्यानेच राजा झाला होता. त्यांनी मीराबाईला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. तिला प्रसादामध्ये विष कालवून खायला दिले. फुलांमध्ये साप पाठवला. अभिशानावर खिळे रोविले पण प्रत्येक संकटातून कृष्ण कृपेने मीराबाई यांना काहीच झाले नाही.

विष घातलेल्या दुधाचा नैवेद्य ज्यावेळी मीराबाईने कृष्णाला दाखविला आणि प्रसाद म्हणून ते दूध ग्रहण केले. त्यावेळी कृष्णाची मूर्ती विषामुळे हिरवी झाली परंतु मीराबाईला काहीही बाधा झाली नव्हती. हे पाहून मीराबाईला खूप वाईट वाटले आणि तिने भगवान श्रीकृष्णाला पुरवत होण्यासाठी प्रार्थना केली आणि भगवान श्रीकृष्णाची मूर्ती पुरवत जशीच्या तसे प्रकट झाली.

मिराबाई 1533 च्या सुमारास मेडताला गेल्या आणि मीराबाईनी चित्तोडचा त्याग केल्यानंतर पुढच्याच वर्षी 1534 मध्ये गुजरातच्या बहादूर शहाणे चित्तोड ताब्यात घेतले. या युद्धात चित्तोडचा शासक विक्रमादित्य मारला गेला आणि शेकडो स्त्रियांनी जोहर केले. त्यानंतर 1538 मध्ये जोधपुरचा शासकराव मालदेव यांनी मिळताचा ताबा घेतला. त्यानंतर बिरदेव पडून गेला आणि अजरामर येथे त्याने आश्रय घेतला. त्यानंतर मीराबाई ब्रजच्या यात्रेला निघाल्या.

1539 मध्ये मीराबाई रुंदावनमध्ये रूप गोस्वामी यांना भेटल्या वृंदावनात त्या काही काळ राहिल्या त्यानंतर 1546 मध्ये द्वारकेला गेल्या. तिथे त्यांना समाजात बंडखोर मानले जात होते. कारण मीराबाई त्यांचे धार्मिक कार्य राज कन्या आणि विधवा यांच्यासाठी स्थापित केलेल्या रुढी नियमांच्या विरुद्ध होत्या. त्यांनी आपला बहुतेक वेळ कृष्णा मंदिरात आणि कृषी यात्री करूना भेटण्यामध्ये आणि भक्ती पद लिहिण्यामध्ये घालवला होता.

मिराबाई यांचा मृत्यू :

मिराबाई या मध्ययुगीन हिंदू आध्यात्मिक कवयित्री होऊन गेल्या आहेत. त्या कृष्णभक्त होत्या. त्यांची भक्ती चळवळीतील सर्वात लोकप्रिय भक्ती ही संतांपैकी एक होती. भगवान श्रीकृष्णाला त्यांची भक्ती समर्पित होती भगवान श्रीकृष्ण व्यतिरिक्त मीराबाई कोणत्याही देवाला पुजत नव्हत्या. आजही उत्तर भारतामध्ये मीराबाई खूप लोकप्रिय आहेत तसेच त्यांची मंदिरे आहेत आणि मीराबाईंची रचना आजही मोठ्या श्रद्धेने गायली जातात.

मीराबाई या भारतीय परंपरेत भगवान श्रीकृष्णाच्या स्तुतीसाठी लिहिलेला हजारो भक्ती कविता यांच्याशी जोडतात.
वृंदावनमध्ये बराच काळ राहिल्या. त्यानंतर मीराबाई द्वारकेला गेले आणि 1560 मध्ये श्रीकृष्णाच्या चरणी त्या कायमच्या लिन झाल्या. गोवर्धन गिरधारी गोपाळ कृष्णाच्या मूर्ती लुप्त झाल्या असे म्हटले जाते.

FAQ

मीराबाईचा जन्म कोणत्या राज्यात झाला होता?

राजस्थान.

मिराबाई यांचा मृत्यू कधी झाला?

मिराबाई या 1560 मध्ये श्रीकृष्णाच्या चरणी झाल्या आणि श्रीकृष्णाच्या मूर्तीमध्ये मुक्त झाल्या.

मीराबाईंना विष देण्यात आले तेव्हा काय झाले?

मीराबाईंना जेव्हा विष देण्यात आले तेव्हा श्रीकृष्णाने त्या विषयाचे अमृतात रूपांतर केले.

मीराबाईचा विवाह कोणाशी झाला होता?

भोज राज.

मीराबाईंच्या वडिलांचे नाव काय होत?

रतनसिंह.

Wiki Mitra

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment