थालीपीठ रेसिपी मराठी Thalipeeth Recipe In Marathi

थालीपीठ रेसिपी मराठी Thalipeeth Recipe In Marathi थालीपीठ हा एक मसालेदार आणि स्वादिष्ट पदार्थ आहे. जो महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. हा एक शुध्द शाकाहारी पदार्थ आहे, थालीपीठ हे वेग वेगळ्या प्रकारे बनवली जाते. उपवास असल्यास साबुदाणा थालीपीठ बनवू शकतो, आणि फळापासून सुध्दा थालीपीठ रेसिपी बनवली जाते. तसेच हॉटेलमध्ये एकदम स्वादिष्ट आणि मसालेदार पदार्थ थालीपीठ आपल्याला खायला मिळतो. थालीपीठ ही वेग वेगळे पिठ व मसाले वापरून बनवली जाते. काही लोकांना थालीपीठ खूप आवडते पण त्यांना यांची रेसिपी माहीत नाही. व काही लोक बाहेर जाऊ शकत नाही, अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे. एकदम हॉटेल सारखी स्वादिष्ट आणि मसालेदार थालीपीठ रेसिपी कशी बनवतात. आता आपण थालीपीठ रेसिपी पाहणार आहोत.

Thalipeeth Recipe

थालीपीठ रेसिपी मराठी Thalipeeth Recipe In Marathi

थालीपीठच्या पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ :

थालीपीठ तयार करण्यासाठी आपल्याला पूर्वतयारी करावी लागते. सर्व सामान एकत्र करावे लागते. नंतर आपण लवकर थालीपीठ रेसिपी तयार करू शकतो. पूर्वतयारी करीता आपल्याला 15 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

थालीपीठ कुकिंग करण्यासाठी आपल्याला 10 मिनिट वेळ लागतो.

टोटल टाईम :

थालीपीठ रेसिपी तयार करण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते. यासाठी लागणारे सर्व साहित्य एकत्र करावे लागते. याकरिता 15 मिनिट वेळ लागतो, आणि कुकिंग करण्यासाठी 10 मिनिट असा टोटल टाईम 25 मिनिटमध्ये आपली रेसिपी तयार होते.

थालीपीठचे प्रकार :

थालीपीठ हा एक लोकप्रिय पदार्थ आहे, आणि खूप स्वादिष्ट व चमचमीत पदार्थ आहे. वेग वेगळ्या ठिकाणी थालीपीठचे वेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये साबुदाणा थालीपीठ, फळ साबुदाणा थालीपीठ, गोड साबुदाणा थालीपीठ, सोयाबीन थालीपीठ, धापडे अशे अनेक थालीपीठचे प्रकार आहेत, हे सर्व प्रकार एकदम स्वादिष्ट आहेत.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
थालीपीठ रेसिपी ही आपण 4 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

थालीपीठसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) 1 मध्यम वाटी गव्हाचे पीठ.
2) 1 वाटी तांदूळ पीठ.
3) 1 वाटी ज्वारी पीठ.
4) 1 वाटी बाजरी पीठ.
5) 1 वाटी बेसन.
6) 1 चम्मच अजवान.
7) 1 चम्मच हळद.
8) चवीनुसार मीठ.
9) 1 चम्मच जिरा पावडर.
10) 1 चम्मच धनिया पावडर.
11) थोडे तीळ.
12) 1 कांदा.
13) 1 हिरवी मिरची व कोथिंबीर.
14) थोडे तेल.
15) पाणी आवश्यकते नुसार.

पाककृती :

 • सांबर रेसिपी मराठी
 • सर्वात प्रथम मिरची, कोथींबीर स्वच्छ धुऊन घ्या. नंतर एकदम बारीक कापून घ्या, याबरोबर कांदा पण बारीक करा.
 • नंतर एका प्लेटमध्ये गव्हाचे पीठ, बेसन, बाजरी, तांदूळ आणि ज्वारीचे पीठ घेऊन पूर्ण मिक्स करा.
 • नंतर यामध्ये सर्व मसाले टाकून द्या. जसे हळद, जीरा पावडर, धनिया पावडर, मिरची पावडर, कोथिंबीर, कांदा, हिरवी मिरची, तीळ इत्यादी.
 • नंतर यांचे व्यवस्थित मिश्रण करून घ्या, आणि चवीनुसार थोडे मीठ टाका, व थोडे तेल सुध्दा टाका.
 • मिश्रण झाल्यावर त्यामध्ये आवश्यक तेवढे थोडे थोडे पाणी घाला, पीठ हळू हळू मिक्स करत रहा.
 • नंतर पीठ आटोपशीर ओलसर आणि अतिशय गुळगुळीत तयार करा. पिठाची गुणवत्ता यावर अवलंबून आपण पाणी कमी किंवा जास्त टाकू शकतो.
 • आता पीठाचा नरम गोळा तयार करून झाले की सुती किचन रुमाल पाण्याने ओला करा. शिल्लक पाणी मुरेल असा, रुमाल थोडा ओलसर असावा.
 • नंतर गॅस चालू करून एक खोल तळाचा पॅन त्यावर ठेवा, आणि गरम होऊ द्या.
 • आता पीठाचा एक मध्यम गोळा घ्या, आणि आपल्या तळहाताने ओल्या रुमाल वरती टाकून सपाट करा.
 • मध्यम आकारात सपाट करा, सपाट करताना 2 ते 3 थेंब पाणी सुध्दा वापरू शकता.
 • यांच्या मध्यभागी किंवा बाजूंना 3 ते 4 छिद्रे पाडा, यामुळे थालीपीठ चांगली तळण्यासे मदत होते.
 • तवा गरम झाला असेल तर त्यावर थोडे तेल टाकून पसरवा, गॅस मध्यम आशेवरती ठेवा.
 • आता कापड हाताने हळूच उचला तव्याला स्पर्श करून ठेवा. आता थालीपीठला गुंडाळलेले कापड काळजीपूर्वक काढून घ्या.
 • थालीपीठच्या छिद्रावर आणि कडेला थोडे तेल लावा, आणि झाकण ठेवून थालीपीठ 2 ते 3 मिनिटे शिजू द्या.
 • नंतर बेस सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यत तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बेस अधिक तपकिरी करू शकता.
 • उलटा करा आणि दुसरी बाजू देखील शिजवत रहा. जो पर्यत तुम्हाला त्यावर काही तपकिरी किंवा जळलेले डाग दिसत नाहीत.
 • अशा प्रकारे तुम्ही सर्व थालीपीठ तयार करा. दोन्ही बाजूने जळलेले डाग दिसले की आपला थालीपीठ खाण्यासाठी तयार आहे.
 • थालीपीठवर आपण दही, तूप, किंवा हिरव्या मिरचीचा ठेसा घेऊन एकदम स्वादिष्ट थालीपीठ आपण खाऊ शकतो.

थालीपीठमध्ये असणारे घटक :

थालीपीठ तयार करण्यासाठी आपण ज्या सामुग्रीचा वापर करतो, त्यामध्ये विविध घटक आढळून येतात. यामध्ये सोडियम, पोटॅशियम, कार्बोहायड्रेत, फायबर, प्रथिने, व्हिटॅमिन अ, व्हिटॅमिन, कॅल्शियम असे अनेक घटक आहेत. हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत.

फायदे :

थालीपीठ हे ऐकापेक्षा जास्त पिठापासून बनलेली असते. त्यामुळे यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात, यामुळे आपल्या शरीराला मोठा फायदा होतो.

थालीपीठमध्ये ज्वारीचे पीठ असते, यातून आपल्या शरीराला आवश्यक तेवढे अल्कोहोल मिळते.

तसेच थालीपीठमध्ये विशेष घटक असल्यामुळे जसे पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन असल्यामुळे आपण निरोगी राहतो.

तोटे :

थालीपीठमध्ये मिश्र पीठ असल्यामुळे हे एक जड अन्न तयार होते. आपण हे जास्त प्रमाणात सेवन केल्यास आपल्याला पोट दुखी होऊ शकते.

यामध्ये जास्त प्रमाणत प्रथिने आणि पौष्टिक घटक आहे. हे आपण जास्त प्रमाणात सेवन केली तर आपण आजारी पडू शकतो.

तर मित्रांनो, तुम्हाला थालीपीठ रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment