व्हेजिटेबल बिर्याणी मराठी रेसिपी Veg Biryani recipe in Marathi बिर्याणी म्हटलं की, आपल्यासमोर दोन प्रकारच्या बिर्याणी येतात एक म्हणजे व्हेजिटेबल बिर्याणी आणि दुसरी म्हणजे नॉनव्हेज बिर्याणी. आज काल बाजारामध्ये नॉनव्हेज बिर्याणी प्रचलित आहे. जे नॉनव्हेज खात नाहीत, अशी लोक वेज बिर्याणी जास्त पसंत करतात. अशा लोकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत, व्हेज बिर्याणी ही खास रेसिपी. व्हेज बिर्याणी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. तर आज आपण हॉटेल सारखी चमचमीत अशी व्हेजिटेबल बिर्याणी कशी बनवायची हे रेसिपी पाहणार आहोत.
व्हेजिटेबल बिर्याणी मराठी रेसिपी Veg Biryani recipe in Marathi
बिर्याणीच्या पूर्वतयारी करिता लागणारा वेळ :
बिर्याणीची पूर्वतयारी करणे खूपच महत्त्वाचे आहे कारण आपल्याला जर बिर्याणीची टेस्ट हॉटेल प्रमाणे आणायची असेल तर त्यामध्ये घालायचे सर्वच घटक योग्य त्या प्रमाणात पूर्व तयार केले पाहिजेत मग त्यासाठी 30 मिनिटे एवढा वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
व्हेज बिर्याणी कुकिंग करिता आपल्याला 20 मिनिटे एवढा वेळ लागेल.
टोटल टाईम :
व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला पूर्वतयारी आणि बुकिंग टाईम यांचा विचार केला असता 50 मिनिटे एकूण वेळ लागेल.
बिर्याणीचे प्रकार :
बिर्याणी हा भारतीय उपखंडात बनवला जाणारा एक भारतीय खाद्यपदार्थ आहे. हैदराबादी बिर्याणी सर्वात उत्कृष्ट मानली जाते. बिर्याणीचे मुख्यता आपल्याला दोन प्रकार पाहायला मिळतात. एक म्हणजे नॉनव्हेज बिर्याणी आणि दुसरी म्हणजे व्हेज बिर्याणी. नॉनव्हेज बिर्याणी वेगवेगळ्या प्रकारात बनवली जाते. तसेच व्हेज बिर्याणी सुद्धा बनवण्याची आपापली वेगवेगळी पद्धत आहे. बिर्याणी हा शब्द फारसी भाषेतून आला असून तो एक उर्दू शब्द आहे.
वाढीव :
खालील सामग्री लक्षात घेता आपण ही बिर्याणी 5 व्यक्तींकरिता बनवणार आहोत.
बिर्याणी बनवण्यासाठी लागणारी सामग्री :
1) एक पाव तांदूळ
2) एक कप बारीक चिरलेले गाजर
3) दोन मोठ्या आकाराचे कांदे
4) 2 कप पाणी
5) एक कप फूलगोबीचे तुकडे.
6) दहा ते पंधरा काजू
7) दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट
8) पाव कप दही
9) पाच चमचे बटर
10) मीठ (चवीनुसार)
11) एक चमचा लाल मिरची पावडर
12) एक छोटी वाटी बारीक कापलेली बीन्स
13) दोन चिमूट केशर.
14) आपण हे भाज्या आपल्या आवडीनुसार बारीक
चिरून घेणे.
15) गरम मसाला मध्ये एक इंच दालचिनी, पाच ते
सहा लवंगा, चार-पाच विलायची तील
तमालपत्र, 5-6 काळेमिरी इ.
16) दोन कप टोमॅटो प्युरी.
पाककृती :
- बिर्याणी करण्याआधी सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये दोन-तीन चमचे बटर किंवा तूप घालून ते थोडं गरम झाल्यावर यामध्ये दहा ते पंधरा काजू बिया घालून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्या. नंतर त्याला एका प्लेटमध्ये बाजूला काढून घ्या.
- यानंतर बिर्याणी करता वापरण्यात येणारे सर्व गरम मसाले जसे की दालचिनी, लवंग, काळीमिरी, तमालपत्र यांना त्याच उरलेल्या बटरमध्ये परतून घ्या.
- बटरमध्ये हे गरम मसाले भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे घालून चांगल्या प्रकारे परतून घ्या. त्यानंतर त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घाला.
- कांदा चांगल्या प्रकारे परतून घेतल्यानंतर यामध्ये बारीक कापलेले बीन्स, फूलगोभीचे बारीक तुकडे, बारीक चिरलेला गाजर, हिरवे मटर तसेच आपल्या आवडीच्या भाज्या घालून चांगल्या प्रकारे मिश्रण परतून घ्या.
- नंतर त्यामध्ये लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण चांगल्या प्रकारे परतून घ्यावे. आता थोडा वेळ गॅस मध्यम आचेवर पाच ते सहा मिनिटापर्यंत ठेवावा. त्या सर्व मिश्रणाला वाफ येईल.
वाफ येण्यास सुरुवात झाली की, यामध्ये आपण तयार केलेले चार ते पाच टोमॅटोची प्युरी घालून घ्या. - याला मध्यम आचेवरच शिजू द्यावे त्यामुळे टोमॅटोचा कच्चेपणा निघून जाईल, चार-पाच मिनिटानंतर ही ग्रेव्ही घट्ट होईल. जर ग्रेव्ही घट्ट झाली नसेल तर गॅस मोठ्या आचेवर ठेवून ती ग्रेव्ही घट्ट करून घ्यावी.
- ग्रेव्ही पातळ राहील तर आपली बिर्याणी ओलसर आणि मुगडे होणार नाही, त्यामुळे ग्रेव्ही नेहमी घट्टच असायला हवी.
- आता आपण बिर्याणीसाठी लागणारी ग्रेव्ही तयार केली आहे, यामध्ये एक पाव दही घालून ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यावे.
- तोपर्यंत बिर्याणीसाठी लागणारा भात शिजवून घेण्याची कृती पाहूया :
- बिर्याणी तयार करण्यापूर्वी बासमती तांदूळ स्वच्छ पाण्यात धुवून 25 मिनिटे भिजू द्यावेत.
- एका भांड्याला बटर गरम करून त्यामध्ये दोन विलायची, एक तमालपत्र व तीन लवंगा आहेत. सर्व घालून जोपर्यंत त्याचा सुगंध सुटत नाही तोपर्यंत चांगल्या प्रकारे परतून घ्या.
- यानंतर या परतून घेतलेल्या भांड्यात बासमती तांदूळ पाण्यासोबत घाला. यामुळे खड्या मसाल्यांचा सुगंध या तांदुळामध्ये भरला जाईल.
- या प्रक्रियेत गॅस मोठ्या आचेवर ठेवून हे तांदूळ उकडून घ्यावे. यानंतर यामध्ये मीठ घालावे.
- पाण्याला उकळी आल्यानंतर आपले तांदूळ पाण्यावर तरंगायला लागतील अशा वेळेस गॅस कमी करून घ्यावा.
- मोठ्या आचेवर पाच ते दहा मिनिटे उकडण्यासाठी ठेवून द्यावे. आता आपला भात मंद आचेवर शिजू द्यावा.
- हा तांदूळ 70 टक्के शिजवायचा असून 30 टक्के बिर्याणी मध्ये आपोआप शिजतो.
- 70% शिजल्यानंतर हे तांदूळ थंड होण्यासाठी एका परातीमध्ये काढून घ्या मात्र परातीत काढून घेत असताना तांदूळ तुटता कामा नये.
- व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी एक खोलगट भांडे घेऊन त्यामध्ये आतून सर्व ठिकाणी बटर किंवा तूप ब्रशच्या मदतीने पसरवून घ्या.
- आता त्यामध्ये एक लेयर तांदुळाची टाका. व पसरवून घ्या त्यानंतर त्यामध्ये तळलेला कांदा तळलेले काजू आणि थोडी ग्रेव्ही वरून टाकावी.
- यानंतर पुन्हा असेच तांदुळाची लेयर पसरवून त्यावर थोडे तळलेले काजू ग्रेव्ही त्याचा थर तयार करून घ्या. नंतर त्यावर एक चमचा तूप फिरवून हिरवी कोथिंबीर तळलेला कांदा केसर काजू घालून झाकण बंद करावे. आता हे भांड गॅसवर मध्यम आचेवर वीस मिनिटं ठेवावे झाकण बंद केल्यानंतर या झाकणाला एका कपड्याच्या सहाय्याने बंद करावे. त्याने आतील हवा बाहेर जाणार नाही. त्यामुळे आपल्या बिर्याणीला एक प्रकारचा स्वाद येईल.
- 25 मिनिटे झाल्यानंतर गॅस बंद करून झाकण काढून घ्यावे आणि एका बाजूने हळुवारपणे बिर्याणी मिक्स करत रहावे, जेणेकरून आपली व्हेज बिर्याणी रंगीबिरंगी दिसेल.
- आपली गरमागरम व्हेज बिर्याणी रेसिपी तयार आहे. आता ही बिर्याणी तुम्ही बनवलेल्या ग्रेव्ही सोबत किंवा कोशिंबीर सोबत ही खाऊ शकता.
व्हेज बिर्याणी मध्ये असलेले पोषक घटक :
आपण वर दिलेल्या सामग्रीमध्ये पाहिलेच आहे, की व्हेज बिर्याणी मध्ये वेगवेगळे फळभाज्यांचा देखील आपण उपयोग करतो त्यामुळे हा एक पोषक खाद्यपदार्थ बनतो. त्यामध्ये कोलेस्ट्रॉल आणि सोडियमचे प्रमाण खूप कमी असते. आणि इतर फळभाज्यांमध्ये फायबर आणि मॅग्नीजचे प्रमाण जास्त असते.
फायदे :
व्हेज बिर्याणी हे आरोग्यदायी आहार मानला जातो. कारण त्यामध्ये गाजरासारख्या विविध प्रकारच्या ताज्या भाज्यांचे मिश्रण असते. आणि सर्वच फळभाज्या ह्या आपल्या शरीरासाठी पोषक असतात. त्यामुळे व्हेज बिर्याणीची आपल्या शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.
तोटे :
व्हेज बिर्याणी शरीरासाठी पोषक अन्नपदार्थ आहे परंतु त्याचे मोठ्या प्रमाणात सेवन केल्यास पोटदुखीचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे मर्यादितच खाल्ली पाहिजे.
तर मित्रांनो, तुम्हाला व्हेज बिर्याणी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.