Andhashradha Information In Marathi अंधश्रद्धा आपल्या समाजातील एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. मात्र याबद्दल म्हणावे तसे बोलले जात नाही. पूर्वीच्या काळी वाईट गोष्टी करण्यापासून किंवा धोक्याच्या गोष्टी करण्यापासून रोखण्यासाठी या अंधश्रद्धा तयार करण्यात आल्या होत्या, मात्र पुढे जाऊन लोकांनी त्याला इतके बदलून टाकले, की आज काल गरज नसताना देखील या अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर फैलावत आहेत.
अंधश्रद्धेचेची संपूर्ण माहिती Andhashradha Information In Marathi
आपल्या समाजात अंधश्रद्धा ही एक मोठी समस्या होऊन बसलेली आहे, आणि या अंधश्रद्धेचे निराकरण केले नाही तर फार मोठ्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. आणि भविष्यात समाजावर त्याचा मोठा विपरीत परिणाम होऊ शकतो. मित्रांनो खऱ्या अर्थाने श्रध्येला तडा गेला की अंधश्रद्धा आपली जागा पक्की करत असते.
अंधश्रद्धा कुठल्याही आधाराशिवाय असलेल्या असून, अतिशय पोकळ आहेत, मात्र समाजामध्ये त्यांची पाळेमुळे खूप खोलवर रुजली गेलेली आहेत. त्यामुळे या अंधश्रद्धा समाजातून दूर करणे वाटते तेवढे सोपे नाही. मित्रांनो एक वेळेस माणूस आपल्या जवळच्या व्यक्तीवर विश्वास ठेवणार नाही, मात्र अंधश्रद्धेवर पटकन विश्वास ठेवतो, अशी परिस्थिती दिसून येत आहे.
एका सर्वेनुसार भारतातील तीन लोकांपैकी एक लोक अंधश्रद्धेने ग्रासलेला असून, त्यामुळे त्यांनी स्वतःच्या आयुष्याची देखील वाताहात करून घेतली आहे. या अंधश्रद्धा पाळणाऱ्यांमध्ये, अशिक्षित लोक तर आहेतच. शिवाय त्यांच्याबरोबरच शिक्षित लोकांचा देखील समावेश आहे.
मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण अंधश्रद्धेबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.
अंधश्रद्धा म्हणजे काय:
मित्रांनो, पिढीपार चालत आलेल्या अनेक समजुती ज्यांच्याबद्दल कोणालाही काही माहिती नसते, मात्र दैवी धाकाच्या भीतीने या गोष्टींवर विश्वास ठेवून तशी वागणूक करणे म्हणजे अंधश्रद्धा. अंधश्रद्धाळू लोक देवाच्या खोट्या भक्तीमध्ये इतके तल्लीन होतात, की कोणी काहीही सांगितले की पटकन त्यावर त्यांचा विश्वास बसत असतो. अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे देवाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह नसून, खरंच देवाने अशा प्रथा पाळायला सांगितले आहे का? यावर प्रश्नचिन्ह असते.
अंधश्रद्धेचे विविध प्रकार:
मित्रांनो, दररोज आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणावरील वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा ऐकायला मिळतात. याचे उदाहरण म्हणजे २०१७ या वर्षी उत्तर भारतातील काही महिलांच्या अचानक वेण्या कापल्या जात असल्याच्या बातम्या ऐकायला मिळत होत्या. हा कारनामा भूतांचा आहे, अशी अफवा सर्वत्र पसरली होती. मात्र सखोल माहिती घेतली असता असे लक्षात आले की, या प्रत्येक महिलांनी स्वतःची वेणी स्वतःच कापली होती. आणि हे सगळे त्यांनी अंधश्रद्धा मुळे केले असल्याचे निष्पन्न झाले.
दुसऱ्या एका घटनेमध्ये २०१७ या वर्षीच राजस्थानच्या अजमेरमध्ये एका महिलेची तिच्या कुटुंबीयांनी ती भूत अथवा डायन असल्याच्या अंधश्रद्धेतून हत्या केली होती.
यामध्ये दक्षिण भारत देखील मागे नाही, असेच २०१८ या वर्षी हैदराबाद या ठिकाणी एका तांत्रिकाच्या सांगण्यानुसार, एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या आजार बरा व्हावा याकरिता आपल्या मुलालाच गच्चीवरून फेकून दिले होते. तर दुसऱ्या एका घटनेत दिल्लीमध्ये ११ जणांनी सामूहिक फाशी घेऊन आपले जीवन संपवले होते. यावरून मित्रांनो अंधश्रद्धा किती घातक ठरवू शकते याची प्रचिती येते.
अंधश्रद्धेचा समाजावर होणारा परिणाम:
मित्रांनो, पूर्वीच्या काळी काही कारणामुळे या अंधश्रद्धांची निर्मिती केली जात असत. आता मांजर आडवी जाण्याचेच उदाहरण बघा. पूर्वीच्या काळी मांजरीने रस्ता ओलांडल्यास रात्री प्रवासाकरता वापरण्यात येणारे बैल मांजरीच्या डोळ्यांना घाबरत असत, आणि सैरभैर पळत सुटत असत.
परिणामी प्रवाशांना दुखापत होई, म्हणून या अंधश्रद्धेची निर्मिती केली गेली असे सांगण्यात येते. आणि लोकांनी ते ऐकावे म्हणून त्याला दैवी भीती देखील जोडण्यात आली होती. अशा कितीतरी अंधश्रद्धा सांगता येतील, ज्याचे खरे कारण वेगळेच होते मात्र आजच्या काळामध्ये त्याचा काहीही उपयोग नाही. मात्र लोक आज देखील या अंधश्रद्धा पाळताना दिसतात.
अंधश्रद्धेमुळे समाजाचे मोठ्या प्रमाणावर पतन होत असते, तांत्रिक बाबांनी सांगितलेल्या उपायांमुळे अनेक लोक वाईट मार्गाला देखील लागू शकतात. त्याचप्रमाणे त्यांच्या मनावर वाईट परिणाम देखील होऊ शकतो. काही बाबा बुवा घरातील व्यक्तींची नाव घेऊन त्या व्यक्तीने तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा आणला, किंवा तुमच्यावर करणी केली असे सांगतात.
अशावेळी घरातील नात्यांमध्ये दुरावा येण्याची शक्यता असते. अनेक तांत्रिक बाबा अंधश्रद्धेकरिता पैसा उकळत असतात, त्यामुळे समाजाची आर्थिक स्थिती देखील खालावली जाते.
मित्रांनो, असे असले तरी देखील आज अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी सरकारने अनेक कायदे केलेले आहेत. कर्नाटक सरकारने सुद्धा २०१७ या वर्षी अंधश्रद्धा विरोधी कायदा केलेला आहे. भारत सरकार सोबतच प्रत्येक राज्य सरकारने देखील अंधश्रद्धेविरोधी कायदे करून, याला आवर घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच राज्यघटनेच्या कलम ‘५१ ए’ मध्ये देखील सांगितले आहे की, मानवाने अंधश्रद्धेला खत पाणी न घालता विज्ञान आणि मानवतावादाची भावना जोपासावी, आणि हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असेल.
निष्कर्ष:
मित्रांनो, अंधश्रद्धे विरुद्ध प्रत्येक जण भाष्य करत असतो, किंवा अंधश्रद्धा विषयी बोलत असतो. मात्र ज्यावेळी स्वतः अंधश्रद्धे विरुद्ध काही प्रयत्न करण्याची वेळ येते त्यावेळी प्रत्येक जण अंधश्रद्ध्येला घाबरून मागे सरतो. अंधश्रद्धेवर मोठी भाषणे देणारी लोक वैयक्तिक आयुष्यात मात्र अंधश्रद्धा पाळत असतात.
या ठिकाणी एक विनोद आवर्जून सांगावा वाटतो, तो म्हणजे एक व्याख्याता अंधश्रद्धा एक शाप या विषयावर भाषण द्यायला चालला होता. मात्र त्याला मांजर आडवे गेल्यामुळे हे भाषण रद्द करून तो पुन्हा घरी आला.
मित्रांनो, अशीच परिस्थिती काहीतरी आपल्या समाजात बघायला मिळते. आज आपण अंधश्रद्धा विषयावर माहिती घेतली आहे, ज्यामध्ये तुम्हाला अंधश्रद्धा म्हणजे काय, बाबा किंवा तांत्रिक लोक यांची कारनामे, अंधश्रद्धेचे प्रकार, समाजावर अंधश्रद्धेचा होणारा परिणाम, व या अंधश्रद्धेला संपवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न, त्याचप्रमाणे अंधश्रद्धा पसरण्याची कारणे, लोक अंधश्रद्धेवर का विश्वास ठेवतात, इत्यादी गोष्टींचा आढावा घेतलेला आहे. सोबतच काही प्रश्न उत्तरे देखील बघितलेली आहेत.
FAQ
अंधश्रद्धेमुळे समाजावर काय परिणाम दिसून येतात?
मित्रांनो, अंधश्रद्धा या जुगारापेक्षाही काही कमी नाहीत. या अंधश्रद्धेमुळे देखील समाजावर घातक परिणाम होऊन आर्थिक स्थिती ढासळण्याची परिस्थिती देखील निर्माण होते. तसेच अंधश्रद्धेमुळे व्यक्तीच्या मनावर वाईट परिणाम होतो. तसेच आपसामध्ये वैर येण्याचे देखील संभाव्यता असते. त्याचप्रमाणे अंधश्रद्धेच्या नावाखाली एखादा गुन्हा किंवा वाईट कृत्य घडण्याची देखील संभाव्यता असते.
अंधश्रद्धा कशावर आधारलेली असते?
मित्रांनो, अंधश्रद्धा ही एखाद्या प्रचलित घटनांची साखळी असते. ज्यामुळे पूर्वपार लोक एखाद्या मिथकावर विश्वास ठेवत असतात. आणि पिढीनपिढ्या हे मिथक चालल्यामुळे ते अंधश्रद्धा मध्ये रूपांतरित होते.
अंधश्रद्धेचे काही फायदे आहेत का?
मित्रांनो, अंधश्रद्धा वाईट असली तरी देखील तिचे काही फायदे देखील आहेत. जसे की अंधश्रद्धा मुळे समाजातील लोकांना देवाच्या भीतीमुळे एखाद्या वाईट कृत्य करण्यापासून रोखले जाऊ शकते. तसेच अंधश्रद्धेच्या भीतीने का होईना समाजामध्ये वितृष्ठ येत नाही.
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी असणाऱ्या समितीचे नाव काय आहे?
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अंनिस अर्थात अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्य करत असते.
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी खूप मोठे कार्य करणारे व्यक्तीचे नाव काय आहे?
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी खूप मोठे कार्य करणारे डॉक्टर नरेंद्र अच्युत दाभोळकर हे व्यक्ती होते.
मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण अंधश्रद्धा या विषयावर माहिती बघितलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये आवर्जून कळवा. याशिवाय तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींना ही माहिती वाचायला मिळावी, आणि त्यांच्यातील अंधश्रद्धा दूर व्हावी यासाठी यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. तसेच अंधश्रद्धा पाळणाऱ्या आणि त्याला खतपाणी घालणाऱ्या व्यक्तींना देखील ही माहिती आवर्जून वाचण्यास सांगा.
धन्यवाद…