BCA Course Information In Marathi शिक्षण क्षेत्र एवढे पुढे गेले आहे की, आज काल आपण कोणत्या क्षेत्रात पदार्पण करावे. हे सुद्धा आपल्याला कधी कधी कळत नाही. त्यामुळे सगळीकडे हे प्रश्न पडतात. दहावीपर्यंतचे शिक्षण मात्र सर्वांचे सारखेच असते; परंतु त्यानंतर आपल्याला बारावी पूर्ण करण्यासाठी किंवा त्या पुढचे शिक्षण घेण्यासाठी कोणते क्षेत्र निवडावे हे आपल्या लगेच लक्षात येत नाही. जर तुम्हाला पुढील शिक्षण कोणते घ्यावे.
बीसीए कोर्सची संपूर्ण माहिती BCA Course Information In Marathi
याविषयी आधीच माहिती असेल तर ते शिक्षणाचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. परंतु तुम्ही दुसऱ्याच्या म्हटल्याने जर शिक्षण घेत असाल तर त्याचा काहीही उपयोग नाही, त्यामुळे तुम्हाला तुमचे कोणते क्षेत्र निवडायचे आहे. हे आधी ठरवावे लागते. आज आम्ही तुमच्याकरिता बीसीए याविषयी माहिती सांगणार आहोत.
बऱ्याच विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर या विषयांमध्ये अधिक रुची असते. त्यामुळे तुम्हाला जर बीसीए या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रवेश घेतला तर तुमचे भविष्य तुमच्या हातात असते कारण ज्या क्षेत्रात आपली आवड आहे. तेच क्षेत्र आपण निवडावे असे केल्याने त्यामध्ये आपली प्रगती लवकर होते.
बीसीए हे काय आहे ?
जर आपण बीसीएचा फुल फॉर्म पाहिला तर त्याचा फुल फॉर्म बॅचलर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन(Bachelor of Computer Application) असा होतो. याचा अर्थ कम्प्युटर रिलेटेड हा कोर्स आहे. बीसी हा कोर्स तीन वर्षाचा असतो आणि या तीन वर्षांमध्ये तुम्हाला सहा सेमिस्टर अभ्यासक्रमामध्ये असतात. बीसीए हा कोर्स प्रोफेशनल डिग्री कोर्स म्हणून याच्याकडे बघितले जाते. बीसीए हा कोर्स एक अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे आणि या कोर्समध्ये आपल्याला कम्प्युटर एप्लीकेशन आणि कम्प्युटर सायन्स यांच्याशी निगडित बऱ्याचशा गोष्टी शिकविल्या जातात.
तुम्हाला जर शिक्षण क्षेत्रात चांगले करिअर घडवायचे असेल तर बीसीए हा कोर्स तुमच्याकरिता उपयोगी पडू शकतो तसेच बीसीएस असे अनेक कोर्स यामध्ये उपलब्ध आहेत. आपण पुढे यामध्ये मास्टर डिग्री सुद्धा करू शकतो आणि नंतर पीएचडी सुद्धा करू शकतो. BCA हा एक असा कोर्स आहे, जो आपण बारावी सायन्स या शाखेतून किंवा मग आयटी क्षेत्रातील विद्यार्थी हा कोर्स करू शकतात.
बीसीए करण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता :
तुम्हाला कोणताही कोर्स जर करायचा असेल तर त्या संबंधित विद्यार्थ्यांना काही पात्रतेच्या अटी पूर्ण कराव्या लागतात तसेच बीसीए हा कोर्स करत असताना तुम्हाला संस्थेने ठरवलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करावी लागते. हा कोर्स करण्यासाठी पुढील पात्रता निकष लक्षात घेऊया.
जर एखाद्या विद्यार्थ्याला बीसीए हा कोर्स पूर्ण करायचा आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण इंग्रजी विषयातून पूर्ण केले पाहिजे किंवा मग त्याचे बारावी सायन्स या शाखेमध्ये शिकत असताना गणित हा विषय मुख्य असला पाहिजे ही अट आहे.
त्या विद्यार्थ्याने बारावीही विज्ञान शाखेतून मान्यता प्राप्त विद्यापीठातूनच पूर्ण केली पाहिजे बारावी मध्ये कमीत कमी 50% गुण तरी मिळवले पाहिजे.
संबंधित विद्यार्थी हा भारताचा नागरिक असला पाहिजे तसेच काही संस्था या बारावीमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणवत्तेच्या आधारे प्रवेश देतात.
विद्यार्थ्यांना वैयक्तिक मुलाखती किंवा विविध संस्था विद्यापीठाच्या घेतलेल्या लेखी परीक्षेच्या आधारे प्रवेश दिला जातो. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय हे कमीत कमी सतरा वर्ष व जास्तीत जास्त 25 एवढे असावे.
बीसीए या अभ्यासक्रमामध्ये असणारा कोर्स किती वर्षाचा आहे?
बीसीए हा कोर्स तीन वर्षाचा असून त्या अभ्यासक्रमामध्ये त्याचे सहा सेमिस्टर आहेत. ते खालील प्रमाणे जाणून घेऊया.
सेमिस्टर 1 : यामध्ये पायाभूत गणित, हार्डवेअर लॅब, सर्जनशील इंग्रजी, डिजिटल संगणक मूलभूत तत्वे, प्रोग्रामिंगचा परिचय सी प्रोग्रामिंग लॅब आणि पीसी सॉफ्टवेअर लॅब.
सेमिस्टर 2 : कास्ट ऑपरेटिंग सिस्टीम, संप्रेषणात्मक इंग्रजी, मूलभूत गणित, डेटा स्ट्रक्चर, डेटा स्ट्रक्चर लॅब आणि व्हिज्युअल प्रोग्रामिंग.
सेमिस्टर 3 : प्रस्ताविक बीजगणित, परस्पर संवाद, आर्थिक लेखा, डेटाबेस व्यवस्थापन, सॉफ्टवेअर अभियांत्रिकी प्रणाली, सी प्लस प्लस (C++) वापरून ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅम, सी प्लस प्लस (C++), डोमेन लॅब
सेमिस्टर 4 : आर्थिक व्यवस्थापन, व्यवसायिक इंग्रजी, संगणक नेटवर्क, प्रोग्रामिंग डीबीएमएस प्रकल्प वेब तंत्रज्ञान प्रयोगशाळा आणि भाषा प्रयोगशाळा.
सेमिस्टर 5 : युनिक्स प्रोग्रामिंग ग्राफिक्स आणि ॲनिमेशन वापर करता, इंटरफेस डिझाईन, पायथन प्रोग्रामिंग व्यवसाय बुद्धिमत्ता, युनिक स्लॅब वेब, डिझाईनिंग प्रकल्प, पायथन प्रोग्रामिंग लॅब, ग्राफिक्स आणि ॲनिमेशन लॅब, बिजनेस इंटेलिजन्स लॅब.
सेमिस्टर 6 : क्लाऊड कम्प्युटिंग मल्टीमीडिया अनुप्रयोग शॉप, कम्प्युटिंगचा परिचय, अल्गोरिदम डिझाईन, क्लाइंट सर्वर संगणक संगणक, आर्किटेक्चर डेटाबेस व्यवस्थापन प्रणाली.
BCA कोर्स नंतर तुम्ही कशामध्ये करिअर करू शकता.
BCA हा कोर्स एखाद्या विद्यार्थ्याने पूर्ण केला तर त्याला अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम मिळू शकते व त्याचे जीवन सुखाने जाऊ शकते. त्याकरता कोणकोणते क्षेत्र आहेत. ते आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया.
- सॉफ्टवेअर डेव्हलपर
- संगणक अभियंता
- संगणक प्रणाली विश्लेषक
- संगणक समर्थन विशेषज्ञ
- वित्त व्यवस्थापक
- विपणन व्यवस्थापक
- शिक्षक आणि व्याख्याता
- व्यवसाय सल्लागार
- मोबाईल ॲप विकास
- तांत्रिक लेखक.
याव्यतिरिक्त बीसीए पदवीधरकांना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी, आयटी सल्लागार कंपन्या तसेच बँका, ई-कॉमर्स कंपन्या, सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था आणि इ. विविध क्षेत्रांमध्ये रोजगार उपलब्ध होऊ शकतो, त्यामुळे हा कोर्स विद्यार्थ्यांकरिता महत्त्वाचा ठरू शकतो.
बीसीए(BCA) कोर्सचा फायदे :
बीसीए कम्प्युटर एप्लीकेशनमध्ये करिअर करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता BCA कोर्सचा फायदा होऊ शकतो.
बीसीए हा संगणक अनुप्रयोग आणि प्रोग्रामिंग भाषांमध्ये एक पाया मजबूत करतो, त्यामुळे याचा अभ्यास किंवा विशेष प्रशिक्षणासाठी हा कोर्स महत्त्वाचा ठरतो.
अभ्यासक्रमाचा उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन केलेला असा बीसीएचा अभ्यासक्रम आहे. त्यामुळे पदवीधरांना उच्च प्रतीचे रोजगार उपलब्ध होऊ शकतात.
बीसीए पदवीधारकांकडे विविध क्षेत्रांमध्ये करिअर करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असतात.
FAQ
बीसीए हा कोर्स कोण करू शकतो?
बीसीए हा कोर्स बारावी सायन्स किंवा आयटी विद्यार्थी करू शकतात.
बीसीए केल्यानंतर पुढचे शिक्षण तुम्ही कोणती घेऊ शकता?
MCA.
बीसीए सेकंड सेमिस्टरमध्ये कोणते विषय आहेत?
कास्ट ऑपरेटिंग सिस्टीम, संप्रेषणात्मक इंग्रजी, मूलभूत गणित, डेटा स्ट्रक्चर, डेटा स्ट्रक्चर लॅब आणि व्हिज्युअल प्रोग्रामिंग.
बीसीए हा कोर्स किती वर्षाचा आहे?
बीसीए हा तीन वर्षाचा कोर्स आहे.
बीसीए याचा फुल फॉर्म काय आहे?
Bachelor of Computer Application.