जी डी सी ए कोर्सची संपूर्ण माहिती GDCA Course Information In Marathi

GDCA Course Information In Marathi विद्यार्थ्यांना दहावी किंवा बारावी पास झाल्यानंतर पुढे काय करायचे असा प्रश्न पडतो परंतु आजची परिस्थिती खूप बिकट आहे. ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात तुम्हाला भरपूर स्पर्धा दिसतात. पूर्वीच्या शिक्षण प्रणालीमध्ये आणि आजच्या शिक्षण प्रणालीमध्ये अनेक बदल घडून आलेले आहेत. पूर्वीच्या काळी दहावी बारावी शिक्षण म्हणजे खूप शिक्षण झाले असे समजले जायचे, परंतु आज दहावी बारावी किंवा बोर्डाची परीक्षा केवळ हे पुढील अभ्यासक्रमासाठीचा पाया समजल्या जातो. तुमच्याकडे दहावी बारावी मार्कशीट असेल आणि तुम्हाला एखाद्या संस्थेत किंवा कंपनीमध्ये काम करायचे असेल तर ते शक्य नाही.

GDCA Course Information In Marathi

जी डी सी ए कोर्सची संपूर्ण माहिती GDCA Course Information In Marathi

आज काल एवढी स्पर्धा वाढली आहे की, शिक्षण क्षेत्रात अनेक पर्याय आपल्यासमोर खुले झालेले आहेत. कुठेही नोकरी करायची असेल तर आपल्याला ग्रॅज्युएशन पूर्ण असलेच पाहिजे. बऱ्याचदा ग्रॅज्युएशन किंवा एखादी नोकरी जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्या विवाहामध्ये सुद्धा अनेक अडचणी उभ्या राहतात.

बरेच कोर्स हे खूप महागडे असतात परंतु ते पूर्ण करण्यासाठी आपली आर्थिक परिस्थिती कमकुवत असते. दहावीची परीक्षा पास झाल्यानंतर किंवा बारावी झाल्यानंतर आपल्याला परवडणारा असा कोणता कोर्स आहे. याविषयी आपण माहिती जाणून घेणे गरजेचे असते की, जो उत्पन्नाचा आणि रोजगाराचा मार्ग आपल्यासाठी उपलब्ध करून देईल.

जी डी सी ए म्हणजे काय?

जी डी सी ए म्हणजेच गव्हर्मेंट डिप्लोमा इन कार्पोरेशन अँड अकाउंटन्सी. ही एक अशी पदवी आहे, जी महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांना देते आणि सहकारातील सरकारी डिप्लोमा आणि अकाउंटन्सीचा यामध्ये अभ्यासक्रम असतो सतत सहकारी क्षेत्रात वाढत असलेल्या व्यवसायिक उमेदवारांकरिता हा अभ्यासक्रम सरकारद्वारे दिला जातो.

याचा फॉर्म जिल्हा उपनिबंधक कार्यालय किंवा सहकारी संस्था येथे उपलब्ध होत असतात. ही एक राज्यस्तरीय परीक्षा आहे, जी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाते. ही एका वर्षाची मान्यता प्राप्त पदवी असते विभागीय लेखात संयुक्त नोंदणी आणि बॉम्बे नागरी सेवा नियम शिस्त अपील नियम आणि नोंदणीचे अधिकार यावर या परीक्षेचे प्रशिक्षण दिले जाते.

जी डी सी ए कोर्सच्या पात्रता :

हा कोर्स पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काही पात्रता पूर्ण कराव्या लागतात. विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेतून 50% गुणांनी परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते. जीडीसीए ही परीक्षा देण्यासाठी ग्रॅज्युएशन पूर्ण लागते. महाराष्ट्र सरकारी कर्मचारी परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

जर तुम्हाला एखाद्या गव्हर्मेंट सेक्टरमध्ये काम मिळालेले असेल किंवा एखाद्या को-ऑपरेटिव्ह संस्थेत काम करत असाल तर तुम्हाला ही परीक्षा द्यायची असेल आणि त्यासाठी काही अटी आहेत, त्या म्हणजे बारावी तुम्ही बारावी पास असाल तर तुम्हाला तीन वर्ष कामाचा अनुभव लागेल आणि जर तुमची दहावी झालेली असेल तर त्या ठिकाणी पाच वर्षाच्या कामाचा अनुभव लागेल.

तुम्ही जी परीक्षा देणार आहात त्यासाठी वयाची अट सुद्धा आहेत. ती म्हणजे विद्यार्थ्यांचे व हे 22 ते 31 वर्ष असणे अनिवार्य आहे. या परीक्षेची जाहिरात मात्र जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये प्रसिद्ध होते आणि मे महिन्यात या परीक्षा घेतल्या जातात. साधारणपणे ही परीक्षा दर वर्षी मी महिन्याच्या 24, 25 आणि 26 तारखेला घेतली जाते.

जी डी सी ए या परीक्षेचा अभ्यासक्रम :

जी डी सी या परीक्षेचा अभ्यासक्रम पाहिला असता यामध्ये सहा विषय असतात आणि प्रत्येक पेपर हा 100 मार्काचा असतो एका दिवसाला दोन पेपर घेतले जातात. हे पेपर तीन दिवस चालतात. तीन दिवसात सहा पेपर पूर्ण होतात अशी या अभ्यासक्रमाची रचना आहे.

हा अभ्यासक्रम सहकार या विषयाशी संबंधित असतो तसेच सहकार म्हणजे काय? सहकाराची भावना काय? सहकार व्यवस्थापन म्हणजे काय व ते कसे करायचे? त्याच्यात कोणते कोणते पद असते तसेच त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या कलमांचा कसा वापर केला जातो आणि प्रशिक्षण कसे दिले जाते. याविषयी सर्वच सखोल माहिती दिलेली असते.

जी डी सी या परीक्षेसाठी पुढील सहा विषय असतात :

  • मॅनेजमेंट ऑफ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी.
  • अकाउंट.
  • ऑडिटिंग हिस्टरी प्रिन्सिपल अँड मॅनेजमेंट इन कॉर्पोरेशन.
  • बँकिंग अँड क्रेडिट सोसायटी.

जी डी सी ए या परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कॉलेजला जाण्याची गरज नसते, तसेच हा अभ्यासक्रम तुम्ही ऑनलाईन सुद्धा करू शकता कारण या अभ्यासक्रमाची ऑनलाईन पुस्तके सुद्धा उपलब्ध आहेत तसेच खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये सुद्धा हा अभ्यासक्रम शिकवला जातो.

जास्तीत जास्त कोणत्या विषयांवर भर द्यावा?

हा अभ्यासक्रम ठरवून देण्यात आलेला आहे, तरीसुद्धा खाली दिलेल्या विषयांवर जास्तीत जास्त अभ्यास करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.

बँकिंग सहकारी ऑडिट आणि सहकारी व्यवस्थापन सहकार कायदा आणि इतर कायदे सहकाराचा सिद्धांत आणि इतिहास सहकार्याची व्याख्या आणि तत्वे
इतिहासाचे महत्त्व प्रसंगीकता आणि सहकार्याचे महत्त्व भारतातील सहकारी चळवळीची वाढ सहकारी चळवळीचा विकास सहकारी चळवळीतील संबंधाची भूमिका जगाच्या आधुनिकीकरण आणि खाजगीकरनामध्ये सहकार्याचे स्थान

तसेच इतर समित्यांचा मुख्य शिफारशी आणि वेळोवेळी जाहीर केल्या जाणाऱ्या इतर समित्यांचा अभ्यास त्यामध्ये करणे गरजेचे आहे. अखिल भारतीय ग्रामीण पतसंरक्षण समिती 1954.

  • सहकारी पतपुरवठा समिती
  • मेहता समिती कृषी पथक
  • पुनरावलोकन समिती
  • सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या गरजा आणि पायाभूत सुविधा यांच्यामुळे राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ.
  • राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ खादी आणि ग्रामोद्योग.
  • महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ
  • राज्य सहकारी संघ
  • महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद
  • लेखातत्त्वे
  • पुस्तक ठेवण्याची तत्वे
  • त्रुटी सुधारणे ट्रेडिंग खाते
  • पावती आणि पेमेंट खाते
  • नफा आणि तोटा खाते
  • शिल्लक निवड उत्पन्न आणि खर्च खाते.

GDCA या परीक्षेसाठी अर्ज कसा करायचा?

जी डी सी ए या परीक्षेचा फॉर्म आपण ऑनलाइन भरू शकतो. हे फॉर्म ऑनलाईन भरताना आपल्याला आवश्यक ती माहिती त्यामध्ये भरावी लागते. तसेच आवश्यक असणारी कागदपत्रे सुद्धा अपलोड करावी लागतात. तुमचे हॉल तिकीट व जेथे परीक्षा होणार आहे ते ठिकाण आपल्याला ऑनलाइन वेबसाईट द्वारे मिळते. या फॉर्मची फीज आठशे रुपये असते. तर एसटी एसटी उमेदवारांसाठी ही फीज पाचशे रुपये असते. ही परीक्षा दिल्यानंतर तुम्ही सहकारी गृहनिर्माण किंवा सोसायटीमध्ये व्यवस्थापक किंवा सल्लागार म्हणून काम करू शकता. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराला लेखापरीक्षण क्षेत्रात चांगली नोकरी सुद्धा मिळते. तुमच्या लेखा आणि लेखापरीक्षण कार्यासाठी पूर्ण परवाना दिला जातो.

ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही सरकारी क्षेत्रात पॅनल ऑडिटर इंटरनल ऑडिटर किंवा अकाउंटंट म्हणून सुद्धा काम करू शकता. तुम्ही जर एखाद्या सहकारी बँकेत प्रायव्हेट बँकेत किंवा सहकारी पतसंस्थेत काम करत असाल तर ही परीक्षा दिल्यामुळे आपल्याला प्रमोशन सुद्धा मिळते व तुम्हाला पगारात वाढ सुद्धा होते. बऱ्याचदा बँकेतील कर्मचारी हे प्रमोशन किंवा इन्क्रिमेंट साठी जी डी सी ए परीक्षा देत असतात .

या परीक्षेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

या परीक्षेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे कर्मचारी आणि कार्यालय राजपत्रित आणि राजपत्रित कर्मचाऱ्यांना विभागीय प्रशिक्षण प्रदान करणे असते. हे प्रशिक्षण मुळात सहकार विभागातील संस्थांमध्ये दिले जातात.

धनंजय गाडगीळ इन्स्ट्रुमेंट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था.

व्हीव्ही पाटील इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट आणि यशवंतराव चव्हाण अकादमी ऑफ डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन.

ही परीक्षा झाल्यानंतर तुमच्यासमोर कोणकोणते रोजगार उपलब्ध होतात?

जी डी सी परीक्षा तुम्ही पास झाल्यानंतर तुमच्यासमोर अकाउंट एक्झिक्युटिव्ह,
ट्रेझरी एक्झिक्युटिव्ह, सोसायटी मॅनेजर, फंड मॅनेजर, सोसायटी ऑडिटर, को-ऑपरेटिव्ह बँक ऑडिटर, असिस्टंट अकाउंटंट आणि वर्किंग कॅपिटल एक्झिक्युटिव्ह असिस्टंट तुम्ही जॉब करू शकता.

FAQ

जी डी सी ए परीक्षेचे पूर्ण रूप काय आहे?

गव्हर्मेंट डिप्लोमा इन कोऑपरेशन अँड अकाउंटन्सी.

जी डी सी ए अर्ज कसा करावा?

जी डी सी ए साठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

जी डी सी ए साठी वयोमर्यादा किती आहे?

22 ते 31 वर्ष.

जी डी सी ए पदवी अभ्यासक्रम किती वर्षाचा आहे?

जी डी सी ए पदवी हा अभ्यासक्रम एका वर्षाचा आहे.

जीडीसीए या परीक्षा कोणत्या तारखेला घेतल्या जातात?

मे महिन्याच्या 24 25 व 26 तारखेला परीक्षा दरवर्षी घेतल्या जातात.

Leave a Comment