दाल मखनी रेसिपी मराठी ( dal makhani recipe in marathi )
नमस्कार खवय्ये बंधुनो,आज आपण दाल मखनी रेसिपी मराठी ( dal makhani recipe in marathi ) पाहणार आहोत.ही रेसिपी ची प्रमाण 3 ते 4 जणांसाठी पुरेशी होते.
दाल मखनी रेसिपी मराठी साहित्य ( dal makhani recipe in marathi )
- अर्धी वाटी अख्खे उडीद साला सकट
- 1/4 वाटी राजमा(रेड बीन्स)
- 3 चमचे आलेलसूण पेस्ट
- 3 ते 4 चमचे बटर
- एक चमचा जिर
- अर्धा चमचा हळद
- 2 मध्यम आकाराचे टोमॅटो
- एक चमचा गरम मसाला पावडर
- किंवा गरम मसाला वापरायचा नसेल तर तुम्ही 2 लवंगा, 2 वेलची,एक तमालपत्र, एक दालचिनी तुकडा
- एक वाटी कांदा बारीक चिरून
- एक चमचा लाल तिखट
- एक चमचा धनेपूड
- अर्धा चमचा आमचूर पावडर
- अर्धा चमचा कसुरी मेथी
- एक कप दूध
- मीठ चवी नुसार
- कोथिंबीर सजावटीसाठी
दाल मखनी रेसिपी मराठी कृती ( dal makhani recipe in marathi )
उडीद डाळ आणि राजमा चांगले धुवून घ्यावे व ६ ते ८ तास पाण्यात भिजवून ठेवावे. कूकरमध्ये भिजवलेले उडीद आणि राजमा दुप्पट पाणी घालून चांगले शिजवून घ्यावेत. साधरण ४ ते 7 शिट्ट्या कराव्यात.
पनीर कोफ्ता करी रेसिपी मराठी | paneer kofta curry recipe in marathi येथे वाचा
टॉमेटो प्युरी बनवण्यासाठी एक खोलगट पॅनमध्ये टॉमेटो बुडतील एवढे पाणी गरम करावे. त्यामध्ये २ टॉमेटो घालून २ मिनीटे उकळून घ्यावे आणि बाहेर काढून थंड होवू द्यावेत. साले आणि बिया काढून घ्यावयात व उरलेला गर आणि थोडे पाणी मिक्सरमध्ये घालून प्युरी बनवावी. खोलगट कढईत बटर घालून मध्यम आचेवर मेलट करून घ्यावे.
त्यात जिरे घालून तडतडू द्यावे व हळद घालावी.
आलेलसूण पेस्ट आणि लाल तिखट घालावे. काही सेकंद परतून घ्यावे.त्यामध्ये चिरलेला कांदा घालून परतुन घ्यावे. कांदा व्यावस्तीत परतल की त्यामध्ये टॉमेटो प्युरी घालून मध्यम आचेवर, झाकण ठेवून ५ ते ७ मिनीटे शिजूवून घ्यावे.
धणे-जिरेपूड घालून नीट ढवळावे. शिजवलेले उडीद आणि राजमा घालावा.
थोडावेळ मॅश करून घ्यावे. पाणी घालून मधम आचेवर उकळी काढावी. फोडणी देताना जर तुम्ही आख्खा गरम मसाला घातला नसेल तर आता त्यात गरम मसाला पावडर घालावी. नंतर कसूरी मेथी, मिठ आणि आमचूर पावडर घालून एकजीव करावे. अजून थोडे पाणी घालून घट्टपणा करावे.
कढई वर झाकण ठेवून २० ते २५ मिनीटे कमी शिजून घ्या. मधेमधे ढवळावे, डाळ कढई च्या तळाला चिकटू देवू नये.
२ टेस्पून बटर घालून अजून १० मिनीट एक वाफ काढून घ्यावी. १० मिनीटांनी १ कप दूध घालावे आणि ढवळावे.
गरम दाल मखनी कोथिंबीरीने सजवावी व तुम्ही ही डिश रोटी, नान, किंवा भाताबरोबर सर्व्ह करू शकता.
तर दाल मखनी रेसिपी मराठी ( dal makhani recipe in marathi ) कशी वाटली नक्की कळवा.