डाल तडका रेसिपी मराठी | dal tadka recipe in marathi

By Wiki Mitra

Published On:

Follow Us
डाल तडका रेसिपी मराठी | dal tadka recipe in marathi

डाल तडका रेसिपी मराठी ( dal tadka recipe in marathi )

नमस्कार खवय्ये बंधुनो आज आपण एकदम साधी सोपी रेसिपी म्हणजे डाळ तडका पाहणार आहोत. ही एक पंजाबी रेसिपी आहे.

१) तूरडाळ आणि चणाडाळ प्रेशर कूकरमध्ये मऊसर शिजवून घ्यावी. व्यवस्थित शिजली कि घोटून घ्यावी.

२) उभा चिरलेला कांदा तेलात खरपूस तळून घ्यावा. तळलेला कांदा डाळीत छान लागतो. हा कांदा सजावटीसाठी वापरावा.

ब्रेड पकोडे रेसिपी मराठी | bread pakora recipe in marathi येथे वाचा

३) पातेल्यात २ टिस्पून तूप गरम करावे. त्यात मोहोरी घालावी, तडतडू द्यावी. त्यात हिंग, हळद, २ कढीपत्त्याची पाने, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा घालावा. गोल्डन ब्राऊन रंगावर परतावा, टोमॅटो घालून मऊसर होईस्तोवर परतावे.

४) नंतर घोटलेली डाळ घालावी आणि गरजेपुरते पाणी घालावे. दाल तडका थोडा घट्टसरच असतो त्यामुळे पाणी बेताचे घालावे. चवीपुरते मिठ घालून उकळी येऊ द्यावी. जर लिंबूरस घालणार असाल तर तो आत्त घालून ढवळावे.

५) डाळ सव्र्हींग बोलमध्ये काढावी. कढल्यात १ टिस्पून तूप गरम करावे त्यात जिरे, कढीपत्ता, आणि लसूण घालावी लसूण जरा लालसर झाली कि लाल मिरची टाकून फोडणी तयार करावी आणि ही फोडणी तयार डाळीवर घालावी कोथिंबीर आणि तळलेल्या कांद्याने सजवून भाताबरोबर गरमागरम सर्व्ह करावी.

Wiki Mitra

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment