मेरी कोम यांची संपूर्ण माहिती Mary Kom Information In Marathi

Mary Kom Information In Marathi मेरी कोम ही भारताची एकमेव महिला बॉक्सर आहे. जिने तिच्या महान अशा कामगिरीने भारताला ऑलम्पिकमध्ये कास्यपदक जिंकून दिले होते. ही महिला भारतीय बॉक्सर पहिल्यांदाच ऑलम्पिक मध्ये आली होती. त्यांनी पाच वेळा वर्ल्ड बॉक्सर चॅम्पियनमध्ये विजय प्राप्त केला आहे. तिने 18 व्या वर्षीच बॉक्सिंगला सुरुवात केली होती. मेरीकोम ही संपूर्ण भारत देशाची एक प्रेरणास्थान आहे. तिच्या जीवनात अनेक समस्या होत्या परंतु त्या सर्व समस्या आपल्या कुटुंबासोबत संघर्ष करून मेरी कोम यांनी एक भारतातील महिलांसाठी मिसाल सोडले आहे.

Mary Kom Information In Marathi

मेरी कोम यांची संपूर्ण माहिती Mary Kom Information In Marathi

मेरी कोम यांचा जन्म व बालपण :

मेरी कोम यांचा जन्म 1 मार्च 1983 रोजी मणिपूर मधील कांगथेई येथे झाला. मेरी कोम यांचा जन्म एका गरीब कुटुंबामध्ये झाला होता तसेच तिचे गाव हे एक दुर्गम खेडे होते. मुलांना शिकवण्याएवढी सुद्धा तिच्या आई-वडिलांची परिस्थिती नव्हती बँकॉकच्या आशिष स्पर्धेमध्ये मणिपूर बॉक्सिंग डिस्को सिंग यांनी सुवर्णपदक पटकावले होते. हे मेरी कोमला कळले, त्यामुळे तिला सुद्धा असे वाटत होते की, आपण बॉक्सिंग मध्ये उतरावे

मेरी कोमने घरचा विरोध असताना 2000 मध्ये म्हणजेच सतराव्या वर्षी बॉक्सिंग रिंग मध्ये पहिले पाऊल टाकले. दोन आठवड्यामध्ये मेरी कोम ही बॉक्सिंग चा बेसिक्स पायात शिकले आणि 2007 राज्यस्तरीय स्पर्धेचे विजेतेपद तिने मिळवले तर त्यानंतर घरी सुद्धा बॉक्सिंग बद्दल मेरी कोमची वर्तमानपत्रातून नाव आणि फोटो झळकल्यामुळे माहिती मिळाली, त्यामुळे बॉक्सिंग या खेळामध्ये पुढचे पाऊल तिने टाकले.

मेरी कोम यांचे शिक्षण :

किचन मॉडेल हायस्कूलमध्ये झाले तिने सहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर ते सेंट झेवियर कॅथोलिक शाळेमध्ये गेली आणि तिथून तिने आठवीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर तिने ट्रायबल हायस्कूलमध्ये नऊ आणि दहा मध्ये प्रवेश घेतला व अभ्यास सुरू ठेवला परंतु परीक्षा उत्तीर्ण झाली नाही. त्यामुळे मेरीकोम ही माध्यमिक शाळा सोडली आणि एन आय ओ एस ची परीक्षा दिली. त्यानंतर तिने इनफाड येथे चुराचंदपूर महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केले.

मेरी कोमची बॉक्सिंगची कारकीर्द :

मेरी कोमला लहानपणापासूनच ॲथलीट व्हायचे होते आणि त्या शाळेमध्ये फुटबॉल खेळायला लागल्या. मात्र त्यापूर्वी तिने कधीही बॉक्सिंग केलेली नव्हती. मणिपूरच्या बॉक्सिंग डिंकू सिंगने 1998 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि त्याच्या विजयाने मेरीकोम प्रभावित झाली.

त्यानंतर तिने बॉक्सिंगमध्ये आपले करिअर म्हणून सुरुवात केली. तिच्यासमोर सुरुवातीला खूप मोठे आव्हान आले कारण कुटुंबातील सदस्य तिला पाठिंबा देत नव्हते कारण त्यांचे म्हणणे बॉक्सिंग हा पुरुषांचा खेळ आहे. त्यामुळे अशा खेळांमध्ये खूप मेहनत घ्यावी लागते आणि जी तरुणींसाठी अयोग्य होती.

मेरी कोम यांनी प्रशिक्षण कुठे घेतले?

मेरी कोम यांनी आपले ध्येय साधण्यासाठी कितीही वेळ गेला तरी त्यावर मात केली. तिने आपल्या आई वडिलांना न सांगता प्रशिक्षण सुरू केले. खुमन लुंपाक स्पोर्ट कॉम्प्लेक्स मध्ये मुलांसोबत मुली बॉक्सिंग करताना पाहून तिला आश्चर्य वाटले. तिथून पुढे तिच्या मनात स्वप्नांशी संबंधित बरेचसे विचार आले.

त्यानंतर तिच्या गावापासून निफाड हा प्रवास केला आणि मणिपूर राज्य बॉक्सिंग प्रशिक्षणासाठी नेमले. तेथील बॉक्सिंग प्रशिक्षक एम नरजीत सिंग यांना ती भेटली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने बॉक्सिंग स्पर्धा खेळणे शिकली. या खेळामध्ये तिला खूप उत्साह होता. त्यामुळे सर्वांनी प्रशिक्षण केंद्र सोडल्यानंतरही ती रात्री उशिरापर्यंत तेथे सराव करत असे.

मेरी यांचे बॉक्सिंग कारकीर्द :

मेरी कोम यांनी बॉक्सिंग शिकल्यानंतर बॉक्सिंगमध्ये आपली करिअर करण्याचा निर्णय घेतला. तिने बॉक्सिंग सुरू केल्यानंतर 1998 ते 2000 मध्ये प्रशिक्षण घेऊन महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप मणिपूर ही 2000 मध्ये जिंकली होती, त्यामुळे तिला बॉक्सर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या विजयाची बातमी तिच्या कुटुंबाला एका वृत्तपत्रामधून कळले. त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांची कुटुंबीय सुद्धा त्यांच्यासोबत पाठीमागे उभे राहिले.

त्यानंतर तिने पश्चिम बंगालमधील महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून राज्याचे नाव उंच केले. त्यानंतर 2001 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर तिच्या कारकिर्दीला खरी सुरुवात झाली तिने 18 वर्षाचे असताना सर्वप्रथम अमेरिकेतील ए आय डी ए महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये 48 किलो वजनी गटात भाग घेतला होता. जिथे तिने रोपे पदक जिंकले होते. त्यानंतर 2002 मध्ये तुर्की मध्ये झालेल्या एआयबीए महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये 45 किलो वजने गड जिंकला आणि त्यांनी तेथे सुवर्णपदक जिंकले. त्याच वर्षी मेरी यांनी हंगेरीतील विच कपमध्ये 45 वजनी गटात सुवर्णपदक जिंकले.

त्यानंतर 2003 मध्ये भारतात झालेले आशियाई महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये मेरिने 46 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आणि त्यानंतर नॉर्वे येथे झालेल्या महिला बॉक्सिंग विश्वचषक स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले 2005 मध्ये तैवान मधील आशियाई महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये 46 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. त्याच वर्षी तिने रशियातील ए आय बी ए महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप सुद्धा जिंकली होती 2006 मध्ये डेन्मार्क विनेस वुमेन्स बॉक्सिंग कप आणि भारतात ए आय बी ए महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकून तिला सुवर्णपदक मिळाले होते. त्यानंतर तिने 2008 मध्ये अशीही महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये रोपे पदक जिंकले.

त्यानंतर 2009 मध्ये सुद्धा एशियन इंडोर गेम्स मध्ये सुवर्णपदक जिंकले 2010 मध्ये कजाकिस्तान मधील अशीही महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सलग तिने पाचव्या सुवर्णपदक जिंकले होते. 2011 मध्ये सुद्धा 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर 2012 मध्ये मेरी कोम यांनी सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर त्याच वर्षी लंडनमधील झालेल्या ऑलंपिकमध्ये कांस्यपदक मिळवले. त्यानंतर 2014 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला गटामध्ये तिने सुवर्णपदक जिंकले.

मेरी कोम यांचे वैयक्तिक जीवन :

मेरी कोम यांनी 2001 मध्ये पंजाब मधील राष्ट्रीय खेळासाठी जात असताना तिचे दिल्लीमध्ये ओनरल यांच्याशी भेट झाली. त्यावेळी दिल्ली येथील विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेत होता. दोघांचाही एकमेकांवर खूप प्रभाव होता, त्यांनी 2005 मध्ये लग्न केले त्यांना तीन मुले आहेत.

मेरी कोमला मिळालेले पुरस्कार :

मेरी कोम यांना पद्मश्री पुरस्कार 2006 मध्ये मिळाला. त्यानंतर राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार. 2009 मध्ये पद्मभूषण हा पुरस्कार 2013 मध्ये मिळाला आणि अर्जुन पुरस्कार हा बॉक्सिंगमध्ये 2003 मध्ये मिळाला आणि पद्मविभूषण हा पुरस्कार 2020 मध्ये मिळाला.

FAQ

मेरी कोम यांचे पूर्ण नाव काय आहे?

मंगते चूंगनेजंग मेरी कोम.

मेरी कोम कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे.

भारतातील सर्वात पहिली महिला बॉक्सर कोण आहे?

मेरी कोम.

मेरी कोम हिचा जन्म कधी झाला?

1 मार्च 1983 रोजी.

मेरी कोम यांनी किती जागतिक चॅम्पियनशिप पदके जिंकले?

मेरी कोम यांनी आठ जागतिक चॅम्पियनशिप पदके जिंकली.

Leave a Comment