गोपाळ कृष्ण गोखले यांची संपूर्ण माहिती Gopal Krishna Gokhale Information In Marathi

Gopal Krishna Gokhale Information In Marathi गोपाळ कृष्ण गोखले हे एक भारतातील ब्रिटिश साम्राज्यविरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वतंत्र लढ्याचा पाया घालणाऱ्या राजकीय व सामाजिक नेत्यांपैकी एक असून ती भारतीय काँग्रेस आघाडीचे नेते होते तसेच ते भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक सुद्धा होते. महात्मा गांधीजी हे गोखले यांचे शिष्य मानले जातात. 1885 ते 1905 हा कालावधी मवाळवमतवादी कालखंड म्हणून ओळखला जातो. या कालखंडात राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतरचा हा पहिला कालखंड होता. ज्या काळातील अग्रणीचे नेते म्हणून गोपाळ कृष्ण गोखले हेच ओळखले जातात.

Gopal Krishna Gokhale Information In Marathi

गोपाळ कृष्ण गोखले यांची संपूर्ण माहिती Gopal Krishna Gokhale Information In Marathi

त्यांनी राजकारणाला अध्यात्मिक करण्याचा विचार मांडला. राजकारणाला अध्यात्मिक करण्याचा विचार मांडून 1900 शतकातील उदारमतवादी राजकीय विचारवंतांच्या साखळीमध्ये त्यांनी एक महत्त्वाचे विचारवंत म्हणून काम केले. भारतातील इंग्रजी सत्ता सदैव दैवी वरदान आहे असे ते मानत होते. त्यांनी सनदशीर राजकारणाला तात्विक आणि व्यवहारिक मान्यता दिली. महात्मा गांधीजींनी आपले राजकीय कार्य करताना गोपाळ कृष्ण गोखले यांनाच गुरु मानले होते. गोपाळकृष्ण गोखले हे विचारवंती समाजसेवक कुशल राजकारणी होते.

नावनामदार गोपाळ कृष्ण गोखले
जन्म9 मे 1866
जन्म ठिकाणकोतळूक, रत्नागिरी जिल्हा
वडीलकृष्ण महादेव गोखले
आईसत्यभामाबाई कृष्ण गोखले
चळवळभारतीय स्वातंत्र्यलढा, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सुधारणा संघटना, भारत सेवक समाज, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, डेक्कन एज्युकेशन सोसायटी
मृत्यू19 फेब्रुवारी 1915

गोपाळ कृष्ण गोखले यांचे जन्म :

गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म 9 मे 1866 रोजी महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील कोतळूक या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्ण महादेव गोखले असे होते. तर आईचे नाव सत्यभामाबाई होते, त्यांचे बालपण मात्र कोल्हापूर या जिल्ह्यातील कागल येथे गेले.

त्यांनी प्राथमिक शिक्षण सुद्धा तिथेच घेतले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वडिलांचे बंधू गोविंदराव यांनी स्वतःचे शिक्षण सोडले आणि पत्नीचे दागिने सुद्धा विकले व गोपाळ कृष्ण गोखले यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी कोल्हापूरचे राजाराम कॉलेज व मुंबईचे एलफिस्टन कॉलेज येथे पाठवले.

गोपाळ कृष्ण गोखले यांचे शिक्षण :

गोपाळ कृष्ण गोखले यांनी प्राथमिक शिक्षण हे कोल्हापूर येथे पूर्ण केले. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे शिक्षण राजाराम कॉलेज व मुंबई येथे झाले. 1984 मध्ये त्यांनी बीए गणितात पदवी घेऊन पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी सुद्धा स्वीकारली. पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीवन सदस्यत्व फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी अध्यापन केले. 1895 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर हॅलो म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून त्यांचा सार्वजनिक जीवनामध्ये प्रवेश झाला. सार्वजनिक सभेचे सचिव म्हणून त्यांनी काही काळ कार्य सुद्धा केले होते. शेतकऱ्यांचे कर्ज दुष्काळ सावकारांचा त्रास या विषयांवर त्यांनी सखोल अभ्यास केला आणि सरकारकडे निवेदने पाठवले. त्याबाबतच पाठपुरावा सुद्धा गेला अशा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांविषयी त्यांच्या मनात खूप कळवला होता. त्यांनी यामध्ये शिस्त निर्माण केली आणि त्यांच्या या निवेदनांना सर्वत्र मान्यता सुद्धा मिळाली होती.

राजकीय प्रवास :

कृष्ण गोखले व बाळ गंगाधर टिळक यांनी त्यांचा राजकीय प्रवास हा एकाच व्यासपीठावरून सुरू केला. लोकमान्य यांना जहालवादी राजकारण मान्य होते तर गोखले यांनी मवाळवादाचा मार्ग स्वीकारला होता. त्यांनी लोकशिक्षण अस्पृश्यता जाती निर्मूलन स्त्री शिक्षण स्त्री स्वातंत्र्य यांच्याशी संबंधित समाजकार्य सुद्धा केले. त्यांनी तत्कालीन इंग्रजी शासकांना समजेल अशा प्रकारे समाज सुधारणा सुद्धा केल्या.

त्या मान्य करून सुद्धा घेतल्या गेल्या. 1902 मध्ये त्यांची निवड केंद्रीय मध्यवर्ती कायदेमंडळावर झाली आणि ते नामदार झाले. या निवडीचा त्याचे पूर्णपणे उपयोग घेतला आहे. विविध प्रश्नांना वाचा मिळवून दिली. 1889 मध्ये काँग्रेसच्या व्यासपीठावर त्यांनी सर्वप्रथम भाषण केले आणि त्यांचा संबंध काँग्रेसची आला. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी काँग्रेस पक्ष धरून राहिले.

काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरील नेते म्हणून ओळखले जातात. 1905 सालच्या डिसेंबरमध्ये ते बनारस येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून होते. काँग्रेसचे कार्य त्यांनी भारतात व इंग्रज मध्ये सुद्धा केले. भारताच्या सेवेसाठी तरुण त्यागी निष्ठावंत कार्यकर्ते घडविण्याचे उद्देशाने त्यांनी 13 जून 1905 रोजी भारत सेवक समाज (the servant of India society)ची स्थापना केली.

गोपाळ कृष्ण गोखले यांचा विवाह :

गोपाळ कृष्ण गोखले हे एक भारतातील महान स्वतंत्र सैनिक मानले जातात. त्यांचे तीनदा लग्न झाले होते. गोखले यांनी 1880 मध्ये सावित्रीबाईशी लग्न केले परंतु त्यांची शारीरिक दृष्ट्या शरीर कमजोर असल्यामुळे त्यांना आजारावर आजाराने ग्रस्त झाल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी 1887 मध्ये दुसरे लग्न केले.

ज्यांच्यापासून त्यांना दोन मुली झाल्या परंतु त्यांचेही 1900 मध्ये निधन झाले. त्यानंतर गोखले पूर्णपणे तुटले त्यांनी लग्न केले नाही आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या मुलीचे संगोपन केले त्यांची काळजी घेतली. त्यांच्या एका मुलीचे नाव काशी होते, तर दुसऱ्या मुलीचे नाव गोदुबाई असे होते.

गोपाळ कृष्ण गोखले यांचा भारतीय राष्ट्रवादी चळवळीवर प्रभाव :

गोपाळ कृष्ण गोखले यांचा भारतीय राष्ट्रीय चळवळीवर प्रभाव होता. तरी लोकसंख्येच्या शिक्षणाच्या मूल्यावर भर दिला होता. देश सेवेसाठी राष्ट्रीय प्रचारकांना प्रशिक्षित करण्यासाठी 12 जून 1905 रोजी भारत सेवक समितीची सुद्धा स्थापना केली. त्यांचे ब्रिटिश साम्राज्याशी संपूर्ण संबंध होते.

दुसरीकडे पंडित हृदय नारायण कुंजरू, श्रीनिवास शास्त्री, जी. के. देवधर, एन. एम. जोशी इत्यादींनी लोकांमध्ये देशभक्ती जागृत करण्यासाठी त्यांना पुन्हा सार्वजनिक सभा आणि सुधारक ही प्रकाशन हे सुरू केली होती.

गोपाळ कृष्ण गोखले यांचे निधन :

गोपाळ कृष्ण गोखले हे भारताचे एक महान स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांनी त्यांच्या शेवटच्या वर्षामध्ये मधुमेह हृदयविकार आणि दमा यांसारखे आजार उद्भवले आणि भारताच्या या शूर व महान अशा सुपुत्राचे 19 फेब्रुवारी 1915 रोजी मुंबई येथे निधन झाले.

FAQ

गोपाळ कृष्ण गोखले यांचे पूर्ण नाव काय आहे?

नामदार गोपाळ कृष्ण गोखले.

गोपाळ कृष्ण गोखले यांचा मृत्यू कधी झाला?

गोपाळ कृष्ण गोखले यांचा मृत्यू 19 फेब्रुवारी 1915 रोजी महाराष्ट्रातील पुणे येथे झाला.

गोपाळ कृष्ण गोखले यांचे राजकीय गुरू कोण होते?

न्यायमूर्ती एम.जी. रानडे.

गोपाळ कृष्ण गोखले यांच्या दोन मुलींची नावे काय होती?

गोपाळ कृष्ण गोखले यांच्या मुलीचे नाव काशी व दुसऱ्या मुलीचे नाव गोदुबाई होते.

गोपाळ कृष्ण गोखले यांनी कोणत्या सोसायटीची स्थापना केली?

सर्व्हंट्स ऑफ इंडिया.

Leave a Comment