काश्मिरी दम आलू रेसिपी मराठी | how to make kashmiri dum aloo

काश्मिरी दम आलू रेसिपी मराठी | how to make kashmiri dum aloo

नमस्कार खवय्ये बंधुनो आणि भगिनींनो आज आपण काश्मिरी दम आलू ची रेसिपी मराठी ( how to make kashmiri dum aloo ) पाहणार आहोत.

काश्मिरी दम आलू रेसिपी साहित्य ( how to make kashmiri dum aloo ingredients )

 • 18 ते 20 लहान बटाटे (बटाटे एकदम लहान असावे)
 • एक वाटी कांदा बारीक चिरून
 • अर्धी वाटी टोमॅटो बारीक चिरून
 • बारीक आल्याचा तुकडा ठेचून किंवा चिरून
 • 8 ते 10 लसूण पाकळ्या ठेचून किंवा चिरून
 • 2 ते 3 चमचे काजूची पेस्ट
 • 4 चमचे फेटलेलं दही
 • चिमूट भर सुंठ,एक चमचा बडीशेप पावडर,चिमुट भर लवंग पावडर,
 • अर्धा चमचा जिरेपूड
 • एक चमचा (मोठा ) धनेपूड
 • एक चमचा गरम मसाला
 • काश्मीरी लाल मिरची पावडर(रंगा साठी)
 • एक चमचा लाल तिखट (तिखटपणा साठी).
 • अर्धा चमचा हळद
 • चवीपुरतं मीठ
 • 3 ते 4 चमचे तेल

काश्मिरी दम आलू रेसिपी कृती ( how to make kashmiri dum aloo )

सर्वप्रथम बटाटे चांगले धुवून घ्यावे.गॅस वर एका भांड्यात मिठाचे पाणी उकळायला ठेवावे.पाणी चांगले उकळले की त्यात बटाटे घालावे व झाकण ठेऊन साल काढता येईल एवढे शिजवून घ्यावे. 10 ते 15 मिनिटात बटाटे चांगले शिजतील.बटाटयांचा गाळ होणार नाही ह्याची काळजी घ्यावी.

गॅस बंद करून भांड्यातील गरम पाणी काढून त्यात गार पाणी ओतावे व बटाटयाचे साल काढून घ्यावे.
एका कढईत गरम तेल ओतून घ्यावे व त्यात बटाटे हे गोल्डन ब्राऊन होईसपर्यंत तळून घ्यावे.
जर बटाटे जास्त आपण जास्त ब्राऊन घेतले तर ते भरून करपट लागतात व आतून कच्चे राहतात ,त्यामुळे बटाटे जास्त ब्राऊन होऊ देऊ नये.

बटाटे टिशू पेपर वर काढून घ्यावे व त्याला एका काट्याच्या चमच्याने बटाटे टोचून घ्यावे म्हणजे ग्रेव्ही मध्ये घातल्यावर बटाट्याच्या आत ग्रेव्ही चांगली जाईल. कढईत 3 ते 4 चमचे तेल गरम करून घ्यावे व त्यात आले लसूण ची पेस्ट घालावी व चांगली परतून घ्यावी. व त्यात एक वाटी कांदा घालावा व लाल होईसपर्यंत परतून घ्यावा.

कांदा लाल झाला तर त्यात टोमॅटो घालावं व परतून घ्यावा व त्यात साधं लाल तिखट घालावं व त्यात 2 ते 3 चमचे काजूची पेस्ट घालावी. चवीनुसार मीठ घालावे व मसाल्याला तेल सुट्सपर्यंत परतून घ्यावे.

पनीर टिक्का रेसिपी मराठी | paneer tikka recipe in marathi येथे वाचा

हा मसाला थोडासा गार झाला की मिक्सर मध्ये काढून घ्यावे.त्याच कढईत एक चमचा तेल घालून त्यात हळद व कश्मिरी लाल मिरची पावडर घालावी.त्यात कांदा टोमॅटो ची प्युरी घालावी व चांगले परतून घ्यावे.

मसाला परतला त्यात घेतलेल्या मापाप्रमाणे सुंठ पूड, बडीशेप पावडर, लवंग पावडर, धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला घालून परतावे. त्यांनतर दही घालावी. दही घालताना गॅस बारीक करावा.व पटापट हलवून घ्यावे म्हणजे दही फुटणार नाही.

दही व्यवस्तीत मिक्स झालं की त्यात तळलेले बटाटे घालावे व 15 मिनिटे ग्रेव्ही चांगली झाकण ठेवून शिजवून घ्यावी मध्ये मध्ये हलवावी.तुम्हाला हवा तितका घट्टपणा आला की गॅस बंद करावा व पोळी, नान किंवा भाता बरोबर सर्व्ह करावे.

ही रेसिपी 3 ते 4 जणांना पुरणारी आहे. तर काश्मिरी दम आलू रेसिपी मराठी ( how to make kashmiri dum aloo ) कशी वाटली नक्की कळवा.

Leave a Comment