माळशेज घाटची संपूर्ण माहिती Malshej Ghat Information In Marathi

Malshej Ghat Information In Marathi आळेफाटा कल्याण किंवा अहमदनगर कल्याण असा प्रवास करत असताना वाटेमध्ये हमखास लागणारा घाट म्हणजे माळशेज घाट होय. अतिशय निसर्ग सौंदर्याने नटलेला हा घाट तेवढाच धोकेदायक स्वरूपाचा देखील असतो. कारण की पावसाळ्यामध्ये या ठिकाणी अनेकदा भूस्खलन होण्याचा धोका संभवत असतो. सुमारे दहा किलोमीटर अंतराचा हा घाट पर्यटकांसाठी अतिशय उत्तम ठिकाण असून, कुटुंब किंवा मित्रांसोबत आठवड्याचे शेवटचे दिवस घालवण्यासाठी अर्थात वीकेंडसाठी खूपच उपयुक्त समजला जात असतो.

Malshej Ghat Information In Marathi

माळशेज घाटची संपूर्ण माहिती Malshej Ghat Information In Marathi

हा केवळ महामार्गावरील एक घाट नसून पर्यटकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. असेच घाटाच्या प्रवासामध्ये अनेक नयनरम्य व नैसर्गिक ठिकाणी पर्यटकांना बघायला मिळत असतात. ज्यामुळे पर्यटक या घाटामध्ये अगदी खिळून राहत असतात.

ठाणे जिल्ह्यामध्ये असणारा हा घाट अतिशय आकर्षक असून, या ठिकाणी प्रचंड मोठ्या धबधब्यांची देखील रेलचेल आहे. सोबतच येथे हिरवळीने नटलेले खोरे, उंच उंच डोंगर, व त्यावरून फेसाळत कोसळणारे धबधबे, सोबतच पाण्याचे अगदी काचेसारखे स्वच्छ तलाव हे या ठिकाणचे वैशिष्ट्ये आहे. आजच्या भागामध्ये आपण या माळशेज घाटाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावमाळशेज
प्रकारघाट रस्ता
ओळखनिसर्ग सौंदर्य
ठिकाणठाणे
मार्गआळेफाटा ते कल्याण किंवा अहमदनगर ते कल्याण
जवळील जिल्हेमुंबई, ठाणे आणि पुणे
काळजीपावसाळ्यामध्ये भूस्खलन होऊ शकते
कमाल वेगमर्यादा २० ते ५० किलोमीटर प्रति तास
खबरदारीओव्हरटेक करू नये

माळशेज घाट हा एक पर्वतामध्ये निर्माण करण्यात आलेल्या खिंडीच्या स्वरूपातील घाट असून, पश्चिम महाराष्ट्रामध्ये वसलेले हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धबधबे, तलाव, हिरवळ, निसर्ग सौंदर्य, आणि प्राणी प्रजाती असल्यामुळे अनेक ट्रेकर्स आणि गिर्यारोहक या ठिकाणाला नियमित भेट देत असतात. त्याचबरोबर निसर्गासौंदर्याच्या भेटी करता देखील अनेक पर्यटक येथे येत असतात.

अनेक लोकांसाठी वीकेंड घालवण्याचे उत्तम ठिकाण म्हणून या माळशेज घाटाला ओळखले जाते. या ठिकाणी पुणे मुंबई सह ठाणे जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणावर पर्यटक पर्यटन करण्यासाठी येत असतात. मुख्यतः जुलै महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत या ठिकाणी गुलाबी रंगाचे फ्लेमिंगो पक्षी मोठ्या प्रमाणावर आढळून येत असतात, आणि या पक्षांना बघण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत असतात.

अतिशय हिरवीगार वनराई आणि त्यामध्ये आकर्षक रंगाचे गुलाबी फ्लेमिंगो पक्षी हे दृश्य अतिशय विहंगम आणि बघण्यासारखे असते. त्याचबरोबर फेसाळत वाहणारे धबधबे, उत्कृष्ट धरण, उंच उंच हरिश्चंद्रगड किल्ला आणि निसर्गाचे आल्हाददायक वातावरण या गोष्टी ट्रेकर्स आणि गिर्यारोहकांसह विविध पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतात. या ठिकाणी अनेक मंदिरे देखील असून, सोळाव्या शतकामध्ये असणाऱ्या स्थापत्य कलेची ही उत्तम उदाहरणे आहेत. जी पर्यटकांना नियमित भुरळ घालत असतात.

अहमदनगर मुरबाड कल्याण या मार्गाने जाताना ठाण्याच्या जवळ गेल्यानंतर हा माळशेज घाट लागत असतो. एकूण दहा किलोमीटर लांबीचा हा घाट अतिशय उत्तम पर्यटन स्थळ असून, पावसाळ्यामध्ये मात्र जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस यामुळे या ठिकाणी काहीसे धोकेदायक वातावरण निर्माण होत असते. त्यामुळे येथे रात्री प्रवास करणे धोक्याचे समजले जाते.

सोबतच या ठिकाणी कमीत कमी २० ते ५० किलोमीटर प्रतितास हा वेग असला पाहिजे. अवजड वाहन असेल तर हाच वेग १० किलोमीटर प्रति तास इतकाच ठेवला जावा. या घाटातून प्रवास करताना कधीही दुसऱ्या वाहनांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा उतारावरून येणाऱ्या वाहनाशी टक्कर होण्याची शक्यता असते.

त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला गाडी उभी करू नये, जेणेकरून दुसऱ्या गाड्यांना रस्ता शोधण्यास अडचण निर्माण होईल. त्याचबरोबर या घाट परिसरामध्ये अनेकदा भूस्खलन किंवा दरडी कोसळण्याच्या घटना घडत असतात, त्यामुळे अतिशय जपून या ठिकाणी प्रवास करावा लागतो.

तुम्हाला माळशेज घाटाच्या पर्यटनाला जायचे असेल, तर तुम्ही कल्याण रेल्वे स्टेशनवर उतरून अवघ्या ८५ किलोमीटर अंतराचा प्रवास करून येथे पोहोचू शकता. या ठिकाणी तुम्ही बस अथवा टॅक्सीचा मार्ग अवलंब करू शकता. त्याचबरोबर खाजगी वाहनांनी तुम्ही या महामार्गावर प्रवास करताना या घाटातून जाऊ शकता. विमानाने या ठिकाणी जायचे असेल, तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळचे ठरू शकते. मात्र तिथून तुम्हाला रस्ते प्रवास करत बऱ्याच अंतरावर जावे लागेल.

माळशेज घाटातील पर्यटन स्थळे:

माळशेज घाटामध्ये पर्यटन करण्यासाठी गेल्यानंतर तुम्ही तेथील अनेक ठिकाने बघू शकता. ज्यामुळे तुमच्या पर्यटनामध्ये अधिकच आनंद निर्माण होईल. यामध्ये थंब पॉईंट, कृष्णा बेला पॉईंट, व्हॅली व्ह्यू पॉईंट, माळशेज घाट, फोटोग्राफी पॉईंट, येथील बोगदे, प्रेम सागर गॅलरी, आणि लाजवंती पॉईंट इत्यादी ठिकाणी अतिशय प्रेक्षणीय असून, या ठिकाणी केल्यानंतर तुम्हाला विविध प्रकार अनुभवायला मिळतील. त्यामुळे माळशेज घाटाला भेट देतानाच या ठिकाणाला देखील भेट देण्याचा सल्ला दिला जात असतो.

निष्कर्ष:

कुठलाही प्रदेशाचा विकास व्हायचा असेल तर तेथील रस्ते सर्वात पहिले विकसित झाले पाहिजेत. महाराष्ट्राला अनेक स्वरूपाच्या भौगोलिक परिसराचा वारसा लाभला असल्यामुळे महाराष्ट्र मध्ये किनारपट्टी डोंगरदऱ्या, उंच सखल भाग, मोठमोठी जंगले, आणि पठारी प्रदेशासह मैदानी प्रदेशाचा देखील समावेश होत असतो. या वेगवेगळ्या अवघड ठिकाणावरून रस्ते निर्माण करण्यासाठी तसेच डोंगरातून मार्ग काढण्यासाठी घाट रस्ते निर्माण करावे लागतात.

घाट रस्ते हे डोंगरदर्‍यांच्या सानिध्यात असल्यामुळे येथे आपोआपच निसर्गासौंदर्य प्रचंड मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे या घाटातून प्रवास करणे प्रवाशांसाठी एक आनंददायी अनुभव ठरत असतो. घाटातून प्रवास करताना अनेक लोक देहभान विसरून या निसर्गासंदर्यामध्ये गुंतून जात असतात. तर काही लोक सुट्ट्या घालवण्यासाठी खास करून या घाटाच्या परिसरामध्ये येत असतात.

या घाटाच्या आसपास अनेक पर्यटन स्थळे देखील विकसित झालेली असतात. असाच एक उत्तम पर्यटन स्थळ असणारा घाट म्हणजे माळशेज घाट होय. अतिशय निसर्ग सौंदर्याने युक्त असला तरी देखील हा घाट काही स्वरूपात धोकेदायक देखील समजला जातो. आजच्या भागामध्ये आपण याच माळशेज घाटाविषयी संपूर्ण माहिती बघितलेली आहे. ज्यामध्ये माळशेज घाटाच्या पर्यटनाविषयी जाणून घेत असताना या गटाच्या ऐतिहासिक माहितीबद्दल देखील जाणून घेतलेले आहे.

सोबतच या ठिकाणी उद्भवणारे धोके देखील माहिती करून घेतलेले आहेत. माळशेज घाटाच्या पर्यटनाला कसे जावे, तिथे राहण्याची काय सोय आहे, काय काळजी घ्यावी, येथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध आहे का, व कोणत्या कालावधीमध्ये येथे भेट देणे उचित ठरते या सर्व गोष्टींबद्दल माहिती बघितली आहे.

FAQ

माळशेज हा घाट कोणत्या महामार्गावर वसलेला आहे?

माळशेज हा घाट आळेफाटा ते कल्याण किंवा अहमदनगर ते कल्याण या मार्गावर वसलेला आहे.

माळशेज घाटाच्या जवळ असणारे जिल्हे कोणते आहेत?

माळशेज घाटाच्या जवळ मुंबई, पुणे आणि ठाणे हे जिल्हे आहेत.

माळशेज घाट कोणत्या दोन प्राकृतिक विभागांना जोडत असतो?

माळशेज घाट हा कोकण आणि पठार या दोन प्राकृतिक विभागांना जोडत असतो.

माळशेज घाटाची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची किती समजली जाते?

माळशेज घाटाची समुद्रसपाटीपासून असणारी सरासरी उंची ही २९९७ फूट अर्थात सातशे मीटर इतकी आहे.

माळशेज घाटाजवळ कोणकोणती ऐतिहासिक पर्यटन स्थळे वसलेली आहेत?

माळशेज घाटाजवळ हरिश्चंद्रगड किल्ला, नाणेघाट शिलालेख, नाने घाट, नालासोपारा, अंबरनाथ यांच्यासह पुणे आणि मुंबई यांसारखे पर्यटन शहरदेखील आहेत.

Leave a Comment