Mahabaleshwar Information In Marathi महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्रातील सातारा जिल्हामध्ये असून हे एक थंड हवेचे ठिकाण आहे तसेच हे ठिकाण एक पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा आहे. येथे दरवर्षी अनेक पर्यटक भेटी देतात तसेच पर्यटकांची महाबळेश्वरला लाभलेले हे उत्कृष्ट गिरीस्थान हा असा एक लौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासून महाबळेश्वर हे ठिकाण 1372 मीटर उंचीवर वसलेले आहेत असेच हे ठिकाण पश्चिम घाटाच्या रंगीत असलेले आहे. येथे अनेक निसर्गरम्य ठिकाणी आहेत. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून सुद्धा महाबळेश्वर या ठिकाणाला ओळखले जाते. अतिशय थंड हवेचे ठिकाण आणि सुंदर निसर्गरम्य वातावरण असे हे पर्यटन स्थळ आहे.
महाबळेश्वरची संपूर्ण माहिती Mahabaleshwar Information In Marathi
पर्यटन स्थळ | महाबळेश्वर |
राज्य | महाराष्ट्र |
जिल्हा | सातारा |
धार्मिक स्थळ | भगवान शिव शंकराला समर्पित |
समुद्रसपाटीपासून उंची | 1372 मीटर |
महाबळेश्वर हे शहर मुंबईपासून 285 किलोमीटर अंतरावर आहे. महाबळेश्वर येथेच कृष्णा नदीचा उगम झालेला आहे. जी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते. जुन्या महाबळेश्वर मधील पुराणकालीन महादेव मंदिराच्या जवळ गोमुखातून या नदीचा उगम झाला अशी एक दंतकथा आहे. याची अशीही एक दंतकथा आहे की, हिच्या वेण्णा आणि कोयना या उपनद्या शिव आणि ब्रह्मा आहेत असे म्हटले जाते.
कृष्णा नदी शिवाय आणखी इथे चार नद्या त्याच गोमुखात उगम पावलेले आहेत परंतु त्या कृष्णा नदीला मिळण्या अगोदर काही अंतरावरून वाहतात. त्या म्हणजे कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या नद्या आहेत. महाबळेश्वरचे हवामान हे स्ट्रॉबेरीसाठी अत्यंत योग्य आहे. त्यामुळे या भागांमध्ये स्ट्रॉबेरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. भारतात देशाचे एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनापैकी 85 टक्के स्ट्रॉबेरी उत्पादन हे महाबळेश्वर येथूनच होते. महाबळेश्वर हे एक पर्यटन स्थळ सुद्धा आहे.
महाबळेश्वरचा इतिहास :
महाबळेश्वर या शहराचा आपण इतिहास पाहिला तर तो 1215 मध्ये देवगिरीचे राजे ऋग्वेद यांनी जुने महाबळेश्वर याला भेट दिली तेव्हा त्यांनी कृष्णा नदीच्या काठावर झऱ्याचे ठिकाणी एक लहानसे मंदिर आणि एक जलाशय बांधलेले आहे. 16 व्या शतकात चंद्रराव मोरे या मराठी कुटुंबाने पूर्वीच्या राजकुळाचा पराभव केला आणि जावळी व महाबळेश्वरचे राजे झाले त्या काळात या मंदिराची पुनर्बांधणी केली. 1819 मध्ये ब्रिटिशांनी सर्व डोंगरी भाग साताऱ्याच्या राज्याच्या क्षेत्राखाली आणला आणि कर्नल लॉडविक आहे.
साताऱ्याचे स्थानिक अधिकारी होते, त्यांनी 1824 मध्ये या विभागातील सर्व सैनिक आणि वाटाड्यांना व भारतीय मदतनीस घेऊन या पॉईंट पर्यंत पोचले. आज तोच पॉइंट लॉर्ड वीक पॉईंट म्हणून ओळखला जातो. 1828 पासून सर ऋग्वेद, माउंट स्टुअर्स , करणक, ऑर्थर मॅलेट यांनी सुद्धा येथे भेट दिली. महाबळेश्वर या शहराची ओळख 1929 ते 30 मध्ये झाले. त्यापूर्वी ते मालकम पेठ या नावाने ओळखले जात होते परंतु आता ते महाबळेश्वर या नावाने ओळखले जाते.
पर्यटन स्थळ :
महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील एक थंड हवेचे ठिकाण व पर्यटन स्थळ सुद्धा आहे. येथे एक महाबळेश्वर महादेवाचे मंदिर आहे. जे यादव राजा सिंघनदेव यांनी तेराव्या शतकात बांधले होते. अफजलखानाच्या तंबूवरील कापून आणलेले सोन्याचे कळस छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाबळेश्वर मंदिराला अर्पण केले होते. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या ठिकाणी चांगली घनदाट जंगल आहे.
महाबळेश्वर येथील महाबळेश्वर मंदिर लागून असलेले जावळीचे खोरे आणि प्रतापगड या सर्व स्थळांना शिवरायांच्या नावाचा व कर्तुत्वाचा ऐतिहासिक संदर्भ लाभलेला आहे. महाबळेश्वरला पावसाचे प्रमाण खूप असते तसेच पावसाळ्यामध्ये हा परिसर जन्म असतो. येथे अनेक निसर्ग सौंदर्य स्थळे आहेत जसे खंडाळा लोणावळा माथेरान किंवा इतर पॉईंट्स सुद्धा खूपच आकर्षक असून येथे विल्सन पॉईंट, आर्थर सीट पॉईंट, लॉर्ड वीक पॉईंट हे सुद्धा प्रसिद्ध असे आहे.
महाबळेश्वरच्या मंदिरातून कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गोवित्री या पाच नद्या उगम पावतात तसेच पंचगंगेचे देऊळ हे मानले जाते. हे ठिकाण क्षेत्र महाबळेश्वर म्हणून खूप प्रसिद्ध आहे. येथे भाविक भक्तांची रेलचेल नेहमीच असते. सावित्री ही उपनिधी पश्चिम वाहिनी आहे तर बाकीच्या चार नद्या पूर्ववाहिनी आहेत. वेदना तलाव म्हणजे पर्यटकांची खूप मोठे आकर्षण आहे.
पर्यटकांसाठी येथे जुन्या महाबळेश्वर पासून सात किलोमीटर अंतरावर खूप प्रेक्षणीय ठिकाणी आहेत. शिवाय पाच मंदिर सुद्धा आहे, जे पूर्वीच्या काळातील भारतीय वास्तू शैलीचे दर्शन आपल्याला घडवतात. येथे नैसर्गिक रित्या तयार झालेली खूप ठिकाणी आहेत. तसेच काही ठिकाणी ब्रिटिश राजवटीतील विश्रांतीसाठी त्यांनी तयार केलेली आहेत.
महाबळेश्वर येथे पाहण्यासारखे ठिकाणे :
पंचगंगा मंदिर. : पंचगंगा मंदिर हे कृष्णा कोयना, गायत्री, सावित्री, वेण्णा, सरस्वती आणि भगवती या सात नद्यांचे मुख्य स्थान आहे. यापैकी पहिल्या पाच नद्यांचा ओव्हर सतत बाराही महिने वाहत असतो. सरस्वतीचा ओहोळ मात्र प्रत्येक साठ वर्षांनी दर्शन देतो. आता 2034 या साली दर्शन देईल. भागीरथीचा ओहोळ प्रत्येक बारा वर्षांनी दर्शन देतो. हे मंदिर 4500 वर्षांपूर्वीचे आहे. येथून बाहेर पडल्यानंतर कृष्णा नदी स्वतंत्र वाहते येथे कृष्णाई मंदिर सुद्धा आहे.
महाबळेश्वर बाजार पेठ : महाबळेश्वर ही बाजारपेठ खूप प्रसिद्ध आहे. येथे लोकरीचे कपडे, स्वेटर, चांबळ्याचे पट्टे, चामड्याची पॉकेट इत्यादी वस्तू मिळतात.
मंकी पॉईंट : येथे नैसर्गिक रित्या तीन दगड आहेत. जे मंकी सारखे समोरासमोर बसलेले आहेत असे वाटते आणि गांधीजींच्या शब्दांची आठवण आपल्याला येथे गेल्यानंतर होते. त्यामुळे या ठिकाणाला मंकी पॉईंट असे म्हटले जाते.
कृष्णाबाई मंदिर : पंचगंगा मंदिराच्या पाठीमागे अगदी जवळच कृष्णाबाई मंदिर आहे. येथे कृष्णा नदीची पूजा केली जाते.
1888 मध्ये कोकणचे राजे यांनी उंच टेकडीवर बांधलेले हे एक ठिकाण आहे. येथून कृष्णा नदीची पूर्ण दरी आपल्याला पाहता येते.
त्या व्यतिरिक्त येथे पाहण्यासाठी ऑर्थर सीट, पॉईंट, वेण्णा लेक, कॅट्स पॉईंट, निडल होल पॉईंट आणि विल्सन पॉईंट आहे तसेच जवळच प्रतापगड, लिंगमळा धबधबा सुद्धा आहे.
महाबळेश्वर येथे कसे जाल?
महाबळेश्वर येथे तुम्ही हवाई मार्गे ट्रेन मार्गे आणि रस्त्याने सुद्धा जाऊ शकता. महाबळेश्वर येथे जर तुम्हाला हवाई मार्गे जायचे असेल तर पुणे विमानतळ पासून 270 किलोमीटर अंतरावर आहे आणि पुणे-मुंबई विमानतळावरून तुम्ही थेट टॅक्सी किंवा बसणे सुद्धा जाऊ शकता.
जर तुम्हाला इथे रेल्वे मार्ग यायचे असेल तर तुम्ही रेल्वे मार्गे सुद्धा येऊ शकता. सातारा रेल्वे स्टेशनपासून महाबळेश्वर केवळ 60 किलोमीटर अंतरावर आहे.
जर तुम्हाला रस्ते मार्गे यायचे असेल तर साताऱ्यापासून 60 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून 120 किलोमीटर अंतरावर आहे. तर कोल्हापूर पासून 178 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्हाला महाबळेश्वर येथे कोणत्याही शहरातून येण्यासाठी रस्ते उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्ही महाबळेश्वरला स्वतःच्या वाहनाने सुद्धा येऊ शकतात.
FAQ
महाबळेश्वर येथे काय प्रसिद्ध आहे?
महाबळेश्वर पासून पाच किलोमीटर अंतरावर महाबळेश्वर हे एक तीर्थक्षेत्र आहे तसेच महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरी यासाठी जगप्रसिद्ध आहे.
महाबळेश्वर हे ठिकाण कसे आहे?
महाबळेश्वर हे एक थंड हवेचे ठिकाण आहे, येथे टेकड्या दर्या जंगलाचे दृश्य आपण डोळ्यांनी पाहू शकतो. महाबळेश्वर हे एक नैसर्गिक तसेच सुंदर ठिकाण आहे.
समुद्रसपाटीपासून महाबळेश्वरची उंची किती आहे?
1373 मीटर.
महाबळेश्वरला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती आहे?
महाबळेश्वरला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ ही हिवाळा म्हणजेच डिसेंबर ते फेब्रुवारी पर्यंत असतो.
महाबळेश्वर येथे कोणत्या नद्या उगम पावतात?
महाबळेश्वर येथे मुख्य कृष्णा नदी उगम पावते तसेच तिच्या उपनद्या कोयना, गायत्री, सावित्री व वेण्णा सुद्धा आहेत.