Jaigad Fort Information In Marathi जयगड हा किल्ला भारतात मधील महाराष्ट्र या राज्यांमध्ये येतो. भारत सरकारने या किल्ल्याला 21 जून 1910 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. हा किल्ला सोळाव्या शतकात बांधण्यात आलेला आहे. जयगड हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतो तसेच हा किल्ला जयगड या गावांमध्ये बसलेला आहे. हा किल्ला गणपतीपुळे या प्रसिद्ध देवस्थानापासून खूपच जवळ आहे.
जयगड किल्याची संपूर्ण माहिती Jaigad Fort Information In Marathi
हा किल्ला जलदुर्ग प्रकारात येतो कारण या किल्ल्याच्या तीनही बाजू पाण्याने वेढलेल्या आहेत आणि एका बाजूला जमीन आहे. किल्ल्याची उंची ही समुद्रसपाटीपासून 55 मीटर एवढी आहे. हा किल्ला पूर्णपणे बारा एकरामध्ये विस्तारलेला असून जयगड या किल्ल्याचे मुख्य दोन भागांमध्ये विभाजन झालेल्या आहे. त्यामध्ये एक म्हणजे बालेकिल्ला आणि दुसरा म्हणजे पडकोड या किल्ल्याला संरक्षण तटबंदी सुद्धा बांधलेले आहेत.
किल्ल्याचे नाव | जयगड किल्ला |
स्थापना | 16 वे शतक |
ठिकाण | रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड गावांमध्ये हा किल्ला आहे. |
प्रकार | जलदुर्ग |
समुद्र | अरबी समुद्र |
एकूण क्षेत्रफळ | 12 एकर |
किल्ल्यावर पाहण्यासारखे ठिकाणे | गणपती मंदिर, हनुमान, मंदिर, बुरुंज, महादरवाजा, जयबा, स्मारक आणि ब्रिटिशांच्या काळातील इमारती. |
जयगड किल्ल्याचे भौगोलिक स्थान :
जयगड हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतो तसेच हा किल्ला जयगड या गावांमध्ये बसलेला आहे. हा किल्ला गणपतीपुळे या प्रसिद्ध देवस्थानापासून खूपच जवळ आहे. हा किल्ला जलदुर्ग प्रकारात येतो.
जयगड किल्ला हा एका पठारावर वसलेला आहे. हे पठार समुद्रामध्ये थोडेसे आत घुसलेले असल्यामुळे या किल्ल्याच्या तिन्ही बाजू सागराच्या पाण्यांनी वेढलेले आहे.
येथेच शालिनी ही नदी सागराला येऊन भेटते. त्यामुळे नैसर्गिक असे हे एक सुरक्षित बंदर म्हणून जयगड पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे. जयगड हे गाव किल्ल्याच्या दक्षिणेकडील उतारावर वसलेले असून जयगड हे गाव सध्या जिंदाल औष्णिक प्रकल्पामुळे खूप प्रसिद्ध झाले आहे. जयगड या गावांमध्ये जाणाऱ्या फाट्यापासून आपण पाच मिनिटांमध्ये जयगडचा बाले किल्ल्याचा प्रवेशद्वार जवळ सुद्धा येऊन पोहोचतो.
जयगड या किल्ल्याचा इतिहास :
जयगड हा किल्ला सोळाव्या शतकामध्ये बांधला गेला. हा किल्ला विजापूरकरांनी बांधलेला असला तरी त्यांना जास्त काळ ताब्यामध्ये हा किल्ला ठेवता आला नाही. 1878 आणि 1880 च्या दरम्यान संगमेश्वरांच्या नायकांनी किल्ल्याचा ताबा त्यांच्याकडे घेतला होता.
आदिलशहाने बऱ्याचदा हा किल्ला मिळवण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याला त्यामध्ये यश मिळाले नाही. पुढे 1895 च्या दरम्यान हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्याकडे होते. 1818 च्या इंग्रज मराठा युद्धाच्या वेळी हा किल्ला इंग्रजांना सहज मिळाला होता. महाराष्ट्रातील एक महत्त्वाच्या किल्ला म्हणून जयगड ओळखला जातो. हा किल्ला निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. हा किल्ला पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे भेट देत असतात.
जयगड या किल्ल्यावर पाहण्यासारखे ठिकाणी :
खंदक जयगड हा किल्ला सध्या बाले किल्ल्याचा संपूर्ण परिसर तारेची जाडी लावून संरक्षित केला गेलेला आहे. प्रवेशद्वाराच्या बाहेर सात ते आठ फूट खोलीचा खंदक आहे. हा कातड कोरीवखंद असून तो पाण्याने भरण्यासाठी बनवलेला नाही. त्यामुळे तो कायमचाच कोरडा असतो शत्रू तटाला येऊन भिडू नये म्हणून हा खंदक भरले किल्ल्याभोवती खोदलेला आहे. प्रवेश द्वाराच्या डावीकडून तटबंदीला वळला घालून गेलेला खंड खोल पर्यंत दिलेला आहे. उजवीकडील बाजूला खंडगाणा एक प्रवेशद्वार सुद्धा आहे. प्रवेशद्वार असलेली ही रचना खूपच वेगळ्या प्रकारची दिसते.
महादरवाजा : दोन बुरुजामध्ये लपलेला दरवाजा येथे आहे. प्रवेशद्वारावर पूर्वी नगर खाना असावा अशी त्याची रचना केलेली आहे. काही वर्षांपूर्वी या नगर खाण्याच्या जागेमध्ये एक उत्तम असे विश्रामगृह सुद्धा बांधलेले होते. सध्या ते बंद केल्यामुळे पूर्णपणे रिकामी जागा झालेली आहे. दरवाज्यावर कमल पुष्प कोरलेली आहेत. हे तुम्ही पाहू शकता, दरवाजामध्ये भाडेकरांच्या देवडे आहेत. आत आल्यावर तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग दिसतो.
इमारत : तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी असे मार्ग केलेले आहेत. तटबंदीच्या मधल्या जागेत एक तीन मजली उंच इमारत हे तर आपले लक्ष वेधून घेते. या भव्य इमारतीचे छत आता मात्र नष्ट झालेले आहे. याला वाडा किंवा राजवाडा असे म्हटले जात होते. काही जण याला कान्होजी आंग्रे यांचा वाडा सुद्धा म्हणतात.
या वाड्याशेजारीच पाण्याची मोठी विहीर आहे. परंतु ती झाडी झोप आणि पूर्णपणे झाकलेली आहे. बाजूलाच गणपतीचे मंदिर आहे.
जयबा स्मारक : गणपती मंदिरासमोर एक छोटीसी दीपमाळ आहे. दीपमाळी जवळ जयबाजी स्मारक आहे. तटाला लागून असलेले हे स्मारक जयबाच्या बलिदानाची स्मृति म्हणून उभारले गेलेले आहे. जयगडाची बांधणी करताना त्याचा तट वारंवार ढासळत होता त्याचे बांधकाम पक्के व्हावे म्हणून नरबळी द्यावा लागेल अशी लोकांची समजूत होती.
तटबंदीच्या नरवळीसाठी जयबा तयार झाला. त्याला तटबंदीमध्ये जिवंत जिनून तटाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. जयबाच्या या त्या गाव मुळे तटबंदी उभी राहिली म्हणून गडाचे नाव जयगड ठेवण्यात आले होते. अशी ही कथा प्रसिद्ध झालेली आहे.
बुरुंज : तटबंदी वरून पूर्ण गडफेरी मारता येते. गडावरून समुद्राकडे देखावा खूप सुंदर दिसतो. तटबंदी मधील बुरुंज गोलाकार असून त्यामध्ये जागोजागी मारायच्या जागा तयार केल्या आहेत. बुरुजावर तोफासाठी केलेली सोय आपण पाहू शकता. परंतु तेथे आता तोफा ठेवलेल्या नाहीत. गडफेरी करण्यासाठी तास दीड तासांचा वेळ आपल्याला पुरेसं आहे.
महामाया देवीचे मंदिर : दरवाज्याच्या बाहेरील खांदकामधील दरवाजातून आत गेल्यावर खंदकाच्या टोकाकडील भागात पायऱ्या दिसतात. तिथून खालच्या भागांमध्ये आपल्याला जाता येते. खाली जांभ्या दगडात कोरलेल्या गुहा आहेत. या गुहेमध्ये महामाया देवीचे एक मंदिर आहे. ही ग्रामस्थ असलेल्या घाडगे यांची कुलदैवत आहे.
जयगड या किल्ल्यावर कसे जाल?
तुम्हाला जर या किल्ल्यावर रेल्वे मार्गाने यायचे असेल तर तुम्ही रेल्वे मार्गाने सुद्धा येऊ शकता. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे रत्नागिरी स्टेशन आहे. तेथून तुम्ही रायगड पर्यंत टॅक्सीने जाऊ शकता.
रस्ते मार्गे जर तुम्हाला यायचे असेल तर तुम्ही खाजगी वाहने किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आल्यानंतर अनेक बीच किल्ले सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि येथील बस स्टॉप सर्वच शहरांशी जोडलेले आहे, त्यामुळे तुम्ही स्वतःच्या वाहने सुद्धा येथे येऊ शकतात.
गडावर राहण्याची व खाण्याची सोय :
जयगड हा किल्ला कमी उंच असला तरी सुद्धा येथे पिण्यासाठी पाणी व जेवणाची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे तुम्हाला किल्ला पाहायला जायचे असेल तर तुम्हाला पाणी व जेवणाची सोय स्वतः करावी लागेल. गावाजवळ असलेले हॉटेल किंवा इतर ठिकाणी तुम्ही तुमच्या जेवणाची व पाण्याची सोय करु शकता.
FAQ
जयगड हा किल्ला कधी बांधण्यात आला?
जयगड हा किल्ला सोळाव्या शतकात बांधण्यात आला.
जयगड हा किल्ला कशा स्वरूपाचा किल्ला आहे?
जयगड हा किल्ला जलदुर्ग आहे.
जयगड हा किल्ला किती एकरांमध्ये पसरलेला आहे?
जयगड हा किल्ला 14 एकरामध्ये पसरलेला आहे.
जयगड या किल्ल्यावर तुम्ही काय पाहू शकता?
जयगड या किल्ल्यावर तुम्ही गणपती मंदिर, ब्रिटिश कालीन इमारती, प्रवेश गेट, खंदक पाहू शकता.
जयगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात येतो?
जयगड हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात येतो.