Suvarnadurg Fort Information In Marathi सुवर्णदुर्ग हा किल्ला इतिहासामधील अनेक राज्यकर्त्यांनी समुद्रामधून होणारे आक्रमण रोखण्यासाठी आणि समुद्री शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी मोक्याच्या जागेवर बांधला होता तसेच येथे व्यापारी बंदर सुद्धा आहेत. या ठिकाणी अनेक किल्ले बांधले गेले. त्यामधील हा एक महत्त्वाचा किल्ला आहे. सुवर्णदुर्ग हा किल्ला महाराष्ट्र राज्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात येतो. रत्नागिरी जिल्ह्यामध्येच वसलेले आणखीन दोन केले आहे. त्यांचे सिंधुदुर्ग व विजयदुर्ग हे जलदुर्ग प्रकारातील किल्ले आहेत. यांची समुद्रसपाटीपासूनची उंची 1400 फूट एवढी आहे.

सुवर्णदुर्ग किल्याची संपूर्ण माहिती Suvarnadurg Fort Information In Marathi
या किल्ल्याजवळचे सर्वात जवळचे गाव म्हणजेच दापोली हे आहे. हे गाव कोकणातील समुद्री किल्ल्यांचे रक्षण करणारे कान्होजी आगरी आणि आगरी कुटुंब ही सर्वांनाच आपल्या परिचयाचे आहे. हे मराठा साम्राज्याचे पहिले समुद्री सरखेल म्हणून ओळखले जात होते, समुद्राचे राजे हेच होते.
त्याचबरोबर कान्होजी आग्रे आणि त्यांची पुढील पिढीत सुद्धा समुद्री किल्ल्याचे रक्षण करत होते. पूर्वीच्या काळी आगरी कुटुंब समुद्रकिनाऱ्यावरील जास्तीत जास्त किल्ले त्यांच्या ताब्यात होते. त्यामधील एक म्हणजे सुवर्णदुर्ग हा किल्ला आहे. हा सुद्धा आंग्रे यांच्या कुटुंबाच्या वर्चस्वाखालीच होता.
किल्ल्याचे नाव | सुवर्णदुर्ग |
ठिकाण | महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली गाव |
समुद्र | अरबी समुद्र |
प्रकार | जलदुर्ग |
किल्ल्याची उंची | 1400 फूट |
किल्ल्याचे क्षेत्रफळ | 4.5 ते 5 एकर |
किल्ल्यावरील ठिकाण | चोर दरवाजा, महादरवाजा, तोफा, बुरुज, विहीर आणि राजवाडा |
सुवर्णदुर्ग हा किल्ला कोठे आहे?
सुवर्णदुर्ग हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी या जिल्ह्यातील दापोली गावाजवळील हर्णे या बंदराजवळ वसलेला आहे तसेच या किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची 1400 फूट एवढी आहे. हा किल्ला जलदुर्ग प्रकारामध्ये येतो. हा किल्ला समुद्राने वेढलेला आहे.
सुवर्णदुर्ग या किल्ल्याची लांबी 480 मीटर आणि रुंदी 123 मीटर एवढी आहे. किल्ल्याच्या संरक्षणासाठी किल्ल्याभोवती एक व भक्कम तटबंदी आहे. सुवर्णदुर्ग हा किल्ला समुद्राच्या पाण्याने वेढलेला असल्यामुळे या किल्ल्यावर जाण्यासाठी बोटीचा किंवा नावेचा वापर करावा लागतो.
आपल्याला या किल्ल्याजवळ गेल्याबरोबर एक मुख्य दरवाजा दिसतो आणि त्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला असलेले दोन भरून आपल्याला पाहायला मिळतात. मुख्य दरवाजावर आपल्याला शिल्प पाहायला मिळतात. या किल्ल्याचा मुख्य दरवाजा असून तो आजही चांगल्या अवस्थेत आहे. हा किल्ला 5 एकराच्या क्षेत्रफळामध्ये विस्तारलेला असून किल्ल्यावर 24 गुरूंचे आहेत. या प्रत्येक गुरूंचा ची उंची 30 फूट आहे. सुवर्णदुर्ग किल्ला हा हर्णे बंदरापासून 17 किलोमीटर अंतरावर आहे.
सुवर्णदुर्ग या किल्ल्याचा इतिहास :
सुवर्णदुर्ग हा किल्ला 16 व्या शतकामध्ये अधीक्षणाच्या काळामध्ये बांधण्यात आलेला असून हा किल्ला 1608 मध्ये मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी दुसऱ्या आदिलशहाचा पराभव करून मराठा साम्राज्यामध्ये सामील केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांचा दुसरा मुलगा राजाराम महाराज यांनी या किल्ल्यावर एक हेर नेमला.
सुवर्णदुर्ग हा किल्ला समुद्राचे शिवाजी म्हणून ओळखले जाणारे महान सैनिक कान्होजी आंग्रे यांच्या देखरेखीखाली होता. कान्होजी ते तुळाजी पर्यंत हा किल्ला आंग्रे घराण्याच्या ताब्यामध्ये राहिला. इसवी सन 1755 मध्ये हा किल्ला पेशव्यांना देण्यात आला आणि मग तो 1818 मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणेच इंग्रजांच्या ताब्यात गेला. हा किल्ला भारतात आता सरकारच्या ताब्यात आहे.
किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व :
प्राचीन काळी हर्णे बंदराच्या आरक्षणासाठी समुद्र किनारपट्टीवर काही किल्ले बांधले गेले त्यामध्येच सुवर्णदुर्ग हा किल्ला सुद्धा बांधला गेला. ज्यावेळी मुगल सरदार सिद्धी कासिम याने 1688 मध्ये सुवर्णदुर्ग या किल्ल्याला वेढा घातला होता. त्यावेळी आचलोजी मोहिते हा या किल्ल्याचा किल्लेदार होता आणि तो मोघलांना मिळालेला होता.
आचलोजी मोहिते हा मोघलांना फितूर झाला आणि कान्होजी आंग्रे यांना समजताच त्यांनी सुवर्णदुर्ग किल्ल्यावरील इतर सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन आचलोजी मोहिते यांना जेरबंद केले. त्यानंतर मुघलांवर हल्ला केला. पण तो हल्ला वाया गेला आणि कान्होजी व त्यांच्या सैनिकांना मोगलांनी कैद केले. परंतु कान्होजी हे खूप धैर्यवान होते.
त्यांनी कैदेतून त्यांची कशी बशी सुटका करून घेतली. ते समुद्रातून पोहोच पोहोच सुवर्णदुर्ग किल्ल्यावर आले. त्यांचे हे धाडस पाहून मराठ्यांच्या व इतर सैनिकांच्या मध्ये सुद्धा लढण्यासाठी उत्साह निर्माण झाला. त्यानंतर सैनिकांनी हा किल्ला पावसाळ्यापर्यंत लढवला. सिद्धी कासिंने हार मानली व वेढा हटवला. या सर्व लढाईमध्ये शौर्याने सामोरे जाणाऱ्या केवळ वीस वर्षे वय असलेल्या कान्होजी आंग्रे यांना या किल्ल्याचे किल्लेदार पद मिळाले आणि या किल्ल्याची कारकीर्द व देखरेख सुद्धा त्यांच्यापासून सुरू झाली.
किल्ल्यावर पाहण्यासारखे ठिकाणे
महादरवाजा : समुद्रातून बोटीने किल्ल्यावर गेल्यानंतर दोन बुरुजाच्या मध्यभागी तुम्हाला एक दरवाजा दिसेल तोच हा महादरवाजा आहे आणि किल्ल्याचा मुख्य दरवाजा सुद्धा आहे. हे दरवाजे पूर्वी कडील बाजूला असून तो उत्तर मुखी आहे असे म्हटले जाते की, हे किल्ल्याचे प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतले आहे.
त्याचबरोबर महादरवाज्याच्या पायरीजवळ गेल्यानंतर आपल्याला पायरीवर एक कासवाचे शिल्प पाहायला मिळते तसेच महादरवाज्याच्या कमानीवर सुद्धा वेगवेगळे शिल्प आपल्याला पाहायला मिळतात. दरवाज्याच्या उजव्या बाजूच्या तटावर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे आणि त्याला शेंदूर लावलेला आहे.
राजवाडा : महादरवाज्यातून आत गेल्यानंतर डाव्या बाजूला विहिरीच्या थोडे पुढे आल्यानंतर राजवाड्याचे अवशेष दगडी चौधरे तुम्ही पाहू शकता.
विहीर : किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर पुढे चालत गेल्यानंतर तुम्हाला एक विहीर पाहायला मिळते. ही गोड्या पाण्याची विहीर आहे. त्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी आणि रोजच्या वापरासाठी केला जात असे. या किल्ल्यावर सात विहिरी आहेत.
चोर दरवाजा : किल्ल्यामध्ये पश्चिम बाजूच्या तटाला एक सुंदर चोर दरवाजा आहे. हा दरवाजा चार फूट उंच असून त्याला खाली जाण्यासाठी पायऱ्या सुद्धा आहेत. पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर वाट समुद्राकडील बुरुजाकडे जाते. या दरवाजाचा उपयोग पूर्वी अडचणीच्या काळामध्ये केला जायचा म्हणून याला चोर दरवाजा असे नाव पडले.
तोफा : या किल्ल्यावर महादरवाज्याच्या समोर वाळूमध्ये असलेल्या तोफा आपल्याला पाहायला मिळतात.
बुरुंज : पूर्वीच्या काळी बुरुंजाचा उपयोग हा शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी केला जायचा या किल्ल्यावर आपल्याला भरून पाहायला मिळत. सुवर्णदुर्ग किल्ल्यावर एकूण 24 बुरुंज आहेत. या बुरुजांची उंची 30 फूट आहे. बुरुजावर चढण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. आज आपल्याला बुरुजावर चढून किल्ल्याच्या सभोवताली असणाऱ्या समुद्राच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकता.
सुवर्णदुर्ग किल्ल्यावर कसे जावे :
जर तुम्हाला सुवर्णदुर्ग हा किल्ला पाहायला जायचे असेल तर तुम्ही पुणे-मुंबई या मुख्य शहरापासून बसने गोवा महामार्गाजवळील फाट्याजवळ उतरून तेथून स्थानिक बस पकडून दापोलीला जाऊ शकता. दापोली मधून बस किंवा टॅक्सी पकडून हर्णे या बंदरापर्यंत तुम्ही जाऊ शकता. बंदरावर तुम्हाला किल्ल्यावर जाण्यासाठी बोटे उपलब्ध आहेत. या बंदरावरून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी दहा ते वीस मिनिटे लागतात.
किल्ल्यावर राहण्याची व जेवणाची सोय :
किल्ल्यावर कोणतीही राहण्याची व जेवणाची सोय उपलब्ध नाही, त्यामुळे आपण आपल्या सोबत पिण्याचे पाणी व जेवणाची व्यवस्था करून घ्यावी.
FAQ
सुवर्णदुर्ग हा किल्ला कोणी बांधला?
सुवर्णदुर्ग हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकात बांधला.
सुवर्णदुर्ग हा किल्ला किती एकरामध्ये असलेला आहे?
दुर्ग हा किल्ला 4.5 हेक्टर क्षेत्रामध्ये बसलेला आहे.
- दुर्गा हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात येतो.
- सुवर्णदुर्ग या किल्ल्याचे देखरेख व संरक्षण कोणाकडे होते?
- कान्होजी आंग्रे व त्यांचे कुटुंब.
- सुवर्णदुर्ग हा किल्ला कोणत्या समुद्रात आहे?
- सुवर्णदुर्ग हा किल्ला अरबी समुद्रात आहे.