Lohgad Fort Information In Marathi महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत, जे खूप प्राचीन आहेत. या किल्ल्यांना भेट देण्यासाठी अनेक पर्यटक दरवर्षी यात्रा करतात व तेथील सर्व किल्ला पाहतात तसेच किल्ल्याविषयीचे आकर्षण व आजूबाजूचा निसर्गरम्य स्थळ आहे. पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. लोहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यामधील लोणावळा या गावाजवळ मावळ नावाच्या डोंगरावर आहे. या किल्ल्याची उंची 3400 फूट आहे. लोहगड या किल्ल्याचे पावनखोरे आणि इंद्रायणी खोरे या दोन भागांमध्ये त्याचे विभाजन झाले आहे तसेच हा किल्ला जवळच्या विसापूर किल्ल्याला जोडलेला आहे.
लोहगड किल्ल्याची संपूर्ण माहिती Lohgad Fort Information In Marathi
लोहगड या किल्ल्यावर मराठा साम्राज्याने बरीच वर्ष राज्य केले आणि मराठा साम्राज्याचे व्यवस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला आपल्या राजकीय कारणांसाठी खूप वापरला. पुण्यापासून या किल्ल्याचे अंतर हे 50 किलोमीटर आहे तसेच हा किल्ला पाच वर्ष मीगल वर्षांनी सुद्धा मुघलांच्या ताब्यात ठेवला होता.
जेव्हा पुरंदरचा तह झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना 23 किल्ले औरंगजेबाला द्यावे लागले होते, त्यामध्ये लोहगडांचा सुद्धा समावेश होता. आणि त्यामुळेच मुलांना या किल्ल्यावर पाच वर्षे राज्य करण्याची संधी मिळाली होती परंतु सोळाशे 70 मध्ये हा किल्ला परत स्वराज्यामध्ये सामील झाला होता. या किल्ल्यावर चढणे खूप सोपे आहे तसेच हा किल्ला डोंगरावर वसलेला आहे. या किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे.
लोहगड या किल्ल्याचा इतिहास :
लोहगड किल्ल्याचा इतिहास खूप प्राचीन आहे तसेच प्राचीन इतिहासावरून आपल्या असे लक्षात येते की, हा किल्ला 700 वर्षांपूर्वीचा जुना किल्ला आहे आणि प्राचीन काळी या किल्ल्यावर चालुक्य सातावाहन राष्ट्रकूट आणि यादव या वर्षाचे वर्ष होते. त्यानंतर 1489 च्या काळामध्ये मलिक अहमदनगर यांनी निजामशाहीची सुरुवात केली आणि त्यावेळी त्याने अनेक किल्ले जिंकून घेतले व त्यामध्ये लोहगड हा किल्ला सुद्धा समाविष्ट होता. 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड विसापूर आपल्या ताब्यात घेतला होता.
पुरंदर किल्ल्यावर झालेल्या मराठा आणि मुघल लढाईमध्ये विनाकारण सैन्य मरण पावत असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह करण्याचे ठरवले होते आणि या तहामध्ये शिवाजी महाराजांनी आपले 23 किल्ले औरंगजेबाला दिले होते. यामध्ये लोहगडाचा सुद्धा समावेश होता.
या किल्ल्याचा पाच वर्ष मुघलांनी सुद्धा वापर केला परंतु हा किल्ला मराठ्यांनी पुन्हा 13 मे 1670 मध्ये जिंकला होता आणि 1713 मध्ये शाहू महाराजांनी हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात दिला होता. त्यांच्याकडून हा किल्ला पेशव्यांना देण्यात आला आहे. हा किल्ला नंतर इंग्रजांच्या ताब्यात राहिला.
लोहगड किल्ल्याची वैशिष्ट्ये :
- लोहगड या किल्ल्याची सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कड्याच्या टोकावर बांधलेली जिरेबंद अशी वाट आहे. या किल्ल्यावर ही वाट अतिशय कमी दुर्वावर पहावयास मिळते. अशी सुंदर आकर्षक अशी निसर्गरम्य आहे.
- छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहामध्ये या किल्ल्याचा सुद्धा समावेश केला होता.
- शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरत लूट केली त्यावेळी तेथील सर्व संपत्ती व खजिना हा लोहगडावर आणून ठेवला होता.
- किल्ल्यामध्ये नानांनी सोळा कान असलेली एक बाब बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला आहे.
- किल्ल्यावर सर्वात जास्त मराठा साम्राज्याने राज्य केले आहे.
- लोहगडावर जाण्यासाठी मुख्य तीन वाटा आहेत.
- या किल्ल्यावर बुरुज आहेत, त्यावरून बाहेरून येणाऱ्या माणसांवर नजर ठेवल्या जाते तसेच वाटेवर गणेश दरवाजा, नारायण दरवाजा आणि हनुमान व महादरवाजा असे चार दरवाजे आहेत. यातील हनुमान दरवाजा खूप जुना आहे.
किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे :
लोहगड या किल्ल्यावर पाहण्यासारखी अनेक पर्यटन स्थळे आहेत येथे अनेक पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. या किल्ल्यावर पाहण्यासाठी आकर्षाने पुढील प्रमाणे आहेत.
महादरवाजा : महादरवाजा हा लोहगडाचे मुख्य द्वार आहे. या दरवाजाचे काम नाना फडणवीस यांनी करून घेतले होते आणि या दरवाजावर हनुमानच्या मूर्तीचे नक्षीकाम केले आहे
गणेश दरवाजा या किल्ल्यामध्ये जाण्यासाठी गणेश दरवाजाचा वापर केला जातो. हा दरवाजा मध्यम आकाराचा असून दरवाज्याच्या आतल्या भागामध्ये दोन्ही बाजूला देवडे आहे. असे म्हणतात की या दरवाजाच्या डाव्या आणि उजव्या बुरुजाच्या बरोबर खाली सावळी कुटुंबाचा नरबळी दिला होता. गणेश दरवाजाला गडाचा पहिला दरवाजा सुद्धा म्हटले जाते.
नारायण दरवाजा : नारायण दरवाजा मधून ही किल्ल्यामध्ये प्रवेश करता येतो. हा दरवाजा 1789 मध्ये नाना फडणवीस यांनी बांधला होता व या दरवाजाजवळ धान्य ठेवण्यासाठी भुयारी सुद्धा बनवली होती.
हनुमान दरवाजा : या किल्ल्यामध्ये येण्यासाठी हनुमान दरवाजाचा उपयोग केला जातो. हा दरवाजा प्राचीन दरवाजा आहे.
शिवकालीन तोफा : किल्ल्यामध्ये गणेश दरवाजातून आत गेल्यानंतर आपल्याला रिकाम्या जागेमध्ये ठेवलेले आणि मूळ किस आणलेल्या शिवकालीन तोफा सुद्धा पाहायला मिळतात.
महादेव मंदिर : दर्गा पासून पुढे गेल्यानंतर एक सुंदर शिव मंदिर आहे.
विंचू कडा लोहगडाच्या टेकडीवर गेल्यानंतर एक विंचाच्या आकाराची कडा आपल्याला पाहायला मिळते, त्यालाच विंचूकडे असे म्हणतात.
लक्ष्मी कोठी : शिवाजी महाराजांनी सुरत लुटले होते, त्यावेळी सर्व मिळालेली संपत्ती ही लक्ष्मी कोटीमध्ये ठेवली होती. ही कोठी आजही आपल्याला पाहायला मिळते.
जवळील इतर आकर्षक ठिकाण:
आमी घाटी शहर : आम्ही घाटी शहर हे लोणावळा गावापासून 22 ते 20 किलोमीटर एवढा अंतरावर आहे. येथून तुम्ही लोहगड हा किल्ला पाहायला गेल्यानंतर तुम्हाला हे शहर दिसते.
लोणावळा : लोणावळा हे शहर एक प्रसिद्ध पहाडी असे शहर आहे. हे या किल्ल्यापासून केवळ 20 किलोमीटर अंतरावर आहे. येथे अनेक लोक निसर्गाचा देखावा पाहण्यासाठी येतात.
लोहगड किल्ल्यावर कसे जावे :
लोहगड या किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्ही रेल्वे मार्ग रस्ता मार्ग व विमानाने सुद्धा जाऊ शकतात. जर तुम्हाला हा किल्ला पाण्यासाठी रेल्वे मार्गे यायचे असेल तर पुणे किंवा मुंबई मधून रेल्वे पकडून लोणावळा रेल्वे स्टेशनवर उतरायचे आहे आणि तिथून तुम्हाला मावळ बस किंवा स्थानिक रेल्वे बस सुद्धा पकडू शकता.
जर तुम्हाला रस्ते मार्गे थेट किल्ल्यापर्यंत जायचे असेल तर किल्ल्यापर्यंत कोणतीही बस उपलब्ध नाही, त्यामुळे लोणावळा बस पकडून तुम्ही लोणावळ्यामध्ये टॅक्सीने जाऊ शकता.
विमानाने जायचं असेल तर जर तुम्हाला लोहगडला जाण्यासाठी विमान नाही यायचे असेल तर तेथे कोणतेही विमानतळ अस्तित्वात नाही परंतु या किल्ल्यापासून सर्वात जवळचे विमानतळ हे पुणे आहे आणि तेथून रेल्वे किंवा बस पकडून तुम्ही लोणावळ्याला येऊ शकतात.
FAQ
या किल्ल्याला किती पायऱ्या आहेत?
250 ते 300.
हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात येतो?
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात आहे.
लोहगड या किल्ल्याचे बांधकाम कधी झाले?
लोहगड या किल्ल्याची बांधकाम बारावी शतकात राजा भोज यांनी बांधले होते.
लोहगड हा किल्ला कोणी ताब्यात घेतला?
लोहगड हा किल्ला निजामाने 1564 मध्ये ताब्यात घेतला होता.
लोहगड या किल्ल्याची उंची किती आहे?
3400 फूट.