ताम्हणी घाटची संपूर्ण माहिती Tamhani Ghat Information In Marathi

Tamhani Ghat Information In Marathi तुम्हाला पर्यटन स्थळी जाणे आवडत असेल तर तुम्ही ताम्हिणी घाटाला अवश्य भेट द्या. कारण हा घाट सह्याद्री पर्वताच्या रांगांमध्ये वसलेला असून पश्चिम घाटांमध्ये अतिशय निसर्गरम्य असे वातावरण आहे आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये तांबेने हा घाट वसलेला आहे. हा घाट मुळशी धरणाचा निसर्गरम्य देखावा जवळ आपल्याला पाहायला मिळतो.

Tamhani Ghat Information In Marathi

ताम्हणी घाटची संपूर्ण माहिती Tamhani Ghat Information In Marathi

मुंबई गोवा या मार्गाने कोलाड पर्यंत गेल्यानंतर पुढे कुंडलिका नदी लागते. तिच्यावर एक फुल बांधलेला आहे. हा फुल ओलांडून डाव्या बाजूने मुळशी धरणावरून पुण्याला सुद्धा जाता येते. कोलाड आणि मुळशी धरण यांच्या मधल्या भागाला तामिनी घाट असे सुद्धा म्हणतात. माणगाव वरून पुण्याकडे जाताना तुम्हाला हा घाट लागतो. पावसाळ्याच्या दिवसात तर हा घाट अतिशय नैसर्गिक सौंदर्यतीने नटलेला आपल्याला दिसतो.

येथील वातावरण अप्रतिम असते, दरवर्षी या घाटावर अनेक पर्यटक भेट देण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये येत असतात. कारण येथे सर्वत्र हिरवळ पसरलेला गवताचा गालिचा असतो. तसेच डोंगर माथ्याला टेकलेले ढगाळ वातावरण आणि वळणाच्या रस्त्याने उतरणाऱ्या ह्या गाड्या, नागमोडी वळण आणि बाजूला असलेले मुळशी धरण पाहून मन अगदी प्रसन्न होते. चिंब पावसात भिजायचा आनंद अलौकिक असतो. ताम्हिनी घाटामध्ये तुम्हाला हे सर्वच सुख उपभोगायला मिळते. जर तुम्हालाही हा अनुभव आणि आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही या घाटाला नक्कीच भेट द्या.

तामिनी घाटाचे भौगोलिक वैशिष्ट्ये :

पश्चिम घाटाची सह्याद्री पर्वतरांग युनेस्कोच्या प्रचंड जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे तसेच जागतिक वारसा स्थळ म्हणूनही घोषित केले आहे. महाराष्ट्रातील मुळशी ते ताम्हिणीला जोडले गेले असून 150 चौरस किलोमीटर क्षेत्र हा घाट व्यापते. या घाटातील वळणावळणाचे रस्ते आणि बाजूला असलेल्या हिरवळीच्या जंगलातून पार करते आणि प्रत्येक वळणावर विलक्षण अशी दृश्य आपल्याला पाहायला मिळते.

त्यामुळेच या भागाला ताम्हिणी असे नाव दिले गेले. सह्याद्रीच्या कडेकोपऱ्यात हा घाट वसलेला आहे, त्यामुळे येथील वातावरण रमणीय आहे तसेच या घाटात असंख्य धबधबे आहेत. ज्यामुळे दिवसा येथे नेहमीच पर्यटकांची झुंबड आपल्याला पाहायला मिळते.

या घाटाचे सौंदर्य हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये अतिशय खुलून दिसते. बरेच लोक आजूबाजूचे दृश्य पाहून तेथे फोटो काढतात तसेच कोणी व्हिडिओ काढतो. संध्याकाळ झाली असताच या घाटात संपूर्ण धुके पसरते. एवढा दाट हा धुक्याचा थर असतो की, रस्त्याने जाणाऱ्या गाड्या सुद्धा आपल्याला दिसत नाही. घाटातून दूर दूर नजर टाकले असता. आपल्याला जाणवायला लागतं अनेक गाड्या रस्त्याच्या बाजूला उभे आहेत कारण त्यांचे लाईट आले नसते वाटतात हे धुक्याच्या पसरण्यामुळे असं वाटते.

ताम्हिणी घाटाचे वर्णन :

ताम्हीनी हा घाट मुंबईपासून 140 किलोमीटर अंतरावर आहे तर पुण्यापासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. या घाटाच्या सुरुवातीला एक सुंदर लहान धबधबा तुम्हाला पाहायला मिळतो तसेच बाजूला हिरव्यागार डोंगर असलेला हा घाट अतिशय सुंदर दिसतो. हा धबधबा अनेक पर्यटकांचे मन आकर्षित करतो. येथे अनेक धबधबे आपल्याला पाहायला मिळतात. येथे वृक्ष करडा रंग टाकून हिरव्यागार शाली जणूकाही पांघर होतात असे आपल्याला वाटते.

ओथंबून भरलेले ढग खळखळणारे धबधबे आणि सर्वत्र पसरलेले हिरवेगार गालीचे हे पाहून जणू काही आपल्याला स्वर्गाचे अनुभव झाल्याशिवाय राहत नाही. या घाटाचे वर्णन कसे करावे हे सुद्धा आपल्याला कळत नाही, एवढा हा घाट नेत्र सुख आहे. घाटामध्ये आपल्याला अनेक दुर्मिळ पशु पक्षांच्या सोबत वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या प्रजाती सुद्धा पाहायला मिळतात.

ताम्हीनी घाटात पाहण्यासारखे ठिकाणे

तामिनी या घाटामध्ये तुम्ही हिरवगार झाडे आजूबाजूचा परिसर तसेच विविध प्रकारची वनस्पती, वन्यजीवांनी भरलेले हे घाट पाहू शकता. त्या व्यतिरिक्त या घाटामध्ये साग, बांबू, आंबा अशा प्रकारच्या अनेक प्रजातींचे वृक्ष तुम्ही पाहू शकता. भारतीय बायसन, बिबट्या, हरीण इत्यादी प्राणी सुद्धा येथे तुम्हाला दिसून येतील आणि पक्षांमध्ये तर खूपच विभिन्न आणि दुर्मिळ पक्षी सुद्धा तुम्हाला या गटात पाहायला मिळतील किंवा त्यांचा आवाज ऐकायला मिळेल.

धबधबे ताम्हिनी या घाटामध्ये अनेक धबधबे आहेत. जे या घाटाचे मोहक असे वैशिष्ट्य आहे. जे पर्यटकांना मंत्रमुग्ध करते, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा डोंगरांना जणू काही संजीवनी प्राप्त होते. या घाटावरून अनेक धबधबे वळसे घेत खाली उतरतात. येथील वाल्मिकी धबधबा, वळसे धबधबा व कातळ धर धबधबा हे खूप प्रसिद्ध आहे. हिरव्यागार वनस्पतींच्या मधोमध डोंगरावरून वाहणाऱ्या या धबधब्याचे दृश्य डोळ्यांना आणि मनाला मंत्रमुग्ध करतात.

ताम्हिनी या घाटावर कसे जावे :

तुम्हाला जर ताम्हिणी घाटावर जायचे असेल तर हा घाट मुंबईपासून 140 किलोमीटर अंतरावर आहे. तर पुण्यापासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. इथे घाटात रस्ता होण्यापूर्वी जंगलाची पायवाट होती. तिथे आदिवासी लोक काहीच पुण्याला जाणे येणे करत होते. हे जंगल खूप घनदाट असल्यामुळे गावातील लोक या रस्त्याने जायला घाबरायचे. अनेक आदिवासींना वाघाने किंवा काही जंगली प्राण्यांनी खाल्ल्याच्या अनेक गोष्टी इथे घडले आहेत.

मुंबई – गोवा या मार्गाने कोलाडपर्यंत गेल्यानंतर पुढे कुंडलिका नदी लागते. या नदीवर एक फुल बांधलेला आहे. हा फुल ओलांडून डाव्या बाजूने मुळशी धरणावरून पुण्याला सुद्धा जाता येते. कोलाड आणि मुळशी धरण यांच्या मधल्या भागाला तामिनी घाट असे सुद्धा म्हणतात. माणगाव वरून पुण्याकडे जाताना तुम्हाला हा घाट लागतो. पावसाळ्याच्या दिवसात तर हा घाट अतिशय नैसर्गिक सौंदर्यतीने नटलेला आपल्याला दिसतो.
आता सरकारने रस्ता मोठा बनविला आहे.

सतत गाड्यांची रेलचेल रस्ते पुणे मुंबईहून गोवा महामार्गावर असलेल्या माणगाव किंवा कोलाजला जोडण्यासाठी व कोकणात जाण्यासाठी हे नवीन मार्ग बांधण्यात आले आहे. त्यामुळे श्रीवर्धन, दापोली, दिवेआगर, माणगाव, इंदापूर, रायगड, किल्ला, महाड, रोहा, कोलाड इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी रस्त्यांची सोय उपलब्ध झाली आहे. तुम्ही पुण्या मुंबईपर्यंत बस, विमान किंवा रेल्वे मार्गाने सुद्धा येऊ शकता आणि तेथून ताम्हणी घाटाकडे सुद्धा जाऊ शकता.

राहण्याची व जेवणाची व्यवस्था :

ताम्हिनी हा घाट नैसर्गिक आश्चर्यासोबत सांस्कृतिक वर्षाची सुद्धा केंद्र आहे. येथे राहणारे आदिवासी आणि काही छोटी गावे आहेत. जे त्यांची पारंपरिक जीवनशैली त्यांनी कायम ठेवले आहे. या परिसरामध्ये तुम्हाला जर म्हणायचे असेल तर त्यांच्या सहाराने तुम्ही तेथे राहू शकता आणि आपली जेवणाची व्यवस्था सुद्धा करू शकता. येथील प्रादेशिक अन्नपदार्थांमध्ये वडापाव पोहे भाकरी यांसारखे पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थांचा समावेश होतो.

FAQ

ताम्हिणी हा घाट पुण्यावरून किती अंतरावर आहे?

ताम्हिणी हा घाट 70 किलोमीटर अंतरावर आहे.

ताम्हिणी घाट कुठे आहे?

ताम्हिणी हा घाट भारतातील महाराष्ट्रामधील मुळशी आणि ताम्हिनी यादरम्यान वसलेला आहे, हा एक पश्चिम सह्याद्री घाट आहे.

ताम्हिणी हा घाट मुंबई पासून किती अंतरावर आहे?

ताम्हिणी हा घाट मुंबईपासून 140 किलोमीटर अंतरावर आहे.

ताम्हिनी या घाटावरील प्रसिद्ध धबधब्यांची नावे सांगा.

वाल्मिकी, वडसे आणि कातळ धबधबा प्रसिद्ध आहे.

ताम्हिणी या घटाने किती क्षेत्र व्यापले आहे?

150 क्षेत्र ताम्हिणी या घाटाने व्यापले आहे.

Leave a Comment