मोबाइल म्हणजे काय ? । Mobile Information in Marathi

mobile information in marathi नमस्कार मित्रांनो आज आपण Mobile बद्दल मूलभूत माहिती बघणार आहोत. उदा. Mobile शब्दाचा अर्थ? mobile meaning in marathi. पहिला मोबाइल फोन कसा होता? आणि मोबाइल चे विविध अंग (Parts). Mobile: एका ठिकाणाहून दुसरीकडे सहज नेता येणारे (able to move freely or easily) Mobile phone in marathi म्हणजे काय तर अगदी सहज कुठे हलवता येणारे आणि माहितीची देवाण घेवाण करता येणारे उपकरण (Portable communication device).

mobile information in marathi
mobile information in marathi

मोबाइल म्हणजे काय ? । Mobile Information in Marathi

आज या उपकरणाला विविध नावाने संबोधले जाते जसे की –mobile phone, cellular phone, cell phone or cellphone, hand phone or handphone, mobile, cell तर काही वेळा फक्त phone. जगातील पहिला मोबाइल फोन कोणी बनवला तर मोटोरोला (Motorola) या कंपनीने 1973 मध्ये. त्याचे वजन होते तब्बल 2 किलो (Kg).

या मोबाइल चे मुख्यतः दोन प्रकार पडतात :

1.Smartphone

2. Feature phone

सविस्तर माहिती बघूयात :

1. Smartphone:

आता आपण जर ही माहिती आपल्या फोन वर वाचत असाल तर तो आहे स्मार्ट फोन. जो फोन जास्तीत जास्त संगणकाची कामे करण्यास समर्थ आहे, ज्यामध्ये इंटरनेट कनेक्शन आहे अशा फोन ला आपण स्मार्ट फोन म्हणू शकतो. आणि हो अश्या फोन मधून आपण विडिओ कॉलिंग पण करू शकतो बरका.

2.Feature phone:

हा एक मूलभूत फोन आहे. यामध्ये फक्त आपण फोन कॉल करू शकतो किंवा आलेले फोन उचलू शकतो. तसेच संदेश (Message) पाठवू शकतो. आजही काही खेडेगावात जेथे इंटरनेट नेटवर्क पोहोचलेले नाही तिथे असे Feature phone वापरले जातात.

नक्की वाचा: मोबाइलचे प्रकार

मोबाइल चे विविध पार्ट्स : महत्वाचे दोन पार्ट्स आहेत.

1. Hardware आणि 2. Software

1.हार्डवेअर (Hardware):

म्हणजेच असे पार्ट्स जे आपण डोळ्याने बघू शकतो, त्यांना हात लावू शकतो.

a. Central Processing Unit:

संगणकामध्ये जसे CPU हे यूनिट कार्यरत असते तसेच यूनिट हे मोबाइल फोन मध्येही असते. त्याला आपण मोबाइल च प्रोसेसर ही म्हणू शकतो. तो एक मोबाइल चा मेंदू म्हणूनच काम करतो.

b.Display:

यालाच दुसरे नाव म्हणजे Screen. डिस्प्ले ची साइज ही तिरपी म्हणजेच Diagonally मोजली जाते. Feature phone च्या screen ची साइज ही 3.5 इंच पासून सुरू होते तर Smartphone चा डिस्प्ले हा 5.2 इंच पेक्षा मोठा आपल्याला बघायला मिळतो. त्याचे विविध प्रकार आपण बघतो. उदा. LCD, IPS, LED, OLED, AMOLED.

c.Sound:

दोन प्रकारचे sound असतात. एक म्हणजे आपण ज्यातून आवाज ऐकतो तो आणि दुसरा म्हणजे समोरच्या व्यक्तिला आवाज जातो तो. आज आपण बघतोय की विविध मोबाइल कंपन्यानंमद्धे स्पर्धा सुरू असते या सॉऊंड गुणवत्तेवरून.

d.Battery:

हा तर खूप महत्वाचा पार्ट आहे कारण यामुळेच तर आपण हे उपकरण कुठेही घेऊन जाऊ शकतो. या बॅटरी Lithium-Ion (Li-Ion) पासून बनलेल्या असतात. त्याची एक लाइफ असते. जनरली 2-3 वर्षे बॅटरी चांगली चालू शकते. जर आपण योग्य ती  काळजी घेतली तर अगदी 4-5 वर्षे आपण वापरू शकतो. काळजी काय घ्यायची तर ती दररोज Charge/Discharge झाली पाहिजे. Overcharge चा तर आता प्रश्नच येत नाही. Overcharge न होणारी टेक्नॉलॉजी आज सर्वच मोबाइल मध्ये वापरली जाते.

e. SIM Card (Subscriber Identity Module Card):

याबद्दल बहुतेकांना माहिती असेलच. ही एक Small microchip असते. आपण ज्यावेळी मोबाइल घेतो त्यावेळी ती  इंस्टॉल केली केली जाते. त्याचा आकार पोस्टाच्या स्टॅम्प एवढा असतो. त्याचे विविध प्रकार पडतात जसे की Mini SIM card, Micro SIM card

2. सॉफ्टवेअर (Software):

म्हणजे काय तर हा एक सूचनांचा संच असतो. त्याच्या सुचनेनुसारच मोबाइल चालत असतो.

a. Software Platform:

याला आपण Operating System (OS) असेही म्हणू शकतो. Feature phone आणि Smartphone यांच्या Software platform मध्ये जमीन आसमानचा फरक आढळतो. Smartphone मध्ये सध्या Android हा सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म खूप प्रसिद्ध आहे.

b. Mobile app:

हा एक संगणक आज्ञावली (Computer Programme) असते जी मोबाइल वर चालण्यासाठीच तयार केलेली असते. त्याला आपण Software application ही म्हणू शकतो. उदा. Alarm Clock app, Contact Book app, यांसारखे अनेक app आपल्याला मोबाइल मध्ये बघायला मिळतात.

c. Application stores:

 हे एक प्रकारचे ऑनलाइन वरील Mobile app खरेदी-विक्रीचे दुकानच असते. त्यामधून आपण जे हवे ते app आपण खरेदी/विक्री करू शकतो. उदा. Google play store, Apple’s App Store, BlackBerry App World

आपण काय शिकलो ?

मोबाइल म्हणजे काय? mobile information in marathi मोबईलची एका सामान्य माणसाला काय काय माहिती असायला हवी ती सर्व आपण वर बघितली आहे. आपल्याला what is called mobile in marathi माहिती कशी वाटली याबद्दल आम्हाला खाली कमेन्ट मध्ये कळवायला विसरू नका. भेटूयात पुढच्या लेखात अशाच उपयुक्त माहिती सोबत.

1 thought on “मोबाइल म्हणजे काय ? । Mobile Information in Marathi”

Leave a Comment