पी. टी. उषा यांची संपूर्ण माहिती P. T. Usha Information In Marathi

P. T. Usha Information In Marathi पी. टी. उषा ह्या भारतातील धावपटू आहेत. त्यांनी आपले नाव व भारताचे नाव जगामध्ये उज्वल केले आहे. भारतीय ट्रॅक आणि मैदानाची राणी सुवर्णकन्या आणि पायाएवली एक्सप्रेस अशा अनेक नावांनी पी. टी. उषा यांना संबोधले जाते. 1979 पासून पी. टी उषा यांनी भारतीय खेळात पदार्पण केले होते. भारताची सुवर्णकन्या म्हणून सुद्धा पी टी उषा यांना ओळखले जाते. त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबामध्ये झाला होता. परंतु त्यांनी त्यांच्या परिस्थितीवर मात करून पुढचे शिक्षण घेतले.

P. T. Usha Information In Marathi

पी. टी. उषा यांची संपूर्ण माहिती P. T. Usha Information In Marathi

महिला क्रीडा महाविद्यालयामध्ये त्यांनी महाविद्यालय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांना खेळामध्ये लहानपणापासूनच आवड होती. त्यामुळे शालेय स्पर्धेत सुद्धा भाग घ्यायच्या. त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर योग्य मार्गदर्शन त्यांना मिळाले आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला व तेथेही गोल्ड मेडल पटकावले. आज त्या एक उत्तम धावपटू म्हणून ओळखल्या जातात. आज आपण त्यांच्या विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

पी. टी. उषा यांचा जन्म व बालपण :

पी. टी. उषा यांचा जन्म 24 जून 1964 रोजी केरळमधील कोयोझोडोल जिल्ह्यातील पायवडी या छोट्याशा गावात झाला होता. पी. टी. उषा यांचा संपूर्ण नाव पिलावूनकांडी ठेक्केपरंबिल उषा असे आहे. त्यांचे बालपण मात्र खूप हालाकीमध्ये गेले होते, त्यांच्या घरची परिस्थिती बिकट होती. त्यांच्या वडिलांचा छोट्याशा कापडाचा व्यापार होता. त्यामध्ये त्यांच्या संपूर्ण घराचे पालन पोषण होत होते. अशा बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा पी. टी. उषा यांनी त्यांच्या शिक्षणाची साथ सोडली नव्हती.

शालेय जीवनामध्ये त्यांना खेळामध्ये खूप आवड निर्माण झाली होती. त्यांना लागणाऱ्या आवश्यक गरजा आणि पूर्ण होत नसल्यामुळे बऱ्याच त्यांच्या आरोग्याविषयीच्या समस्या सुद्धा निर्माण होत होत्या. शाळेत असताना पी. टी. उषा वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी घेत होते, त्यामुळे त्यांना क्रीडा क्षेत्राची खूपच आवड निर्माण झाली.

पी. टी. उषाचे शिक्षण :

पी. टी. उषा यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण केरळमधील पायोली या गावातील प्राथमिक शाळेतच पूर्ण केले. त्यानंतर त्यांना खेळामध्ये विशेष आवड निर्माण झाली. त्यामुळे आईच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी 1976 मध्ये सरकार प्रयोजित महिला क्रीडा खेळामध्ये भाग घेतला होता आणि या शर्यतीमध्ये तिने प्रथम क्रमांक पटकावला त्यानंतर त्यांना खेळामध्ये आवड तर जास्तीत जास्त निर्माण झाली . खेळामध्ये पुढचे करिअर करण्याची त्यांनी निर्णय घेतला.

पी टी उषा यांचे वैयक्तिक जीवन :

पी. टी. उषा यांना लहानपणापासूनच धावण्याची आवड होती. त्यांचे काका शाळेमध्ये शिक्षक होते, त्यामुळे तिला अथलेटिक्समध्ये करिअर करण्यासाठी कुटुंबाकडून सुद्धा प्रोत्साहन मिळाले होते. तिच्या करीयरमध्ये तिच्या कुटुंबाने सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली होती. तिच्या प्रशिक्षणादरम्यान त्यांच्या पालकांनी पाठिंबा आणि प्रोत्साहन दिले होते. त्यांचे बालपण मात्र खूप हल्ला की मध्ये गेले होते. त्यांच्या घरची परिस्थिती बिकट होती. त्यांच्या वडिलांचा छोट्याशा कापडाचा व्यापार होता.

त्यामध्ये त्यांच्या संपूर्ण घराचे पालन पोषण होत होते अशा बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा पी टी उषा यांनी त्यांच्या शिक्षणाची साथ सोडली नव्हती. शालेय जीवनामध्ये त्यांना खेळामध्ये खूप आवड निर्माण झाली होती. त्यांना लागणाऱ्या आवश्यक गरजा आणि पूर्ण होत नसल्यामुळे बऱ्याच त्यांच्या आरोग्याविषयीच्या समस्या सुद्धा निर्माण होत होत्या. ह्या एक जगातील सर्वात प्रसिद्ध आणि कुशल क्रीडापटू आहेत. तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी तिला क्वीन ऑफ इंडियन ट्रेक असे सुद्धा संबोधले गेले होते. त्यांच्या जीवनामध्ये येथूनच खरी खेळाला सुरुवात झाली होती.

प्रशिक्षणा दरम्यान तिच्या वडिलांसोबत मैदानावर धावायला जायच्या. 1978 ते 1989 मध्ये जेव्हा शॉर्ट मध्ये समुद्रकिनावर धावत होत्या. तेव्हा तिला पाहण्यासाठी गर्दी जमत असे. पी. टी. उषा यांनी कच्च्या रस्त्यावर धावून ट्रेन बरोबर धावायच्या अशा प्रकारे त्यांनी धावण्याचा सराव केला. पी. टी. उषा यांनी श्रीनिवासन यांच्याशी लग्न केले. लग्नाच्या काही वर्षानंतर त्यांना एक मुलगा झाला, ज्याचे नाव त्यांनी उज्वल असे ठेवले होते.

पी टी उषा यांची अथलेटिक कारकीर्द :

पी. टी. उषा प्राथमिक शाळेमध्ये जात होत्या. तेव्हापासूनच त्यांना अथलेटिक कारकीर्दीला सुरुवात केली असे म्हणण्यास वागे ठरणार नाही. पाकिस्तानमध्ये त्यांनी पाकिस्तान उपन्याशनल मीटमध्ये पहिल्या शर्यतीत भाग घेतला होता. या स्पर्धेत भारतासाठी उषाने चार सुवर्णपदक जिंकली. या वर्षी पी टी उषाने ती शर्यत जिंकली होती. त्यावेळी केवळ त्यांचे वय 16 वर्षे होते. यानंतर 1982 मध्ये जागतिक कनिष्ठ निमंत्रण संमेलन मध्ये भाग घेतला. तेथे त्यांनी 200 मीटर स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक पटकावले होते तसेच शंभर मीटर शर्यतीमध्ये कास्यपदक देशाच्या नावावर जिंकले होते.

या शर्यतीत पी टी उषाने दोन पदके जिंकून भारताची सर्वात वेगवान धावपटू हा किताब सुद्धा पटकावला. त्यानंतर कुवेतमध्ये जागतिक युनियन निमंत्रण संमेलनाच्या बरोबर एका वर्षानंतर एक शर्यत स्पर्धा सुरू झाली. त्या शर्यतीत एशियन ट्रॅक अँड फील चॅम्पियनशिप असे नाव देण्यात आले होते. या चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी 400 मीटर शर्यतीत नवा विक्रम गाठला आणि भारतासाठी आणखीन एक सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर 1984 मध्ये ऑलम्पिक तयारीसाठी तिने खूप मेहनत घेतली आणि तिची कामगिरी जास्तीत जास्त वाढवण्याकडे तिने आपले लक्ष केंद्रित केले.

पी. टी. उषाचा लॉस एन्जॉय येथे पुढील ऑलम्पिक मध्ये 400 मीटरच्या फेरीच्या पहिल्या फेरी त एक मोठा विक्रम गाठला. त्यानंतर तिची अंतिम फेरीसाठी निवड झाली. तेथे अंतिम फेरीत पी. टी. उषाने 1/100 गुण मिळवले. या अंतिम फेरीमध्ये पोचणारी ही पहिली महिला होती.

प्रत्येक शर्यतीत तिने भाग घेतला. पी. टी. उषाने आशियाई खेळांचे नवे विक्रम स्थापित केले. 1985 मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई धावण्याच्या स्पर्धेत त्यांनी पाच सुवर्णपदक जिंकले आणि 1986 मध्ये झालेल्या धावण्याच्या स्पर्धेत त्यांनी चार सुवर्णपदक आणि एक रौप्य पदक जिंकले. एकाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पी. टी. उषाने एकूण सहा पदक जिंकून अशी मोठा कारकिर्दी रचली.

पी. टी. उषा यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान :

  • पी. टी. उषा यांना भारत सरकारकडून 1985 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला.
  • कुन्नूर विद्यापीठाने 2000 मध्ये मानद डॉक्टर प्रदान केले.
  • 2017 मध्ये आयटी कानपूर द्वारे मानद डॉक्टर प्रदान करण्यात आली.
  • कालिकत विद्यापीठाचे 2018 मध्ये मानक डॉक्टर प्रदान केले.
  • 2019 मध्ये आय ए एफ वेटरन पिन.
  • बीबीसी इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार सुद्धा मिळाला.

FAQ

पी टी उषा यांचा जन्म कधी झाला?

24 जून 1964 रोजी.

पी. टी. उषा यांचे पूर्ण नाव काय आहे?

पिलवूलकांडी थेक्कापरंबिल उषा.

पी. टी. उषा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

पी. टी. उषा ह्या ऑलम्पिक धावण्याच्या शर्यतीसाठी प्रसिद्ध आहे.

पी टी उषा यांनी शिक्षण कोठे घेतले?

कोझिकोड येथील प्रॉव्हिडन्स महिला महाविद्यालय येथे त्यांनी शिक्षण घेतले.

पी टी उषा यांना काय म्हटले जाते?

पी. टी. उषा यांना भारतीय ट्रॅक आणि फिल्डची राणी असे म्हटले जाते.

Leave a Comment