Pigeon Bird Information In Marathi कबूतर या पक्षाच्या अनेक जाती आपण पाहिला असेल, त्यामध्ये त्यांच्या रंगात विविधता आढळून येते तसेच हे पक्षी पाळीव असून पक्षी तसेच रानटी भागातही आढळून येतात. कबूतर हे पक्षी खूप सुंदर दिसतात तसेच ती शांत स्वरूपाची पक्षी आहेत. कबूतर घरांमध्ये सुद्धा पाळले जातात. कबूतर हा एक भाग्यवान असा पक्षी आहे कारण कबूतर ज्या ठिकाणी राहतात. तेथे कबूतर देवी लक्ष्मीचा निवास आहे असे मानतात. कबुतराचा उपयोग हा खूप प्राचीन काळापासून होत असल्याचे आपण पाहिले आहेत.
कबूतर पक्षाची संपूर्ण माहिती Pigeon Bird Information In Marathi
कबुतराची स्मरणशक्ती खूपच चांगली असते, त्यामुळे जेव्हा त्यांना एकदा एखादी ठिकाण पाहिले तर ते ठिकाण ते विसरत नाही तसेच कबुतरांचा वापर पूर्वीच्या काळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश पाठवण्यासाठी केला जात होता.
बऱ्याच चित्रपटांमध्ये सुद्धा आपण कबुतरांविषयी कृती पाहिली असेल अनेक चित्रपटांमध्ये कबूतराची सीन तयार केले आहेत. त्यावर गाणी सुद्धा तयार केले आहे. कबूतर 6000 फूट उंचीपर्यंत उडू शकतात. साधारणपणे कबुतराच्या 300 पेक्षा अधिक जाती आढळून येतात. कबूतर हा एक लॅटिन शब्द असून पोपिओ यावरून तो शब्द आला आहे.
कबुतराची रचना :
कबुतराची लांबी 32 सेंटीमीटर असते, तर त्या कबुतराचे वजन जास्तीत जास्त 900 ग्रॅम पर्यंत असते. काही कबुतरांच्या प्रजातींमध्ये 15 ते 75 cm लांबीचे सुद्धा कबूतर असतात. त्यांचे वजन 30 ते 2000 ग्रॅम पर्यंत सुद्धा असते. न्यू गिनी नावाचे कबूतर सर्वात मोठे कबूतर आहे. कबूतरला दोन पंख आणि एकच असते तसेच ते त्यांना उडण्यासाठी सक्षम बनवतात.
कबुतराची पिसे खूप घनदाट असतात. कबूतर लाल रंगाचे सुद्धा असते. तर काही कबूतर निर्णय राखाडी रंगाचे सुद्धा असतात लाल कबूतर त्याचे डोळे आणि पाय हे लाल रंगाचे असतात हे पक्षी दिसायला सुंदर व कापसासारखे मऊ असतात. कबूतर हे पन्नास ते साठ किलोमीटर ताशी वेगाने उडू शकतात जंगलात राहणारे कबुतरांचे वय सहसा सहा ते सात वर्षे असते कबूतर हा एक तेजस्वी पक्षी आहे.
कबुतराच्या रंगात मात्र विविधता आढळून येते काही कबूतर शुभ्र पांढऱ्या रंगाचे तर काही काड्या रंगाचे तर काही मळकट रंगाची सुद्धा आढळून येतात. कबुतराचा सोना हा अत्यंत दयाळू आणि शांत आहे. त्यामुळे कबूतर हे शांतीचे प्रतीक सुद्धा मानले जात.
बऱ्याचदा कबुतराचा रंग राखाडी आणि तपकिरी सुद्धा असतो. भारतातील कबूतर तीन रंगात आढळते. त्यामध्ये पांढरा, तपकिरी आणि राखाडी घराघरांमध्ये हे कबूतर पाळले जातात. काही कबुतराच्या प्रजातीत जंगलांमध्ये सुद्धा राहतात. कबुतरांना लोकांमध्ये राहणे आवडते. ज्या कबुतरांना एखाद्याची ओळख झाली की, कबूतर त्यांच्याजवळ सहजपणे जातात, कबूतर हे एका गटात राहतात.
कबुतराचा आहार :
कबूतर हे त्यांच्या आहारामध्ये फळे, बिया, धान्य, मका, बाजरी, तांदूळ इत्यादी खातात. कबूतर हे पक्षी इतर पक्षांप्रमाणे ब्रेड आणि भाजलेले पदार्थ सुद्धा खातात. कबूतराला विविध प्रकारचे धान्य खाण्यास आवडते. जेव्हा त्यांना एकच एक धान्य खायला दिले जाते. तेव्हा ते कंटाळतात त्यामुळे कबुतरांना गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ अशा प्रकारचे वेगवेगळे धान्य दिले जाते.
कबूतर कुठे राहतात :
कबूतर हे पाळीव असल्यामुळे मानवाच्या निवासस्थानी सुद्धा राहतात. कबुतरांना जुनी घरे, मानवाच्या वस्तीत राहणे खूप आवडते. बरेच कबूतर हे जंगली असतात. त्यामुळे जंगलांमध्ये किनारी भागांतील प्रदेशांमध्ये सुद्धा कबुतराच्या प्रजाती राहतात. कबुतराच्या वेगवेगळ्या प्रजाती ह्या आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये आढळून येतात.
त्या व्यतिरिक्त कबूतर हे उत्तर आफ्रिका, युरोप उष्ण प्रदेशात आढळून येतात तसेच महासागरातील बेटे पूर्व, पोलिन, एशिया, अटलांटिक महासागर प्रदेशात सुद्धा कबूतर हा पक्षी आढळून येतो. पृथ्वीच्या दक्षिण आणि उत्तर ध्रुवावर कबुतराची एकही प्रजाती पाहायला मिळत नाही.
कबुतराचे जीवन :
कबुतराचा प्रजनन काळ हा वर्षभर चालतो. एका वेळेला कबूतर दोन अंडी देतात. कबूतर हे त्यांच्या मादी जोडीदारापासून कधीही वेगळे राहत नाही. केवळ वसंत ऋतू आणि उन्हाळ्यात हे पक्षी प्रजनन करतात. मादी कबूतर एका वेळेला दोन अंडी घालते तसेच जी मादी अंडी घालते ते नर आणि मादी दोघे मिळून उबवली जातात.
त्या अंड्यातून पिल्ले बाहेर आल्यानंतर नर व मादी दोघेही पिल्लांना खाऊ घालतात. अंड्यातून पिल्ले 19 ते 20 दिवसात बाहेर येतात. त्यानंतर ही पिल्ले पाच आठवड्यात उडू लागतात. कबूतर आपले घरटे बनवण्यासाठी काड्या, झाडांच्या छोट्या फांद्या याचा वापर करतात तसेच प्रजातीनुसार कबूतर आपले घरटे हे जमिनीवर किंवा झाडावर तसेच इमारतीच्या कोपऱ्यांमध्ये सुद्धा बनवते.
कबुतराचे महत्त्व :
प्राचीन काळी कबुतराचा उपयोग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश पाठवण्यासाठी केला जात होता तसेच कबूतर हे शांतीची प्रतीक मानले जाते. कबुतरामध्ये एक विशिष्ट क्षमता असते. दिशा ओळखण्यासाठी कबूतर खूप तरबेज असतात. त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधून सुद्धा त्यांना एखाद्या ठिकाणी नेऊन सोडली तर ते न चुकता पूर्वीच्या जागी योग्य ठिकाणी परत येऊ शकतात. कबुतराच्या या क्षमतेवर मोठ्या प्रमाणावर पूर्वीच्या काळापासूनच कबुतराला महत्त्व प्राप्त झाले आहे.
कबुतरा चे प्रकार :
कबुतराच्या 300 पेक्षा जास्त प्रजाती आढळून येतात. काही कबुतराच्या प्रजाती आपण खालील प्रमाणे पाहूया.
पांढरा कबूतर : पांढरा कबूतर हे शांतीचे आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते. याला कबूतर डव या नावाने सुद्धा ओळखले जाते. हे या कबुतराचे चिन्ह जगभरातील विविध मानवी हक्क मोहिमांमध्ये सुद्धा वापरले गेले आहे. जगातील अनेक संस्कृतींमध्ये पांढऱ्या कबूतर शांतीचे प्रतीक म्हणून सुद्धा दाखवले आहे.
रॉक कबूतर : रॉक कबूतर हे शहरी भागांमध्ये सुद्धा हे कबूतर आढळून येतात. या प्रजातीच्या कबुतरायाचे निळ्या, राखाडी रंगाचा पिसारा असतो तसेच त्याच्या मानेवर पांढऱ्या पिसांच्या ठिपके सुद्धा असतात. रॉक कबूतर जगभरातील गावांमध्ये व शहरांमध्ये आढळून येते. त्याच्याविषयी मोठ्या संख्येने बऱ्याचदा उपद्रव मानला गेलेला आहे.
रेसिंग होमर कबूतर : हे एक प्रकारचे पाळीव कबुतराची प्रजाती आहे. विशेष हे कबूतर रेसिंगसाठी प्रजनन उत्पादन केले जाते. या पक्षांचे पंख मजबूत व उंच पातळीची सहनशक्ती गाठण्यासाठी वर्षापासून प्रचलित आहे. रेसिंग स्पर्धेसाठी या कबुतराचा उपयोग केला जातो. हे कबूतर रॉक कबुतरापेक्षा मोठे असतात. त्याचे डोके पांढरे व डोळे लाल असतात.
होमिंग कबूतर : हुमिंग कबूतर हे एक प्रकारचे पाळीव कबूतर आहे. ज्यांना काही अंतरावर सोडल्यास त्यांच्या घराच्या ठिकाणी ते परत येतात. या कबुतरांना विशेष प्रशिक्षण सुद्धा दिले जाते. या कबुतरांचा उपयोग प्राचीन काळापासून केल्या जात आहे तसेच महाविद्यांमध्ये सुद्धा या कबुतराचा उपयोग संदेश पोहोचवण्यासाठी केला गेला होता. या कबुतराचे पांढरे डोके व डोळे लाल असतात तसेच हे कबूतर रॉक कबुतरापेक्षा मोठे असते.
फिल्ड कबूतर हे कबूतर एक प्रकारचे जंगली कबूतर आहे. जे ग्रामीण भागात आणि खुल्या शेतात सुद्धा आढळून येतात. या कबुतरांच्या मानेवर पांढरा ठिपका असतो व कबुतरापेक्षा ही प्रजाती लहान असते.
FAQ
कबूतर हा पक्षी काय खातो?
कबूतर हा पक्षी विविध प्रकारची धान्य, फळे बिया इत्यादी खातात.
कबुतराची सर्वात मोठी जात कोणती आहे?
मुकुट असलेले कबूतर हे सर्वात मोठी जात आहे.
कबूतर या पक्षाचा उपयोग कशासाठी केला जातो?
कबूतर या पक्षाचा उपयोग संदेश पोहोचवण्यासाठी केला जातो.
कबूतर पाळणे घातक का आहे?
कबुतराच्या विष्ठेतून तसेच पक्षांमधून सुद्धा काही रोग संक्रमित होऊ शकतात. कबुतरांना आर्मी थोसिस लिस्टीरिया आणि ई -कोलाई यासारखे रोग होतात.
कबूतर कुठे राहतो?
कबूतर जंगलांमध्ये तसेच पडक्या जागेत घरट्यात राहतो.