उमाजी नाईक यांची संपूर्ण माहिती Umaji Naik Information In Marathi

Umaji Naik Information In Marathi उमाजी नाईक हे एक भारतीय क्रांतिकारक होते. त्यांनी 1826 ते 1832 दरम्यान भारतातील ब्रिटिश नियंत्रणाला विरोध केला होता. ते एक अग्रणी भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांना प्रेमाने विश्वक्रांतीवीर राजे उमाजी नाईक असे संबोधले जाते. त्यांचे वडील दादूची नाईक खोमणे हे पुरंदर किल्ल्याचे वतनदार होते. त्यामुळे उमाजी राजेंचे कुटुंब पुरंदर व वज्रगड किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते.

Umaji Naik Information In Marathi

उमाजी नाईक यांची संपूर्ण माहिती Umaji Naik Information In Marathi

नावउमाजी नाईक
जन्म7 सप्टेंबर 1791
वडीलदादोजी नाईक खोमणे
आईलक्ष्मीबाई
चळवळभारतीय स्वातंत्र्यलढा
प्रभावछत्रपती शिवाजी महाराज
मृत्यू3 फेब्रुवारी 1932

जन्म व बालपण :

उमाजी नाईक यांचा जन्म 7 सप्टेंबर 1791 ला पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर भिवडी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दादोजी नाईक खोमणे असे होते तर त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. त्यांचे वडील दादोजी नाईक खोमणे हे पुरंदर किल्ल्याचे वतनदार होते.

त्यामुळे उमाजी राजेंचे कुटुंब पुरंदर व वज्रगड किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळे त्यांना नाईक ही पदवी सुद्धा मिळाली होती. उमाजी राजे हे जन्मापासूनच खूप हुशार आणि चंचल तसेच शरीराने धडकत उंच पुरे व करारी होते.

त्यांना पारंपारिक रामोशी हेर कला लवकरच आत्मसात केली. उमाजी राजे जसे जसे मोठ मोठे होत गेले तसे त्यांनी वडील दादोजी यांच्याकडून दंडपट्टा, तलवार, भाला, कुराडी, तीर, कामठा व गोफण इत्यादी चालवण्याची कला सुद्धा शिकून घेतली त्यामुळे राजे उमाजी नाईक यांची गुरु त्यांचे वडीलच होते.

इंग्रजांच्या जुलमी सत्तेच्या विरुद्ध क्रांतीची ज्योत सर्वप्रथम उमाजी नाईक यांनी प्रज्वलित केली होती. हा त्यांचा सर्वात पहिला उठाव होता. त्यांनी ब्रिटिश अर्थव्यवस्था मंदावण्याचा खूप प्रयत्न केला.

जीवन :

उमाजी राजे लहान असताना इंग्रजांनी भारतात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर हळूहळू मराठी मुलुख जिंकत त्यांनी पुणे सुद्धा ताब्यात घेतले होते. 1803 मध्ये पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यास स्थानपन्न केले आणि त्याने इतर सर्व किल्ल्याप्रमाणे पुरंदर किल्ल्याच्या वतनदारीचे व संरक्षणाचे काम रामोजी समाजाकडून काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले होते, त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली होती.

जनतेवर इंग्रजांनी अत्याचार सुरू केले अशा परिस्थितीमध्ये करारी उमाजी राजे बेभान झाले होते. छत्रपती शिवरायांना श्रद्धा स्फूर्तीचे स्थान देत त्यांचा आदर्श घेऊन त्यांनी स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीय यांनी राज्य करू नये तसेच मी त्यांना राज्य करू देणार नाही…! असा पण केला व विश्वजी नाईक, कृष्ण नाईक, खुशाबा, रामोजी, बापू सोळसकर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबा रायाला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरुद्ध पहिल्या बंडाची त्यांनी गर्जना सुद्धा केली होती.

उमाजी नाईक यांचे कार्य :

उमाजी नाईक यांनी इंग्रज सावकार मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्याची सुरुवात केली होती. कोणत्याही स्त्रीवर अत्याचार अन्याय झाल्यास ते भावासारखे धावून जात होते. इंग्रजांनी त्रास दिल्यामुळे उमाजी राजेंना सरकारने 1818 मध्ये एक वर्ष तुरुंगवासाचे शिक्षा सुद्धा दिली होती; परंतु तो काळ सत्कारणी लावत त्यांनी त्या काळात तुरुंगात लिहिणे, वाचणे सुद्धा शिकले होते.

या घटनेचे इंग्रज अधिकारी कॅप्टन मॅकिन्टॉश यांना त्याचे फार आचेवर कौतुक केले. तुरुंगातून सुटल्यानंतर इंग्रजांच्या विरुद्धच्या त्यांच्या कारवाया यामध्ये आणखीन वाढ झाली उमाजी राजे देशासाठी लढत असताना जनता ही त्यांना मोठ्या प्रमाणावर साथ देऊ लागली इंग्रज मेटाकुटीला आले होते. उमाजी राजेंना पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी यांनी फर्मान सोडले होते.

उमाजी राजेंचे सैन्य डोंगरामध्ये टोळ्या करून राहत होते. एक सैन्य तुकडीत जवळजवळ पाच हजार सैनिक होते. 24 फेब्रुवारी 1824 रोजी उमाजी आणि त्यांच्या सशस्त्र साथीदारांनी भांबुडा नावाच्या किल्ल्यातून इंग्रजांनी लपवून ठेवलेली सर्व संपत्ती चोरून नेली. इंग्रजांनी त्याच क्षणी उमाजी नाईक यांना अटक करण्याचे आदेश सुद्धा दिले होते. उमाजी नाईक पकडल्याबद्दल दहा हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून त्यांच्यावर बक्षीस देऊ करण्यात आले.

उमाजींनी गुरेला युद्धाचा वापर केला आणि इंग्रजांना महत्त्वपूर्ण आवाहन देण्यासाठी लोकसंख्येला संघटित केले होते. 22 जुलै 1826 या दिवशी आद्य क्रांतिकारक उमाजी यांचा राज्याभिषेक कडेपठार जेजुरी या ठिकाणी करण्यात आला. त्यांनी छत्र, चामर, अवघा, गिर इत्यादी राजचिन्हे धारण केले. दरबारात ते भिक्षुक, पुजारी यांना दक्षिणा व गोरगरिबांना दान देत असत. उमाजी राजेंनी विभागणीय प्रमुख व त्यांच्या तुकड्या नेमून सर्व भागांमध्ये तैनात केल्या होत्या आणि त्यांना कामे सुद्धा वाटून दिली होती.

त्यांनी एकमेकांशी संपर्क दळणवळण इंग्रजांच्या बातम्या आणि लोकांच्या बातम्या इतर कामासाठी हेअर खाते सुद्धा निर्माण केले होते विभागनिहाय गुप्तहेर खाते नेमले होते. सैन्यात व गुप्तहेर खात्यात सर्व जाती-धर्माचे लोक समाविष्ट होते. 28 ऑक्टोबर 1826 या दिवशी उमाजी राजेविरुद्ध इंग्रजांनी पहिला जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामध्ये उमाजी राजे व त्यांचा साथीदारांना पकडणाऱ्या मोठ्या रकमेची बक्षिसे व इनाम जाहीर केले होते.

या क्रांतिकारकांना मदत करणाऱ्या सुद्धा त्यांनी शिक्षा जाहीर केली परंतु जनतेने इंग्रजांना मदत केली नाही. यातून उमाजी राजेंची लोकप्रियता दिसून आली अशाच प्रकारे दुसरा जाहीरनामा इंग्रजांनी 8 ऑगस्ट 1827 या दिवशी प्रसिद्ध केला. त्यात बक्षीसाची रक्कम वाढवली व शरण येणाऱ्या माफी देण्याची अभिवचन सुद्धा देण्यात आले.
तरीही कोणी मदत केली नाही कारण लोक उमाजी राजेंना इंग्रजांविरुद्ध असणारे एक नेता मानत होते.

इंग्रज त्या काळामध्ये सुद्धा गोरगरिबांवर अन्याय करत होते. त्यामुळे इंग्रजांना कोणीही साथ न देणे हेच लोकांच्या मनामध्ये होते. 20 डिसेंबर 1827 साली उमाजी राजे व इंग्रज यांच्यामध्ये युद्ध झाले. त्यामध्ये इंग्रजांना पराभव झाला होता. त्यानंतर इंग्रजांना त्यांनी सांगितले, आज हे बंड असले तरी हजारो बंडे सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील तुम्ही जरी असा फक्त इशारा देऊन न थांबता त्यांनी इंग्रजांना सडोके पडो असे करून सोडले होते.

त्यानंतर इंग्रजांनी तिसरा जाहीरनामा काढला व त्यामध्ये बक्षीसाची रक्कम दुप्पट केली याचा सुद्धा त्यांना काहीही उपयोग झाला नाही. अशाप्रकारे त्यांनी चौथा जाहीरनामा काढला परंतु त्यांची मदत कोणीच केली नाही.
त्यानंतर इंग्रजांनी पाचवा जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्यामध्ये सावकार जमीनदार वतनदार यांना मोठमोठी आमुशीत देऊन बक्षीस जाहीर केले.

त्यामध्ये दहा हजार रुपये रोख आणि दोनशे एकर जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली. हा इनाम त्र्यंबक चंद्रस कुलकर्णी याच्या मनात लालच सुटली आणि त्याने उमाजी राजेंची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली. त्यानंतर 15 डिसेंबर 1831 रोजी भोर तालुक्यातील उतरली या गावी रात्री बेसावध असताना उमाजी राजेंना इंग्रजांनी पकडले.

उमाजी नाईक यांचा मृत्यू :

उमाजी नाईक जीवनामध्ये एक असा भयानक दिवस आला तो म्हणजे 15 डिसेंबर 1831 रोजी हाच तो दिवस होता. त्यांना भोर येथील एका गावामध्ये अटक केली आणि न्यायालयात देशद्रोहाचा आरोप लावला गेला. उमाजी नाईक यांना 3 फेब्रुवारी 1832 रोजी पुण्यातील खडका कमल न्यायालयात फाशी देण्यात आली व उमाजी नाईक यांना त्यांच्या वयाच्या 41 व्या वर्षी देशासाठी वीरगती प्राप्त झाली.

FAQ

उमाजी नाईक यांचा जन्म कधी झाला?

7 सप्टेंबर 1791.

उमाजी नाईक यांनी कोणती चळवळ स्थापन केली?

भारतीय स्वातंत्र्यलढा.

उमाजी नाईक यांच्यावर कोणाचा प्रभाव होता?

छत्रपती शिवाजी महाराजांचा.

उमाजी नाईक यांच्या वडिलांचे नाव काय होते?

दादोजी नाईक खोमणे.

उमाजी नाईक यांचा मृत्यू कधी झाला?

उमाजी नाईक यांचा मृत्यू 43 व्या वर्षी म्हणजेच 3 फेब्रुवारी 1832 रोजी पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचोरी मध्ये त्यांना फाशीवर चढवले होते.

Leave a Comment