भारतीय संविधानची संपूर्ण माहिती Indian Constitution Information In Marathi

Indian Constitution Information In Marathi भारताचे संविधान हे सर्वात मोठे लिखित संविधान आहे. भारताची राज्यघटना हीच भारताचे सर्वोच्च कायदा आहे. हा दस्ताऐवज मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्य तसेच मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्वे आणि नागरिकांची कर्तव्य निर्धारित करणारी चौकट यामध्ये समाविष्ट केलेले आहे. हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार मानले जातात.

Indian Constitution Information In Marathi

भारतीय संविधानची संपूर्ण माहिती Indian Constitution Information In Marathi

शीर्षकभारतीय संविधान
न्याय क्षेत्रभारत
स्वीकारल्याची दिनांक26 नोव्हेंबर 1949
अंमलबजावणीची दिनांक26 जानेवारी 1950
शासन प्रणालीसंघीय, संसदीय , घटनात्मक, प्रजासत्ताक
संविधान रचना काळ2 वर्ष 11 महिने 18 दिवस
संविधान दिवस 26 नोव्हेंबर

संविधान म्हणजे काय?

भारताचे संविधान म्हणजेच आपण त्याला भारताची राज्यघटना असे म्हणतो. आपला भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे म्हणजेच लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेले राज्य आणि आपली राज्यघटना किंवा संविधान हे जगातील सर्वात मोठा धर्मग्रंथच आहे असे म्हटले तरी चालेल.

भारताची राज्यघटना ही 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आली तसेच 26 जानेवारी 1950 रोजी ती अमलात आणली गेली. 1947 मध्ये भारताच्या राज्यघटनेचा किंवा संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी सरकारने एका समितीची स्थापना केली.

या समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते आणि त्यांना आपल्या राज्यघटनेचे रचनाकार म्हणून सुद्धा आपण ओळखतो आपल्या देशाचे संविधान हे तर जगातील सर्वात मोठे संविधान आहे. संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले होते. नागरिकांमध्ये संविधानांच्या मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी भारत सरकारने 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो.

भारतीय संविधान प्रस्तावना :

भारतीय संविधानाची रचना करण्यासाठी तसेच मसुदा तयार करण्यासाठी 1947 रोजी एक मसुदा समिती स्थापन करण्यात आली आणि त्या समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना नेमण्यात आले. मसुदा तयार करण्यासाठी त्या समितीला 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले तसेच 26 नोव्हेंबर 1949 मध्ये शेवटचा मसुदा समितीने स्वीकारला व 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अमलात आणले गेले. तो दिवस आपण प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतो.

नागरिकांमध्ये संविधान मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो.

भारतीय संविधानाचा इतिहास :

भारतीय संविधानामध्ये अमलात आलेले मुख्यत्वे हे 1950 मध्ये तयार करण्यात आले होते; परंतु ते 1935 च्या भारत सरकार कायद्यावर आधारित आहे. 1935 सालच्या या कायद्याने अंतर्गत भारताच्या स्वशासनाचा पाया घातला गेला होता. ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट आणली यांच्या शिष्ट मंडळाच्या स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एका मसुदा समितीच्या स्थापनेविषयीच्या कल्पनेस भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या नेत्यांनी सहमती दर्शवली होती.

1946 च्या उन्हाळ्यात या समितीची स्थापना झाली आणि तिची पहिली बैठकी 9 डिसेंबर 1946 रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली प्रॅक अँथनी यांच्या उपाध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे संविधान सभागृहामध्ये झाली. 11 डिसेंबर रोजी सर्व सदस्यांच्या संमतीने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षस्थानी आशुतोष मुखर्जी यांच्या उपाध्यक्ष स्थानी निवड करण्यात आली.

हे सभागृह आज सेंट्रल हॉल या नावाने ओळखले जाते पहिल्या बैठकीला नऊ महिलांसह 211 सदस्य उपस्थित होते तर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतात स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने भारताचे प्रतिनिधी या रूपात काम केले होते. अनेक बैठकानंतर या समितीने त्यांचा अहवाल सादर केला. मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला आणि भारतात 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा केला गेला.

संविधानाचे स्वरूप :

भारताची राज्यघटना उद्देशिका, मुख्य भाग व बारा पुरवण्या म्हणजेच परिशिष्टे अशा स्वरूपामध्ये संविधानाचे स्वरूप विभागले आहे. मुख्यतः संविधानाचे 25 भाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. सुरुवातीच्या 395 कलमांपैकी काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत. जानेवारी 2020 मध्ये राज्यघटनेत 488 कलमे असून भारतीय संविधान हे विस्ताराने जगातले सर्वात मोठे संविधान आहे.

भारताची राज्यघटना ही काहीशी लवचिक तर काहीशी ताठर आहे म्हणजेच यामध्ये थोडेफार बदल करता येतात परंतु काहीसे बदल करता येत नाही. आपल्या घटनेने भारतीय नागरिकत्वाला एकेरी नागरिकत्व दिले आहे व प्रत्येकाला एका मताचा अधिकार सुद्धा प्राप्त झालेला आहे.

संविधानाची स्थापना :

1946 च्या उन्हाळ्यात या समितीची स्थापना झाली आणि तिची पहिली बैठकी 9 डिसेंबर 1946 रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली प्रॅक अँथनी यांच्या उपाध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे संविधान सभागृहामध्ये झाली. 11 डिसेंबर रोजी सर्व सदस्यांच्या संमतीने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षस्थानी आशुतोष मुखर्जी यांच्या उपाध्यक्ष स्थानी निवड करण्यात आली. हे सभागृह आज सेंट्रल हॉल या नावाने ओळखले जाते.

पहिल्या बैठकीला 9 महिलांसह 211 सदस्य उपस्थित होते. तर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतात स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने भारताचे प्रतिनिधी या रूपात काम केले होते. अनेक बैठकानंतर या समितीने त्यांचा अहवाल सादर केला. मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला आणि भारतात 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा केला गेला.

भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये :

भारतीय राज्यघटना ही 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आली. त्यामुळे राज्यघटना 26 जानेवारी 1949 रोजी अमलात आणली गेली. भारताचे संविधानाच्या अंमलबजावणीसाठी दोन घटकांचा विचार केला गेला. तो म्हणजे कायदा आणि न्यायप्रणाली तसेच दुसरे म्हणजे राजकारण.

भारतीय संविधानाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हे जगातील सर्वात मोठे संविधान असून ते लिखित संविधान आहे तसेच भारतीय संविधानामध्ये एकूण एक लाख 45 हजार शब्द आहेत.

भारतीय संविधानाचे हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषेमध्ये रचना केली गेलेली आहे. संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असून त्या काळामध्ये मसुदा समितीच्या रचनेवेळी एकूण 44 सभा तयार झाल्या होत्या.

भारताचे संविधान हे हाताने लिहिलेले असावे असे पंडित जवाहरलाल नेहरू यांची इच्छा होती. त्यामुळे भारताचे संविधान हे कॅलिग्राफी कलाकार बिहारी नारायण रायजादा यांनी आपल्या सुंदर अक्षरांनी संविधान हस्तलिखित बनवले होते.

हे हस्तलिखित संविधान लिहिण्यासाठी सहा महिने लागले तसेच 254 आणि 300 पेन लागली होते. भारतीय राज्यघटनेचे घटनादुरुस्ती ही 18 जून 1951 मध्ये पहिल्यांदा करण्यात आली आणि आज पर्यंत शंभर घटना दुरुस्ती झाल्या आहेत.

मूलभूत हक्क असे अधिकार आहे, जे व्यक्तीच्या जीवनासाठी मूलभूत असल्यामुळे संविधानाने नागरिकांना दिलेले अधिकार आहेत. संविधानाच्या कलम 7व्या, 42, 44 , 73 आणि 74 व्या दुरुस्ती यासारख्या विविध सुधारणेद्वारे मूळ संविधानामध्ये लक्षणीय बदल करण्यात आले आहे.

भारतीय संविधानाच्या हाताने लिहिलेल्या संविधानावर संसदेच्या 284 सदस्यांची स्वाक्षरी आहे तर यामध्ये एकूण 15 महिला सदस्यांचा सुद्धा समावेश केलेला आहे.

FAQ

भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

डॉ. भीमराव आंबेडकर.

संविधानाची किती प्रकार आहेत?

संविधानाचे दोन प्रकार आहेत, त्यामध्ये लिखित आणि अलिखित.

संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले गेले?

26 नोव्हेंबर 1949 रोजी.

संविधानाची अंमलबजावणी कधी झाली?

26 जानेवारी 1949 रोजी.

भारतीय राज्यघटना कोठे आहे?

1950 चे मूळ संविधान नवी दिल्लीतील संसद भवनात नायट्रोजनने भरलेल्या केसमध्ये जतन केलेले आहे.

Leave a Comment