क्विनोवा धान्य विषयी संपूर्ण माहिती Quinoa Grain Information In Marathi

Quinoa Grain Information In Marathi धनधान्य म्हटलं की आपल्याला गहू, ज्वारी, बाजरी, मका यांसारखे धान्य आठवतात. कारण आपण हे धान्य रोज बघत असतो. आणि खात देखील असतो. मात्र असे काही धान्य देखील आहे, जे आपल्या रोजच्या आहारामध्ये समाविष्ट नसतात. त्यामुळे सर्वसाधारणपणे अनेक लोकांना याबद्दल माहिती नसते. असेच एक धान्य म्हणजे क्विनोआ होय.

Quinoa Grain Information In Marathi

क्विनोवा धान्य विषयी संपूर्ण माहिती Quinoa Grain Information In Marathi

आरोग्याच्या दृष्टीने अनेक लोक जागृत झाल्यामुळे या धान्याची लोकप्रियता देखील प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. हे धान्य अतिशय असाधरण गुणधर्म असणारे आहे. त्याचबरोबर त्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक आढळून येतात. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच अनेक रोगांना बरे करण्यामध्ये देखील फायदेशीर ठरतात.

एक औषधी किंवा आरोग्यदायी खाद्य म्हणून ओळखले जाणारे हे धान्य पचण्यासाठी देखील अतिशय सोपे असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर डॉक्टर देखील हे धान्य सेवन करण्याचा सल्ला देत आहेत. आजच्या भागामध्ये आपण या धान्य बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत.

नावक्विनोवा
प्रकारधान्य
उपलब्ध पाणी७१.६१%
उपलब्ध कॅलरी१२०
उपलब्ध प्रथिने 4.4%
उपलब्ध कर्बोदके२१.३%
उपलब्ध साखर०.८ %
इतर उपलब्ध घटकफॉस्फरस, सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक, कॉपर, लोह

क्वीनोआ वनस्पती म्हणजे नेमके काय:

एक असाधरण गुणधर्माचे धान्य, ज्याला सुपर ग्रेन या नावाने ओळखले जाते. असे हे धान्य अतिशय उत्तम व आरोग्यदायी समजले जाते. या वनस्पतीच्या संपूर्ण भागांचा, अर्थात पान, धान्य अशा सर्वच भागांचा वापर केला जातो. ज्याप्रमाणे आपण दररोजच्या जेवणामध्ये धनधान्य वापरतो, तश्याच स्वरूपाचे हे धान्य मुख्यतः डोंगराळ भागामध्ये उगवले जाते.

आकाराने गोल आणि रंगाने जांभळा, काळा, किंवा लाल स्वरूपाचा हा प्रकार तीळ या वनस्पती सारखाच दिसतो. मुख्यतः हे भारतामध्ये उगम पावलेले धान्य नसून, त्याचा उगम अमेरिकेच्या अँडीज पर्वादामध्ये झाला होता. मुख्यतः पर्वतीय भाग, आणि जंगल या ठिकाणी उत्पादन घेतले जाणारी ही वनस्पती चवीला देखील अतिशय उत्तम असते.

हे एक वार्षिक स्वरूपाचे पीक असून, उंचीला देखील चांगलेच वाढते. राजगिरासारखे दिसणारे हे झाड लालसर जांभळ्या किंवा हिरव्या रंगाचे असते. त्याची फुले देखील खूपच छान दिसतात. मात्र यांना कुठल्याही प्रकारचा सुगंध नसतो. अतिशय नाजूक स्वरूपाची ही वनस्पती त्याच्या अद्वितीय धान्य करता खूपच प्रसिद्ध आहे.

या वनस्पतीचे वैशिष्ट्य म्हणजे, यावर कुठल्याही प्रकारचा रोग किंवा कीड सहजासहजी येत नाही. त्यामुळे या वनस्पतीला उगवण्याचा खर्च देखील बऱ्याच प्रमाणात कमी होतो. ओट्स आणि हे धान्य काही अंशी दिसायला सारखे असते.

क्वीनोआ वनस्पती साठवण्याच्या पद्धती:

ही वनस्पती धन्य स्वरूपात तुमच्याकडे असेल, तर तुम्ही योग्य रीतीने साठवली पाहिजे. जेणेकरून अधिक कालावधीसाठी तुम्ही या वनस्पतीचा किंवा धान्याचा आस्वाद घेऊ शकता. जर तुम्हाला चार ते पाच दिवसांसाठी ही वनस्पती साठवायची असेल, तर तुम्ही सहज शिजवून तिला फ्रिजमध्ये ठेवू शकता.

मात्र तुम्हाला एक महिन्यापर्यंत या वनस्पतीचे साठवणूक करायची असेल तर तुम्ही तिला शिजवू शकता, मात्र ठेवताना डीप फ्रीज मध्ये गोठवून ठेवण्याची आवश्यकता असते. त्याच पद्धतीने एक महिन्यापेक्षा जास्त अर्थात एक वर्षापर्यंत तुम्हाला या वनस्पतीची साठवणूक करायची असेल, तर मग मात्र तुम्ही या वनस्पतीला शिजवू शकत नाहीत. मात्र आहे त्या स्थितीत आपल्या सामान्य तापमानाला हवाबंद डब्यामध्ये तुम्ही याची साठवणूक करू शकता.

क्वीनोआ वनस्पती चे प्रकार:

या वनस्पतीच्या अनेक प्रजाती आढळून येतात. त्यांची संख्या सुमारे १२० पेक्षा ही अधिक असून, वेगवेगळ्या हवामानाला या वनस्पती उगवल्या जात असतात. मात्र यातील प्रकार अतिशय महत्त्वाचे असून, ते रंगांच्या आधारे तयार करण्यात आलेले आहेत. यामध्ये लाल, पांढरा, व काळा क्वीनोआ चा समावेश होतो.

यातील काळा क्वीनोआ हा प्रकार शिजवण्यासाठी फार मोठा कालावधी घेत असतो. मात्र शिजवून झाल्यानंतर यामधील रंग व स्वाद बदलत नाही. चवीला अतिशय गोड असणारा हा प्रकार सर्वाधिक पसंत केला जातो.

पांढरा क्वीनोआ हा सर्वत्र उपलब्ध असणारा प्रकार असून, याला हस्तिदंत क्वीनोआ या नावाने देखील संबोधले जाते. या प्रकाराला शिजवण्यासाठी अत्यंत थोडासा वेळ आवश्यक असतो.

शक्यतो सॅलड सारख्या प्रकारामध्ये खाल्ला जाणारा क्वीनोआ म्हणजे लाल क्वीनोआ होय. इतर प्रजातींच्या तुलनेत हा अधिक काळापर्यंत साठवून ठेवला जाऊ शकतो. त्याचबरोबर शिजवल्यानंतर याचा आकार, चव, आणि स्वाद यामध्ये कुठलाही बदल दिसून येत नाही.

क्वीनोआ सेवनाचे फायदे:

या वनस्पतीचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होत असतात. त्यामध्ये वजन कमी करण्यासाठी या वनस्पतीचा खूपच महत्त्वाचा रोल असतो. त्याचबरोबर हृदयाचे आरोग्य सुधारणे, रक्तामध्ये गुठळ्या कमी करणे, व रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आणणे, हाडांच्या संदर्भातील विविध आजार बरे करणे, पचनक्रिया सुधारणे, मधुमेही रुग्णांना आराम देणे, केसांचे आरोग्य सुधारणे, शरीरावर आलेली सूज कमी करणे, त्याचप्रमाणे शरीराच्या कुठल्याही भागांमध्ये वेदना होत असतील तर पेन किलर सारखे काम करणे, इत्यादी गोष्टींमध्ये ही वनस्पती फायदेशीर आहे.

निष्कर्ष:

आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे वनस्पती व प्राणी आपल्याला आढळून येत असतात. गवत वर्गीय वनस्पतींना धान्य येत असते. त्या धान्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कर्बोदकांचे प्रमाण आढळून येते. हे कर्बोदके शरीराला ऊर्जा प्रदान करण्यासाठी खूपच फायदेशीर असतात.

त्यामुळे रोजच्या आहारामध्ये गहू, ज्वारी, तांदूळ यांसारख्या धनधान्यचे आपण सेवन करत असतो. हे रोजच्या आहारामध्ये समाविष्ट असल्यामुळे याबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती असते. मात्र असे देखील काही धान्य आहेत, जे आपण नियमित वापरात आणत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेणे गरजेचे ठरते. आजच्या भागामध्ये आपण क्वीनोआ या धान्य बद्दल माहिती बघितली आहे.

ज्यामध्ये हे धान्य नेमके काय असते, दिसण्यास कशाप्रमाणे दिसते, याची साठवणूक क्षमता, त्याचे विविध प्रकार, कोणत्या ठिकाणी उगवले जाते, यामध्ये आढळणारी विविध पौष्टिक तत्त्व, याचे आरोग्यदायी फायदे, त्याचबरोबर उपयोग या धान्याच्या सेवनाने होणारे तोटे, आणि या धान्याचा वापर करताना घ्यावयाची खबरदारी किंवा लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी इत्यादी माहिती बघितली आहे.

FAQ

क्वीनोआ या वनस्पतीला कोणत्या गटातील वनस्पती म्हणून ओळखले जाते?

एक तृणधान्य वर्गीय वनस्पती म्हणून या वनस्पतीला ओळखले जाते. जे त्याच्या उत्कृष्ट धान्य निर्मितीसाठी कारणीभूत असते.

क्वीनोआ हे धान्य कोणत्या गटातील आहे, व यामध्ये अजून कोणत्या वनस्पतींचा समावेश होतो?

क्वीन हे धान्य पोएसी या गटातील अथवा कुटुंबातील असून, यामध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका यासारख्या धान्यांचा समावेश होतो.

क्वीनोआ या वनस्पतीचा उगम कोठे आढळून येतो?

क्वीन या वनस्पतीचा उगम दक्षिण अमेरिकेमध्ये असलेल्या अँडीज या पर्वतामध्ये आढळून येतो. सर्वात प्रथम या ठिकाणी या वनस्पतीची लागवड केली गेली असे पुरावे आढळतात.

क्वीन ही वनस्पती कशा सारखी दिसते?

क्वीन ही वनस्पती राजगिरा या वनस्पतीषी साधर्म्य दाखवणारी असून, बाह्य दर्शनानुसार त्या वनस्पती सारख्याच भासतात.

क्वीनोआ या वनस्पतीच्या साठवणुकीबद्दल काय सांगता येईल?

हे धान्य साठवण करण्यासाठी फारच फायदेशीर असते. साधारणतः शिजवून फ्रीजमध्ये ठेवल्यास, पाच दिवस हे धान्य टिकू शकते. तसेच याला एक महिन्यापर्यंत ठेवायचे असेल तर गोठवून देखील ठेवले जाऊ शकते. मात्र त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी अर्थात वर्षापर्यंत साठवायचे असेल तर हवाबंद डब्यामध्ये साधारण तापमानाला विना शीजवता हे साठवले जाऊ शकते.

Leave a Comment