तुळशीची संपूर्ण माहिती Tulsi Information In Marathi

Tulsi Information In Marathi तुळस ही एक औषधी वनस्पती आहे तसेच ती हिंदू धर्मामध्ये पवित्र मानली जाते. तुळशीला मंगलतेची पावित्र्याची प्रतीक मानले जाते. हिंदू घरांमध्ये तर घरोघरी तुळशी वृंदावन किंवा कुंडीमध्ये, जमिनीवर तुळशीचे रोप लावले जातेस तसेच हिंदू नित्यनेमाने तुळशीची पूजा करतात.

Tulsi Information In Marathi

तुळशीची संपूर्ण माहिती Tulsi Information In Marathi

तुळशीला दररोज पाणी घालतात वृंदावन तयार करून त्यामध्ये तुळशीच्या रोपाला लावून हिंदू स्त्रिया प्रदक्षिणा घालतात व सायंकाळी तुळशीपुढे दिवा लावून प्रार्थना सुद्धा केली जाते. वारकरी संप्रदायातील लोक तुळशीला खूप मानतात. त्यामुळे तुळशीची माळ सुद्धा गळ्यामध्ये ते लोक घालत असतात. हिंदू धर्मात एखाद्याचा मृत्यू झाला तर मृतदेहावर तुलसी पत्र सुद्धा ठेवले जातात. तुळशीची झुडपे ही आशिया, युरोप, आफ्रिका खंडामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळून येतात.

वनस्पतीचे नावतुळस
शास्त्रीय नावऑसिमम सॅक्टम
उंची30-120सेंटीमीटर
प्रकारऔषधी तुळस, काळी तुळस, कृष्ण तुळस, राम तुळस, लवंग तुळस, रान तुळस
तापमान7 अंश ते 27 अंश सेल्सिअस

तुळशीचे वर्णन :

तुळशीचे मुख्य दोन प्रकार आढळतात. त्यामध्ये राम तुळस आणि कृष्ण तुळस दोन्हीही तुळस रंगामुळे भिन्न दिसतात परंतु त्यांची पाने मात्र सारखीच असतात त्यांच्या रंगांमध्ये आपल्याला फरक जाणवतो. कृष्ण तुळस किंवा काळी तुळस म्हणजे या तुळशीला काळा आणि गर्द जांभळ्या रंगाची पाने असून ज्याला कृष्ण तुळस असे सुद्धा म्हटले जाते. या तुळशीची पाने किंचित आणि रंगाची असते. त्यामुळे तिला कृष्ण तुळस अशी सुद्धा म्हटले जाते. या तुळशीची पाने खाल्ल्याने सर्दी, खोकला, ताप यावर लवकर आराम मिळतो.

राम तुळशीच्या पानांचा रंग हिरवा असून त्यांची पाने खाण्यासाठी गोड लागतात. राम तुळस भगवान श्रीरामांना अत्यंत प्रिय आहे. घरामध्ये राम तुळशीचे रोप लावल्याने घरात सुख शांती आणि ऐश्वर्या नांदते तसेच घरामध्ये ही तुळस लावणे खूपच शुभ मानली जाते. हिंदू धर्मामध्ये या तुळशीला खूप महत्त्व आहे. या तुळशीला लवंगी तुळस असे सुद्धा म्हटले जाते. या तुळशीच्या पानांचा सुवास हा लवंग किंवा मसालेदार असा येतो. हे पोटाच्या विकारांसाठी खूपच उपयुक्त आहे.

तुळशीची रोपे सर्वसाधारणपणे 30 ते 120 सेंटीमीटर पर्यंत उंच वाढतात. तिचे पाने हिरवे व लंब गोलाकार तसेच किंचितशी टोकदार व कातरलेली असतात. तुळशीच्या तुऱ्यासारख्या फुलाला मंजिरी असे म्हटले जाते. फुलांमध्ये सुगंधी तेल असते, फुलांमध्ये तुळशीच्या बिया सुद्धा असतात. तुळस ही दिवसातले 20 तास ऑक्सिजन तर उर्वरित तास कार्बन डाय-ऑक्साइड हवेमध्ये सोडते असे वनस्पती शास्त्रज्ञाचे म्हणणे आहे.

तुळशीचे हिंदू धर्मातील महत्त्व :

हिंदू घरांमध्ये तर घरोघरी तुळशी वृंदावन किंवा कुंडीमध्ये जमिनीवर तुळशीचे रोप लावले जातेस तसेच हिंदू नित्यनेमाने तुळशीची पूजा करतात. त्यांना दररोज पाणी घालतात, वृंदावन तयार करून त्यामध्ये तुळशीच्या रोपाला लावून हिंदू स्त्रिया प्रदक्षिणा घालतात व सायंकाळी तुळशीपुढे दिवा लावून प्रार्थना सुद्धा केली जाते.

वारकरी संप्रदायातील लोक तुळशीला खूप मानतात. त्यामुळे तुळशीच्या माळा सुद्धा गळ्यामध्ये ते लोक घालत असतात. हिंदू धर्मात एखाद्याचा मृत्यू झाला तर मृतदेहावर तुळशीपत्र सुद्धा ठेवले जातात.

तुळशीचे फायदे कोणते आहेत?

तुळशी एक औषधी वनस्पती आहे तसेच हिंदू धर्मामध्ये पवित्र मानली जाते. तुळशीच्या पानांमध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट आणि अँटिबायोटिक गुण धर्म शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात यामुळे केवळ सर्दी खोकलाच नव्हे तर पचन संस्थेची संबंधित समस्या सुद्धा दूर होतात.

तुळशीची पाने, पचन प्रक्रिया सुरळीत करतात. आम्लपित्त आणि पोटातील जळजळ यांची समस्या सुद्धा दूर करतात. घरगुती उपायमध्ये तुळशीचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. तुळस ही औषधी गुणधर्मामुळे अनेक रोगांवर रामबाण औषध आहे. त्यामुळे त्याचे सेवन सुद्धा केले जाते.

तुळशीची मंजिरी भगवान विष्णूच्या चरणी अर्पण केली जातात. शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की, त्यामुळे आपल्याला मोक्षप्राप्ती होते तसेच तुळशीच्या बियांचे सेवन केल्यास पोटातील उष्णता कमी होऊन थंडावा सुद्धा मिळतो. तुळशीच्या बिया पाण्यामध्ये भिजवून त्यानंतर दुधात मिसळून त्यांचे सेवन केल्याने फायदेशीर ठरते. तुळशीवरील मंजिरी काढली नाही तर तुळशीची वाढ खुंटते

तुळशीच्या जाती :

औषधी तुळस :

औषधी तुळस यामध्ये पुदिना कुटुंबातील फुलांची वनस्पती आहे. या तुळसला सुगंधी आणि औषधी दोन्हीही गुणधर्मासाठी वापरले जाते. ही वनस्पती विविध आजारांसाठी आयुर्वेदिक उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. हिंदू धर्मामध्ये ही वनस्पती पवित्र मानली जाते.

कापूर तुळस :

कापूर तुळसचा उपयोग पूर्व आफ्रिकेत सर्दी खोकला, पोटदुखी, गोवर, अतिसार, कीटकनाशक तसेच डास आणि साठवून कीटक नियंत्रण यासाठी केला जातो तसेच या तुळशीचा उपयोग अनेक आजार दूर करण्यासाठी सुद्धा केला जातो.

काळी तुळस/ कृष्ण तुळस :

कृष्ण तुळस किंवा काळी तुळस म्हणजे या तुळशीला काळा आणि गर्द जांभळ्या रंगाची पाणी असून ज्याला कृष्ण तुळस असे सुद्धा म्हटले जाते. या तुळशीची पाने किंचित जाभळ्या रंगाची असते. त्यामुळे तिला कृष्ण तुळस असेसुद्धा म्हटले जाते. या तुळशीची पाने खाल्ल्याने सर्दी, खोकला, ताप यावर लवकर आराम मिळतो.

रान तुळस :

रान तुळस ही भारतामध्ये सर्वत्र आढळून येते. या तुळशीच्या झुडपांची उंची एक ते अडीच मीटर पर्यंत वाढते. या तुळशीचा उपयोग कान दुखी, दात दुखी व लहान मुलांची पोटदुखी यावर केला जातो. पानांचा काढा पाचक पौष्टिक उत्तेजित व शामक तसेच मूत्र म्हणजेच लघवी साफ करणारी आहे. पानांचा रस पोट दुखीवर सुद्धा दिला जातो. या तुळशीचे फुले फिकट हिरवट, पिवळी असून मंजिऱ्यांवर अधिक दाट मंडलामध्ये येतात. तिला जास्त वास असतो तसेच तिचे तेल जंतू रोधक व कमी विषारी असते.

राम तुळस :

राम तुळशीच्या पानांचा रंग हिरवा असून त्यांची पाने खाण्यासाठी गोड लागतात. राम तुळस भगवान श्रीरामांना अत्यंत प्रिय आहे. घरामध्ये राम तुळशीचे रोप लावल्याने घरात सुख शांती आणि ऐश्वर्या नांदते तसेच घरामध्ये ही तुळस लावणे खूपच शुभ मानली जाते. हिंदू धर्मामध्ये या तुळशीला खूप महत्त्व आहे. या तुळशीला लवंगी तुळस असे सुद्धा म्हटले जाते. या तुळशीचा पानांचा सुवास हा लवंग किंवा मसालेदार असा येतो. हे पोटाच्या विकारांसाठी खूपच उपयुक्त आहे.

FAQ

तुळशीपासून किती तास ऑक्सिजन मिळते?

तुळशीपासून वीस तास ऑक्सिजन मिळते असे शास्त्रात सांगितले आहे.

तुळशीचे मुख्य किती प्रकार आहेत?

तुळशीचे मुख्य दोन प्रकार आहेत. एक म्हणजे राम तुळस आणि दुसरी कृष्ण तुळस.

तुळस कधी लावावे?

तुळशीची रोप गुरुवारी शुक्रवारी लावणे योग्य आहे कारण गुरुवारी तुळशीचे रोप लावल्यामुळे श्री विष्णूचा तुमच्यावर आशीर्वाद राहतो. तुळशीला लक्ष्मीची रूप मानले जाते म्हणून शुक्रवारी सुद्धा अंगणी तुळस लावणे लाभदायक ठरते.

कोणत्या धर्मामध्ये तुळस अंगणी लावली जाते?

हिंदू धर्मामध्ये तुळस अंगणात लावली जाते व तिची पूजा सुद्धा केली जाते.

तुळशीमध्ये कोणती औषधी गुण आहेत?

तुळशीमध्ये सर्दी, खोकला, कफ, दात दुखी तसेच पचनसंस्थेविषयीचे विकार दूर करण्याचे औषधी गुण आहेत.

Leave a Comment