Vikram Sarabhai Information In Marathi विक्रम साराभाई हे एक भारतीय भौतिकशास्त्र व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. भारताची इस्रो ही अवकाश संशोधनवर आधारित असलेली प्रमुख संस्था स्थापन करणे सुद्धा डॉक्टर विक्रम साराभाई यांचा हातभार होता. त्यांनी भारतामध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे.
विक्रम साराभाई यांची संपूर्ण माहिती Vikram Sarabhai Information In Marathi
विक्रम साराभाई यांचा जन्म व बालपण :
विक्रम साराभाई यांचा जन्म 12 ऑगस्ट 1919 मध्ये अहमदाबाद येथील एका श्रीमंत कुटुंबात झाला होता, त्यांचे वडील उद्योगपती होते. त्यांच्या वडिलांचे नाव अंबालाल साराभाई होते तसेच त्यांचे बऱ्याच राजकीय व्यक्तींशी सुद्धा संबंध होते.
रवींद्रनाथ टागोर, पंडित जवाहरलाल नेहरू, सरोजनी नायडू, महात्मा गांधी इत्यादी लोक त्यांच्या घरी येत होते तसेच विक्रम साराभाई यांच्या आईचे नाव सरलादेवी होते. त्यांनी त्यांच्या आठ मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःची मॉन्टेसरी पद्धतीची शाळा काढली होती. या शाळेमध्ये विक्रम साराभाईचे शिक्षण झाले होते.
विक्रम साराभाई यांचे शिक्षण :
विक्रम साराभाई यांना शिक्षणाचे लहानपणा पासूनच खूपच आवड होती, त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्या मनावर मोठ मोठ्या स्वातंत्र्यवीरांचा आणि नेत्यांचा प्रभाव पडला होता. त्यांनी चांगलं शिक्षण घेऊन समाज प्रबोधन घडवून आणावं असं वाटत होतं, विक्रम साराभाई यांना गणित आणि भौतिकशास्त्र हे दोन विषय खूपच आवडायचे त्यांच्या घराण्यात श्रीमंती असल्यामुळे लहानपणी विक्रम साराभाई यांना शिकवण्यासाठी युरोपातून शिक्षक बोलावले जायचे.
विक्रम साराभाई यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण राहत असलेल्या ठिकाणीच पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण प्राप्त करण्यासाठी विक्रम साराभाई अहमदाबादमधील गुजराती महाविद्यालयात गेले. त्यांनी उच्च शिक्षण मिळवण्यासाठी इंग्लंड गाठले. इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठामधून त्यांनी रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयावर शिक्षण घेतलं. सेंड जोन्स कॉलेजमधून रसायन शस्त्र व भौतिक शस्त्र या विषयांच्या ट्रायपास परीक्षांमध्ये विक्रम साराभाई उत्तीर्ण झाले होते. 1940 मध्ये त्यांनी बीए आणि 1942 मध्ये एम.ए या दोन पदव्या प्राप्त केल्या .
विक्रम साराभाई यांचे वैयक्तिक जीवन :
त्यांनी 1942 मध्ये लग्न सुद्धा केले, त्यांचा विवाह मृणालिनी यांच्याशी झाला होता ह्या एक सांस्कृतिक नृत्य कलेमध्ये पारंगत होत्या. त्यानंतर यांना पुढे कार्तिकीय आणि मल्लिका अशी दोन अपत्य झाली.
विक्रम साराभाई यांची कारकीर्द :
विक्रम साराभाई यांनी भारताच्या स्पेस क्षेत्रामध्ये आपली महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यामुळे भारताच्या स्पेस क्षेत्रामध्ये सुद्धा प्रगती झाली आणि ज्यामुळे आपल्या भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले. विक्रम साराभाई हे उच्चशिक्षण पूर्ण करण्यासाठी ब्रिटनला गेले होते; परंतु दुसऱ्या महाविद्यालयात सुरुवात झाली आणि त्यामुळे ते आपल्या मायदेशी परत आले.
परत आल्यानंतर विक्रम साराभाई यांच्या आयुष्यामध्ये खूप सुवर्णसंधी चालून आली.
ज्येष्ठ नोबल पुरस्कार मानकरी असलेले शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांच्या सहवासात त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक किरणवर संशोधन करण्यासाठी बोलावले गेले ही संधी त्यांना स्वतः चालून आली होती. भारतात परत आल्यावर विक्रम साराभाई यांनी भारतामध्ये स्वतःचं नाव बनवण्यासाठी सुरुवात केली. दुसरे महायुद्ध संपताच म्हणजे 1945 मध्ये साराभाई पुन्हा ब्रिटनला गेले.
1947 मध्ये साराभाई यांनी भारतामध्ये पुन्हा प्रवेश केला. भारतात परतायच्या आधी कॉस्मिक रे इन्वेटिगेशन इन ट्रॉपिकल लॅटीट्युडस वर संशोधन केले आणि डॉक्टरेट ही पदवी त्यांना प्राप्त झाली. त्यांनी मिळवलेल्या ज्ञानाचा पुरेपूर वापर व्हावा. यासाठी त्यांनी 11 नोव्हेंबर 1947 मध्ये अहमदाबाद येथे भौतिकी संशोधन कार्यशाळा स्थापन केली आणि अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये डॉक्टर विक्रम साराभाई यांनी उल्लेखनीय कामगिरी दाखवली.
विक्रम साराभाई यांच्या भौतिक शास्त्र आणि खगोलशास्त्र या दोन्ही क्षेत्रांमध्ये दिलेल्या कामगिरीमुळे भारताला मोठा फायदा झाला. भारताच्या आर्थिक आणि वैज्ञानिक अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये खूप मोठी प्रगती दिसून आली आणि आपल्या देशासाठी काहीतरी करून दाखवणे हे त्यांचे लहानपणापासूनचे स्वप्न पूर्ण झाले. त्यांनी एक कार्यशाळा स्थापन करून सत्यात उतरून दाखवली. अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही संस्था स्थापन करण्यामध्ये विक्रम साराभाई यांचा खूप मोठा सहभाग होता.
1975 मध्ये भारताने पहिला उपग्रह अवकाशामध्ये सोडला होता. त्याला महान खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचे नाव देण्यात आलं होतं. आर्यभट्ट या उपग्रहाची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटरमध्ये झाली होती. आज भारताने अवकाश क्षेत्रात खूप मोठी प्रगती करून ठेवली आहे आणि त्याचं श्रेय खूप मोठ्या प्रमाणात डॉक्टर विक्रम साराभाई यांना जाते.
विक्रम साराभाई यांनी घेतलेली कष्ट, मेहनत आणि तल्लख बुद्धी या सर्वांच्या जोरावर आज भारत हा देश आघाडीवर आहे. त्यानंतर अनेक उपग्रह अवकाशात आजपर्यंत सोडले गेले आहेत. विक्रम साराभाई यांची ख्याती ही जगभर पसरली त्यानंतर पुढे विक्रम साराभाई यांनी अनेक संशोधन संस्था स्थापन करण्याचा प्रयत्न केला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही भारतातील सगळ्यात उत्तम संस्था विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आली होती.
राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा ही भौतिक शास्त्राच्या संशोधनासाठी सर्वात प्रसिद्ध प्रयोगशाळा असून या प्रयोगशाळेची स्थापना विक्रम साराभाई यांच्या हस्ते करण्यात आली होती. अहमदाबाद टेक्सास्टाईल इंडस्ट्रियल रिसर्च असोसिएशन ही संस्था सुद्धा विक्रम साराभाई यांनी सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी “सेंटर फॉर एन्व्हायरमेंट प्लॅनिंग अँड टेक्नॉलॉजी” ही पर्यावरण क्षेत्रामध्ये प्रसिद्ध असलेली संस्था उभी केली आहे.
1965 मध्ये डॉ. विक्रम साराभाई यांनी नेहरू विकास संस्थेची स्थापना केली आणि आपलं ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचावं असं त्यांना वाटत होतं. आपल्या भारतातील प्रत्येकाने गणित व विज्ञान या विषयाला जास्तीत जास्त अभ्यास करून भारताचे नाव स्वतंत्रपणे तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मोठं करावं अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी विक्रम साराभाई यांनी 1960 मध्ये “विक्रम ए साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटर” ही संस्था स्थापन केली होती.
1970 मध्ये भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संस्था म्हणजे इस्रो हे स्थान संस्था स्थापन करण्यामध्ये विक्रम साराभाई यांचे खूप मोठे श्रेय आहे. भारताच्या उज्वल भविष्यासाठी विक्रम साराभाई यांनी खूपच महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांचा दृष्टिकोन आज भारतासाठी अतिशय मोलाचा ठरलेला आहे. देशाने विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रगती केलेली आहे. त्यांच्या अथक प्रयत्न आज फळाला आले आहे.
विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र :
विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र हे तिरूअनंतपुरम येथे स्थापित करण्यात आले आहे. हे इस्रोचे मुख्य केंद्र आहे. या केंद्रामध्ये रॉकेट, प्रक्षेपण आणि कृत्रिम ग्रहाचा निर्माण आणि त्या संबंधित त्याचा विकास केला जातो.
विक्रम साराभाई यांना मिळालेले पुरस्कार :
- विक्रम साराभाई यांना खगोलशास्त्रज्ञ या क्षेत्रामध्ये दाखवलेल्या कामगिरीसाठी भारत सरकारकडून सन्मानित करण्यात आले होते.
- त्यांना 1962 मध्ये भारत सरकार द्वारे शांती भटनागर पुरस्कार देण्यात आला.
- 1966 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- 1972 मध्ये पद्मविभूषण मरणोत्तर हा पुरस्कार मिळाला.
विक्रम साराभाई यांची निधन :
विक्रम साराभाई यांची निधन 30 डिसेंबर 1971 रोजी झाले. हे भारताचे महान खगोलशास्त्रज्ञ होते.
FAQ
डॉ. विक्रम साराभाई यांचा जन्म कधी झाला.
डॉ. विक्रम साराभाई यांचा जन्म 12 ऑगस्ट 1919 रोजी झाला.
इस्रो या संस्थेची स्थापना कोणी आणि केव्हा केली?
इस्रो या संस्थेची स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी झाली आणि त्याची स्थापना डॉ. विक्रम साराभाई यांनी केली.
भारतीय अंतराळ संशोधनाचे खरे शिल्पकार कोण?
डॉ. विक्रम साराभाई.
विक्रम साराभाई यांचा मृत्यू कधी झाला
30 डिसेंबर 1971.
विक्रम साराभाई यांच्या पत्नीचे नाव काय होते?
मृणालिनी.