मिसळ पाव रेसिपी मराठी Misal Pav Recipe in Marathi मिसळ पाव हे एक महाराष्ट्रीयन स्ट्रीट फूड असून ते खूप लोकप्रिय आहे. जे चवीला अत्यंत मजेदार आणि चविष्ट लागते. कोल्हापुरी मिसळ पाव मुंबईच्या पाव भाजी प्रमाणेच खूपच लोकप्रिय आहे. बरेच लोक मिसळ पावला उसळ पाव देखील म्हणतात.
कोल्हापुरी मिसळ मसालेदार आणि खूपच स्वादिष्ट असते. ज्या लोकांना मसालेदार जेवण आवडते त्या लोकांकरिता हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध नाष्टा आहे.
जर तुम्हालाही मिसळपाव खायला आवडत असेल तर त्यासाठी तुम्ही आता घरी ही मिसळपाव बनवू शकता. कारण आम्ही तुमच्याकरिता घेऊन आलो आहोत मिसळ पाव रेसिपी विषयीची माहिती. ही रेसिपी एकदा तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला आणि तुमच्या मुलांनाही रेसिपी नक्कीच आवडेल. तसेही ही रेसिपी बनवणे काही अवघड काम नाही. आणि त्याच करिता तुमच्या घरामध्ये उपलब्ध असलेले साहित्य व मसाल्यांचा देखील तुम्ही उपयोग करू शकता.
मिसळ पाव रेसिपी मराठी Misal Pav Recipe in Marathi
मिसळपावचे प्रकार :
मिसळ पावची मुख्यतः दोन प्रकार पडतात त्यामध्ये करी मध्ये असलेले जाड मिश्रण आणि दुसरा म्हणजे रस्सा किंवा ग्रेव्ही युक्त मिसळपाव. मिसळ पाव चा उगम हा खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रदेशात झाला असे मानले जाते परंतु आता स्पेशल नाशिक मिसळपाव, पुणेरी मिसळपाव, कोल्हापुरी मिसळपाव, नागपुरी मिसळपाव आणि खानदेशी मिसळपाव हे प्रकार पाहायला मिळतात. तुम्ही हे मिसळपाव सकाळी नाष्टा म्हणून किंवा दुपारी किंवा रात्रीपर्यंत कधीही खाऊ शकता.
वाढीव :
मिसळपाव ही रेसिपी आपण 5
लोकांकरता करणार आहोत.
पूर्वतयारी करण्याची वेळ :
मिसळपावची तर पूर्वतयारी करण्याकरिता
आपल्याला किमान 15 मिनिटे एवढा
कालावधी लागतो.
कुकिंग टाईम :
मिसळपाव कुक करण्यासाठी
आपल्याला एक तास लागतो.
टोटल टाईम :
मिसळ पाव तयार करण्याकरिता
पूर्वतयारी आणि कुकिंग टाईम म्हणून
आपल्याला एक तास पंधरा मिनिटे
एवढा कालावधी लागतो.
साहित्य :
सुरुवातीला मिसळपावची पेस्ट तयार करण्याकरता लागणारे साहित्य पाहूया :
1) दोन टीस्पून आले लसूण पेस्ट
2) दोन टीस्पून तेल
3) एक मोठा बारीक चिरलेला कांदा.
4) दोन बारीक चिरलेले टोमॅटो
5) पाव कप किसलेले नारळ.
ग्रेव्ही बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
1) तीन टीस्पून तेल
2) एक टीस्पून लाल मिरची पेस्ट
3) मीठ
4) एक टीस्पून गरम मसाला
5) एक टी स्पून जिरे धने पावडर
6) अर्धा टीस्पून हळद
7) अर्धा टीस्पून दालचिनी लवंग पावडर
8) तीन कप पाणी
उसळ बनवण्यासाठी लागणारी सामग्री :
1) 3टीस्पून तेल
2) दोन टीस्पून लसूण अद्रक पेस्ट.
3) अर्धा टीस्पून हिंग
4) एक कप बटाटे
5) दीड कप मट भिजवलेली
6) अर्धा टीस्पून हळद
7) एक टीस्पून गरम मसाला
8) अर्धा टीस्पून दालचिनी लवंग पावडर
9) लिंबाचा रस, तीन कप पाणी, चवीनुसार मीठ
पाककृती :
- तर मिसळपाव रेसिपी कशी बनवायची त्याची आपण कृती पाहूया.
- कढई गरम होण्यासाठी ठेवली असता त्यामध्ये तेल टाकावे. तेल गरम झाले की त्यामध्ये लसूण, कांद्याची पेस्ट घालावी. पेस्ट हलक्या तपकिरी रंगाची होईपर्यंत ती परतावित राहावी.
- नंतर त्यामध्ये टोमॅटो आणि खोबरे घाला. काही मिनिटं हे मिश्रण भाजल्यानंतर ते थंड होण्यासाठी ठेवा. मिश्रण थंड झाल्यावर बारीक करून घ्या.
- मिसळ पाव ग्रेव्ही बनवण्यासाठी आता कढईत तेल गरम करा व त्यामध्ये किसलेला पेस्ट घाला आणि दोन मिनिटे छान भाजून घ्या.
- नंतर त्यामध्ये मीठ, लाल तिखट, गरम मसाला, जिरे धने पावडर, लवंग-दालचिनी पावडर घालून चांगले मिक्स करा. त्यानंतर त्यामध्ये पाणी घाला हे मिश्रण तेल सोडेपर्यंत शिजवायचे आहे. मिश्रण झाल्यानंतर हे एका भांड्यात बाजूला काढून ठेवा.
- आता आपण उसळ कशी बनवायची ही कृती पाहूया.
उसळ बनवण्यासाठी तेल गरम करून घ्या त्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि हिंग घालून चांगले परतून घ्या. - रात्रभर भिजत ठेवलेल्या उसळ मध्ये आता बटाटे मिसळून घ्या. नंतर त्यामध्ये हळद मीठ गरम मसाला लवंग दालचिनी पावडर आणि लिंबाचा रस घाला.
- नंतर पाणी घालून ते आठ ते दहा मिनिटे मिश्रण शिजवा.
- हे मिश्रण शिजल्यानंतर एका भांड्यात काढून घ्यावे आणि बाजूला ठेवावे.
- मिसळ पाव बनवण्याकरता एका भांड्यात प्रथमतः तयार केलेली उसळ टाका. यानंतर तयार केलेली ग्रेव्ही घाला आणि चिरलेला कांदा तसेच फरसाण यांची मिश्रण घाला.
- नंतर त्यावर कोशिंबीर घाला आणि पाव तसेच लिंबाच्या कापांसह खायला द्या.
अशाप्रकारे मिसळ पाव ची सजावट करावी.
पोषक घटक
मिसळ पाव मध्ये कार्बोहायड्रेट कॅलरीज आणि प्रोटीनचा स्त्रोत असतो. त्यामुळे मिसळ पाव खाणे शरीरासाठी चांगले आहे.
तसेच आपण इतर साहित्यांचा म्हणजेच फळभाज्यांचा देखील त्यामध्ये उपयोग केलेला आहे त्यातूनही शरीराला बरेच प्रोटीन मिळते.
फायदे :
मिसळपाव हा एक पौष्टिक नाश्ता असून तो लहान पासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी पौष्टिक आहे.
मिसळ पाव हा वृद्धांसाठी देखील पौष्टिक आहार ठरू शकतो. त्यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट तत्त्व तसेच प्रोटीन शरीरासाठी आवश्यकच असते. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक्षमता देखील वाढते.
तोटे :
जरी मिसळपाव हा पौष्टिक नाश्ता असला तरीही इतर रुग्णांसाठी तो हानिकारक ठरू शकतो.
त्यामध्ये वापरण्यात येणारे मसाले शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे मिसळपावचे सेवन ज्यांना शक्य आहे त्यांनीच करावे.
तर मित्रांनो, तुम्हाला आजची मिसळ पाव ही रेसिपी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.