Shivtharghal Information In Marathi शिवथरघळ ही रायगड जिल्ह्यामध्ये येणारी एक निसर्ग सौंदर्याने नटलेली घळ आहे. ती महाड पासून केवळ 30 किलोमीटर अंतरावर आहे तसेच त्याच्या सर्व बाजूंनी उंच उंच पर्वत वाघजाई दरीच्या कुशीत हे ठिकाण वसलेले आहे. काळ नदीचा उगम याच परिसरात आहे. त्यानंतर पुढे ही नदी सावित्री नदीला जाऊन मिळते आणि काळच्या या काठावर कुंभे, कसबे व आंबे अशी तीन शिवथर वस्त्या आहेत. याच्या चहुबाजूने वेडलेले हिरवेगार झाडांनी नटलेले डोंगर आहेत. त्याच्या मधोमध शिवथरघळ आहे.
शिवथरघळची संपूर्ण माहिती Shivtharghal Information In Marathi
या घडीला समर्थ रामदास स्वामी यांचा सुंदर मठ असे सुद्धा म्हणतात. ज्यांना पर्यटक करण्याची खूप आवड आहे असे पर्यटक त्यांच्या आयुष्यातील एक सुंदर ठिकाण हे टिकू शकतात. येथे गडकिल्ले आहेत. राजांचा इतिहास तुम्ही पाहू शकता. तुमच्यासाठी ही दुर्ग भ्रमंती आहे, येथील नैसर्गिक वातावरण मन मोहन टाकते असे आहे.
शिवथरघळचा इतिहास :
शिवथरघळ आणि तेथील आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे. हा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. सर्वात सुंदर असे तेथील घनदाट जावळीचे जंगल आहे. शिवथरघळचा इतिहास खूप प्राचीन आहे. हा सर्व परिसर चंद्रराव मोरे जावळीच्या वनात पूर्वी सहभागी होता. जावळीचे मोरे हे विजापूरच्या दरबारचे वतनदार देशमुख होते. त्यांच्याकडील या प्रदेशामुळे ते वरचढ झाले होते. नंतर पुढे 1648 मध्ये शिवरायांनी हा परिसर स्वतः आपल्या ताब्यात घेतला.
समर्थ रामदास 1649 मध्ये या आघाडीमध्ये वास्तव्यासाठी आले नंतर 1660 पर्यंत ही घळ म्हणजेच दहा ते अकरा वर्ष याच ठिकाणी समर्थ रामदास राहिले होते. त्यांनी दासबोध सुद्धा येथेच लिहिला. दासबोधाची साथ आठ दशके त्यांनी या घळीतच लिहून पूर्ण केली होती. 1676 मध्ये दक्षिण दिग्विजयासाठी जाताना श्री समर्थांचा आशीर्वाद येथूनच घेऊन छत्रपती शिवाजी महाराज पुढे गेले होते. या घळीचा शोध धुळे येथील विख्यात समर्थ भक्त श्री शंकर कृष्णदेव यांनी 1916 साली लावला होता.
शिवथरघळवर पाहण्यासारखी प्रसिद्ध ठिकाणी :
शिवथरघळ येथे पाहण्यासारखे अनेक ठिकाण आहेत. येथे दोन्ही बाजूंनी डोंगराचे कडे आपण पाहू शकतो तसेच मध्ये असलेली अरुंधतरी आहे त्यालाच घळ असे म्हटले जाते. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये अशा अनेक घडी तेथे आहेत. अनेक घडींना त्यांचा इतिहास आहे. सर्वात प्रसिद्ध असलेली श्री समर्थ रामदासांची शिवथळ घळ ही तिथल्या निसर्ग सौंदर्यामुळे सुद्धा चर्चेत आहे. तेथे पावसाळ्यामध्ये कोसळणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात.
शिवथर घळ ही वरंधघाट उतरल्यानंतर लागणाऱ्या बिरवाडी गावाजवळ आहे. या घळपर्यंत पायथ्यापर्यंत वाहने जाऊ शकतात. येथे समर्थ रामदासाचे मंदिर 1957 मध्ये बांधण्यात आलेले आहे. तेच समर्थ रामदास यांचे मठ आहे. मठापासून हे मंदिर केवळ अर्ध्या किलोमीटर अंतरावर आहे. मठाच्या माळ्यापर्यंत सुद्धा वाहने तेथे जाऊ शकतात.
घळीच्या मोकाशी दगड आणि मातीच्या बांधलेला एक दरवाजा आहे. गुहेच्या समोर समर्थांच्या बसण्याची जागा आपण पाहू शकता. या गुहेमध्ये एक हजार चौरस फूट क्षेत्र असलेले दगड मातीचे बांधकाम केलेल्या तीन भिंती आहेत तसेच येथे हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या सुद्धा बांधलेल्या आहेत.
गुहेच्या समोरच भिंतीमध्ये समर्थांच्या बसण्याची जागा खोदून काढले आहे. त्यालाच सिंहासन असेल म्हटले आहे तसेच येथे एक देवघर आणि सात कोनाडे आहेत. या घडी पासून अर्धा किलोमीटर अंतरावर गोविंद माची आहे तसेच येथे फुटावर आणखीन रामगंगा नावाचा धबधबा आहे. जो पावसाळ्यामध्ये खूपच सुंदर दिसतो आणि अनेक पर्यटक येथे भेट देण्यासाठी येत असतात.
30 फुटांवर गुप्तगंगा सुद्धा आहे. याच्या जवळच शिवकाळात प्रसिद्ध झालेली जावळीची माळ, मठाची माळ, उंबराचा माळ, बोरीचा माळ, फंशीचा माळ इत्यादी समर्थ साहित्य उपलब्ध या ठिकाणी आहेत. येथे अनेक पर्यटक भेट देत असतात. हे ठिकाण पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत सुंदर व भक्तांसाठी श्रद्धांजली आठवण म्हणून तुम्ही येथे भेट देऊ शकता.
शिवथरघळवर कसे जाल?
शिवथरघळ हे अतिशय सुंदर आहे तसेच तुम्हाला जर येथे जायचे असेल तर येथे अनेक पर्यटक भेट देता; परंतु तेथे जाण्यासाठी तुम्हाला पुण्यावरून धोरण बिरवाडी मार्गे हे ठिकाण 111 किलोमीटर आहे. तुम्ही पुण्यावरून सुद्धा इथपर्यंत बसने किंवा स्वतःची गाडी असेल तर येऊ शकता. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 2,985 फूट उंच आहे. हा प्रदेश खूप सुंदर आहे.
जर तुम्हाला मुंबई-गोवा मार्गाने यायचे असेल तर माणगाव-लोनेरे-महाड बिरवाडी मार्गे 205 किलोमीटर आहे. तुम्हाला जर दुसऱ्या मार्गाने यायचे असेल तर राजगड भूतोंडे आणि बेळवंडी या मार्गे सुद्धा तुम्ही येऊ शकता जर तुम्हाला नदी कोंबड्याचा डोंगर आणि गोप्या घाट मार्गे कसबे शिवतर पर्यंत यायचे असेल तर तसे सुद्धा तुम्ही येऊ शकता. हा मार्ग थोडा अवघड आहे; परंतु येथून तुम्ही निसर्गाचे सुंदर दर्शन घेत या मठापर्यंत पोहोचू शकता. बस स्टॉप पासून केवळ दहा मिनिटे तुम्हाला या मठावर जाण्यासाठी लागतात.
राहण्याची व जेवणाची व्यवस्था :
तुम्हाला येथील पर्यटन ठिकाण पाहायचे असेल किंवा तुम्हाला जर येथे राहायचे असेल तर येथे श्री समर्थ स्वामींचा मठ हा सेवा समितीच्या इमारतींमध्ये बांधण्यात आलेला असून येथे अनेक जणांच्या राहण्याची सोय केली जाते. तसेच तिथे आपण स्वतः शिधा घेऊन गेलो तर जेवणाची सोय सुद्धा होऊ शकते. येथे बाराही महिने पाण्याची सोय असते.
FAQ
शिवथरघळ कोठे आहे?
शिवथरघळ हा रायगड जिल्ह्यामध्ये महाड पासून 30 किलोमीटर अंतरावर आहे.
शिवथरघळ हे कोणाशी संबंधित आहे?
समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली हे एक ठिकाण आहे.
रामदास स्वामींनी या गडावर कोणता ग्रंथाची रचना केली होती?
दासबोध.
शिवथरघळ येथे रामदास स्वामी केव्हा आले?
रामदास स्वामी शिवथरघळ येथे 1649 मध्ये आले.
शिवथर घळीचा शोध कोणी व केव्हा लावला?
शिवथरघळीचा शोध धुळे येथील विख्यात समर्थ भक्त श्री शंकर कृष्णदेव यांनी 1916 साली लावला होता.