कोरफडची संपूर्ण माहिती Aloevera Information In Marathi

Aloevera Information In Marathi कोरफड ही वनस्पती आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे कारण ही एक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला संस्कृतमध्ये कुमारी तर इंग्लिश भाषेमध्ये आलो असे म्हटले जाते. कोरफडचा रस खूपच आरोग्यदायी आहे. कोरफड मध्ये अनेक पोषक घटक असतात, त्यामुळे ते शरीराला पोषक घटकांचा पुरवठा करत असते. त्यामुळे दररोजच्या आहारामध्ये कोरफडीचा रस समाविष्ट करणे आपल्या फायदेशीर ठरते. कोरफड या कुळामध्ये 500 प्रजाती आहेत त्यापैकी ही एक आहे.

Aloevera Information In Marathi

कोरफळची संपूर्ण माहिती Aloevera Information In Marathi

नावकोरफड
संस्कृत नावकुमारी
उपयोगसौदर्य टिकून ठेवण्यासाठी, शरीराशी संबंधित अनेक समस्या दूर करते.
उंची45-60cm
लागवडजुलै -ऑगस्ट

कोरफडचे वर्णन :

कोरफडचे पान म्हणजेच एक झाड म्हणजे रसाळ काटेरी दात असलेला दांडा असतो. कोरफडीची फूल बहुतेक पिवळे, नारंगी, गुलाबी किंवा लाल रंगाची सुद्धा असतात. साधे किंवा पुष्कळ फांद्यांचे हिरव्या नसलेले दातांचे शीर्षस्थानी हे फुल असते.
कोरफड ही वनस्पती मजबूत पानांचा गुच्छ असतो. कोरफडचे उत्पादन वेस्ट इंडीजमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते तसेच कोरफडीचे खोड हे आखूड असून तिची मुळे जमिनीमध्ये जास्त खोलवर गेली नसतात.

तिची पाने मांसल गुच्छासारखे असून 45 ते 60 सेंटिमीटर लांब असतात तसेच एकाड एक मुळापासून निघालेली अशी तिची पाने बिन देठाची असतात. त्यांच्या पानाचा आकार भाल्यासारखा परंतु टोकाकडे मात्र बोथड झालेला असतो. टोकांवर व कडांवर काटे असतात.

फिकट हिरव्या पानांवर पांढरे ठिपक्यांच्या रांगा सुद्धा आपल्याला दिसतील या झाडांना ऑगस्ट-डिसेंबर मध्ये लांब दांड्यावर अनेक लोंबत्या पिवळसर केशरी रंगाच्या लांबट फुलांचा फुलोरा येतो. त्यालाच बोंडे त्रिकोणी व अनेक बीजी असतात.

कोरफडचे फायदे :

कोरफड ही शारीरिक दृष्ट्या अतिशय उपयोगी आहे, त्यामुळे तिला औषधी वनस्पतींमध्ये समाविष्ट केले आहे. कोरफड आपण आपल्या घरातील कुंडीमध्ये सुद्धा लावू शकतो. कोरफड तुम्हाला सर्दी खोकल्यापासून सुटका मिळवून देण्यासाठी डोळे व केस यांची निगा राखण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरते. कोरफडमध्ये अनेक गुणधर्म आहेत जसे सर्दी, खोकला, दमा अशाप्रकारच्या श्वषणाच्या आजारावर सुद्धा कोरफड उपयुक्त ठरते.

श्वसनाचे आजार असतील तर कोरफडीच्या रसामध्ये थोडे मध मिसळून दिवसातून दोन वेळा खाल्ल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होतो. कोरफडचा ताजा रस मलावरोध, अपचन, ऍसिडिटी, मुळव्याध अशा पचन संस्थेची संबंधित आजार दूर करतात. कोरफडीचा रस नियमित घेतल्यामुळे चया पचन प्रक्रिया सुधारून वजन सुद्धा कमी होते. दररोज कोरफडीचा रस घेतल्याने कोलेस्ट्रॉल मधुमेह, मूळव्याध हे आजार सुद्धा कमी होऊ शकतात.

मोबाईल, कम्प्युटर यांसारख्या इलेक्ट्रॉनिक साधनांचा अतिवापर केल्यामुळे झोपताना तुमची डोळे चुरचुर करत असेल तर कोरफडी चा रस पाण्यामध्ये घालून त्याने डोळे धुतल्यावर तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

कोरफड पासून अनेक त्वचा विकार दूर होतात. रक्त विकार सुद्धा कमी होण्यास कोरफड मदत करते. त्यामध्ये जळणे, भाजणं अंग आग होणे, पित्त होणे यांसारख्या त्वचा विकारावर कोरफड खूपच उपयुक्त ठरते.

रात्री झोपण्याआधी कोरफडीच्या घरामध्ये ऑलिव्ह ऑइल एकत्र करून तुम्ही त्वचेला लावल्यास त्वचेवरील काळेपणा, सुरकुत्या, पिंपल्स दूर होतात. त्वचा काळवंडली असेल तर कोरफडीमध्ये लिंबाचा रस मिसळून रात्रभर त्वचेला लावून ठेवल्यास तुम्हाला नक्की फायदा होतो.

कोरफडीचा रस केसांना लावल्यामुळे केसातील कोंडा कमी होतो. आठवड्यातून दोन ते तीन वेळा कोमट खोबरेल तेलामध्ये कोरफडीचा रस घालून केसांच्या मुळांना आणि केसांना लावल्यामुळे केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते तसेच केस गळती सुद्धा थांबते.

कोरफड खाण्याचे तोटे :

कोरफड हे फायदेशीर आहे तसेच कोरफड आपल्या आरोग्य व सौंदर्य टिकवून ठेवते. मात्र कोरफडीचे अति प्रमाणात सेवन केल्यास तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

कोरफडचे जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे तुम्हाला कर्करोग होऊ शकतो तसेच पोटदुखी सारखी समस्या सुद्धा उद्भवू शकतात. कोरफडची ऍलर्जी ज्यांना आहे, त्यांनी कोरफडचे सेवन करणे टाळले पाहिजे.

कोरफडचे जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अनावश्यक कमी झाली तर त्यापासून गंभीर आणि तुमच्या आरोग्याला पोहोचू शकते.

गर्भवती महिलांनी सुद्धा कोरफडचे सेवन करू नये कारण वेळेपूर्वीच त्यांना वेदना सुरू होऊ शकतात. त्यामुळे बाळाला जन्म देण्यास सुद्धा त्यांना अडचणी येऊ शकतात.

कोरफडची लागवड कशी करतात?

कोरफडचे उत्पादन हे कमी पाण्यामध्ये सुद्धा येऊ शकते. त्यामुळे कोरफडची लागवड करण्यासाठी तुम्हाला कोरडवाहू शेती सुद्धा उपयोगी ठरू शकते. पाणथळ जमिनीवर कोरफडची लागवड करता येत नाही तसेच ज्या ठिकाणी खूप थंडी असते, तेथेही कोरफडची लागवड करता येत नाही.

रेताळ आणि चिकन माती असलेल्या जमिनीत यांची लागवड करता येते. तुम्हाला जर कोरफड ची शेती करायची असेल तर त्यासाठी जमीन कमी उंचीवर आणि शेतात पाण्याचा निचरा करण्यायोग्य व्यवस्था करणे गरजेचे असते, त्यामुळे कोरफडची वाढ चांगली होते.

कोरफड ची लागवड केव्हा करावी?

कोरफडची रोपे लावली जातात, ज्यामुळे कोरफडची लागवड फेब्रुवारी ते ऑगस्ट या महिन्यांमध्ये चांगली करता येते. त्यांची लागवड करण्यायोग्य वेळ जुलै-ऑगस्ट आहे. तरीसुद्धा कोरफडची रोपे लावण्यापूर्वी एका एकरात किमान 20 टन शेणखत टाकले पाहिजे.

तीन ते चार महिन्यात चार ते पाच पानांचा रोप लावावा. एका एकरात दहा हजार रोपे लावली जातात. रोपांची संख्या माती आणि हवामानाच्या प्रकारावर सुद्धा अवलंबून असते. जिथे रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होते. तेथे रूपांमध्ये जास्त अंतर ठेवले जाते आणि जिथे वाढ कमी होते किंवा जेथे वातावरण रोपांच्या अनुकूल असते, तेथे जवळ जवळ अंतरावर ही रोपे लावली जातात.

FAQ

कोरफड कशी सेवन करावी?

कोरफडीची साल सोलून त्यामधील घरामध्ये साखर मिसळून तुम्ही खाऊ शकता किंवा मग कोरफडीचा गर मिक्सर मधून बारीक करून तुम्ही त्याचे शरबत करून सुद्धा पिऊ शकता.

चेहऱ्यासाठी कोरफड चा काय उपयोग होतो?

कोरफड मध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे असतात. कोरफडचा गर त्वचेला लावल्यास त्वचेवरील काळेपणा सुरकुत्या पिंपल्स दूर होतात. त्वचा काळवंडली असेल तर कोरफडीमध्ये लिंबाचा रस मिसळून रात्रभर त्वचेला लावून ठेवल्यास तुम्हाला नक्की फायदा होतो.

कोरफडची लागवड तुम्ही घरात करू शकता का?

तुम्ही कोरफड घरात लावू शकता तुम्हाला एखाद्या कुंडीमध्ये किंवा घरात असलेल्या कोपऱ्यामध्ये तुम्ही कोरफडची लागवड करू शकता. कोरफडमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते. त्यामुळे घरात लावल्यामुळे धनवैभव, सुखाची कमतरता राहत नाही.

कोरफड केसांसाठी कसे उपयुक्त आहे?

कोरफड मध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व खनिज असतात. केस तुटणे तसेच केसांची वाढ खुंटणे, डोक्यामध्ये कोंडा होणे यासाठी कोरफड खूपच महत्त्वपूर्ण आहे.

कोरफड खाण्याचे तोटे काय आहेत?

तुम्ही जर कोरफडचे चुकीच्या पद्धतीने सेवन करत असाल तर त्यामुळे शरीरातील पोटॅशियमची पातळी कमी होते व हृदयाचा गतीमध्ये अनियमित्ता व अशक्तपणा यासारख्या समस्या तुम्हाला होऊ शकतात.

Leave a Comment