अक्का मसूर मराठी Akkha Mashoor Recipie In Marathi

अक्का मसूर मराठी Akkha Mashoor Recipie In Marathi  अक्का मसूर हे मसुरच्या डाळीपासून बनवल्या जाणारी रेसिपी आहे. हे खायाला एकदम स्वादिष्ट आणि मसालेदार आहे. हा शुध्द शाकाहारी पदार्थ आहे, अक्का मसूर महाराष्ट्रात सर्वात प्रसिद्ध पदार्थ आहे. विविध ठिकाणी अक्का मसूर वेग वेगळ्या प्रकारे बनवली जाते. आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये पाहिले असेल किती स्वादिष्ट आणि मसालेदार अक्का मसूर मिळते. मसूरची डाळ हे एक कडधान्य आहे, यामुळे यामध्ये विविध पौष्टिक घटक आहेत.

काही ग्रामीण आणि शहरी भागात मसालेदार अक्का मसूर मिळत नाही. काही लोकांना अक्का मसूर खूप आवडते, पण त्याचा परिसरात स्वादिष्ट अक्का मसूर मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे. एकदम सोप्या पद्धतीने हॉटेल सारखी मसालेदार अक्का मसूर कशी बनवतात यांची रेसिपी. आता आपण अक्का मसूर रेसिपी पाहणार आहोत.

Akkha Mashoor

अक्का मसूर मराठी Akkha Mashoor Recipie In Marathi

अक्का मसुरचे प्रकार :

अक्का मसूर हा एक पौष्टिक आणि चवदार पदार्थ आहे, यांचे विविध प्रकार पडतात. जसे अक्का मुसर, मसाला अक्का मसूर, तडका अक्का मसूर, मटर अक्का मसूर, मसूर खिचडी, मसूर डाळ हे सर्व प्रकार एकदम स्वादिष्ट आहेत.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
अक्का मसूर ही रेसिपी आपण 5 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

अक्का मसूरच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ :

अक्का मसूर तयार करण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते, नंतर आपण लवकर अक्का मसूर रेसिपी बनवू शकतो. यासाठी आपल्याला 10 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

अक्का मसूर कुकिंग करण्यासाठी आपल्याला 25 मिनिट वेळ लागतो.

टोटल टाईम :

अक्का मसूर बनवण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते, नंतर कुकिंग करावी लागते. यासाठी आपल्याला टोटल टाईम 35 मिनिट वेळ लागतो.

अक्का मसूरसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) 2 वाटी मसूर डाळ.
2) 2 टोमॅटो.
3) 2 कांदे.
4) 3 चमचे लसन अद्रक पेस्ट.
5) 2 चमचे मिरची पावडर.
6) 1 चमच हळद.
7) 1 चमच गरम मसाला.
8) मीठ, तेल.
9) कोथींबीर.

पाककृती :

  • सर्वात प्रथम टोमॅटो आणि कोथिंबीर स्वच्छ धुऊन घ्या, आणि मसूरची डाळ व्यवस्थित निसून घ्या.
  • नंतर टोमॅटो, कोथिंबीर, आणि कांदा बारीक चिरून घ्या, आणि नंतरच्या कामासाठी बाजूला ठेवा.
  • नंतर 3 ते 4 तास मसूरची डाळ थोड्या गरम पाण्यात भिजू घाला. डाळ चांगली भिजली की बाहेर कडून स्वच्छ धुऊन घ्या.
  • नंतर गॅस चालू करून गॅस वरती कुकर ठेवा, त्यामधे मसुरची डाळ शिजू घाला, 2 ते 3 शिट्या होये पर्यत डाळ शिजू द्या.
  • डाळ चांगली शिजली की गॅस बंद करा, आणि डाळ खाली काढून थोडा वेळ थंड होऊ द्या.
  • आता गॅस वरती एक खोल तळाचा पॅन ठेवा, यांमध्ये आवश्यक तेवढे तेल टाकून गरम करा.
  • तेल गरम झाले की, यामध्ये थोडी मोहरी टाका, मोहरी चांगली फुटली की यांमध्ये लसन-अद्रक पेस्ट टाका.
  • पेस्ट चांगला होय द्या, थोडा लालसर आणि कच्चा वास निघे पर्यत परतवत रहा. नंतर यामध्ये बारीक कांदा टाका.
  • आणि पूर्ण मिश्र करा, कांदा पूर्ण लालसर होये पर्यत भाजून घ्या, नंतर यांमध्ये बारीक टोमॅटो घाला.
  • टोमॅटो 4 ते 5 मिनिट चांगले शिजवू द्या, टोमॅटो थोडे नरम होतील, तेव्हा टोमॅटो झाले समजावे.
  • नंतर यामध्ये मिरची पावडर, हळद, गरम मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करा, मसाल्याचा सुगंध वास येणार.
  • तेव्हा आपला मसाला झाला समजावे. नंतर यांमध्ये आपण शिजवलेली मसुरची डाळ टाका,
  • आणि आवश्यक तेवढे पाणी टाकून, चवीनुसार थोडे मीठ टाका, आणि पूर्ण मिक्स करा.
  • भाजीला एक उकळी येऊ द्या. नंतर यामध्ये बारीक कोथींबीर टाका, आणि भाजी खाली काढून घ्या.
  • आता आपली गरमा-गरम मसालेदार अक्का मसूर खाण्यासाठी तयार आहे, आपण पोळी किंवा भाकरी सोबत अक्का मसूर खाण्याचा आनंद घेऊ शकतो.

अक्का मसूरमध्ये असणारे घटक :

अक्का मसूर हा एक पौष्टिक आहार आहे, यामध्ये विविध प्रकारचे घटक आहेत. जसे. मॅग्निशियॅम, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने, व्हिटॅमिन आणि चरबी हे सर्व घटक आपल्याला शरीरासाठी खूप आवश्यक आहेत.

फायदे :

मसूर हे एक कडधान्य आहे, अक्का मसूर आपण सेवन केली तर आपल्याला मॅग्निशियॅम, सोडियम, पोटॅशियम सारखे घटक मिळतात.

यामुळे आपले शरीर निरोगी राहते, आणि आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते.

यामध्ये असणारे व्हिटॅमिन, चरबी आपल्या मासपेशीत आणि चरबीत वाढ करतात.

हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत.

तोटे :

अक्का मसूर आपण जास्त प्रमाणात सेवन केली तर आपल्याला पोटदुखी होऊ शकते.

यामध्ये असणारे पौष्टिक घटक आपल्या शरीरात जास्त झाले तर, आपण आजारी पडू शकतो.

म्हणून अक्का मसूर आपण योग्य प्रमाणात सेवन केली पाहिजे, ज्यामुळे आपण निरोगी राहू.

तर मित्रांनो, तुम्हाला अक्का मसूर रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment