दालचा मराठी Dalcha Recipie In Marathi

By Wiki Mitra

Published On:

Follow Us
Dalcha

दालचा मराठी Dalcha Recipie In Marathi  दालचा ही रेसिपी तूर डाळ, हरभरा डाळ, आणि मटण पासून तयार केली जाते. ही खायाला एकदम स्वादिष्ट आणि मसालेदार रेसिपी आहे, दालचा हा एक नॉनव्हेज मधील एक प्रकार आहे, जो सर्वाना आवडतो. दालचा हा हैदराबादचे प्रसिद्ध पदार्थ आहे. इथे लोक जेवणासाठी जास्त दालचाचा उपयोग करतात. आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये पाहिले असेल किती स्वादिष्ट आणि मसालेदार दालचा मिळते.

मोठ्या शहरात दालचा रेसिपी सहज मिळून जाते, पण काही ग्रामीण आणि शहरी भागात दालचा सहज मिळत नाही. काही लोकांना दालचा खूप आवडते, पण त्याचा परिसरात स्वादिष्ट दालचा मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे, एकदम सोप्या पद्धतीने स्वादिष्ट दालचा कसा बनवतात यांची रेसिपी. आता आपण दालचा रेसिपी पाहणार आहोत.

Dalcha

दालचा मराठी Dalcha Recipie In Marathi

दालचाचे प्रकार :

दालचा हा एक स्वादिष्ट आणि मसालेदार पदार्थ आहे. दालचा विविध ठिकाणी वेग-वेगळ्या प्रकारे बनवला जातो. जसे दालचा, मसाला दालचा, दालचा करी, पालक दालचा हे सर्व प्रकार एकदम स्वादिष्ट आहेत.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
दालचा ही रेसिपी आपण 6 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

दालचाच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ :

दालचा बनवण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते. नंतर आपण लवकर ही रेसिपी बनवू शकतो, यासाठी आपल्याला 15 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

दालचा कुकिंग करण्यासाठी आपल्याला 25 मिनिट वेळ लागतो.

टोटल टाईम :

दालचा तयार करण्यासाठी पहिले सर्व साहित्य एकत्र करावे लागते, नंतर कुकिंग करावे लागते. यासाठी आपल्याला टोटल टाईम 40 मिनिट वेळ लागतो.

दालचासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) 1 वाटी तुर डाळ.
2) 1 वाटी हरभरा डाळ.
3) 1 पाव मटण.
4) 3 चमचे लसन-अद्रक पेस्ट.
5) 2 कांदे.
6) 2 टोमॅटो.
7) 2 चमचे मिरची पावडर.
8) 1 चमच हळद.
9) 1 चमच गरम मसाला.
10) 3 ते 4 तमालपत्र.
11) 1 चिमूट कस्तुरी.
12) तेल, मीठ.
13) 3 हिरवी मिरची.
14) थोडी कोथिंबीर.

पाककृती :

  • सर्वात प्रथम टोमॅटो, कोथिंबीर, मिरची, स्वच्छ धुऊन घ्या, नंतर सर्व डाळ 2 वेळा स्वच्छ धुऊन घ्या.
  • नंतर टोमॅटो, मिरची आणि कांदा बारीक चिरून घ्या, आणि लसन-अद्रक पेस्ट तयार करून द्या.
  • नंतर एका कुकरमध्ये तूर डाळ, हरभरा डाळ, टोमॅटो, थोडी हळद, आणि आवश्यक तेवढे पाणी टाकून गॅस वरती शिजू घाला.
  • गॅस मध्यम आसेवर ठेवा, आणि 3 ते 4 शिट्या होये पर्यत चांगले शिजवू द्या, आता आपण मसाला तयार करूया.
  • गॅसवरती एक खोल तळाचा पॅन ठेवा, त्यात आवश्यक तेवढे तेल टाकून गरम करा, तेल गरम झाले की.
  • प्रथम यामध्ये कांदा टाका, आणि परतवत रहा, कांदा चांगला पारदर्शी होये पर्यत भाजून घ्या.
  • कांदा झाला की, यामध्ये लसन-अद्रक पेस्ट टाका, आणि पेस्ट थोडा लालसर आणि कच्चा वास निघे पर्यत परतवत रहा.
  • नंतर यामध्ये तमालपत्र आणि बारीक हिरवी मिरची टाका, हे चांगले भाजून घ्या.
  • नंतर यामध्ये स्वच्छ धुतलेले मटणाचे तुकडे टाका, आणि 10 ते 12 मिनिट चांगले शिजवू द्या.
  • नंतर यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, आणि गरम मसाला टाकून पूर्ण मिक्स करा, मसाला चांगला झाला की.
  • यामध्ये थोडे पाणी टाकून मटण मध्यम आसेवर थोडा वेळ होऊ द्या. शिजलेल्या डाळीत थोडी रोयीने घुसळून घ्या.
  • आता ही डाळ मसाल्यात टाका, त्यामध्ये चवीनुसार थोडे मीठ टाका, आणि एक उकळी येऊ द्या.
  • नंतर यामध्ये थोडी बारीक कोथिंबीर टाका, आणि गॅस बंद करून भाजी खाली उतरून घ्या.

आता आपली स्वादिष्ट आणि मसालेदार दालचा खाण्यासाठी तयार आहे, आपण भाकर किंवा पोळी सोबत दालचा घेऊन जेवण करण्याचा आनंद घेऊ शकतो.

दालचामध्ये असणारे घटक :

दालचा हा एक पौष्टिक आहार आहे. यामध्ये विविध प्रकारचे घटक आहेत. जसे प्रोटीन, चरबी, फॅट, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्निशियॅम, प्रथिने, कर्बोदके, व्हिटॅमिन, हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत.

फायदे :

दालचा सेवन केल्याने आपल्याला प्रोटीन आणि कॅल्शियम सारखे पौष्टिक घटक मिळतात, यामुळे निरोगी राहतो.

यामध्ये असणारे फॅट, चरबी आणि कर्बोदके, आपल्या मासपेशीत वाढ करतात.

दालचा मध्ये अनेक प्रकारचे घटक आहेत, जे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत.

तोटे :
दालचा आपण जास्त प्रमाणात सेवन केली तर आपल्याला पोटदुखी, आणि मळ-मळ होऊ शकते.

यामध्ये विविध पौष्टिक घटक आहेत, हे आपल्या शरीरात जास्त प्रमाणात झाले तर आपण आजारी पडू शकतो.

म्हणून दालचा आपण योग्य प्रमाणात सेवन करावे, ज्यामुळे आपण निरोगी राहू.

तर मित्रांनो, तुम्हाला दालचा रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Wiki Mitra

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment