अजिंठा लेणीची संपूर्ण माहिती Ajanta Caves Information In Marathi

By Wiki Mitra

Updated On:

Follow Us
Ajanta Caves Information In Marathi

Ajanta Caves Information In Marathi अजिंठा लेण्या या सोयगाव तालुक्यातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये येतात. या लेण्यांची निर्मिती दुसऱ्या ते चौथ्या शतकापर्यंत झालेली आहे तसेच या शतकामध्ये 29 बौद्ध लेण्या आहेत. छत्रपती संभाजी नगर शहरापासून शंभर ते 110 किलोमीटर अंतरावर वाघुर नदीच्या परिसरा शेजारी या लेण्या आहेत. या लेण्या नदीपात्रापासून 1500 मीटर उंचीवर विस्तीर्ण अशा डोंगरांमध्ये कोरल्या गेलेल्या आहेत.

Ajanta Caves Information In Marathi

अजिंठा लेणीची संपूर्ण माहिती Ajanta Caves Information In Marathi

बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारी ही प्रदीर्घ ऐतिहासिक कालखंडाची पार्श्वभूमी असलेली अजिंठा लेणी भारताच्या जागतिक आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी ओळख करून देणाऱ्या महत्त्वाच्या लेण्यांमधील एक आहे. येथे घनदाट जंगल आणि वेढलेले पर्वत तसेच लेण्या त्यामध्ये आणखीनच भर टाकतात. दरवर्षी येथे अनेक पर्यटक भेटी देण्यासाठी येत असतात. पर्यटक हे देश विदेशातून येत असतात.

पर्यटकांची नेहमीच येथे रेलचेल असते. भारताच्या केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे प्रतिष्ठित पर्यटन स्थळ प्रकल्पामध्ये देशातील बारा पर्यटन स्थळांची निवड करण्यात आली तेव्हा महाराष्ट्रातील अजिंठा वेरूळच्या लेण्यांचा सुद्धा या यादीमध्ये समावेश करण्यात आला होता.

अजिंठा लेणी ही जागतिक वारसा स्थान म्हणून कोणी 1983 साली घोषित केलेली आहे. जून 2013 मध्ये महाराष्ट्राच्या सात आश्चर्याची घोषणा करण्यात आली असताना, त्यामध्ये अजिंठा लेणी हे प्रमुख सातवे आश्चर्य ठरले आहे.

लेण्यांमधील चित्रापैकी एका लेण्याची चित्र वीस रुपयांच्या चलनाच्या नोटावर छापण्यात आलेले आहे. येथे अजिंठा येथे गौतम बुद्धाच्या विविध भावमुद्रा आणि बौद्ध तत्त्वज्ञानाला चित्र शिल्प स्वरूप प्राप्त झाल्याचे आपल्याला तेथे पाहायला मिळते. हे एक अद्वितीय आविष्कारच आहे, अशी ही अजिंठा लेणी सर्व पर्यटकांना आकर्षित करीत असते.

अजिंठा लेण्याचा इतिहास :

अजिंठा लेणी ही भारतातील प्राचीन लेण्यांपैकी एक आहे. भारतामध्ये धर्मशाळा, लेण्या आणि मंदिरे हे मुख्यतः व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत होते. त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रयस्थान मिळावे असा होता.

अजिंठा गावाजवळच्या लेण्यांची निर्मिती सुद्धा याच हेतूने झाली असावी असे मानले जाते. या लेण्यांचा शोध ब्रिटिश सरकारच्या मद्रास इलाख्यातील ब्रिटिश अधिकारी जॉन स्मित हा वाघाच्या शिकारीसाठी गेल्याने 28 एप्रिल 1819 रोजी लागला. स्मिथने येथील दहाव्या क्रमांकाच्या लेणीतील एका खांबावर आपले नाव आणि जन्मतारीख करून ठेवलेले आजही आपल्याला दिसून येते.

पुरातत्व शास्त्रीय पुराव्यानुसार ही लेणी दोन वेगवेगळ्या कालखंडात निर्माण केली गेलेली आहे. 9, 10, 12, 13 आणि 15 अ ही लेणी हीनयान aकालखंडात कोरली गेली असावी असे अनुमान आहे. हा कालखंड साधारणतः दुसऱ्या शतकाच्या सुमारापासून सुरवात सुरू झाला. या सगळ्या लेण्यातून गौतम बुद्धाचे दर्शन स्तूप प्राप्त होते.

या व्यतिरिक्त एक ते 29 क्रमांकाची लेणी साधारणता 800 ते 900 वर्षानंतर महायान कालखंडात निर्माण केली गेली असावी. या लेण्यांतून गौतम बुद्धाचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे स्वरूप दिसते. महायान लेणी वाकाटक राजाचे राजवटीत निर्मिती झाली असेल त्यामुळे त्यास बऱ्याचदा वाकाटक लेणी असे सुद्धा म्हटले जाते. वाकाटक साम्राज्याच्या श्रासानंतर लिहिण्याची निर्मिती अचानकपणे थांबली व हे लिहिणे योजीत भव्यतेपासून वंचित राहिली.

अजिंठा लेणी चित्रकला आणि वस्तू कला अजिंठा लेण्यांच्या भिंती आणि छतावरील कोरीव काम व चित्रे भगवान बुद्धाचे जीवन आणि शिकवण याची दर्शन करतात. अजिंठा येथे 29 गुहा असून ही पूर्वीच्या सभ्यतेच्या वैभवाची आठवण करून देतात.

अजिंठा लेण्यांमध्ये पाच हिंदू मंदिरे आणि 24 बुद्धविहार आहेत. या गुफांपैकी सर्वात आश्चर्यकारक लेणी एक-दोन-चार 16 आणि 17 ह्या आहेत तर 26 ही गुवा सुप्रसिद्ध बुद्ध मूर्तीची प्रकृती आहे. अक्षरशा यु आकाराच्या आणि 76 मीटर उंचीच्या उभ्या खडकाच्या स्कॉर्पिओवर हा खोदल्या गेला आहे.

भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये अजिंठा लेण्यांचा क्रमांक लागतो. आपण या लेण्यांचा इतिहास पाहिला आहे की, त्यांनी किती सुंदर चित्रकला आणि वस्तू कला कोरले आहेत म्हणजेच त्या काळात सुद्धा या शैली अवगत होत्या. त्यांनी बौद्ध मठ म्हणून काम केले आहे.

जे विद्यार्थी आणि भिक्षू अभ्यास करू शकतात. एकांत राहुन भौतिक जग खूप दूर होते आणि त्यांच्या स्थान निसर्गाच्या अगदी जवळ होते. अजिंठा लेण्यांचे चैत्य गुहा गृहात आकर्षक छत मोठ्या खिडक्या आणि भिंती चित्रे आहेत.

सुरुवातीच्या खोदकामात सापडलेल्या लेण्या नाशिक, कोंडे पितळखोरा आणि दख्खन येथे सापडलेल्या. गुहांसारख्याच आहे, वाकाटकच्या कारकिर्दीतील चौथ्या शतकात या गुहांच्या बांधकामाचा दुसरा टप्पा सुरू झाला. या सर्व नयनरम्य आणि कलात्मक लेणे आहेत. या लेण्यांच्या बहुतेक चित्रकला पूर्ण झालेल्या असून आता काही पडक्या अवस्थेत सुद्धा आहेत.

अजिंठा लेण्याची वैशिष्ट्ये

अजिंठा लेण्या घनदाट जंगल आणि वेढलेले पर्वत तसेच लेण्या त्यामध्ये आणखीनच भर टाकतात. दरवर्षी येथे अनेक पर्यटक भेटी देण्यासाठी येत असतात. अजिंठा लेण्यांचे चैत्य गुहा गृहात आकर्षक छत मोठ्या खिडक्या आणि भिंती चित्रे आहेत. अजिंठा येथे 29 गुहा असून ही पूर्वीच्या सभ्यतेच्या वैभवाची आठवण करून देतात.

अजिंठा लेण्यांमध्ये पाच हिंदू मंदिरे आणि 24 बुद्धविहार आहेत. भारताच्या केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे प्रतिष्ठित पर्यटन स्थळ प्रकल्पामध्ये देशातील बारा पर्यटन स्थळांची निवड करण्यात आली तेव्हा महाराष्ट्रातील अजिंठा वेरूळच्या लेण्यांचा सुद्धा या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सात आश्चर्यांपैकी अजिंठ्याच्या लेणींचा सुद्धा त्यामध्ये समावेश केला आहे.

अजिंठा लेणी पर्यंत कसे जाल ?

अजिंठा लेणी पाहण्यासाठी तुम्हाला आधी छत्रपती संभाजीनगर येथे येणे आवश्यक आहे. तेथून अजिंठा जळगाव रस्त्यावर 100 किलोमीटर अंतरावर ह्या लेण्या आहेत. तुम्ही तेथून लोकल टॅक्सी घेऊन सुद्धा भाड्याने जाऊ शकता. हा एक दिवसाचा प्रवास आहे. तुम्हाला जर रस्त्याने जायचे असेल तर अजिंठा येथील रस्ता इतर रस्त्याशी कनेक्ट झालेला आहे. त्यामुळे तुम्ही सहजतेने कोणत्याही शहरातून अजिंठापर्यंत पोहोचू शकता.

अजिंठा येथे तुम्हाला जवळचे बस स्टॅन्ड मिळेल. तुम्ही महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस सुद्धा घेऊ शकता. जर तुम्हाला रेल्वेने अजिंठा येथे जायचे असेल तर जळगाव शहर अजिंठा लेण्यांपासून केवळ 60 किलोमीटर अंतरावर आहे आणि येथे जवळचे रेल्वे स्टेशन हे जळगाव जंक्शन आहे. तिथून तुम्ही भाड्याने ऑटो करून सुद्धा अजिंठा लेणी पाहण्यासाठी जाऊ शकता.

राहण्याची व जेवणाची सोय :

अजिंठा लेण्या तुम्हाला पाहण्यासाठी मुक्काम किंवा जीवनाची आवश्यकता असेल तर डोंगराच्या पायथ्याशी अनेक रेस्टॉरंट व हॉटेल्स स्टॉल आहेत. जिथे तुम्ही आराम करू शकता आणि जेवण सुद्धा करू शकता व तेथील विविध पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.

FAQ

अजिंठा कशासाठी प्रसिद्ध आहे?

अजिंठा येथे प्राचीन बौद्ध आलेले आहेत.तेथे कला, वास्तुकला, चित्रकला आणि भारताच्या आधुनिक संस्कृतीचा तसेच धार्मिक आणि राजकीय इतिहास साठी अजिंठा लेणी प्रसिद्ध आहे.

अजिंठा लेण्या कुठे आहेत?

अजिंठा लेण्या ह्या पश्चिम भारतातील उत्तर व मध्य महाराष्ट्रात आहे.

या लेण्याची बांधकाम कधी झाले ?

या लेण्याचे बांधकाम दुसऱ्या ते चौथ्या शतकामध्ये झाले असे वाटले जाते.

अजिंठा येथे किती लेण्या आहेत?

अजिंठा येथे प्रसिद्ध 29 लेण्या आहेत.

अजिंठा या लेण्यांचा शोध कधी लागला?

28 एप्रिल 1819.

Wiki Mitra

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment