Thane District Information In Marathi ठाणे जिल्हा भारत देशाच्या महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचा जिल्हा असून, महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील कोकण या प्राकृतिक विभागात हा जिल्हा येतो. ठाणे या जिल्ह्यांमधून 1 ऑगस्ट 2014 रोजी पालघर या जिल्ह्याचे विभाजन होऊन, ठाणे व पालघर ही दोन स्वतंत्र जिल्हे निर्माण झाली आहेत.
ठाणे जिल्ह्याची संपूर्ण माहिती Thane District Information In Marathi
येथील स्थानिक प्रमुख भाषा “आगरी बोली” या नावाने ओळखली जात असून या जिल्ह्यात मुख्यतः आगरी, कुणबी, ठाकर व आदिवासी इत्यादी समाजाच्या लोकांचे समूहाने वास्तव्य आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने बघता एकूण लोकसंख्या “कुणबी व आगरी” या दोन समाजांची अधिक आहे.
ठाणे या जिल्ह्याचा विस्तार पश्चिम दिशेला अरबी समुद्राच्या किनारपट्टी सह मुंबई जिल्ह्याला देखील लागून आहे. उत्तर दिशा चा विचार करता उत्तरेला पालघर या ठाणे मधूनच विभाजित झालेल्या जिल्ह्याची सीमा लागते.
पूर्व दिशेस अहमदनगर व नाशिक, तर दक्षिण दिशेला रायगड तसेच पुणे जिल्ह्याच्या सीमा लागतात. कोकण या महाराष्ट्राचे नंदनवन असणाऱ्या प्राकृतिक विभागात येणाऱ्या ठाणे या जिल्ह्याला अरबी समुद्राचा अथांग असा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेला आहे.
या जिरायगड जिल्ह्याची संपूर्ण माहिती ल्ह्यात 27 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला असला तरीही, पाण्याच्या कमी असणाऱ्या खोली मुळे या किनारपट्टीवर मोठी जहाजे व मालवाहू बोटी येऊ शकत नाहीत. त्यामुळे या जिल्ह्यात मोठया मोठ्या बंदरांचा विकास झालेला नाही.
मात्र पर्यटकांच्या बोटी, समुद्रात छोट्या मासेमारी करणार्या मच्छीमारांच्या बोटी तसेच पाण्याचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांच्या लॉन्चेस इत्यादी आश्रय घेऊ शकतील इतपत पाणी या किनारपट्टी वर असल्याने येथे काहीशा प्रमाणात का होईना मच्छीमारी व पर्यटन या दोन व्यवसाय यांचा विकास झालेला आढळून येतो.
त्याच प्रमाणे येथे औद्योगिक क्षेत्रविकास देखील झपाट्याने झालेला बघावयास मिळतो. या जिल्ह्यात प्रामुख्याने सात इतके तालुके येतात. यामध्ये ठाणे शहर, कल्याण, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ, शहापूर व उल्हासनगर या सात तालुक्यांचा समावेश होतो.
यातील शहापूर हा तालुका “100% पेसा क्षेत्र” म्हणून गणला जातो. औद्योगिक क्षेत्राचा विकास हा ठाणे जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा समजला तरीही वावगे ठरणार नाही.
सन 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार ठाणे या जिल्ह्याचा “तृतीय अर्थात तिसरा” क्रमांक लागतो. संपूर्ण महाराष्ट्राच्या 1.37 टक्के इतके क्षेत्र म्हणजेच जवळ जवळ 4214 चौरस किलोमीटर इतके ठाणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे. त्या जिल्ह्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याला सह्याद्रीच्या डोंगर कड्यांचे सावली लाभलेली आहे.
तसेच भारताची आर्थिक राजधानी असे समजल्या जाणाऱ्या जाणाऱ्या मुंबई जिल्ह्याला ठाणे जिल्हा अगदीच हाकेच्या अंतरावर आहे. तसेच व्यापार आणि वाणिज्य या अर्थाने अतिशय समृद्ध अश्या गुजरात राज्य पासूनही ठाणे जिल्हा अगदीच जवळ आहे. या जिल्ह्यामध्ये मुख्यतः ठाणे कल्याण उल्हासनगर अंबरनाथ व भिवंडी या तालुक्यामध्ये औद्योगिक विकास फार मोठ्या प्रमाणावर झालेला आढळून येतो.
हे वरील सर्व तालुके मुंबई जिल्ह्याच्या धरतीवर आपला औद्योगिक विकास करून प्रगतीच्या दिशेने फार वेगाने वाटचाल करताना आढळून येतात. महाराष्ट्राच्या 720 किलोमीटर लांबीचा किनारपट्टी पैकी 27 किलोमीटर किनारपट्टी ठाणे जिल्ह्यास लाभलेली आहे.
यामध्ये 7642 हेक्टर क्षेत्र मासेमारीसाठी उपलब्ध झालेले आहे. या जिल्ह्यात खाऱ्या पाण्यातील मासेमारी सह गोड्या पाण्यातील मासेमारी देखील केली जाते, आणि हा संपूर्ण माल मुंबई या जिल्ह्यामध्ये विकला जातो.
वर पाहिल्याप्रमाणे औद्योगिक विकासाचा विचार करता ठाणे हा जिल्हा राज्यात तृतीय क्रमांक पटकावतो. यातील निम्म्याहूनही अधिक जिल्हे केवळ औद्योगिक विकासाच्या जोरावरच पुढारलेली आहेत यात नवल वाटायला नको.
या जिल्ह्यात एम. आय. डी. सी. या महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अंतर्गत विविध औद्योगिक इस्टेट्स विकसित करण्यात आलेले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रचंड मागणी, हाकेच्या अंतरावर असणारे मुंबई जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बंदरे तसेच राज्य व केंद्र शासन अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ हा या ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक भरभराटीचा पाया म्हणल्यास वावगे ठरायला नको.
जिल्ह्याच्या दक्षिण व पश्चिम दिशेस औद्योगिक व्यवसायांचे केंद्रीकरण झालेले बघावयास मिळते. खते, औषधे व रसायने या मोठ्या प्रमाणावरील उद्योगांसह प्लास्टिक उद्योग, लोह उद्योग, यंत्रमागावरील कापड हे छोटे मोठे उद्योग देखील या भागात बरेच बघायला मिळतात.
महाराष्ट्राचे मँचेस्टर समजल्या जाणाऱ्या इचलकरंजी नंतर टेक्सटाइल मार्केट मध्ये ठाणे जिल्ह्याचा द्वितीय क्रमांक लागतो. यातील भिवंडी हे शहर कापड उद्योगासाठी लोकप्रिय आहे. केंद्र सरकार द्वारे अंबरनाथ येथे संरक्षण साहित्य निर्मिती प्रकल्प प्रायोजित केला गेला आहे.
वाढते औद्योगिक क्षेत्र हाच येथील निपून आणि कौशल्य कामगारांसाठी रोजगाराचा चिराग आहे. त्याचबरोबर कुशल कामगारांनाही येथे चांगल्या वेतनावर रोजगार मिळतो. जरी या राज्यात खान व्यवसाय खनिजांच्या कमी उपलब्धतेमुळे कमी प्रमाणात असला, तरीही बांधकाम क्षेत्रासाठी लागणाऱ्या वाळूचे उपसा देखील मुरमा, ठाणे आणि घोडबंदर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालतो.